Sunday, January 26, 2014

आओ भारत बनाएं

 गरिमा से जो तना हुआ है, झुके नहीं वो भाल,
आओ हम सब मिल बनाएं, भारत को खुशहाल,
कितना सुन्दर है कितना प्यारा, ये देश हमारा,
हिन्दू, मुस्लिम, सिख, इसाई, सबकी आँख का तारा,
देश की एकता व अखंडता को रखे सदा संभाल,
गरिमा से जो तना हुआ है, झुके नहीं वो भाल,
निर्धनता का मिटा के अँधेरा, प्रगति की धुप फैलाएं,
उजड़े हुए गुलशनो को फिर से, हरा भरा बनाएं,
नाकाम कर दे, दुश्मनों की हर तुरुप चाल,
गरिमा से जो तना हुआ है, झुके नहीं वो भाल,
नफरत की आंधी को रोके, प्यार के फूल खिलाएं,
होली, ईद हो या क्रिसमस, बैसाखी, सब मिल जुल कर मनाएं,
चारो दिशाओं में बिखरा दें, खुशियों का गुलाल,
गरिमा से जो तना हुआ है, झुके नहीं वो भाल.

सौजन्य  :- www.kavyakosh.com 

Wednesday, January 15, 2014

जगाची भटकंती

- जगप्रसिद्ध पिरॅमिड इजिप्तमध्ये नाईल नदीच्या काठी आहे.
- अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.
- नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.
- आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
- रोम शहराला सात टेकड्यांचे शहर म्हटले जाते.
- पांढर्‍या हत्तीचा देश थायलंड.
- ग्रीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.
- ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज म्हणतात.
- दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज म्हणतात.
- व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.
- ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन इकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.
- मनिला (फिलीपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.


Saturday, January 04, 2014

आली कोकण-गाडी दादा

लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण-गाडी
आली कोकण-गाडी दादा, आली कोकण-गाडी

ठाणे-मुंब्रा-कल्याणाची ओलांडुन खाडी
आली कोकण-गाडी दादा, आली कोकण-गाडी

जंक्शन आता मागे गेले, पनवेलीचे ठेसन आले
ओढ लावी कर्नाळ्याची हिरवीहिरवी झाडी

आपट्यापासून गाठिल रोहे, तयार ठेवा नारळ-पोहे
स्वागताला कोकणवासी सजले खेडोपाडी

कशासाठी पोटासाठी, कोकणपट्टी घाटासाठी
आगीनगाडी नागीन जैसी जाते नागमोडी

दर्यावरचा खाईल वारा, पिऊन घेइल पाउसधारा
बघताबघता मागे टाकील सावंताची वाडी

येथे डोंगर तेथे सागर, नारळ-पोफळ हिरवे आगर
कणखर काळ्या सह्याद्रीची थडथडणारी नाडी

सरता कोकण पुढती जाते, गोव्यासंगे जुळवी नाते
कर्नाटक अन्‌ केरळ-तामिळ प्रेमे यांना जोडी

कोकणवासी जनतेलाही भवितव्याची देते द्वाही
सुखी होऊ दे गावित-कोळी कष्टाळू कुळवाडी

शिंग तुतारी झडला ताशा, फळास आल्या अपुल्या आशा
कोकणच्या कैवारी नाथा, आशिर्वादा धाडी

गीत - वसंत बापट


सौजन्य:- http://shaileshchakatta.blogspot.in/2013/12/blog-post_4881.html

रामेठा अर्थात ‘दातपाडी’

