जीवनसत्त्व ‘फ’ला पूर्वी फॅटी ऍसिड म्हणून ओळखले जायचे. यामध्ये लायनॉलिक आणि अल्फा लायनॉलिक ऍसिड आहे. ओमेगा-३ आणि ओमेगा-६ या दोन श्रेणींमध्ये ही ऍसिडस् येतात. ही ऍसिडस् हृदय, किडनी, लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहेत.
कुठून मिळवाल?
मासे, शार्क लिव्हर ऑइल, वनस्पती तेल, काजू, बदाम, अक्रोडसारखा सुका मेवा, सूर्यफुलांच्या बिया, टरबुजाच्या बिया.
उपयोग : शारीरिक वाढीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी जीवनसत्त्व ‘फ’ची गरज आहे. शरीरातल्या हार्मोन्सलेवलचा समतोल ठेवण्यासाठी आवश्यक चांगल्या पेशींच्या वृद्धीसाठी आणि रोगप्रतीकात्मक शक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्त्व ‘फ’ मदत करते. हृदयासाठी घातक असणार्या कॉलेस्ट्रॉलच्या पातळीवर नियंत्रण ठेवणे, शरीरातील हानीकारक तत्त्वे लघवीवाटे शरीराबाहेर फेकण्यास मदत करणे.
कमतरतेमुळे होणारे आजार
केस गळणे, हृदयविकार, किडनी-लिव्हरचे आजार, सतत आजारी पडणे, डोळे सुकणे, उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल वाढणे इत्यादी.
सौजन्य:- चिरायू, सामना
No comments:
Post a Comment