महाराष्ट्राला सुमारे ७२० कि.मी. लांबीचा सागरकिनारा लाभला आहे. हिरवीगर्द झाडी, लाल माती, गरजणारा दर्या आणि रुपेरी वाळू यांचं लेणं लेवून ही किनारपट्टी आपल्याला साद घालते आहे. या भूमीशी भगवान परशुरामांचं नातं जोडलं आहे. ऐतिहासिक गड-किल्ल्यांची सफर करत अस्सल कोकणी स्वादामध्ये आणि मोकळ्या मनाच्या कोकणी सौंदर्यामध्ये तुम्ही नक्कीच हरवून जाल.कोकणातील सुग्रास जेवण मनात दडून बसलेल्या खवय्यांना जागे करा आणि अस्सल कोकणी लज्जतदार, चटकदार, चमचमीत मेजवानी घ्या.
प्रदूषणमुक्त शांत समुद्रकिनारी कौलारू घरात नारळ, सुपारीच्या बागेत प्रेमळ अगत्य ही येथे खवय्यांसाठी तर खासीयत आहे. कांदापोहे, रव्याचे लाडू, उपमा, गोड शिरा, करंजी, कोकणी खाजा, शंकरपाळी, बटाटावडा, तरी मारलेली मिसळ, अळूवडी, थालीपीठ, कोथिंबीरवडी, नारळीपाक, पुरीभाजी, उकडीचे मोदक, पोहे चिवडा, शेवचिवडा, बेसनवड्या, राजगिरा लाडू इ. सकाळच्या न्याहरीमध्येही इथं मांसाहारी टच दिसून येतो. अंडापोळी, भाकरी, तळलेली सुकट व भाकरी, नाचणीची भाकरी असा न्याहरीचा बेत इथं असतो. वरणभात, घावणे, तिळाचा (तिळकूट) लावलेली गवारीची भाजी, तिळकूट लावलेल्या शेवग्याच्या शेंगा, वांगेभरीत, माठाची भाजी, वालाच्या दाण्याची भाजी, मटकीची उसळ, चवळीची उसळ, पुरणपोळी, आमरस, दही, ताक असा शाकाहारी आहार असतो.
पर्यटक पाहुण्यांसाठी खास मांसाहारी कोकणी पाहुणचार केला जातो. यात कोंबडी (सागुती) वडे, आंबोळी, तांदळाची भाकरी, सुके मटण, कोलंबी फ्राय, तळलेली सुरमईची तुकडी, कडक तळलेले बोंबील, तळलेले पापलेट, हलवा फ्राय, सुकी कोलंबी, कोलंबी रस्सा, तिसर्या रस्सा, चिंबोरी, खेकड्याचा रस्सा, झिंगा फ्राय, मटणाचा झणझणीत रस्सा, सोलकढी, मांदेली फ्राय, बांगडा फ्राय, बांगडा रस्सा, तळलेले कालव्याचे गर, शिवल्या भरीत अशी आकर्षक मेजवानी असते. नारळ, रोठा सुपारी, खारा तांदूळ, पोहे, वाल, चवळी, फणस, आंबे, करवंद, कोकम सरबत, आवळा सरबत, आंबा पोळी, फणसपोळी, पोहेपापड, नाचणी पापड, बटाटापापड, पोहे, मिरगुंडा मिरचीचे लोणचे तसेच आंब्याचे लोणचे, सांडगे, मिरची, आवळा कॅण्डी, मँगोपल्प, कोकम आगळ, आमसूल, आंबावडी, मोरावळा, काळीमिरी, दालचिनी, जाम, सुकी मासळी कोकणमेव्याची रससंपदा आपल्या आनंदात भर घालते.
- मंगेश निंबरे
पर्यटनासाठी कोकणात जायचे म्हटले की, सर्वांच्या चेहर्यावर एक वेगळा आनंद फुलून येतो. शांत, सुंदर समुद्रकिनारे, नारळी पोफळीच्या बागा, गडकिल्ले, शिल्पकलेचा अप्रतिम ठेवा असलेली मंदिरे, पुरातन वास्तू, स्मारके आदी अनेक गोष्टी कोकणात पाहण्यासारख्या आहेत. कोकणात येणारे पर्यटक येथील सह्याद्रीचे कडे, सुंदर निसर्ग संपदा याच्या सान्निध्यात चार दिवस भटकंती करण्यासाठी खास करून येत असतात. याचबरोबर कोकणातून परत जाताना इथला खास कोकणी मेवा विकत घेऊन जातात.