 ‘दातपाडी’विषयी ऐकून हे एक निराळंच प्रकरण वाटलं. ही आहे झुडुपर्गीय वनस्पती. पुरुषभर उंचीची. जगभरात हिच्या साधारण पन्नासेक जाती आहेत. हिंदुस्थानात इथून तिथून एकच जात सापडते. आशिया आणि आफ्रिका खंडात आणि तशीच ती आपल्याकडे पश्चिम घाटात ही विपुल आहे. समुद्रसपाटीपासून १२०० ते २००० मीटर उंचीवर ती वाढते. डिसेंबरपासून मेपर्यंत तिला फुलं येतात. फूल पिवळे, झुपकेदार. फळांची साल पातळ. आत एकच बी. पाने चार बोटे लांब-अरुंद. लहान देठाची, लांबट भाल्यासारखी. टोकदार. 
रामेठा ही विषारी वनस्पती आहे. अर्थात तिच्यातला हा विषारीपणा स्व-संरक्षणासाठी असावा. हिच्या पानांचा चीक डोळ्याला लागल्यास इजा होते. खोडावरच्या सालीतल्या राळेमुळे कातडीवर फोड येतात. साल आणि पानं जहाल विषारी असल्याने मासेमारीकरता वापरतात. कागद निर्मितीत कच्चा माल म्हणून सालीचा उपयोग होतो.
आदिवासी जळणासाठी लाकूड म्हणून रामेठाचे लाकूड वापरतात. जळलेल्या लाकडाच्या कोळशावर आदिवासी बायका आकोटाची मिस्री भाजतात. त्यात या लाकडाची राख मिसळली जाते. अशी राखमिस्रीत मिस्री लावल्याने अनेक महिलांचे दात झिजलेत, पडलेत.आयुर्वेदात हिचा ‘दातपाडी’ म्हणून उल्लेख असल्याचे मित्राने सांगितले. रामेठामध्ये ग्लुको पायरीनोसासाईड, नायट्रोफिनाईल ही अल्कोलाईड (विषारी पदार्थ) आहेत. जाणकार आदिवासी हिची पाने सुजेवर किंवा मुक्या मारावर इलाज म्हणून लावतात. अस्थमा, अपचन यावर ही गुणकारी आहे. हिंदुस्थान आणि चीनमध्ये उपचार म्हणून तिच्या वापराला १०० वर्षांची परंपरा आहे. बाजारात विकायला नेताना आदिवासी लोक गुरांच्या अंगाला रामेठयाचा पाला चोळतात. त्यामुळे गुरं मस्त गुटगुटीत दिसतात.

