Monday, June 25, 2018

स्वप्नातील घर : भाग १० - लोन डिसबर्समेंट



दि. २७ जुलै २०१७ रोजी एक्सर्बिया सानपाडा (०२२-६१०९३८०३) मधून पत्नीला ऑफिस मध्ये असताना फोन आला, "तुम्हाला HDFC बँक मध्ये उद्या जाऊन चार्जेस भरायचे आहेत."
मग पत्नीने घरी आल्यावर पुन्हा फोन केला, "कोणते चार्जेस भरायचे आहेत ?"

तो बोलला, "स्टॅम्प ड्युटी". 

पत्नी :- कोणती स्टॅम्प ड्युटी, आम्ही तर सर्व आधीच भरले आहेत.

तो :- लोन वरची स्टॅम्प ड्युटी जी लोन ऑफर लेटर मध्ये रु १,५००/- दाखवली आहे ती अधिक GST पकडून जी रक्कम होईल ती व सोबत तुम्हाला ओळख व पत्ता पुरावा व दोन फोटो घेऊन जावे लागतील लोन डिसबर्स करण्यासाठी.

पत्नी :- माझे पती गेले तर चालतील का ? पण ते सह-कर्जदार नाहीत.

तो :- चालेल. पण त्यांच्या सोबत त्यांचे व तुमचे प्रूफ पाठवा.

पत्नी :- ठीक आहे.
-------------
आणि २८ जुलै ला पत्नीला ई-मेल व एस एम एस आला कि, तुमचे पार्ट लोन डिसबर्समेंट ३१/०७/२०१७ रोजी करण्यात येईल.  बघा हा ई-मेल....


म्हणून मग आम्ही HDFC लॉगिन करून बघितले, तर त्यात अजून दोन धक्के होते....

१. HDFC ने आमचे काँट्रीब्युशन रु. १,१२,७८१/- दाखवले जेव्हा कि आम्ही एक्सर्बिया ला रु १,३०,२५६/- रु आता पर्यंत दिलेले आहेत. बघा हा स्क्रीनशॉट...



२. आम्ही लोन अर्ज करताना सह-कर्जदाराचे नाव घातले नव्हते, तरी HDFC ने सह-कर्जदार म्हणून पतीचे म्हणजे माझे पण नाव टाकले आहे. बघा हा स्क्रीनशॉट.....




आणि हे वाचून आम्हाला धक्काच बसला. आम्ही तर अजून डिसबर्समेंट विनंती दिलेली नाही. मग HDFC ने डिसबर्समेंट कशी नियोजित केली !!!. आम्ही ते HDFC ला ई-मेल वर विचारले…. 

HDFC ने मग डिसबर्समेंट रद्द केले. आणि बघा HDFC चे काय उत्तर आले .....   
 




हा रिप्लाय वाचल्यावर लक्षात आले कि HDFC ने डिसबर्समेंट रद्द केले पण त्यांना १,३०,२५६/- बद्दल आमचे काय म्हणणे आहे हे लक्षात आले नाही. म्हणून मग आम्ही परत ई-मेल केले. 

मग मी स्वतः HDFC मध्ये दुपारी ४ वाजता अंबरनाथ ला पोचलो.  तिथे साधारण ४.४० दरम्यान एका रेप्रेसेंटेटिव्ह कडे पाठवण्यात आले. त्याला सांगितले लोन वरची स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. त्याने सांगितल्या प्रमाणे रु १६१४/- चा चेक सुपूर्द केला. मग त्याने केलेल्या ई-मेल बद्दल विचारले, तेव्हा आम्हाला समजले कि एक्सर्बिया ने ओरिजिनल अग्रीमेंट कॉपी आम्हाला ई-मेल न करता, थेट HDFC ला सबमिट केली व एक्सर्बिया ने स्वतः पेयमेन्ट नियोजित करून घेतली. आणि HDFC ने एक्सर्बिया (मयूर) ला विचारले कि 'कस्टमर सोबत का नाही आले, तेव्हा तो म्हणाला आम्हाला NOC दिली आहे.  म्हणजे बघा, एक्सर्बिया किंवा कोणताही बिल्डर डायरेक्ट रेजिस्ट्रार ऑफिस ला आपल्या सह्या घेतो त्यात, NOC पण असते व ते कस्टमर ला कळू न देता डायरेक्ट लोन कंपनी मधून लोन उचलतात व आपल्याला हफ्ते सुरु होतात. मग "रेरा" चा काय उपयोग आहे ग्राहकाला ?

त्याने विचारले एक्सर्बिया ने तुम्हाला अग्रीमेंट ची कॉपी दिली नाही का? मी सांगितले, 'रेजिस्ट्रेशन नंतर एक्सर्बिया आम्हाला ७ दिवसात ई-मेल करणार होते. अजून त्यांनी कॉपी पाठवली नाही. आणि तुमच्याकडे (HDFC) कडे ओरिजिनल कॉपी सबमिट केली आणि तुम्ही कर्जदाराला न विचारता डायरेक्ट पेयमेन्ट पण नियोजित केली.' ह्यावर तो गप्प बसला. 

मग मी हि त्याला जेवढे आठवले, ते प्रश्न विचारले.

मी : इ एम आय कधी सुरु होते ? पार्ट डिसबर्समेंट वर पण सुरु होते का ?

युवनाथ : इ एम आय पार्ट डिसबर्समेंट वर पण सुरु करता येते. 

