इंटरनेटच्या मोहजालात गुरफटत चाललेल्या मुलांमुळे पालकवर्ग धास्तावला आहे. मात्र लवकरच पालकांचे टेन्शन दूर होणार असून नेटसर्फिंग सुरक्षित करण्यासाठी ‘पॅरंटल कंट्रोल’ हे नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.
‘ग्लोबल सिक्युरिटी टेक फर्म मैकरफी’ने देशातल्या १० शहरांत सर्व्हे केला. यादरम्यान त्यांना ६२ टक्के मुले आपली खासगी माहिती ऑनलाइन शेअर करीत असल्याचे आढळून आले. पालक मात्र प्रत्येक वेळेला आपल्या मुलांची ‘ऑनलाइन ऍक्टिव्हिटी’ तपासून पाहू शकत नाहीत, अशा वेळेला ‘पॅरंटल कंट्रोल सॉफ्टवेअर’ मुलांच्या सुरक्षित ‘नेटसर्फिंग’साठी फायदेशीर ठरणार आहे. मुलांची इंटरनेटवरील हालचाली टिपण्यासाठी या नव्या सॉफ्टवेअरची मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ‘इंटरनेट सिक्युरिटी फर्म ट्रेंड मायक्रो’चे व्यवस्थापक अमित नाथ हे या नव्या सॉफ्टवेअरचे समर्थक आहेत. त्यांच्या मते लहान मुले इंटरनेट हाताळताना नकळतपणे नको ती जोखीम स्वीकारतात. अशा वेळेला हे नवे सॉफ्टवेअर उपयोगाचे ठरू शकते. तर ई-टेकीजचे सीईओ रोहित चौधरी यांच्या म्हणण्यानुसार नेटवर लहान मुलांचा सामना हा अश्लील छायाचित्रांशी आणि त्याच्या कटेंटशी होऊ शकतो. त्यामुळे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या मुलांना ई-मेलद्वारे चॅटिंगद्वारे फसवू शकतात किंवा धमकावू शकतात. हे टाळण्यासाठी हे सॉफ्टवेअर फायदेशीर ठरू शकते.
सौजन्य :- सामना 110712

No comments:
Post a Comment