तंत्रज्ञान शाप की वरदान हा अखंड न संपणारा वाद आहे. त्यातून विधायक कामं जितकी होतात तितकी किंवा त्याहून अधिक कामं विध्वंसाचीच होत असावीत. एसएमएस स्पूफिंग हा त्यातलाच एक प्रकार. साध्यासोप्या शब्दांत सांगायचं तर स्पूफिंग म्हणजे ‘दुसर्याच्या मुखवट्याआड’ कामं करणं. मग या स्पूफिंगचे आयपी स्पूफिंग, मॅक स्पूफिंग, एसएमएस स्पूफिंग असे बरेचसे प्रकार सांगता येतील. ज्या गोष्टीचं स्पूफिंग, त्या गोष्टीचा मुखवटा वापरायचा म्हणजे झालं!
* स्पूफिंग कसं करतात?
मूळ मोबाईल क्रमांकधारकाला पत्ताही लागू न देता हे एसएमएस स्पूफिंगचं काम लीलया केलं जातं. वेबसाईट उघडायची, त्यात प्रति आणि प्रेषक असे दोन्ही मोबाईल नंबर टाकायचे आणि मेसेज लिहायचा, बस्स! हे सगळं गमती जमतीत चाललं असेल तोवर ठीक, नाहीतर कुणा बिचार्याचा यात बळी जायचा. कल्पना तर करून पहा, तुमच्या नंबरवरून कुणाला धमकीचे मेसेजेस गेले आहेत आणि अचानकपणे पोलीस तुमच्या दाराशी दत्त म्हणून उभे राहिले आहेत! आता आलं लक्षात हे किती धोकादायक आहे ते? वाढत्या ग्राहक संख्येसोबत मोबाईल कंपन्यांच्या एसएमएस सेंटरवरही ताण वाढतोय. कधी कधी ही सेंटर्स कंपन्या स्वत: चालवतात किंवा इतरत्र चालवायलाही देतात. याच एसएमएस गेटवेमधले काही कोड त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बदलले की, कुणीही ‘क्ष’ व्यक्ती कुणाही ‘य’ व्यक्तीच्या नावाने तिसर्याच ‘अ’ला एसएमएस पाठवू शकते. नशीब हे कोड बदलणं इतकं सहज शक्य नाही, नाहीतर रोज सकाळी चहाच्या घुटक्यांबरोबर रोजच्या बातम्यांसोबतच एसएमएस स्पूफिंगच्या बातम्याही वाचाव्या लागल्या असत्या.
* हे टाळता येईल का?
याचं उत्तर हो आहे आणि नाहीही. जर तुमच्या मोबाईलमध्ये फक्त ओळखीच्या लोकांचेच एसएमएस यावेत अशी सेटिंग करण्याची व्यवस्था असेल तर किमान अनोळखी नंबरवरून येणार्या अनावश्यक आणि क्वचित फसवेगिरीच्या मेसेजेसपासून दूर राहू शकता, पण यातही दोन अडचणी आहेत. एक म्हणजे सगळ्याच मोबाईलमध्ये ही सुविधा असतेच असं नाही आणि दुसरी अडचण म्हणजे ओळखीच्याच नंबरवरून असा एसएमएस आला तर तो खोटा असूनही खरा मानला जाईल. म्हणजे पुढील गैरसोयींना तोंड देणं आपसूक आलंच.
अर्थात हे टाळता येत नसलं तरी यावरचे उपाय मात्र नक्की माहीत असायला हवेत. असा एसएमएस आल्यास किंवा कुणी तुमचाच मोबाईल नंबर स्पूफ करून त्यावरून इतरांना मेसेज पाठवत आहे असे कळल्यास ताबडतोब आपल्या मोबाईल ऑपरेटरला व पोलिसांना कळवावे. मोबाईल कंपनी हे मेसेज नक्की कुठून पाठवले जात आहेत याचा शोध घेईल व पुढील कार्यवाहीसाठी पोलीस खाते सक्षम आहेच.
आता शोध घेतल्यास अशा सेवा देणार्या काही वेबसाईट सापडतीलही, पण असा दुसर्याचा नंबर वापरून कुणा तिसर्यालाच मेसेज पाठवणं बेकायदेशीर तर आहेच. त्यामुळे या वेबसाईट एकदा नजरेत आल्या की बंद पडतात अन् नाही बंद पडल्या तर सजग नेटिझन्सकडून त्यांची माहिती योग्य ठिकाणी जाऊन त्या बंद पाडल्या जातातच. तशा मोबाईल कंपन्याही गप्प बसलेल्या नाहीत. मेसेज गेटवे आणि एकूणच मेसेजच्या कार्यप्रणालीत कुठे उणिवा, कमकुवतपणा आहे हे डोळ्यात तेल घालून पाहिलं जातंय. जरा कुठे फट सापडली की, त्याचा गैरफायदा घेणारे टपून बसलेले असतातच. ती लक्षात आल्यापासून तिचा दुरुपयोग व्हायला अर्ध्या-एक दिवसाचा अवधीही जास्त ठरावा. म्हणूनच कार्यपद्धतीतल्या अशा फटींना ‘झीरो डे एक्सप्लॉइट’ म्हणतात. खरं तर तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे. ती वापरताना जरा जपूनच वापरावी. खर्या आयुष्यात फुकट ते पौष्टिक असू शकतं, पण आंतरजालावर मिळणारं फुकटचं सगळंच चांगलं असतंच असं नाही!

सौजन्य :- फुलोरा, सामना
swatsurmy@gmail.com
No comments:
Post a Comment