मी : हे प्री-इ एम आय काय असते ?

युवनाथ : प्री इ एम आय म्हणजे व्याज आकारणी. म्हणजे समजा तुम्ही २७ तारखेला डिसबर्समेंट / पार्ट डिसबर्समेंट केले कि, तुमचा इ एम आय सुरु होतो पुढच्या १ तारखेला पण, २७ तारीख ते ३१ तारखे पर्यंत जे व्याज चार्ज होते त्याला प्री इ एम आय म्हणतात.

मी :- डिसबर्समेंट वेळी काय डोकमेण्ट घेउन यायचे ?

युवनाथ :- २ फोटो, ओरिजिनल - पण कार्ड, आधार कार्ड दोन्ही कर्जदाराचे, बँक चेक बुक.

मग मला IGR बद्दल आठवले... माझ्या बऱ्याच वॉट्सअँप ग्रुप मधून एक कस्टमर मिळाला, त्याने J5-608 बुक केला आहे. त्याच्या कडून कळले कि, त्याला साधारण रु ५,१००/- IGR म्हणून भरावे लागले.  

त्या कस्टमर ने सांगितले कि, एजन्ट HDFC च देते व तो सर्व प्रक्रिया पूर्ण करतो. म्हणून मग मी हि HDFC ला विचारले...

मी :- IGR आम्हाला सुद्धा लागेल का ? आणि किती भरावा लागेल ? आम्ही करू शकतो का ?
युवनाथ :- IGR बेसिक रु १,४००/- पण इतर खर्च पकडून २५००/- ते ३०००/- होतील, ते एजन्ट च सांगेल व IGR पहिली डिसबर्समेंट झाल्यावर करायचा असतो. तुम्ही पण करू शकता, पण प्रक्रिया खूप मोठी असते. IGR  ऑनलाईन भरून सर्व डोकमेण्ट चा सेट बनवावा , तो HDFC मध्ये आणायचा, स्टॅम्पिंग करून तो रजिस्ट्रार ला सबमिट करायचा, मग एक पावती HDFC मध्ये जमा करायची व एक ग्राहकाला द्यायची. हि सर्व प्रक्रिया एजन्ट करतो. IGR म्हणजे फ्लॅट रेजिस्ट्रेशन झाल्यावर तुमचे इन्टिमेशन सरकारला जाते, पण लोन कोणत्या बँके कडून घेतले आहे ते IGR केल्यावर सरकारला इंटिमेट होते. 

बघा... म्हणजे हि सर्व माहिती एक्सर्बिया ने नवीन कस्टमर जे त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा फ्लॅट घेतात, त्यांना द्यायला हवी. रक्कम सांगू नये, पण अंदाज तर देता येतो... आणि ह्या बद्दल "रेरा" काय बोलते, कुणास ठाऊक !!
तुम्ही रेजिस्ट्रेशन अग्रीमेंट ची कॉपी पहिल्या डिसबर्समेंट च्या अगोदर कधीही घेऊ शकता. एकदा डिसबर्समेंट झाली कि HDFC कॉपी नाही देऊ शकत. 

मी :- एक्सर्बिया ने आम्हाला सांगितले होते कि, आम्ही ई-मेल मध्ये कॉपी पाठवू, पण त्यांनी डिरेक्टली HDFC ला सबमिट केली. त्यांनी आम्ही विचारलेले सर्व प्रश्न आधी क्लिअर करू दे व कॉपी पाठवू दे. मग आम्ही डिसबर्समेंट चे बघू. 

युवनाथ :- एक्सर्बिया तर मोठी कंपनी आहे.. त्यांच्या कडून असे काही होईल वाटत नाही.

मी :- आता तुमच्या समोर उदाहरण आहे. इंटर्नल व खूप कायदेशीर प्रॉब्लेम्स आहेत. पुणे - सानपाडा ऑफिस मध्ये कॉ-ऑर्डिनेशन नाही. 

पुढे बोलणार होतो "HDFC ला पण कधीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो", पण विचार केला जाऊ दे, दोन्ही मोठ्या संस्था आहेत. मी एकट्याने बोलण्याने काय होणार!

मी :- PMAY ची एलिजिबिलिटी आहे ना ? आम्ही लोन अर्ज बरोबर PMAY ऑनलाईन अर्ज पण सबमिट केला होता. तुमच्याच रेप्रेसेंटेटिव्ह ने सांगितले होते.

युवनाथ :- PMAY साठी एक फॉर्म भरावा लागतो, ते सुद्धा फर्स्ट डिसबर्समेंट वेळीच होईल.

आणि मग मी HDFC मधून बाहेर पडलो.
================

क्रमश :
हि लेखमालिका स्व-अनुभवावर आधारित आहे. ह्यात कोणत्याही व्यक्ती वा संस्थेचा अपमान किंवा मानहानी किंवा जाहिरात करण्याचा हेतू नाही. पण आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला स्वतःचे घर घेताना येणाऱ्या प्रक्रियांचा अनुभव व्हावा हाच उद्देश आहे. कारण, इतर कोणीही त्यांना घर घेताना काय प्रक्रिया करावी लागली व काय सतर्कता बाळगावी लागली हे दुसऱ्याला सांगत नाहीत. म्हणून वाटले आपल्या सोबत घडणाऱ्या घटना आपल्यासारख्याच इतरांना मार्गदर्शक ठरतील, म्हणून हा खटाटोप.