Wednesday, July 25, 2012

चंद्रशेखर आझाद: A Pioneer of Bharatiya Independence !


Introduction

Hindu Dharma has a glorious past of great Saints and Sages. Several Saints ascended to the state of a Guru and showed the path of God realisation to many. They also taught spirituality to society through their conduct and actions. Their mission was not just limited to spirituality but they also did substantial work for the defence of the Nation whenever it was in difficulties. Some of the Saints travelled all over the world and disseminated the spiritual knowledge of Bharat there without any personal expectations. Millions of people abroad are getting the benefit of their efforts. For the past many lakhs of years, the Sages have made tremendous efforts to preserve Vedic Knowledge which is the pride of Bharat. They also created many subjects connected with human life. The most important thing however is that the Saints of Bharat have gifted to the world the tradition of the Guru-disciple relationship.
The current scene however is different. Cricketers, movie heroes and heroines have become the ideals of Hindus. Also the two vices of selfishness and narrow mindedness have become dominant in Hindus which is causing a lot of harm to Hindu society. Under such circumstances it has become essential to study and follow the life of Saints who have imparted the teaching of sacrifice, love, devotion to Righteousness, devotion to the Nation, helping society and kashtradharma (duty of a warrior). We are hereby publishing the matter related to them so that people will get to know about such great Saints and be inspired by them. We pray at the feet of God that, ‘May all Hindus get the inspiration to study and follow their biography and teachings’.

Chandrashekhar Azad (23rd July 1906 - 27th February 1931)

Chandrashekhar Azad was a Bharatiya revolutionary from Allahabad, Uttar Pradesh. Chandershekhar believed that his Dharma was to fight for the Nation. He said a soldier never relinquishes his weapon. Chandershekhar was involved in the Kakori Train Robbery (1926), in the attempt to blow up the Viceroy's train (1926), and in the shooting of Saunders at Lahore (1928) to avenge the killing of Lala Lajpat Rai. He formed the 'Hindustan Socialist Republican Association'. He was an ideal for revolutionaries such as Bhagat Singh, Sukhdev, Batukeshwar Dutt, and Rajguru.

Chandrashekhar was deeply troubled by the Jallianwala Bagh massacre in Amritsar in 1919. That fired him to start the struggle against the British. He received his first punishment at the age of fifteen, when he was caught indulging in revolutionary activities ! When the magistrate asked him his name, he said 'Azad' (meaning free). He was sentenced to fifteen lashes. With each stroke of the whip the young Chandrashekhar shouted "Bharat Mata Ki Jai" [Hail the Mother-land !]. From then on Chandrashekhar assumed the title of 'Azad' and came to be known as Chandrashekhar Azad. Azad vowed that he would never be arrested by the British police and would die a free man.

Azad was attracted towards the more aggressive and revolutionary ideals. He committed himself to achieving independence by any means. Azad and his compatriots would target British officials known for their oppressive actions against ordinary people and freedom fighters. Along with Bhagat Singh and other compatriots like Sukhdev and Rajguru, Azad formed the 'Hindustan Socialist Republican Association' (HRSA). HRSA was committed to attain independence for Bharat. Azad was a terror for the British police. He was on their hit list and the British police badly wanted to capture him dead or alive. On 27th February 1931, Azad met two of his comrades in Alfred Park, Allahabad. He was betrayed by an informer who had revealed his whereabouts to the British police. The police surrounded the park and ordered Azad to surrender. Azad was shot in the thigh. Later seeing no means of escape he shot himself with his last bullet. Thus he kept his pledge of not being caught alive.
सौजन्य :- http://www.hindujagruti.org/articles/8.html 

