Friday, February 25, 2011

डांग्या खोकला म्हणजे काय?

बोर्डेटेला पेर्तुसिस नावाच्या विषाणूमुळे डांग्या खोकला होतो. हा संसर्गजन्य आजार असून दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.


लक्षणे : शिंका, डोळ्यांतून पाणी, नाक वाहणे, रात्रीच्या वेळी खोकला येणे, श्‍वास घेताना आवाज येणे, खोकल्याची न थांबणारी उबळ येणे ही लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त असल्यास तो डांग्या खोकला असू शकतो.

उपाय : डांग्या खोकल्याची लस घेण्याची शिफारस केली जाते. लहान मुलांना घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला अशी डीटीपीची संयुक्तपणे लस दिली जाते.

सौजन्य :- सर्वांसाठी सर्वकाही असणारे एक मराठी वृत्तपत्र.

No comments: