Wednesday, April 27, 2011

मुखवट्याआडचा एसएमएस

तंत्रज्ञान शाप की वरदान हा अखंड न संपणारा वाद आहे. त्यातून विधायक कामं जितकी होतात तितकी किंवा त्याहून अधिक कामं विध्वंसाचीच होत असावीत. एसएमएस स्पूफिंग हा त्यातलाच एक प्रकार. साध्यासोप्या शब्दांत सांगायचं तर स्पूफिंग म्हणजे ‘दुसर्‍याच्या मुखवट्याआड’ कामं करणं. मग या स्पूफिंगचे आयपी स्पूफिंग, मॅक स्पूफिंग, एसएमएस स्पूफिंग असे बरेचसे प्रकार सांगता येतील. ज्या गोष्टीचं स्पूफिंग, त्या गोष्टीचा मुखवटा वापरायचा म्हणजे झालं!
* स्पूफिंग कसं करतात?

मूळ मोबाईल क्रमांकधारकाला पत्ताही लागू न देता हे एसएमएस स्पूफिंगचं काम लीलया केलं जातं. वेबसाईट उघडायची, त्यात प्रति आणि प्रेषक असे दोन्ही मोबाईल नंबर टाकायचे आणि मेसेज लिहायचा, बस्स! हे सगळं गमती जमतीत चाललं असेल तोवर ठीक, नाहीतर कुणा बिचार्‍याचा यात बळी जायचा. कल्पना तर करून पहा, तुमच्या नंबरवरून कुणाला धमकीचे मेसेजेस गेले आहेत आणि अचानकपणे पोलीस तुमच्या दाराशी दत्त म्हणून उभे राहिले आहेत! आता आलं लक्षात हे किती धोकादायक आहे ते? वाढत्या ग्राहक संख्येसोबत मोबाईल कंपन्यांच्या एसएमएस सेंटरवरही ताण वाढतोय. कधी कधी ही सेंटर्स कंपन्या स्वत: चालवतात किंवा इतरत्र चालवायलाही देतात. याच एसएमएस गेटवेमधले काही कोड त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बदलले की, कुणीही ‘क्ष’ व्यक्ती कुणाही ‘य’ व्यक्तीच्या नावाने तिसर्‍याच ‘अ’ला एसएमएस पाठवू शकते. नशीब हे कोड बदलणं इतकं सहज शक्य नाही, नाहीतर रोज सकाळी चहाच्या घुटक्यांबरोबर रोजच्या बातम्यांसोबतच एसएमएस स्पूफिंगच्या बातम्याही वाचाव्या लागल्या असत्या.

* हे टाळता येईल का?

याचं उत्तर हो आहे आणि नाहीही. जर तुमच्या मोबाईलमध्ये फक्त ओळखीच्या लोकांचेच एसएमएस यावेत अशी सेटिंग करण्याची व्यवस्था असेल तर किमान अनोळखी नंबरवरून येणार्‍या अनावश्यक आणि क्वचित फसवेगिरीच्या मेसेजेसपासून दूर राहू शकता, पण यातही दोन अडचणी आहेत. एक म्हणजे सगळ्याच मोबाईलमध्ये ही सुविधा असतेच असं नाही आणि दुसरी अडचण म्हणजे ओळखीच्याच नंबरवरून असा एसएमएस आला तर तो खोटा असूनही खरा मानला जाईल. म्हणजे पुढील गैरसोयींना तोंड देणं आपसूक आलंच.

अर्थात हे टाळता येत नसलं तरी यावरचे उपाय मात्र नक्की माहीत असायला हवेत. असा एसएमएस आल्यास किंवा कुणी तुमचाच मोबाईल नंबर स्पूफ करून त्यावरून इतरांना मेसेज पाठवत आहे असे कळल्यास ताबडतोब आपल्या मोबाईल ऑपरेटरला व पोलिसांना कळवावे. मोबाईल कंपनी हे मेसेज नक्की कुठून पाठवले जात आहेत याचा शोध घेईल व पुढील कार्यवाहीसाठी पोलीस खाते सक्षम आहेच.

आता शोध घेतल्यास अशा सेवा देणार्‍या काही वेबसाईट सापडतीलही, पण असा दुसर्‍याचा नंबर वापरून कुणा तिसर्‍यालाच मेसेज पाठवणं बेकायदेशीर तर आहेच. त्यामुळे या वेबसाईट एकदा नजरेत आल्या की बंद पडतात अन् नाही बंद पडल्या तर सजग नेटिझन्सकडून त्यांची माहिती योग्य ठिकाणी जाऊन त्या बंद पाडल्या जातातच. तशा मोबाईल कंपन्याही गप्प बसलेल्या नाहीत. मेसेज गेटवे आणि एकूणच मेसेजच्या कार्यप्रणालीत कुठे उणिवा, कमकुवतपणा आहे हे डोळ्यात तेल घालून पाहिलं जातंय. जरा कुठे फट सापडली की, त्याचा गैरफायदा घेणारे टपून बसलेले असतातच. ती लक्षात आल्यापासून तिचा दुरुपयोग व्हायला अर्ध्या-एक दिवसाचा अवधीही जास्त ठरावा. म्हणूनच कार्यपद्धतीतल्या अशा फटींना ‘झीरो डे एक्सप्लॉइट’ म्हणतात. खरं तर तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे. ती वापरताना जरा जपूनच वापरावी. खर्‍या आयुष्यात फुकट ते पौष्टिक असू शकतं, पण आंतरजालावर मिळणारं फुकटचं सगळंच चांगलं असतंच असं नाही!

सौजन्य :- फुलोरा, सामना
swatsurmy@gmail.com

Wednesday, April 20, 2011

घरट - गोडाधोडाचा दिवस

 सार्वजनिकरीत्या सण साजरा करण्यासाठी गर्दी लोटत असली तरी त्या गर्दीपासून दूर राहाणार्‍यांची संख्या कमी नाही. वेळेअभावी किंवा सणांच्या बदललेल्या स्वरूपामुळे अनेक जण शॉर्टकटमध्ये सण साजरे करतात.


शेजारच्या घरातून गुढीच्या पूजेचा प्रसाद आला. छान वाटलं. घरी जाऊन पाहिलं तर साधारण अर्धा फूट उंचीची रेडिमेड गुढी तासाभरातच शोकेसमध्ये विराजमान झाली होती.हल्ली ‘कॉस्मोपॉलिटन सोसायट्यां’चा शोभायात्रेच्या फोटोंशिवाय गुढीपाडव्याशी फारसा संबंध नसतो. हे खरं आहे की हल्ली लागण झाल्यासारख्या शोभायात्रा निघत असतात, पण गुढीपाडवा म्हणजे एक सुट्टी, हा विचार करणारेही कमी नाहीत. गुढीपाडवाच कशाला सगळ्याच सणांच्या बाबतीत हे चित्र दिसतं.


ओळखीच्या एका घरात अकरा दिवस गणपती असतो. ही पद्धत दोन पिढ्यांपूर्वी सुरू झालेली. दरवर्षी गणपतीचं दर्शन घ्यायला गेल्यावर घरातल्यांची एकच टेप सुरू असते. ‘पूर्वीच्या लोकांना जमत होतं हो. हल्ली अकरा दिवस वगैरे झेपत नाही. इतकी सुट्टी तरी मिळते का? घरातलं सगळं करणंही जमत नाही. फार व्याप होतात हो.’

आमचं कुटुंब तसं भलंमोठं. रक्षाबंधन, भाऊबिजेच्या दिवशी सगळ्या बहिणी किंवा भावांच्या घरी जायचं म्हटलं तर दिवस संपून जातो. यावर काही वर्षांपूर्वी तोडगा निघाला गेट टुगेदरचा. दरवर्षी या दोन्ही दिवशी कुणातरी एकाच्या घरी सर्व भावंडांनी जमायचं. सगळ्यांची भाऊबीज एकत्रच. म्हणजे प्रवासात वेळ घालवण्याऐवजी सगळ्यांना मनसोक्त भेटताही येतं. दसर्‍याला सोनं देण्यासाठी तर हल्ली प्रत्येकाला भेटणंही शक्य होत नाही.

का बरं?

टाइम नहीं है बॉस!
 
कुठलाही सण साजरा करायला, त्याचे कौतुक करायला हल्ली माणसांकडे वेळ नाही आणि उत्साहसुद्धा नाही. रोजचं ऑफिस, ट्रेन-बसची गर्दी, धावपळ यातून सणांसाठी वेळ कुठे मिळतो. सण म्हणजे एक सुट्टी. जेवायला छान गोडधोड करायचं, नव्या पिढीला माहिती मिळेल इतपत सोपस्कार करायचे आणि मग सुट्टी एन्जॉय करायची.


जुन्या पिढीमध्ये कर्मकांडाचं महत्त्व फार होतं. हे असं नाही केलं तर देव रागवेल ही भीती होती. अलीकडच्या काळात शिक्षणामुळे हे प्रमाण बरंचंसं कमी झालेलं दिसतं. आजही देवाविषयी श्रद्धा असली तरी कर्मकांडांचं खूळ कमी होतंय. पूजाअर्चा करताना आपण सर्रास शॉर्टकट वापरतो. गुढीपाडवा, नागपंचमी अशा अनेक सणांच्या दिवशी असंख्य घरांतून कोणतीही वेगळी पूजाअर्चा केली जात नाही.

सण साजरा न करण्याच्या या मानसिकतेचं आणखी एक कारण म्हणजे त्यांचं अलीकडच्या काळात झालेलं विकृतीकरण!

गणपतीच्या दिवसांत प्रत्येक गल्लीबोळात एक सार्वजनिक गणपती विराजमान होतो. रात्री दहा वाजेपर्यंत (अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून त्यानंतरही) कानठळ्या बसवणारा स्पीकर सुरू असतो. विसर्जनाच्या मिरवणुकीत तर दारूबाजांमुळे चालणंही कठीण होतं. चौपाटीवरील गर्दीऐवजी अनेकांना टीव्हीचा रिमोटच मग आपलासा वाटतो.

तीच तर्‍हा दिवाळी, होळी या सणांची. शाळेची दिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वीच टुरिस्ट कंपन्यांच्या टुर्स फुल्ल झालेल्या असतात. लक्ष्मीपूजनाच्या रात्री साधारणपणे काय चित्र दिसतं? सगळीकडे एकामागोमाग एक फटाक्यांच्या माळा पेटताहेत. जणूकाही स्पर्धा लागलीय. त्यांचा आवाज, सगळीकडे धूर, जळका वास. त्यापेक्षा या गर्दीपासून कुठेतरी लांब, शांत ठिकाणी जाण्याचा पर्याय अनेकांना सोयीचा वाटू लागलाय. निदान कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवता येतो.

होळीचा सण तर हल्ली घाबरवून टाकणाराच झाला आहे. मुंबई आणि आसपासच्या अनेक परिसरांमध्ये होळीच्या आठ-दहा दिवस आधीपासून रस्त्यावर चालणं मुश्किल होतं. कुठून, कधी एखादा फुगा येऊन तुमच्यावर धडकेल सांगता येत नाही. फुग्याचा मार आणि घाणेरड्या पाण्यामुळे खराब झालेले कपडे असा दुहेरी संताप घेऊनच तिथून निघावं लागतं. काही ठिकाणी तर चालत्या ट्रेनवरही फुगे मारतात.

आपले सगळे सण हे माणसांना आनंद देण्यासाठी असतात. ते साजरा करण्याची मूळ पद्धतच तशी बनवली गेली आहे. सणांच्या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र यावं, गोडधोड खाऊन मूड चांगला ठेवावा, एकमेकांना शुभेच्छा देऊन कटुता संपवावी, असा यामागचा उद्देश असतो.

पण हल्ली कुणालाच स्वतः पलीकडचं दिसतं नाही. माझ्या गल्लीतला गणपती मोठा, माझ्याच लाऊडस्पीकरचा आवाज मोठ्ठा, माझी माळ पन्नास हजारांची, माझ्या फुग्याचा नेम बरोबर बसला...बस्स! इतरांचा विचार करायला तरी वेळ कुठे आहे?

सौजन्य :- darekar.amita@gmail.com, FULORA, SAMANA

जीवनसत्त्व बी १२ आणि त्याची उणीव

आहारात बी १२ ची मात्रा कमी असणे किंवा शरीरात बी १२ कमी शोषले जाण्याने त्याची उणीव होते. ही उणीव एक गंभीर स्वरूप घेऊन आपल्या शरीरातल्या लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी करते.



आपले प्रोसेस्सेड पदार्थांचे वाढलेले सेवन आणि दिवसेंदिवस कमी खाण्यात येणारा पारंपरिक स्वयंपाक यांनी हल्ली बर्‍याच व्यक्तींना जीवनसत्त्व बी १२ च्या डेफिशिन्सीचा त्रास होतो. या डेफिशियन्सीची सगळ्यात आधी आढळून येणारी लक्षणं म्हणजे दम लागणं, छातीत धडधडणं, चेहरा निस्तेज होणं, अकारण थकवा, चिडचिड होणं इ. बरेचदा अगदी व्यवस्थित सकाळ संध्याकाळ पोळीभाजी, आमटी-भात असा आहार असलेल्या व्यक्तींना पण अशी बी १२ची उणीव होऊ शकते. हे असं का होतं? तेच आज जाणून घेऊया.

आहारात बी १२ ची मात्रा कमी असणे किंवा शरीरात बी १२ कमी शोषले जाण्याने त्याची उणीव होते. ही उणीव एक गंभीर स्वरूप घेऊन आपल्या शरीरातल्या लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी करते. परिणामाने बी १२ डेफिश्यन्सी अनिमिया किंवा पर्निशियस अनिमिया होऊ शकतो. या व्यतिरिक्त बी १२ आपल्या त्वचा, केस, रक्तपेशी, मज्जातंतू आणि बाकी स्वास्थ्यासाठी पण गरजेचे असते.




बी १२ जीवनसत्त्वाची उणीव एवढी सहजासहजी कशी होऊ शकते? सर्व बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्व विद्राव्य असल्यामुळे रोज शरीरातले अतिरिक्त बी १२ मूत्रमार्गे काढून टाकले जाते. म्हणून रोज आपल्या आहारात हे जीवनसत्त्व असणे गरजेचे असते. दुसरं कारण म्हणजे बी १२ जीवनसत्त्वाचे स्रोत. हे जीवनसत्त्व आपल्याल्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस/ चिकन, अंडी आणि सी फूड (मासे) यातून मिळतं. म्हणून मांसाहारी मंडळींना याची डेफिश्यन्सी सहज होत नाही. शाकाहारी आहारात जर दूध, दही, ताक याचे प्रमाण खूप कमी असेल तर बी १२ ची उणीव होऊ शकते आणि जे विगन आहार (मांस/अंडी/दूध असे कुठलेच पदार्थ नाही) घेतात त्यांना तर फोर्टिफाइड पीठ किंवा व्हिटामिन सप्लिमेंटची गरज असते. शिवाय ज्यांना सिलिएक डिसीज किंवा क्रोहन्स डिसीज झालेला असतो त्यांच्यात पण बी १२ ची उणीव आढळते.

आपल्या शरीरात थोड्या प्रमाणात जीवनसत्त्व बी १२ साठवून ठेवलेले असते. पण जेव्हा दीर्घ काळ आहारातून हे जीवनसत्त्व मिळत नाही, तेव्हा त्याच्या डेफिशिन्सीची लक्षणं दिसायला लागतात. यावर उपचार म्हणजे बी १२ जीवनसत्त्वाची इंजेक्शन घ्यावी लागतात, पण एकदा ही इंजेक्शन घेतली म्हणजे काम झालं असं नसतं. हा उपचार झाल्यानंतर रोज कमीतकमी २ ग्लास दूध किंवा त्यापासून बनलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं. म्हणजे पुन्हा अशी उणीव उद्भवत नाही.

सौजन्य:- फुलोरा, सामना

व्यसन सोडायचे उपाय

पहिल्यांदा दारू पिणार्‍यांपैकी १५ ते २५ टक्के लोक व्यसनी होत असतात. ही फार वाईट सवय आहे. आजच्या आधुनिक जीनवात दारूने सहजरीत्या प्रवेश केला आहे. आज स्त्री, पुरुष, युवावर्ग, वृद्ध या सगळ्यांना ती प्रिय असते मात्र दारू कोणावर प्रेम करत नाही. या गोड विषाला सोडण्यातच भलाई आहे, नाही तर तुमच्याकडे पश्चात्ताप करण्यासाठीही वेळ शिल्लक राहणार नाही.


दारू, सिगारेट व तंबाखू सोडण्याचे सहज व सोपे उपाय आम्ही आपल्यासाठी देत आहोत. ते पुढील प्रमाणे...

* सफरचंदाचा रस वेळोवेळी प्यायल्याने तसेच जेवणात सेबचा उपयोग केल्याने दारू पिण्याची सवय सुटते.


* उकडलेले सफरचंद दिवसातून तीन- चारदा सेवन केल्याने दारूची सवय सुटते.

* एका हळदीचे बारीक-बारीक तुकडे करावे जेव्हा पण सिगारेट, तंबाखू खाण्याची इच्छा झाली तेव्हा हळदीचे तुकडे तोंडात टाकून आरामात चघळावे. काही दिवसात विडी, सिगारेट व तंबाखूची सवय सुटते.


* चरस, गांजा, दारू यांची कोणालाही जास्त नशा झाली असल्यास ६० ग्रॅम द्राक्षे वाटून पाण्यासोबत गाळून घ्यावे. यामध्ये काळी मिरी, जिरे यांची पूड व मीठ टाकून पिण्यास द्यावे. लवकरच दारूची झिंग उतरते.


* कांद्याचा रस २५ ग्रॅम दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तंबाखू खाण्याची सवय सुटते.

* एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये लिंबू पिळावा. हे मिश्रण दिवसातून अनेक वेळा घेतल्याने दारूची नशा कमी होते.

सौजन्य:- फुलोरा, सामना.

Saturday, April 16, 2011

जीवनसत्त्वाची बाराखडी : के

शरीराचे रक्ताभिसरण हे रक्तवाहिन्यांमधून होत असते. या रक्तवाहिन्यांमधून वाहणार्‍या रक्ताद्वारे शरीरातील सर्व पौष्टिक घटक आणि प्राणवायूचा पुरवठा होतो. काही कारणाने रक्ताभिसरण मंदावले, अति वाढले किंवा बंद पडले तर गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते. एकंदरीत उत्तम आरोग्यासाठी रक्ताभिसरण योग्य सुरू राहणे गरजेचे आहे. यासाठी जीवनसत्त्व ‘के’ मोलाची भूमिका बजावते.


यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सूर्यफुलाचे तेल, अंड्याचा पिवळा बलक यामधून ‘के’ जीवनसत्त्व मिळते.

उपयोग : हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक. रक्ताभिसरण सुधारते, यकृताचे स्वास्थ्य सुधारते. गर्भवतीला शेवटच्या महिन्यात अतिशय उपयुक्त.

सौजन्य :- चिरायू, सामना.

Thursday, April 14, 2011

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Dr. B.R. Ambedkar Biography


Born: April 14, 1891

Died: December 6, 1956

Achievements: Dr. B.R. Ambedkar was elected as the chairman of the drafting committee that was constituted by the Constituent Assembly to draft a constitution for the independent India; he was the first Law Minister of India; conferred Bharat Ratna in 1990.

Dr. B.R. Ambedkar is viewed as messiah of dalits and downtrodden in India. He was the chairman of the drafting committee that was constituted by the Constituent Assembly in 1947 to draft a constitution for the independent India. He played a seminal role in the framing of the constitution. Bhimrao Ambedkar was also the first Law Minister of India. For his yeoman service to the nation, B.R. Ambedkar was bestowed with Bharat Ratna in 1990.Dr. B.R. AmbedkarDr.Bhimrao Ambedkar was born on April 14, 1891 in Mhow (presently in Madhya Pradesh). He was the fourteenth child of Ramji and Bhimabai Sakpal Ambavedkar. B.R. Ambedkar belonged to the "untouchable" Mahar Caste. His father and grandfather served in the British Army. In those days, the government ensured that all the army personnel and their children were educated and ran special schools for this purpose. This ensured good education for Bhimrao Ambedkar, which would have otherwise been denied to him by the virtue of his caste.


Bhimrao Ambedkar experienced caste discrimination right from the childhood. After his retirement, Bhimrao's father settled in Satara Maharashtra. Bhimrao was enrolled in the local school. Here, he had to sit on the floor in one corner in the classroom and teachers would not touch his notebooks. In spite of these hardships, Bhimrao continued his studies and passed his Matriculation examination from Bombay University with flying colours in 1908. Bhim Rao Ambedkar joined the Elphinstone College for further education. In 1912, he graduated in Political Science and Economics from Bombay University and got a job in Baroda.

In 1913, Bhimrao Ambedkar lost his father. In the same year Maharaja of Baroda awarded scholarship to Bhim Rao Ambedkar and sent him to America for further studies. Bhimrao reached New York in July 1913. For the first time in his life, Bhim Rao was not demeaned for being a Mahar. He immersed himself in the studies and attained a degree in Master of Arts and a Doctorate in Philosophy from Columbia University in 1916 for his thesis "National Dividend for India: A Historical and Analytical Study." From America, Dr.Ambedkar proceeded to London to study economics and political science. But the Baroda government terminated his scholarship and recalled him back.

The Maharaja of Baroda appointed Dr. Ambedkar as his political secretary. But no one would take orders from him because he was a Mahar. Bhimrao Ambedkar returned to Bombay in November 1917. With the help of Shahu Maharaj of Kolhapur, a sympathizer of the cause for the upliftment of the depressed classes, he started a fortnightly newspaper, the "Mooknayak" (Dumb Hero) on January 31, 1920. The Maharaja also convened many meetings and conferences of the "untouchables" which Bhimrao addressed. In September 1920, after accumulating sufficient funds, Ambedkar went back to London to complete his studies. He became a barrister and got a Doctorate in science.

After completing his studies in London, Ambedkar returned to India. In July 1924, he founded the Bahishkrit Hitkaraini Sabha (Outcastes Welfare Association). The aim of the Sabha was to uplift the downtrodden socially and politically and bring them to the level of the others in the Indian society. In 1927, he led the Mahad March at the Chowdar Tank at Colaba, near Bombay, to give the untouchables the right to draw water from the public tank where he burnt copies of the 'Manusmriti' publicly.

In 1929, Ambedkar made the controversial decision to co-operate with the all-British Simon Commission which was to look into setting up a responsible Indian Government in India. The Congress decided to boycott the Commission and drafted its own version of a constitution for free India. The Congress version had no provisions for the depressed classes. Ambedkar became more skeptical of the Congress's commitment to safeguard the rights of the depressed classes.

When a separate electorate was announced for the depressed classes under Ramsay McDonald 'Communal Award', Gandhiji went on a fast unto death against this decision. Leaders rushed to Dr. Ambedkar to drop his demand. On September 24, 1932, Dr. Ambedkar and Gandhiji reached an understanding, which became the famous Poona Pact. According to the pact the separate electorate demand was replaced with special concessions like reserved seats in the regional legislative assemblies and Central Council of States.

Dr. Ambedkar attended all the three Round Table Conferences in London and forcefully argued for the welfare of the "untouchables". Meanwhile, British Government decided to hold provincial elections in 1937. Dr. B.R. Ambedkar set up the "Independent Labor Party" in August 1936 to contest the elections in the Bombay province. He and many candidates of his party were elected to the Bombay Legislative Assembly.

In 1937, Dr. Ambedkar introduced a Bill to abolish the "khoti" system of land tenure in the Konkan region, the serfdom of agricultural tenants and the Mahar "watan" system of working for the Government as slaves. A clause of an agrarian bill referred to the depressed classes as "Harijans," or people of God. Bhimrao was strongly opposed to this title for the untouchables. He argued that if the "untouchables" were people of God then all others would be people of monsters. He was against any such reference. But the Indian National Congress succeeded in introducing the term Harijan. Ambedkar felt bitter that they could not have any say in what they were called.

In 1947, when India became independent, the first Prime Minister Pt. Jawaharlal Nehru, invited Dr. Bhimrao Ambedkar, who had been elected as a Member of the Constituent Assembly from Bengal, to join his Cabinet as a Law Minister. The Constituent Assembly entrusted the job of drafting the Constitution to a committee and Dr. Ambedkar was elected as Chairman of this Drafting Committee. In February 1948, Dr. Ambedkar presented the Draft Constitution before the people of India; it was adopted on November 26, 1949.

In October 1948, Dr. Ambedkar submitted the Hindu Code Bill to the Constituent Assembly in an attempt to codify the Hindu law. The Bill caused great divisions even in the Congress party. Consideration for the bill was postponed to September 1951. When the Bill was taken up it was truncated. A dejected Ambedkar relinquished his position as Law Minister.

On May 24, 1956, on the occasion of Buddha Jayanti, he declared in Bombay, that he would adopt Buddhism in October. On 0ctober 14, 1956 he embraced Buddhism along with many of his followers. On December 6, 1956, Baba Saheb Dr. B.R. Ambedkar died peacefully in his sleep.

सौजन्य :- http://www.iloveindia.com/indian-heroes/br-ambedkar.html

Sunday, April 10, 2011

MY मराठी

‘यायच्या आधी मला फोनव रे’ किंवा ‘खरड टाक मला’ अशी भाषा कानावर पडली किंवा फेसबुक, ऑर्कुटवर वाचायला मिळाली तरी आजकाल आपल्याला काही अगम्य वाचल्यासारखे वाटत नाही. ‘फोनवणे, खरडणे, व्यनी करणे’ असे शब्द आता हळूहळू चांगलेच रुळायला लागले आहेत. इंग्रजाळलेल्या फोनवणे अर्थात फोन करणे या शब्दाबरोबरच माय मराठी शब्दकोशात आता खरड, अनुदिनी, विदा, व्यनी अशा कदाचित तुम्ही पूर्वी कधीही न ऐकलेल्या शब्दांची भर पडत चालली आहे.


मराठी भाषेचे भवितव्य काय? मराठी भाषा संकटात आहे का? मराठी नामशेष होणार का? सध्या सगळीकडे या प्रश्‍नांनी नुसता धुमाकूळ घातला आहे. स्वयंघोषित विचारवंत ब्लॉगवर, संस्थळांवर, वर्तमानपत्रांतून आपापले विचार मांडत आहेत आणि चर्चा झडत आहेत. या सगळ्यापासून दूर इंटरनेटचा मुक्त हस्ताने वापर करणार्‍या आणि दिवस दिवस इंटरनेटवर ठाण मांडून असलेल्या मराठी नेटिझन्सनी मातर आपल्या परीने ही मायमराठी जपली आहे आणि तिला छान छान वेगवेगळे शब्ददेखील बहाल केले आहेत.


‘यायच्या आधी मला फोनव रे’ किंवा ‘खरड टाक मला’ अशी भाषा कानावर पडली किंवा फेसबुक, ऑर्कुटवर वाचायला मिळाली तरी आजकाल आपल्याला काही अगम्य वाचल्यासारखे वाटत नाही. ‘फोनवणे, खरडणे, व्यनी करणे’ असे शब्द आता हळूहळू चांगलेच रुळायला लागले आहेत. इंग्रजाळलेल्या फोनवणे अर्थात फोन करणे या शब्दाबरोबरच माय मराठी शब्दकोशात आता खरड, अनुदिनी, विदा, व्यनी अशा कदाचित तुम्ही पूर्वी कधीही न ऐकलेल्या शब्दांची भर पडत चालली आहे. नाही नाही असे दचकू नका.. अहो हे शब्द म्हणजे इंग्रजी शब्दांसाठी आपल्या मराठी नेटिझन्सनी शोधलेले मराठी शब्द आहेत. अनुदिनी म्हणजे ब्लॉग, खरड म्हणजे मेसेज अथवा स्क्रॅप, व्यनी म्हणजे व्यक्तिगत निरोप, समस म्हणजे एस.एम.एस. अशी ही मराठी रूपे आहेत. कौतुकाचा भाग म्हणजे ‘विदा’ अर्थात डेटासारख्या शब्दांनी आता विकीसारख्या ठिकाणीदेखील मान्यता मिळवली आहे.

इंटरनेट म्हणजे आंतरजाल, ऑनलाइन असणे म्हणजे रेषेवर असणे, वेबसाईट म्हणजे संस्थळ किंवा frequently asked questions (FAQ) अर्थात वारंवार विचारले जाणारे प्रश्‍न (वाविप्र) अशी सुंदर आणि सुटसुटीत रूपे आता आंतरजालावर सर्रास वापरात आली आहेत. गमतीचा भाग म्हणजे अनेक मराठी संस्थळांवर फेसबुकचा उल्लेख चेपू अर्थात चेहरा पुस्तक तर जी टॉकचा उल्लेख ग-बोल्या म्हणून केला जाताना दिसतो. अर्थात या विश्‍वात नवीनच प्रवेश घेतलेल्या माणसाला हे थोडे अवघड खरेतर आंतरजालीय भाषेत अनझेपेबलच वाटते.

असेच अजून काही नेटिझन्सनी मराठी भाषेला बहाल केलेले शब्द आहेत:-

कॉम्प्युटर ृ संगणक

संगणक रायटिंग / लिखाण ृ टंकन

कीबोर्ड ृ कळफलक

माऊस ृ उंदीर

माहितीचा स्रोत ृ विदागार

लिंक ृ दुवा

रिप्लाय ृ प्रतिसाद

ई-मेल ृ विरोप पत्ता

फॉर्वर्डेड ई-मेल ृ ढकलपत्र

अकाऊंट ृ सदस्य खाते

ओपन सोर्स ृ मुक्तस्रोत

या अशा शब्दांसाठी एक उपक्रमदेखील सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाविषयी व इतर गोष्टींच्या माहितीसाठी आपल्याला विकिपीडियावर सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. मराठी विकिपीडियावर तर आता चक्क मराठी लेखक हवे आहेत म्हणून जाहिरात देण्यात आली आहे. ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाददेखील मिळाला आहे. या सर्वांविषयी आपल्याला http://mr.wikipedia.org इथे जाणून घेता येईल.

विकिपीडियावर नमूद केल्याप्रमाणे विकिपीडिया समूहाचा भाग असणार्‍या ‘विक्शनरी’, ‘विकिबुक्स’, ‘विकिकोट्स’ आदी वेबपेजेसच्या लिंक्सही मराठी विकिपीडियाच्या होमपेजवर क्लिक करता येतात. ‘विक्शनरी’मध्ये ऑनलाइन शब्दकोश पाहता येतो तर ‘विकिबुक’ या लिंकवर ज्ञानेश्‍वरी, गीताई आदी काही वाचता येते. ‘विकिकोट्स’ या पेजवर विचार, सुविचार, म्हणी, वाक्प्रचार यांचा संग्रह करण्यात आला आहे.

सौजन्य:- फुलोरा, सामना
prasad.tamhankar@gmail.com

खाऊ का? आहारविषयक टॉप पाच भ्रमनिरास

गेल्या काही वर्षांत आपल्या आहारात खूप विविधता आली असून आपण बरेच पाश्‍चात्य पदार्थ पण खातो, तसेच आरोग्य आणि आहाराविषयी जागरूकतादेखील वाढली आहे. जेव्हा आपल्याला बर्‍याच माध्यमातून माहिती मिळत असते तेव्हा त्याचबरोबर बरेच समज-गैरसमज पण उद्भवत असतात....


गेल्या काही वर्षांत आपल्या आहारात खूप विविधता आली असून आपण बरेच पाश्‍चात्य पदार्थ पण खातो, तसेच आपली आरोग्य आणि आहाराविषयी जागरूकतादेखील वाढली आहे. जेव्हा आपल्याला बर्‍याच माध्यमातून माहिती मिळत असते तेव्हा त्याचबरोबर बरेच समज-गैरसमज पण उद्भवत असतात. आज मी इथे असेच काही भ्रमनिरास करत आहे.

* खूप पाणी पिऊन वजन कमी होते

मी बर्‍याच सिनेतारकांच्या मुलाखतीत वाचलेले आहे, ‘माझ्या सौंदर्य आणि सुडौल फिगरचे रहस्य म्हणजे पाणी’ असं सांगणारी ती सुंदरी, तिने केलेल्या आहारनियंत्रण आणि व्यायाम याबद्दल काहीच सांगत नाही. आजदेखील बर्‍याच लोकांना असं वाटतं की, खूप खूप पाणी प्यायलं तर शरीरातली चरबीसुद्धा वितळून निघून जाते. हा भ्रम आहे. पाणी पिणे हे अगदी अत्यावश्यक असते. ते शरीरातल्या बर्‍याच हानीकारक किंवा अनावश्यक पदार्थांना बाहेर फेकतं, पण त्यात अतिरिक्त चरबीचा समावेश होत नाही. आपल्या शरीरातली चरबी ही फक्त व्यायाम आणि संतुलित नियंत्रित आहाराने कमी होते.

* सगळे फॅट हानीकारक असतात

हा बहुधा सर्वात जुना गैरसमज असेल. ‘सगळे’ फॅट (तेल, तूप, दुग्धजन्य पदार्थ, दाणे, काजू, किशमिश) वाईट नसतात. उलट आपल्या सगळ्यांना थोड्या विशिष्ट फॅटची रोजच्या आहारात गरज असते. उदा. म्युफा, प्युफा, इसेन्शियल फॅटी ऍसिड जे आपल्याला ऑलिव्ह ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, करडी ऑइल, शेंगदाणा तेल व अक्रोड, पिस्ता, काजू आणि मासे यातून मिळते. फॅट शरीरातल्या पेशींचे आरोग्य जपत, विटामिन अ, ड, ई, क याच्या पचनात मदत करतं आणि सगळ्या मज्जातंतूंचे स्वास्थ्य संभाळतं. अर्थात अति तेलयुक्त किंवा फॅट रीच आहार असेल तर वजन नक्कीच वाढते पण त्याचा अर्थ सगळे फॅट हानीकारक असतात असं होत नाही.

* फॅटफ्री ृ लो कॅलोरी

हा आधुनिक हेल्थ फूड संस्कृतीचा मोठा गैरसमज आहे. फॅटफ्री म्हणजे त्यात कॅलोरी पण कमी असतात किंवा त्याने वजन वाढत नाही असे अजिबात नाही. उलट एक सोपा निर्देश म्हणजे जर फॅट कमी असेल तर पदार्थात साखरेचे किंवा तत्सम प्रमाण वाढवलेले असते. तसेच शुगरफ्री पदार्थात इतर फॅटचे प्रमाण जास्त असते. आणि बेक्ड म्हणजे लो कॅलोरी असं नेहमीच नसतं. तर म्हणून कायम हल्ूगहू लेबल वाचूनच पदार्थाची निवड करावी!

* जास्त साखर खाऊन मधुमेह होतो

तुम्हाला जर मधुमेह असेल तर जास्त साखर किंवा गोड पदार्थ खाऊन तुमच्या रक्तातल्या ग्लूकोजचे प्रमाण वाढेल. पण तुम्हाला मधुमेह नसेल तर फक्त जास्त साखर खाल्ल्यामुळे हा आजार होत नाही. तसेच, आहारात अजिबात वरून साखर घातलेले पदार्थ नसतील तरी तुम्हाला मधुमेह होणार नाही याची खात्री देता येत नाही. कारण मधुमेह होण्यामागे बरीच आनुवंशिक व इतर कारणं असतात जसे अति वजन असणे, व्यायामाचा अभाव, अनियमित व असंतुलित आहार, मद्यपान इ. साधारण गोड पदार्थ कॅलोरी व फॅट रीच असतात आणि म्हणून त्याने वजन वाढून मधुमेह होण्याची शक्यता वाढते. म्हणून रोजच्या रोज गोडधोड, तळलेले पदार्थ खाणे टाळावेत.

* रात्री उशिरा खाल्लं की वजन वाढते

काही वर्षांपूर्वी ४ पी. एम. डाएट नावाचे फॅड आले होते. तेव्हापासून खूप लोकांची अशी समजूत झाली आहे की रात्री-अपरात्री खाल्लं की जास्त वजन वाढतं. आपलं शरीर वेळ बघून पचनक्रिया कशी करायची हे ठरवत नसतं. नाहीतर दिवसा भरपूर केक, पेस्ट्री, पिझ्झा आणि रात्री फक्त सलाड असं खाल्लं तरी मग वजन वाढायला नको मग? पण तसं होत नाही. वजन वाढणं किंवा कमी होणं हे पूर्णपणे दिवसभरात (आणि रात्रीत) आहारात असलेल्या कॅलोरीवर आधारित असतं. एका निरीक्षणानुसार अपरात्री खाल्ले जाणारे पदार्थ हे मुळातच खूप कॅलोरी रिच असून त्याने मेदोवृद्धी होत. तर वजनवाढीचा संबंध ‘कधी’ खातोय याच्याशी नसून ‘काय’ आणि ‘किती’ खातोय याच्याशी असतो!

- सौजन्य:- फुलोरा, सामना. अमिता गद्रे-केळकर (ंलेखिका डाएट कन्सल्टंट आहेत)
amitagadre@gmail.com

प्रयत्नांनी करीअर - डावा, उजवा, उजवा, डावा...

माणसाचा मेंदू हे एक अजब रसायन. स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासात आपल्यासोबत असणारा हा मेंदू नक्की कसं काम करतो हे आपल्यालाच ठाऊक नसतं. निसर्गत:च आपल्या मेंदूच्या काही शक्तींचा अधिक तर काही शक्तींचा कमी विकास झालेला असतो. आपल्या शक्तिस्थळांचा अधिकाधिक वापर करून आणि कमजोर बाबींवर मात करून आपण आपला अभ्यास अधिक कार्यक्षम, उपयुक्त बनवू शकतो. त्यासाठीच तुमचा मेंदू कोणत्या ‘चाली’ने जास्त चालतो? डाव्या की उजव्या? या प्रश्‍नाचं उत्तर देणं महत्त्वाचं ठरेल!
मानसशास्त्रज्ञांच्या मते तुम्हा-आम्हा सर्वांचा मेंदू म्हणजे एक ‘कार्यालय’ आहे. या कार्यालयाच्या प्रत्येक शाखेला एक वेगवेगळं, विशिष्ट कार्य ‘सुपूर्द’ करण्यात आलं आहे. हे विशिष्ट कार्य करण्याच्या क्षमतेवरून त्या विभागाची ‘क्षमता’ तपासता येते.


ढोबळमानाने मेंदूचे ‘डावा मेंदू’ व ‘उजवा मेंदू’ असे दोन भाग मानण्यात येतात. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात जरी हे दोन्ही भाग सापडत असले तरी बर्‍याचदा त्या व्यक्तीचा एक भाग म्हणजेच डावा किंवा उजवा दुसर्‍याहून जास्त प्रभावी असतो. त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत, अर्थातच या प्रभावी भागाप्रमाणेच चालते. डावा मेंदू जास्त प्रभावी असणारी व्यक्ती आणि उजवा मेंदू प्रभावी असणारी व्यक्ती एकच अभ्यासक्रम, एखादे पुस्तक किंवा एखादा विषय संपूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासू शकतो. म्हणूनच आपणही अभ्यास करताना आपला कुठला ‘मेंदू’ जास्त प्रभावी आहे ते ओळखू शकतो तर त्याचा वापर करून आपला अभ्यास अधिक सुसंघटित, प्रभावी आणि स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला अधिक जवळ जाणारा असा बनवू शकतो!

डाव्या मेंदूची माणसं

डावा मेंदू अधिक प्रभावी असणारी माणसं 'Left Brained individuals' म्हणून ओळखली जातात. तुम्ही पण त्यांच्यासारखे आहात का? हे ओळखण्यासाठी आपण प्रथम डाव्या मेंदूच्या माणसांचे गुणधर्म, स्वभावविशेष पाहू. त्यानंतर उजव्या मेंदूच्या व्यक्तींचेही पाहू. तुम्हाला त्यात स्वत:च्या जवळ जाणार्‍या व्यक्ती ज्या गटात सापडतील तो तुमचा मेंदूगट! अर्थात हे लक्षात ठेवायचं की कुणीच संपूर्णपणे १००टक्के डाव्या किंवा उजव्या मेंदूचा बनलेला नसणार आहे! मात्र ६०-४०, ७५-२५ असं एक जास्त प्रभावी आणि कमी प्रभावी असं गुणोत्तर मात्र निश्‍चितच असणार! तर डाव्या मेंदूने जास्त विचार करणारी माणसं म्हणजे ‘लॉजिकल’ माणसं अशी माणसं म्हणजे गणितात प्रवीण. गणितात असणारी स्थिर. पॅटर्नवजा मांडणी त्यांना आवडते. तुकडे करून भाग पाडून ते एखादी गोष्ट पटकन शिकतात. कुठलाही मोबाईल नंबर. गाडीचा नंबर यांना तोंडपाठ असतो. विश्‍लेषणात यांचा हात कोणीच धरू शकत नाही. अगदी साधा क्रिकेटचा सामना पाहत असताना पुढच्या प्रत्येक ओव्हरमधला रनरेट काढण्यासाठी यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. कुठे, कुठली वस्तू कमी किमतीत मिळेल, कुठल्या गुंतवणुकीवर कमी काळात जास्तीत जास्त व्याज मिळेल हे ते धडाधड सांगू शकतात.

अशा व्यक्ती जितक्या हिशेबाच्या पक्क्या, तितक्याच घड्याळाच्याही. वेळ पाळणं भयंकर आवडतं यांना. ध्येय गाठण्यासाठी अचूक नियोजन करतात. अगदी कागदावर स्टेप-बाय-स्टेप ‘प्लानिंग’ करून. नियोजन म्हणजे यांचा कणाच! टप्प्याटप्प्याने आपल्या ध्येयाकडे हे मार्गक्रमणा करतात. घिसाडघाई नाही, अतिउत्साह नाही. अभ्यासातही तसंच. कडून ँ कडे आणि ँ कडून ण् कडे अशी त्यांची विचारांची जोडसाखळी असते. कडून प कडे हनुमान उडी घेणार नाहीत! अक्षर, चिन्ह, सांकेतिक भाषा यावरचे कूटप्रश्‍न यांना सोडवायला प्रचंड आवडतात, म्हणूनच बुद्धिमत्ता चाचणी हे यांचे बलस्थान!

अशा व्यक्ती एखाद्या माणसाला भेटल्या तर त्याचं नाव लक्षात ठेवतात, विसरत नाहीत. नियोजन असल्याने आयुष्यात भौतिक अर्थाने यशस्वी पण ठरतात. अतिशय सूक्ष्म निरीक्षण असतं यांचं. फारसं सुटत नाही नजरेतून.

सांख्यिकीय क्षमता, डेटाचा वापर करणार्‍या स्पर्धात्मक परीक्षांत अशा स्वरूपाच्या व्यक्ती सहज यशस्वी होतात. यांचे त्यांच्या भावनांवर बर्‍यापैकी नियंत्रण असते. साहजिकच निर्णय हे भावनाविवश न होता, विचारांवर आधारित घेतात.

डाव्या मेंदूच्या व्यक्ती इंजिनीअर्स, संख्याशास्त्रातली करीयर्स, बँकिंग यात प्रचंड यशस्वी असतात.

उजव्या मेंदूची माणसं

ही म्हणजे भावनाविवश, बरीचशी कलाप्रवृत्तीची माणसं. यांना पॅटर्नऐवजी चित्र भावतं. एखादी व्यक्ती भेटली तर हे तिचा चेहरा लक्षात ठेवतील. नाव लक्षात ठेवतीलच असं मात्र नाही, अशा व्यक्तींना विश्‍लेषणापेक्षा सारग्रहणात जास्त रस असतो म्हणूनच इतिहासासारख्या विषयात या व्यक्ती रमतात. तुकड्यातुकड्यात अभ्यास करण्याऐवजी अशा व्यक्तींना संपूर्ण एकत्रित संरचना लक्षात ठेवणं जास्त भावतं.

अशा व्यक्तींना नियोजनाचं वावडं असतं. वेळापत्रक अतिशय नावडीचं! अभ्यासाची पद्धतही अशीच. वाटलं तर वाटलं तेव्हा वाटलंं तसं! अंतर्ज्ञानावर त्यांचं ज्ञान आधारलेलं असतं. आतून वाटतं तेव्हाच त्यांना ‘कळतं’. रंग, चित्र यांचा त्यांना प्रचंड सोस असतो. वृत्ती खेळकर. कलाकार प्रवृत्तीची असते. 'Intuition' 'sixth sense' अतिशय तीव्र असतात.

अशा व्यक्ती भावनाविवश असतात. या भावना त्या शब्दातही सहज पकडू शकतात म्हणून निबंधात्मक उत्तरात या व्यक्ती कधीही हार जाणार नाहीत. इतरांना समजून घेणे, चेहरे वाचून स्वभाव ओळखणे यात अतिशय पटाईत! फोनवर तासन्तास बोलत राहतील (दुसर्‍या दिवशी परीक्षा असली तरी!)