संगमेश्वरची मोहनपुरी
ज्याप्रमाणे सिंधुदुर्गात मालवणी खाजाचे नाव आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वरची मोहनपुरी प्रसिध्द आहे. मालवणी खाजा आणि संगमेश्वरच्या मोहनपुरीत बराच फरक आहे. मैदा, खाद्यरंग, शुद्ध शेंगदाणा तेल आणि साखरेच्या पाकापासून बनविली जाणारी ही मोहनपुरी पीठ मळण्यापासून ते साचेबद्ध पध्दतीत तयार करताना ती हातानेच तयार केली जाते हे विशेष. एकदा का साखरेच्या पाकातून ही मोहनपुरी बाहेर काढली की तिला पाहिल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटणारच.
रत्नागिरीच्या चिंगळांची न्यारी लज्जत
रत्नागिरीच्या समुद्रात मुबलक प्रमाणात मिळणारी चिंगळ ही केवळ मुंबईच्या मासळी बाजारापुरती मर्यादित राहिली नसून ती थेट परदेशातही निर्यात केली जातात. त्यामुळे रत्नागिरीत येणारे पर्यटक येथील चिंगळांची चव घेतल्याशिवाय पुढील प्रवासाला फिरत नाहीत. ही मासळी तयार करण्याची पध्दत वेगवेगळी असून यासाठी वापरण्यात येणारा खास कोकणी गरम मसाला यामुळे याला येणारा आगळा स्वाद सर्वांच्या जिभेवर कायम तरळत राहतो.
सिंधुदुर्गातील मालवणी खाजा व सोलकढी
सिंधुदुर्गात गेल्यावर येथील मालवणी खाजाची चव चाखली नाही तर सिंधुदुर्गाची सफर झाली असे वाटत नाही. गूळ, चण्याचे पीठ, आले असे पदार्थ वापरून तयार होणारा हा मालवणी खाजा केवळ कोकणात नव्हे तर संपूर्ण राज्यांत प्रसिध्द पावला आहे. याचबरोबर सिंधुदुर्गात ठिकठिकाणी मिळणारे गुळाच्या चिकीत बनवलेले शेंगदाण्याचे लाडूही सर्वांचे आवडते खाद्य बनले आहे. या पदार्थांप्रमाणेच सिंधुदुर्गात मिळणारी झणझणीत सोलकढी हेसुध्दा येथील खाद्यपदार्थांचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी जेवणानंतर मात्र सोलकढी हवीच असे येथील समीकरण आहे. सिंधुदुर्गातील मालवणी मसाला हा या सर्व शाकाहारी आणि मासांहारी पदार्थांमध्ये आगळी लज्जत आणतो.
पुळ्यातील उकडीचे मोदक
गणपती आणि मोदकाचा अनोखा नातेसंबंध आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे हा मोदकांचा बेत वर्षभर ठरलेलाच असतो. सुंदर समुद्रकिनारा आणि स्वयंभू देवस्थान यामुळे देशाविदेशातील पर्यटक कोकणात आल्यावर गणपतीपुळे येथे जातात. गणपतीला नैवेद्यासाठी नियमित मोदकांचा बेत असतो. गणपतीपुळे परिसरात मिळणारे उकडीचे मोदक हे केवळ हिंदुस्थानीच नाही तर परदेशी पर्यटकांचाही आवडता खाद्यपदार्थ म्हणून नावारूपास आला आहे.
संगमेश्वरचे खोबरे मोदक
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरच संगमेश्वरमध्ये गेल्या काही वर्षांत ताज्या नारळाच्या खोबर्यापासून बनविल्ेले मोदक प्रसिद्ध झाले आहेत. नारळाच्या खोबर्यापासून बनविलेल्या या मोदकातही आंबा, सीताफळ, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट अशा वेगवेगळ्या चवी असून यामध्ये आंबा मोदकालाच मोठी मागणी आहे. गुहागरच्या समुद्रकिनार्यावरील नारळाची चवही आगळीवेगळी असल्याने या मोदकांना खरी लज्जत चढते.
- जे. डी. पराडकर
सौजन्य:- फुलोरा, सामना १०१२२०११

No comments:
Post a Comment