Sunday, February 27, 2011

बिनधास्त मराठीतूनच शिका!

केवळ इंग्रजी बोलता आले म्हणजे प्रगती होते या एकमेव (गैर)समजुतीने जे पालक मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतात. त्यांना एकच सांगावेसे वाटते ते म्हणजे ‘इंग्रजी शिकणे व इंग्रजीतून शिकणे’ या दोन भिन्न बाबी आहेत. विज्ञानाने हे सिद्ध केलंय की विद्यार्थ्यांचा बौद्धिक, आत्मिक विकास साधायचा असेल तर मेंदूला मातृभाषेतूनच सूचना देणं शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे.


एकीकडे ‘मराठी’ शाळा बंद होत असताना जपान, फ्रान्स, जर्मनी या देशांनी एकविसाव्या शतकात केलेली तंत्रज्ञानातील प्रगती बघितली की, एक गोष्ट नक्की जाणवते ती म्हणजे, ‘ज्यांचे शिक्षण मातृभाषेतून होते, त्यांची सदैव प्रगतीच होते.’ इंग्रजीचा A व B सुद्धा माहीत नसलेले हे देश व त्यांची प्रगती पाहता एका गोष्टीवर नक्कीच शिक्कामोर्तब होते, ते म्हणजे प्रगतीसाठी आवश्यक आहे मायबोलीतून शिक्षण घेणे.

मुळातच केवळ इंग्रजी बोलता आले म्हणजे प्रगती होते या एकमेव (गैर)समजुतीने जे पालक मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतात. त्यांना एकच सांगावेसे वाटते ते म्हणजे ‘इंग्रजी शिकणे व इंग्रजीतून शिकणे’ या दोन भिन्न बाबी आहेत. विज्ञानाने हे सिद्ध केलंय की विद्यार्थ्यांचा बौद्धिक, आत्मिक विकास साधायचा असेल तर मेंदूला मातृभाषेतूनच सूचना देणं शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणारी मराठी मुले विज्ञान, समाजशास्त्र अजिबात समजून ‘न’ घेता पाठांतर करतात. जी गोष्ट समजून ‘न’ घेता पाठ केली जाते, त्यामुळे त्या कोवळ्या मनावर अनिष्ट परिणाम होऊन अभ्यास हे ओझे वाटू लागते. आपल्या मुलांच्या ‘मनाचा’ विचार न करता, स्वत:च्या (खोट्या) प्रतिष्ठेकरिता पोटच्या गोळ्याचा (मुलाचा) कोवळ्या मनाचे पोस्टमार्टेम करणार्‍या पालकांना शैक्षणिक क्षेत्रातील ‘अतिरेकीच’ म्हणावे लागेल.

सुजाण पालकहो! थोडंसं जहाल वाटतंय, परंतु ते ‘सत्य’ आहे. आपल्या पाल्याची खरोखरच शैक्षणिक प्रगती व्हावी, असं आपल्याला मनापासून वाटत असेल तर सर्वप्रथम शास्त्रीयदृष्ट्या विचार करून फ्रान्स, जपान या देशांची प्रगती बघून आता तरी जागे व्हा. मातृभाषेतून शिकून सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या जयंत नारळीकर, नरेंद्र जाधव आदी अनेक व्यक्तींना डोळ्यांसमोर आणा.

केवळ उत्तम इंग्रजी बोलता यावे म्हणूनच जर तुम्ही तुमच्या पाल्याला इंग्रजीतून शिकवत असाल तर आपल्यासारखे अज्ञानी आपणच. कारण हजारो रुपये डोनेशनसोबतच प्रति महिना हजारो रुपये सलग दहा वर्षे (1ली ते 10 वी) फी भरण्यापेक्षा मराठी माध्यमात प्रवेश घेऊन आपल्या पाल्याला नियमितपणे ‘इंग्लिश स्पीकिंग’ क्लासला पाठवा (ज्याची फी नाममात्र असते) म्हणजे मातृभाषेतून शिकणेही होईल व त्याचबरोबर फाडफाड नव्हे तर आत्मविश्‍वासाने इंग्रजी बोलतासुद्धा येईल.

पालकांकरिता माय-मराठी हेल्पलाइन : 9820096079

सौजन्य- थर्ड जनरेशन. मराठी वृत्तपत्र.

1 comment:

anil soman said...

Great thought and Idea. I learned in Marathi school in Thane. Now I know eight languages and lived in over 80 countries. When I see my driver and maid servant's sending their kids to so called English medium schools it pains and when they do not heed really good and fair advise I wonder where this samaj is going. I feel sorry I can not write in marathi on the computer I look forward to some help in this regard