संगणकावर वेबसाईट, युट्यूबच्या माध्यमातून जगातल्या कुठल्याही विषयाची माहिती, प्रात्यक्षिकासह मिळवणं सहज शक्य आहे. पण ज्ञान मिळविण्यासाठी गुरूशिवाय पर्याय नाही. खासकरून शास्त्रीय संगीताची विद्या गुरूविना मिळवणे अशक्यच. पण सुधीर गद्रे यांनी संगीतातले राग, ते कधी व कसे गावेत याची शास्त्रोक्त माहिती तीही श्रवणीय प्रात्यक्षिकासह देणारी www.oceanofragas.com ही वेबसाईट तयार केली आहे. त्यामुळे गुरुकुलात जाणं शक्य नसणार्यांना संगणकासमोर एकलव्यासारखं गाणं शिकता येणार आहे.
रसिकांनी लगेचच पाहावी अशी ही साईट आहे. साईट उघडताक्षणीच तुम्ही ज्यावेळी साईट उघडता त्या वेळेच्या रागाचे सूर कानी पडतात. साधारणत: दोन मिनिटांपासून तीन मिनिटांपर्यंतची गाणी ऐकून पुढे जाता येते. पुढच्या भागात रागशोधचक्र ज्यात तुम्हाला रागाचे नाव, थाट, काही स्वरसंगती, मेलकर्ता या आधारे राग शोधता येतो. एखादा थाट निवडला तर त्या थाटातले एकूणएक राग तुमच्यासमोर हजर होतात. अल्फाबेटीकलीपण राग शोधता येतात. त्या रागांच्या नावावर क्लिक केले असता त्या रागासंबंधी पूर्ण माहितीपट आपल्यासमोर उभा ठाकतो.
साधारणत: एक हजारपेक्षा जास्त रागांची यात आवश्यक ती सर्व माहिती यामध्ये संग्रहित आहे व सुमारे ५००पेक्षा अधिक वेगवेगळ्या रेकॉर्डेड रागांचे हे कलेक्शन आहे. राग समयचक्र हे या साईटचे आणखीन एक वैशिष्ट्य.
एकदा आपल्याला पाहिजे तो राग सापडला की त्याविषयी आणखीन बरीच काही माहिती या साईटवर मिळते. संगीतविषयी झालेले काही प्रयोग, संदर्भग्रंथ व काही उपयुक्त वेबसाइटची माहितीपण दिलेली आहे.
सुधीर गद्रे हे मूळचे गिरगावातले. इंजिनीयरिंग केल्यानंतर पुण्यात ते स्थायिक झाले. त्यांची आई मंदाकिनी विश्वनाथ गद्रे या मास्टर नवरंगांच्या शिष्या. १९४२ ते १९७२ अशी जवळजवळ ३० वर्षे मुंबई रेडिओ स्टेशनवर त्या गात होत्या. इंजिनीयरिंग क्षेत्रात नोकरी सुरू झाल्यावर पहिल्या तीन वर्षांत तीन वर्षांचा B.Music चा कोर्स त्यांनी पुरा केला होता. अभ्यास करीत असताना आईच्या गाण्याचा कानावर पडलेला. रियाज, संगीतविषयक पुस्तकांचे वाचन व खूप मोठ्या मोठ्या गवय्यांची ऐकलेली गाणी याचा कुठेतरी खोलवर झालेला परिणाम म्हणजे ही ‘या वेबसाईट व त्याद्वारे झालेली गानकलेची सेवा’ असे सुधीर सांगतात.
५०० हिंदुस्थानी व ५०० कर्नाटक रागांची माहिती असलेल्या सुब्बाराव यांच्या पुस्तकांमुळे त्याच्या कामाला खरी दिशा व गती मिळाली. एकाच नावाचे दोन राग व एकाच रागाला दोन वेगवेगळी नावे असे जेव्हा आढळले तेव्हा पं. भातखंडेबुवा, पं. व्ही. एन. पटवर्धन, पं. मिराशीबुवा, पं. माणिकराव ठाक यांसारख्या जाणकारांच्या पुस्तकांचा आधार घेतला आहे. दीड वर्षाच्या अथक परिश्रमातून तयार केलेली ही संपूर्ण वेबसाईट सलग पाहायला व त्यावरील राग ऐकायला किमान दीड दिवसाची सवड काढावी लागेल इतकी माहिती यात संग्रहित आहे.
सौजन्य :- मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.

No comments:
Post a Comment