ऑफिसात हल्ली संगणकाचा वापर वाढला आहे. सतत बैठे काम, बसण्याची चुकीची पद्धत व कामाचा ताण या सर्वांचा अप्रत्यक्षपणे भार मानेवर येतो व सुरू होते मानदुखी. या मानदुखीकडे जर वेळीच लक्ष नाही दिले तर सर्व्हायकल स्पॉंडिलायसिससारखा आजारही होऊ शकतो.
* मानदुखी टाळण्यासाठी सर्वप्रथम एकाच जागी, एकाच पद्धतीत बसू नका.
* दर एक तासाने निदान एक मिनिटाचा ब्रेक घेऊन मानेचा हलका व्यायाम करा.
* हा व्यायाम तुम्ही कामाच्या ठिकाणी बसल्या जागेही करू शकता. यासाठी मानेला घडीच्या दिशेने पाच वेळा फिरवा. नंतर हीच क्रिया उलट्या दिशेने करा.
* तिळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा. मालिश नेहमी वरून खाली या दिशेने करा.
* गरम, थंड पाण्याचा आलटून पालटून शेक घ्या.
* झोपून टीव्ही पाहणे, अति वजन उचलणे टाळा.
* झोपताना कडक किंवा जास्त उंचीची उशी वापरू नका.
* सर्वात शेवटी महत्त्वाच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
सौजन्य :- एक मराठी वृत्तपत्र.

No comments:
Post a Comment