- भाऊसाहेब चासकर
सौजन्य:- फुलोरा, सामना ०४०११४

नागपुरी सावजी चिकन

- प्रसाद पोतदार

  झणझणीत नागपुरी सावजी चिकन, पांढर्‍या वांग्याचे जळगावी भरीत. हलकी फुलकी तरीही तितकीच पौष्टिक ‘सोयाबीन’ मिश्रित ज्वारीची भाकरी... आई शप्पथ... पोट असं तुडुंब भरलं ना... आणि या सगळ्यावर पाचक सोलकडी, तोंड गोड करायला खरवस... अस्सल ‘मराठी’ फूड याशिवाय दुसरं काय असणार... पंचवीसव्या वर्षात पदार्पण करणार्‍या गोवा पोर्तुगीज आणि ‘दिवा महाराष्ट्राचा’मधली हीच तर खासीयत...
‘दिवा महाराष्ट्राचा’ हॉटेलच्या दरवाजातच एक बोर्ड आहे. कोल्हापूर शून्य किलोमीटर, गोवा शून्य कि.मी. याचा नक्की अर्थ बाहेर पडताना कळतो आणि पुढल्यावेळी ‘कुठं खायचं’ हेही ठरतं... कारण कोल्हापुरी पांढरा रस्सा हवा तर कोल्हापुरात कशाला जायचं? ‘दिवा’ आहे ना... जळगावी भरीत म्हणा, नागपुरी ठेचा म्हणा, कोकणातलं वालाचं भिरडं किंवा महाराष्ट्रातला मराठमोळा इतर कोणताही झणझणीत, चमचमीत पदार्थ खायचा असेल तर सरळ ‘दिवा’ महाराष्ट्रामध्ये शिरायचं... पेशवाई थाटात पोटभर जेवायचं आणि खूश व्हायचं...
तर गंमत नागपुरी सावजी चिकनची... नागपुरी तिखट... माणसाला सहज नाही परवडणारे. खोबर्‍याचा संबंध नाही... नुसतं तिखटजाळ... भगभगून जायला होईल.... पण इथं तेच चिकन त्यातला तिखटी उग्रपणा कमी करून हेल्थ कॉन्शस मुंबईकरांकरिता खास तेल कमी करून तयार होते; पण चवीत फरक अजिबात नाही... २१ मसाले चार-चार पाच-पाच तास मुरवले जातात चिकनमध्ये. मग कुठे मंद आचेवर शिजवायला घालतात... त्यामुळे डिश पुढे येते तेव्हा मन वासानेच भरून जाते. जळगावी भरीतही, त्याचीही तीच तर्‍हा... तिखटपणा कमी, जोडीला ज्वारीची भाकरी कडकच...
‘स्टार्टर’ला तर विचारूच नका... किती खायचे आणि नाही हे पोटाने ठरवायचे. कोलंबीची करंजी, खिम्याचे थालीपिठ, केळफुलाचा वडा यासारखे इतर अनेक मेनू आहेत... सुरुवातीला ते भूक वाढवतात आणि मग माणूस हातचं न राखता जेवतो... ‘तुडुंब झाल्यावरच उठतो... बिलाचं टेन्शन नसतं. ते ओ.के.च असतं... मनही खूष...
शाकाहारी-मांसाहारी... प्रत्येकासाठी वेगळं किचन... भांडी वेगळी... हिरवी भांडी व्हेजची. लाल भांडी नॉनव्हेजची... एखादी डिश आवडली नाही पहिल्याच घासात सरळ परत करायची... त्याचे बिल लावले जात नाही... ‘मराठी’ बोललात तर बिलात स्पेशल सूट. मालक प्रत्येक टेबलवर येऊन स्वत: भेटणार... आस्थेने चौकशी करणार, हवं नको पाहणार... ऑर्डर दिली पण आता नको तरीही ओ.के. उगाच चिडचिड नाही... बिलही नाही... एकूण काय ‘दिवा महाराष्ट्राचा’मधला प्रत्येक क्षण एन्जॉयेबल... खा आणि खात राहा... ‘दिवा महाराष्ट्राचा’ पेटवत राहा!
असं म्हणतात... माणसाला जिंकायचं असेल तर त्याला पोटभर खायला घाला... पोटातून हृदयात पटकन शिरता येते. आम्ही तेच करतो... दर्जा जपतो... तेवढीच माणुसकी-आपुलकीही जपतो.
- डॉ. सुहास अवचट

सौजन्य:- फुलोरा, सामना ०४०११४

बुध


सूर्यमालेतील बुध हा सूर्यानंतरचा पहिला ग्रह. हा आकाराने पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडा मोठा आहे. याचा व्यास ४,८७८ कि.मी. आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असल्यामुळे यास आंतरग्रहदेखील म्हणतात. म्हणजेच तो सकाळी आणि संध्याकाळीच दिसतो. याचा अर्थ तो नेहमी दिसतो असेही नाही. वर्षभरात फक्त काही काळच तो दिसतो. तोसुद्धा सूर्यापासून दूर असताना, अन्यवेळी सूर्यप्रकाशात लुप्त झाल्यामुळे त्याचे दर्शन घडत नाही. या ग्रहावर वातावरण नसल्याने उल्का वर्षावाने हा ग्रह फारच खडबडीत झालेला दिसतो. या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण कमी असल्याने यावर वातावरणाचा अभाव जाणवतो. बुध ग्रहावर एकही चंद्र नाही याचे कारण बहुधा सूर्यापासून त्याचे अंतर कमी असावे, काही वेळेस पृथ्वीवरून बुधाच्या कलादेखील पाहावयास मिळतात.

