सूर्यमालेतील बुध हा सूर्यानंतरचा पहिला ग्रह. हा आकाराने पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडा मोठा आहे. याचा व्यास ४,८७८ कि.मी. आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असल्यामुळे यास आंतरग्रहदेखील म्हणतात. म्हणजेच तो सकाळी आणि संध्याकाळीच दिसतो. याचा अर्थ तो नेहमी दिसतो असेही नाही. वर्षभरात फक्त काही काळच तो दिसतो. तोसुद्धा सूर्यापासून दूर असताना, अन्यवेळी सूर्यप्रकाशात लुप्त झाल्यामुळे त्याचे दर्शन घडत नाही. या ग्रहावर वातावरण नसल्याने उल्का वर्षावाने हा ग्रह फारच खडबडीत झालेला दिसतो. या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण कमी असल्याने यावर वातावरणाचा अभाव जाणवतो. बुध ग्रहावर एकही चंद्र नाही याचे कारण बहुधा सूर्यापासून त्याचे अंतर कमी असावे, काही वेळेस पृथ्वीवरून बुधाच्या कलादेखील पाहावयास मिळतात.
सौजन्य:- फुलोरा, सामना ०४०११४
No comments:
Post a Comment