Monday, July 23, 2012

बेस्ट इंटरनेट ब्राऊजर

इंटरनेट हा आजच्या पिढीचा परवलीचा शब्द झाला आहे, आपण इंटरनेट संगणक, लॅपटॉप, टॅबलेट अगदी मोबाईल अशा सर्वच डिजिटल उपकरणावर वापरतो. इंटरनेट वापरताना इंटरनेट जोडणी, चागले हार्डवेअर/सॉफ्टवेअर याबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते व ती म्हणजे चांगले इंटरनेट ब्राऊजर. चांगल्या इंटरनेट ब्राऊजरमुळे आपण सहजपणे इंटरनेट वापरू शकतो व त्याचबरोबर ब्राऊजरमधील अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपली इंटरनेटवरील अनेक कामे झटपटदेखील करतात.
गुगल क्रोम
सध्या इंटरनेट ब्राऊजर विश्‍वात गुगल क्रोमने जोरदार आघाडी घेतली आहे व नेटिझनमधले सर्वात फेव्हरेट ब्राऊजर म्हणजे गुगल क्रोम.
- संगणक, लॅपटॉप, टॅबलेट अगदी मोबाईल अशा सर्वच डिजिटल उपकरणावर गुगल क्रोम चालते.
- याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टे म्हणजे याचा वेग, गुगल क्रोमवर कोणतेही संकेतस्थळ अतिशय पटकन लोड होते.
- गुगल क्रोमचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे हे ब्राऊजर वापरायला अतिशय सोपे आहे, टॅब हिस्टरी, गुगल सर्चसारखे अनेक शॉर्टकट आपली इंटरनेटवरची अनेक कामे पटपट करतात.
- जर तुम्ही यू — ट्युब किंवा पिकासासारखे गुगलचे इतर सॉफ्टवेअर वापरत असाल तर गुगल तुम्हाला थेट ब्राऊजरमध्येच याचे प्लेग इन देते त्यामुळे तुम्हाला ही सॉफ्टवेअर वापरताना प्रत्येक वेळेस त्याच्या संकेतस्थळावर जावे लागत नाही.
- गुगल क्रोममध्ये सुरक्षिततेच्या साठीदेखील अनेक उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे तुम्ही बिनधास्त कोणतीही ई-सेवा इंटरनेटवर वापरू शकता.

गुगल क्रोमनंतर सर्वाधिक लोकप्रिय असणारे ब्राऊजर म्हणजे मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट एक्सप्लोरर ९. संगणक, लॅपटॉप वर इंटरनेट एक्सप्लोरर अजूनही आपले स्थान टिकवून आहे व त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे विंडोज संगणकप्रणालीबरोबर इंटरनेट एक्सप्लोरर इंस्टाल होऊनच येते त्यामुळे वेगळे ब्राऊजर टाकायची गरज नसते.
- संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल ज्यावर विंडोज प्रणाली आहे अशा उपकरणावर इंटरनेट एक्सप्लोरर चालते. - मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट एक्सप्लोरर गुगल क्रोमला वेगाच्या बाबतीत आता बर्‍यापैकी टक्कर देत आहे. - सुरक्षिततेच्या इंटरनेट एक्सप्लोररमध्येदेखील अनेक उपाययोजना केल्या आहेत. - वापरायला सोपे. - बिंग सर्चचा पर्याय देण्यात आला आहे.
मोझिला फायरफॉक्
खरंतर तांत्रिकदृष्ट्या इंटरनेटमधील बेस्ट ब्राऊजर हे मोझिला फायरफॉक्सच आहे परंतु अजून सर्वसामन्य लोकांना याची माहिती नसल्यामुळे अजून याची लोकप्रियता गुगल क्रोम व इंटरनेट एक्सप्लोरर एवढी नाही.
- संगणक, लॅपटॉप, टॅबलेट अगदी मोबाईल अशा सर्वच डिजिटल उपकरणावर चालते.
- वेगाच्या बाबतीत गुगल क्रोम व इंटरनेट एक्सप्लोररपेक्षा जास्त वेगात चालते.
- पासवर्ड स्टोर करण्याकरिता पासवर्ड मनेजर, फास्ट कीवर्ड सर्च, डाऊनलोड मनेजर, सेशन रिस्टोरसारखे इनोवेटिव्ह वैशिष्ट्ये.
- अतिशय सुरक्षित.
- ३ सपोर्ट करणारे पहिलेच ब्राऊजर.
- टेक जगातील सर्वात लोकप्रिय ब्राऊजर.