सौजन्य:- फुलोरा, सामना ०४०११४

४ G इंटरनेट

इंटरनेटचं विश्व आता खर्‍या अर्थाने सुपरफास्ट होणार आहे, आतापर्यंत आपण वायरलेस इंटरनेट, ब्रॉडबॅण्ड इंटरनेट, मोबाईल इंटरनेट असे इंटरनेटचे नानाविध प्रकार पहिले आहेत. पण इंटरनेटच्या जगात खरी क्रांती घडली ती ३ G च्या अगमनानंतर. ३ G इंटरनेटमुळे आपणास फास्ट इंटरनेट आपल्या आयुष्यात कसा बदल घडवू शकते हे कळले आणि आता इंटरनेटची चौथी पिढी अर्थात ४ G आपल्यासमोर हजर झाली आहे. इंटरनेटची ही चौथी पिढी आपले आयुष्य त्याच्या वेगाने सर्वार्थाने बदलणार आहे. द्रष्टा तंत्रज्ञ स्टीव जॉब्सच्या डोळस नजरेने तर ४ G नंतरचे टेक युग कसे बदलणार आहे हे अगोदरच ओळखले. त्यामुळेच मग ऍपलने तर खास फक्त ४ G ला डोळ्यासमोर ठेवून नवीन आयफोन ५ S देखील सादर केला आहे. ज्यात अनेक नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
४ G चा चमत्कार : ३ G मुळे आपण व्हिडीओ कॉल, मोबाइल टीवी सुपरफास्ट इंटरनेट अशा अनेक गोष्टी कधीही व कुठेही वापरू शकत होतो. ४ G आपणास हे सर्व तर देणार आहेच, पण त्यापेक्षाही अधिक वैशिष्ट्यपूर्ण व अनोख्या सेवा मिळवून देईल. त्यामुळेच ४ G सेवा ही खरं तर एक चमत्कारच असणार आहे.
विद्यार्थांसाठी : आजकाल ई-लर्निंगसारख्या अनेक सेवा या इंटरनेटवर चालतात. अनेक कंपन्यानी तर खास विद्यार्थ्यांसाठी संगणक तसेच टॅबलेटदेखील तयार केले आहेत. ४ G मुळे विद्यार्थी तसेच त्यांचे शिक्षक अगदी शहरातील किंवा गावातील शाळा एकमेकांबरोबर इंटरनेटने जोडता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करण्यापासून ते अगदी इतर शाळा/कॉलेजमधील अद्ययावत गोष्टींची माहिती मिळवण्यापर्यंत मदत होऊ शकते.
तरुणांसाठी : सुपरफास्ट इंटरनेटचा खरा फायदा तरुणवर्गाला होणार आहे. आता सोशल नेटवर्किंगच्या कट्ट्यावर असो किंवा एखादा चित्रपट डाऊनलोड करायचा असेल किंवा अगदी लाइव्ह टीव्ही बघायचा असेल तरी ४ G मुळे तुम्ही कधीही कशावरही सुपरफास्ट इंटरनेटचा आनंद लुटू शकता.
सर्वांसाठी : खरं तर ४ G सुपरफास्ट इंटरनेटचा फायदा सर्वांनाच होणार आहे. ४ G मुळे तुम्ही मोठमोठ्या आकाराच्या फाईल्स काही क्षणातच कोणालाही इमेलद्वारे सहज पाठवू शकता. ४ G मुळे व्हिडीओ कॉन्फरन्सचा दर्जादेखील वाढणार आहे. त्यामुळे जगातील एका कोपर्‍यातील व्यक्ती कोणाशीही कधीही संपर्कात राहू शकते.
- सुपरफास्ट मोबाइल टू मोबाइल कनेक्टिव्हिटी
- सुपरफास्ट फाईल शेयरिंग
- सुपरफास्ट व्हिडीओ कॉन्फरन्स
- सुपरफास्ट ऑनलाईन गेमिंग.
- लाइव्ह टीव्ही
- ३ G पेक्षा ८ पट अधिक वेग
- सुपरफास्ट सोशल नेटवर्किंग.

