Saturday, March 21, 2020

चांगल्या सवयी. Good Habits.

मानवी स्वभावच असा आहे कि, त्याला एखादी चांगली गोष्ट सांगितली तरी, त्याचा अहं त्याला ती गोष्ट सहज स्वीकारण्यापासून परावृत्त करत असतो. पण, जेव्हा एखादी इमर्जन्सी, किंवा एखादी घटना घडते तेव्हा त्या चांगल्या गोष्टी मानव स्वीकारायला सुरुवात करतो. आणि, हेच चांगल्या सवयींबाबत देखील घडते.

आता, कोरोना संकट पासून वाचण्यापासून ह्याच चांगल्या गोष्टींचे महत्व अधोरेखित होत आहे.

१. हात साबणाने स्वछ धुवा.
२. शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल किंवा टीसु पेपर धरा.

आता, चेहऱ्याला वारंवार हात न लावणे हे तरी चष्मा असणार्याना प्रॅक्टिकली शक्य नाही. तरी, पण एक ग्राहक व वापरकर्ता (यूजर) म्हणून काही गोष्टी आम्ही स्वतःहून वर्षानुवर्षे करत आहोत. एक नागरिक म्हणून, आम्ही त्या तुमच्या बरोबर शेयर करत आहोत. ह्यात, कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करणे हा उद्देश नाही. तसेच, सुचवलेली औषधें हि तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

१. रोज सकाळी आंघोळीच्या एक बालदी कोमट पाण्यात फक्त दोन थेंब निलगिरी तेल टाका. ह्याचा वास खूप तीव्र आहे. जो न्हाणी घरात दरवळतो. त्यामुळे, न्हाणी घरात कोरोना ला आळा बसू शकतो. ह्या पाण्याने अंघोळ केल्यावर आपल्या शरीराला निलगिरी चा वास येत नाही. तसेच, शरीरावर असणाऱ्या जंतूंचा नायनाट होण्यास पण मदत होते. घरात गोमूत्र शिंपडावे.

२. घरातील जमीन पुसताना एका बादलीत एक चमचा डेटॉल टाकावे. त्यामुळे, जमिनीवर असणारे जीवजंतूं कमी होण्यास मदत होते.

३. घरात पाच वर्षांवरील लहान मुले असतील तर, पतंजली कफ सिरप ची बाटली कायम घरात ठेवावी. तसेच, सर्वानी रोज आवळा सिरप व कोरफडीचा एक चमचा रस रोज प्यावा. त्याने शरीराची प्रतिकार शक्ती कायम राहण्यास मदत होते.

४. कधी हलका ताप वाटला तर घरात नेहमी सिप्ला कंपनीची "निसिप प्लस" Nicip Plus हि गोळी ठेवावी. मात्र, एक एक गोळी सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी घेऊनही ताप उतरत नसेल तर थेट डॉक्टर कडे जावे.

५. ज्यांच्यामध्ये पूर्व आजार किंवा पूर्वी डेंगू झाला असेल किंवा ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी दर रविवारी एक चमचा पपई च्या पानाचा रस प्यावा. घरातील सर्व मंडळी पण घेऊ शकतात. हा रस शरीरातील लाल पेशी वाढविण्यास मदत करतो.

६. संध्याकाळी घरात दिवेलागणीच्या वेळी, प्रत्येक खोली मध्ये कापूर, धूप लावावे. जेणेकरून, घरातील वातावरण शांत व प्रसन्न राहते. तसेच, सांज कीटकांना घरात घुसण्या पासून मज्जाव होतो.

७. रात्री झोपताना उघडे असणाऱ्या शरीरास ओडोमॉस क्रीम लावून झोपावे. कृपया, चेहऱ्यास लावू नये.

८. रात्री झोपताना घराच्या सर्व कोपऱ्यात, मोठ्या वस्तू कपाट वगैरे च्या मागे, पलंगाखाली बेगॉन स्प्रे करावे. आणि चिंतामुक्त झोपी जावे.


वरील प्रमाणे, दैनंदिनी अनुसरण केल्यावर देखील जर एखाद्या असाध्य रोगाची लक्षणे किंवा, सर्दी ताप खोकला झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा. आपण वापरत असलेल्या उत्पादनांची, औषधांची  अंतिम तारीख सतत बघावी.