सौजन्य :- अमित घोडेकर, सामना  220712

महती महासागरांची

पॅसिफिक : १५५,५५७,००० चौ. कि.मी.
अटलांटिक : ७६,७६२,००० चौ. कि.मी.
इंडियन : ६८,५५६,००० चौ. कि.मी.
दक्षिणीय : २०,३२७,००० चौ. कि.मी.
आर्क्टिक : १४,०५६,००० चौ. कि.मी.
टीप : दक्षिणीय महासागर हा जगातील
चौथा मोठा महासागर आहे.
सर्वात खोल महासागर आणि समुद्र :पॅसिफिक महासागर : ३५,८२७ फूट (१०,९२४ मी.)
अटलांटिक महासागर : ३०,२४६ फूट (९,२१९ मी.)
इंडियन / भारतीय महासागर : २४,४६० फूट (७,४५५ मी.)
कॅरिबियन समुद्र : २२,७८८ फूट (६९४६ मी.)
आर्क्टिक महासागर : १८,४५६ फूट (५,६२५ मी.)
दक्षिण चीन समुद्र : १६,४५६ फूट (५,०१६ मी.)
समुद्र बेरिंग : १५,६५९ फूट (४७७३ मी.)
भूमध्य सागर : १५,१९७ फूट (४६३२ मी.)
मेक्सिकोची खाडी : १२,४२५ फूट (३७८७ मी.)
जपानचा समुद्र : १२,२७६ फूट (३७४२ मी.)
टीप : दक्षिणी समुद्राची खोली अधिकृतरित्या उपलब्ध नाही.
सौजन्य :- फुलोरा सामना 210712

Sunday, July 15, 2012

पृथ्वीचे प्रेमगीत - केवढे मोठे देश हे...!


रशिया : ६,५९२.८४६ चौ. मैल
(१७,०७५,४०० चौ. कि.मी.)
कॅनडा : ३,६०२,७०७ चौ. मैल
(९,३३०,९७० चौ. कि.मी.)
चीन : ३,६००,९४७ चौ. मैल
(९,३२६,४१० चौ. कि.मी.)
अमेरिका : ३,५३९,२४२ चौ. मैल
(९,१६६,६०० चौ. कि.मी.)
ब्राझील : ३,२६५,०७५ चौ. मैल
(८,४५६,५१० चौ. कि.मी.)
ऑस्ट्रेलिया : २,९४१,२८३ चौ. मैल
(७,६१७,९३० चौ. कि.मी.)
हिंदुस्थान : १,१४७,९४९ चौ. मैल
(२,९७३,१९० चौ. कि.मी.)
अर्जेंटिना : १,०५६,६३६ चौ. मैल
(२,७३६,६९० चौ. कि.मी.)
कजाखस्तान : १,०४९,१५० चौ. मैल
(२,७१७,३०० चौ. कि.मी.)
सूदान : ९१७,३७४ चौ. मैल
(२,३७६,००० चौ. कि.मी.)

सौजन्य :- फुलोरा, सामना 140712

Wednesday, July 11, 2012

मुलांची नेटसर्फिंग आता होणार सुरक्षित

इंटरनेटच्या मोहजालात गुरफटत चाललेल्या मुलांमुळे पालकवर्ग धास्तावला आहे. मात्र लवकरच पालकांचे टेन्शन दूर होणार असून नेटसर्फिंग सुरक्षित करण्यासाठी ‘पॅरंटल कंट्रोल’ हे नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.


‘ग्लोबल सिक्युरिटी टेक फर्म मैकरफी’ने देशातल्या १० शहरांत सर्व्हे केला. यादरम्यान त्यांना ६२ टक्के मुले आपली खासगी माहिती ऑनलाइन शेअर करीत असल्याचे आढळून आले. पालक मात्र प्रत्येक वेळेला आपल्या मुलांची ‘ऑनलाइन ऍक्टिव्हिटी’ तपासून पाहू शकत नाहीत, अशा वेळेला ‘पॅरंटल कंट्रोल सॉफ्टवेअर’ मुलांच्या सुरक्षित ‘नेटसर्फिंग’साठी फायदेशीर ठरणार आहे. मुलांची इंटरनेटवरील हालचाली टिपण्यासाठी या नव्या सॉफ्टवेअरची मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ‘इंटरनेट सिक्युरिटी फर्म ट्रेंड मायक्रो’चे व्यवस्थापक अमित नाथ हे या नव्या सॉफ्टवेअरचे समर्थक आहेत. त्यांच्या मते लहान मुले इंटरनेट हाताळताना नकळतपणे नको ती जोखीम स्वीकारतात. अशा वेळेला हे नवे सॉफ्टवेअर उपयोगाचे ठरू शकते. तर ई-टेकीजचे सीईओ रोहित चौधरी यांच्या म्हणण्यानुसार नेटवर लहान मुलांचा सामना हा अश्‍लील छायाचित्रांशी आणि त्याच्या कटेंटशी होऊ शकतो. त्यामुळे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या मुलांना ई-मेलद्वारे चॅटिंगद्वारे फसवू शकतात किंवा धमकावू शकतात. हे टाळण्यासाठी हे सॉफ्टवेअर फायदेशीर ठरू शकते.

सौजन्य :- सामना 110712