Monday, February 28, 2011

नो स्मोकिंग!

आता तरी स्मोकिंग सोडा . . .
वॉशिंग्टनमधील वृत्त स्मोकिंग करणार्‍यांसाठी धक्कादायकच आहे. तेथे भाड्याच्या घरात धूम्रपान करण्यास घरमालकांनी पायबंदी घातली आहे. अमेरिकेत रेस्टॉरंट, कार्यालय, सार्वजनिक स्थळे, क्लब व बीयर बारमध्ये स्मोकिंग करण्यावर निर्बंध घातले आहे. भविष्यात धूम्रपान करणार्‍यांची मोठी गोची होणार आहे. त्यांना धूम्रपान करण्यासाठी वारंवार दंड भरावा लागेल किंवा सिगारेट ओढणे तरी बंद करावे लागणार आहे.


जागतिक आरोग्य संघटनेनुसार तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्‍यांना हृदयविकार, कॅन्सर व इम्फेसिमासारखे भयानक आजार होऊ शकतात. संयुक्त राष्ट्राच्या 19 राज्यांमधील सुमारे 2300 शहरात सिगारेट ओढणार्‍यांविरुद्ध कायदा लागू करण्यात आला आहे. त्यात न्यूयॉर्क, लॉस एंजिल्स, शिकागो व वॉशिंग्टन आदी मोठी शहरे सहभागी झाली आहेत. हिंदुस्थानातही सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणार्‍या व्यक्तीविरुद्ध कठोर कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे.

एवढे असूनदेखील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंदुस्थानात 25 कोटी लोक सिगारेट किंवा तंबाखू सेवन करतात ही धक्कादायक माहिती आरोग्य मंत्रालयातून उपलब्ध झाली आहे. वयाच्या 30 ते 40 वषार्र्त हार्टऍटॅक येण्यामागे सिगारेट ओढणे हे सगळ्यात मोठे कारण असल्याचे कॅन्सर रोगतज्ज्ञांनी म्हटले आहे.

सौजन्य :- एक मराठी वृत्तपत्र.

No comments: