Thursday, February 24, 2011

फळं आणि सौंदर्य

फळं आणि सौंदर्य यांचं नातं फार अतूट आहे फळं खाल्ल्यामुळे आरोग्य सुधारतंच पण ते तुमच्या त्वचेतूनही खुलतं फळांच्या सेवनाबरोबरच त्वचेवरही फळांचा वापर केल्यास त्वचेला चांगला ग्लो येतो आरोग्य आणि सौंदर्य या दोहोंचे वर्धन करण्यासाठी फळांचा उपयोग होतो


* पिकलेल्या डाळिंबाचे दाणे चेहर्‍यावर लावल्यास त्वचेचा रंग हलका आणि गुलाबी होण्यास मदत होते

* ओठांवरही डाळिंबाचा रस लावा त्यामुळे ओठांचा रंग सुधारतो

* पिकलेल्या पपईचा गर सौंदर्य प्रसाधनात अतिशय उपयुक्त ठरतो यात अ, ब, क ही जीवनसत्त्वे असतात याचा गर चेहर्‍यावर लावल्यास त्वचेचे आरोग्य सुधारते

* चेहर्‍यावर चामखीळ असेल तर त्यावर कच्च्या पपईचा गर चोळावा हा उपाय नियमित केल्यास त्याचा परिणाम जाणवेल

* पिकलेल्या केळ्याच्या गरात मलई मिसळून हा पॅक चेहर्‍याला लावा पंधरा मिनीटांनी चेहरा धुवा यानंतर आणखी एका पिकलेल्या केळ्याच्या पातळ चकत्या कापून त्या मधात ठेवा थोड्यावेळाने मधातून चकत्या काढून त्या चेहर्‍यावर लावा त्यानंतर पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा शुष्क चेहर्‍यावर याचा उपयोग होतो त्वचेचा कोरडेपणा जाऊन तिचे आरोग्य सुधारते

* चेहर्‍यावर पुटकुळ्या असतील तर पिकलेल्या केळ्याचा गर चोळून लावा अर्ध्या तासाने कच्च्या दुधाने चेहरा धुवा नियमितपणे केल्यास याचा फायदा होईल

* सफरचंदाच्या रसात थोडे गुलाबजलाचे थेंब घाला व ते चेहर्‍यावर चोळा सावळा रंग उजळविण्यास मदत होते रंग उजळवण्यासाठी सफरचंदाचा गर थोडा उकडा व चेहर्‍यावर चोळा तो वाळला की चेहरा धुवा नियमितपणे हा प्रयोग करा तुम्हाला फरक जाणवेल हा प्रयोग रंग उजळविण्यास उपयोगी ठरतो

* केसातील कोंडा घालवण्यासाठी सफरचंदाचा रस काढून तो ओल्या केसांच्या मुळाशी लावून ठेवा वीस ते पंचवीस मिनिटांनी केस धुवा

* संत्र्याची ताजी साल चेहरा, हात, पाय यावर चोळून लावा त्वचा मुलायम होतो

* हात नरम व मुलायम करण्यासाठी ताज्या रसात थोडा मध घाला व तो चोळा चांगला परिणाम जाणवेल

सौजन्य :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.

No comments: