Wednesday, March 11, 2015

तुळस

अंगणाला तुळशीशिवाय आणि घराला गृहलक्ष्मीशिवाय शोभा नसते हे अगदी खरं, पण वास्तविक पाहता जागेअभावी तुळस आणि तणावाअभावी गृहलक्ष्मी दिसणं म्हणजे आश्‍चर्य.
आजीने आईला सांगितलेलं एक वाक्य, ‘तुळशीची रोज मनोभावे पूजा कर, न मागता ती खूप काही देईल.’ आजीचे ते वाक्य आयुर्वेद अभ्यासल्यानंतर पटलं. तुळशीच्या पानांच्या रसाने शरीरातील जंतू मरतात. पानांचा लेप केल्यास वेदना, सूज कमी होते. गजकर्ण, त्वचाविकार यात पानांचा रस चोळावा, लगेच त्रास कमी होतो. चार थेंब कानात टाकल्यास कानातला ठणका लगेच थांबतो. रात्री झोपताना तुळशीचे बी पाण्यात भिजवून बुळबुळीत खीर खाल्ल्यास जोर न देता प्रात:र्विधी होतो. तुळशीच्या पानाचा रस रोज तोंडात धरल्यास दाताला कीड लागणे, तोंडाला दुर्गंधी येणे, हिरड्यातून पू येणे आठवडाभरात बरे होते. तुळशीच्या पानांचा यकृताच्या कार्यावर परिणाम होऊन रक्तातील अशुद्धता पचवून रक्तशुद्धी करते. त्यामुळे हृदयावरचा अतिरिक्त भार नाहीसा होतो. हृदयाला बलवान करते. 
तुळशीचा रस मध घालून दिल्यास सर्दी-खोकला, पाठदुखी, ताप हे आजार दोन दिवसांत बरे होतात. लघवीतील जळजळ आणि वेदना दूर करण्यासाठी तुळशीच्या बिया सर्वांनाच परिचित आहेत. घाम आणून ताप घालवणारी तुळस म्हणून आजीबाईच्या बटव्यात उल्लेख आहे. विष्णुप्रिया असलेल्या तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश, स्वच्छता आणि पाणी द्या. दिवसातील १८ तास मोठ्या प्रमाणात प्राणवायू देणारे एकमेव रोपटं आहे. घरात प्राणवायूमुळे आरोग्य आनंदी वातावरण राहील. त्यामुळे धनलक्ष्मी आणि गृहलक्ष्मी तणावमुक्त राहतील.
- आयुर्वेदानुसार आताच्या धावत्या युगात काय खावं? (विलास परब, पुणे)
- पूर्वीही प्रत्येकजण खूप शारीरिक व मानसिक काम करायचे आणि खाणंपिणंही करायचे. आता आपण प्रगतीच्या नावाखाली खाण्याच्या पद्धती प्रगत केल्या आणि त्यामुळे आजारांनाही प्रगती मिळाली. चुकीच्या खाण्यामुळे आजार वाढले की, आजारामुळे खाणंपिणं चुकीचे झाले. आपण महाराष्ट्रात राहतो. रोज सात्त्विक महाराष्ट्रीय जेवणच खाल्ले पाहिजे. जगाला आपलं जेवण आवडतं आणि आपल्याला...
सौजन्य :- फुलोरा, सामना ०७०३१५
दीपक केसरकरdeepakkesrkar@gmail.com