या व्यक्ती कवी मनाच्या म्हणूनच थोड्या ‘अनपेक्षित’ वागणार्‍या लहरी असतात. फोनवर बोलताना, इतरांशी बोलताना प्रचंड हातवारे करीत बोलतील. नवी वस्तू घेतील आणि त्याचं ‘इन्स्ट्रक्शन मॅन्युअल’ न वाचताच ते वापरतील! नियम यांना पटत नाहीत आणि नियमानुसार वागतही नाहीत! 'Creative Approch' ने उत्तरं शोधतील. सलग, पायर्‍या पायर्‍यांनी शिकणं यांना कंटाळवाणं वाटतं. संगीत, चित्रकला, नाट्य यात मात्र पारंगत!

निष्कर्षाकडे...

एकूण तुम्ही प्रामुख्याने डावे की उजवे, हे तुम्हाला थोडंफार ओळखता आलं असेलच! तुम्ही म्हणाल, याचा आणि स्पर्धात्मक परीक्षेच्या यशाचा संबंध काय? तर मी म्हणेन, आहे. तुमच्यात असलेला डावा (गणिती) आणि उजवा (कलाकार) यामधला जो अधिक बलवान आहे, तो अर्थातच तुमचं शक्तिस्थान आहे. त्यामुळे तुमच्या अभ्यासात जर त्याचा वापर करायला मिळाला तर तुमची यशोनिश्‍चिती नैसर्गिकच! पण असा विचार करा की, दुर्दैवाने तुमची कच्ची बाजूच तुम्हाला परीक्षेत वापरायची आहे तर? उदा. डाव्या मेंदूच्या व्यक्तीला निबंध लिहायचे आहेत किंवा उजव्या मेंदूच्या व्यक्तीला ‘गणितं’ सोडवायची आहेत तर होणार ना पंचाईत? अशावेळेला आपलं स्वत्त्व’ न सोडता इतर क्षेत्र पण आपल्याला ‘काबिज’ करणं जमलं पाहिजे. ते कसं करावं, हे आपण याच प्रवासात शिकू...

*

तुम्हाला तुम्ही नक्की ‘उजवे की डावे’ याचा थोडाफार अंदाज आलाच असेल ना? तरीही तुमच्या मेंदूच्या डाव्या किंवा उजव्या भागाच्या क्षमतेची नक्की परीक्षा घेण्यासाठी www.wherecreativity goestoschool.com/ Vancouver/left_rigth/rb-test.htm वर जा. इथे एक ऑनलाईन टेस्ट आहे. जवळपास ५० एक प्रश्‍नांची उत्तरं देऊन तत्काळ नक्की तुम्ही ‘डावे की उजवे’ हे तुमच्या लक्षात येईल. हेही विश्‍लेषणासह!

Thursday, April 07, 2011

जीवनसत्त्वाची बाराखडी - फ

 जीवनसत्त्व ‘फ’ला पूर्वी फॅटी ऍसिड म्हणून ओळखले जायचे. यामध्ये लायनॉलिक आणि अल्फा लायनॉलिक ऍसिड आहे. ओमेगा-३ आणि ओमेगा-६ या दोन श्रेणींमध्ये ही ऍसिडस् येतात. ही ऍसिडस् हृदय, किडनी, लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहेत.


कुठून मिळवाल?

मासे, शार्क लिव्हर ऑइल, वनस्पती तेल, काजू, बदाम, अक्रोडसारखा सुका मेवा, सूर्यफुलांच्या बिया, टरबुजाच्या बिया.

उपयोग : शारीरिक वाढीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी जीवनसत्त्व ‘फ’ची गरज आहे. शरीरातल्या हार्मोन्सलेवलचा समतोल ठेवण्यासाठी आवश्यक चांगल्या पेशींच्या वृद्धीसाठी आणि रोगप्रतीकात्मक शक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्त्व ‘फ’ मदत करते. हृदयासाठी घातक असणार्‍या कॉलेस्ट्रॉलच्या पातळीवर नियंत्रण ठेवणे, शरीरातील हानीकारक तत्त्वे लघवीवाटे शरीराबाहेर फेकण्यास मदत करणे.

कमतरतेमुळे होणारे आजार

केस गळणे, हृदयविकार, किडनी-लिव्हरचे आजार, सतत आजारी पडणे, डोळे सुकणे, उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल वाढणे इत्यादी.

सौजन्य:- चिरायू, सामना

Saturday, April 02, 2011

लॅपटॉप टेवा टापटीप

कधीही कुठेही संगणकावर काम करण्यासाठी ‘लॅपटॉप’ ही आजची गरज झाली आहे. विविध मॉडेल्स व कलर्समध्ये उपलब्ध असणारे लॅपटॉप काहींसाठी स्टेटससिंबॉलही बनले आहे. पण थोड्याशा निष्काळजीमुळे तो बिघडू शकतो. म्हणून लॅपटॉप टापटीप ठेवायलाच हवा.


* लॅपटॉपच्या थ्र्ंि स्क्रीन किंवा कीपॅडवर कोणतेही द्रवपदार्थ सांडू नयेत, त्यामुळे लॅपटॉपमधील इलेक्ट्रॉनिक पार्टस् खराब व्हायची शक्यता असते.

* लॅपटॉपमध्ये विंडोज किंवा इतर सॉफ्टवेअरचे सर्व लेटेस्ट पॅचेस वेळोवेळी इन्स्टॉल करीत राहा. त्यामुळे लॅपटॉपचा वेग वाढतो.

* ‘‘लॅपटॉप सेफ बॅग्ज’’चा वापर करा. बाजारातील कमी दर्जाच्या बॅग्जचा वापर शक्यतो टाळावा. लॅपटॉप सेफ बॅग्जमधील ह्युर्मडीटी कंट्रोलमुळे वातावरणातील दमटपणापासून लॅपटॉपचे संरक्षण करतात.

* लॅपटॉप नियमितपणे योग्य वेळी चार्ज करीत राहावे. त्यामुळे लॅपटॉपच्या बॅटरीचे आयुष्य वाढते.

* आजकाल बरेच लॅपटॉप ‘‘थम्ब इंप्रेशन’’ या वैशिष्ट्यावर चालतात. त्यामुळे आपल्या बोटाचे ठसे नोंदवायचे विसरू नका. त्यामुळे आपला लॅपटॉप आपल्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही व्यक्ती वापरू शकणार नाही.

* लॅपटॉपची सर्व्हिसिंग शक्यतो अथोराईज डीलरकडूनच करून घ्यावी. त्यामुळे वॉरंटी संपण्याची शक्यता कमी होते.
सौजन्य:- इंद्रधनू, सामना