सौजन्य:- फुलोरा, सामना ०४०११४

ढोकेश्‍वर

आपला महाराष्ट्र देश हा अनेक गडकिल्ले आणि असंख्य गिरीशिल्पांनी नटलेला भूप्रदेश आहे. ह्या भूप्रदेशात अनेक गिरीशिल्पे खोदली गेली. अशाच एका अनवट डोंगरामध्ये काही गिरीशिल्पे पूर्वीच्या राजमार्गावर म्हणजेच पैठण ते नाणेघाट या मार्गावर टाकळी या गावी खोदली गेली. तीच लेणी आज ‘टाकळी-ढोकेश्वर’ या नावाने आजूबाजूच्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत.
आळेफाटा येथून नगर रस्त्यावर जाऊ लागले की तेथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर ही सुंदर लेणी खोदली गेली आहेत. जमिनीच्या सपाटीपासून अवघ्या २०० मीटर उंचीवर कोरलेली ही सुंदर गिरीशिल्पे आजही भटक्यांना खुणावत आहेत. पुण्यापासून अवघ्या ११० कि.मी. अंतरावर आणि मुंबईपासून २०४ कि.मी. अंतरावर ही सुंदर लेणी आहेत. 
डोंगरपायथ्यापासून सुमारे ३०० पायर्‍या चढल्यानंतर आपल्या स्वागताला या लेण्या उभ्या असतात. यामध्ये आपल्याला एक मुख्य लेणे देखील पाहायला मिळते ते लेणे ‘ढोकेश्वराचे’ लेणे म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाते. ढोकेश्वराचे लेणे हे पूर्वाभिमुख असून आतील गर्भगृहाला पूर्वेकडून व उत्तरेकडून दोन सुंदर दरवाजे खोदलेले आपल्याला पाहवयास मिळतात. हे लेणे म्हणजे चार खांबांचे खोदीव दालनच आहे. या मुख्य लेण्यांमध्ये पूर्वेच्या आणि उत्तरेच्या दोन्ही दारांमध्ये नंदी बघायला मिळतात. गाभार्‍याच्या बाहेर भव्य अशा गंगायमुनेच्या देखील मूर्ती बघायला मिळतात. तसेच या मूर्तींच्या जवळ एक सूर्यदेवतेची मूर्तीदेखील बघायला मिळते. 
या मुख्य लेण्याच्या गाभार्‍याच्या उजव्या कोपर्‍यात तांडवनृत्य करणारी शिवाची मूर्ती तसेच अष्टमातृकादेखील सुंदर रीतीने कोरलेल्या बघायला मिळतात. तसेच लेणीच्या मुख्य दारात जय-विजय द्वारपाल आणि बाजूला असणारे इतर देवी-देवता यादेखील आपले लक्ष वेधून घेतात. या मुख्य लेण्याच्या माथ्यावर डाव्या बाजूस सुमारे ७ ते १० मीटर उंचीवर चार दालनांची सुंदर गुहा आहे त्याला आजूबाजूचे लोक न्हावीघर असे संबोधतात. 
या गुहेमध्ये १र्६े१६ मीटरचे कातळात खोदलेले एक सुंदर टाके आपले लक्ष वेधून घेते. तसेच एक शिलालेखदेखील आपल्याला पायर्‍यांच्या जवळ पाहवयास मिळतो. अपरिचित असणारे हे सुंदर लेणे आवर्जून भेट देण्याजोगे आहे.

- अनुराग वैद्य
सौजन्य :- फुलोरा, सामना ०४०११४

महाराष्ट्राची भूमी

- हिंदुस्थानचे प्रवेशद्वार- मुंबई 
- हिंदुस्थानची आर्थिक राजधानी - मुंबई.
- महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर 
- महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड
- महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड
- मुंबईची परसबाग - नाशिक
- महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी
- मुंबईचा गवळीवाडा- नाशिक
- द्राक्षांचा जिल्हा- नाशिक
- आदिवासींचा जिल्हा- नंदुरबार
- महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव
- महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ
- संत्र्याचा जिल्हा- नागपूर
- महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती
- जंगलांचा जिल्हा- गडचिरोली
- महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव
- साखर कारखान्यांचा जिल्हा- नगर
- महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर
- महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर
- कुस्तिगिरांचा जिल्हा- कोल्हापूर
- लेण्यांचा जिल्हा- संभाजीनगर

सौजन्य :- फुलोरा, सामना ०४०११४