आहारात बी १२ ची मात्रा कमी असणे किंवा शरीरात बी १२ कमी शोषले जाण्याने त्याची उणीव होते. ही उणीव एक गंभीर स्वरूप घेऊन आपल्या शरीरातल्या लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी करते.
आपले प्रोसेस्सेड पदार्थांचे वाढलेले सेवन आणि दिवसेंदिवस कमी खाण्यात येणारा पारंपरिक स्वयंपाक यांनी हल्ली बर्याच व्यक्तींना जीवनसत्त्व बी १२ च्या डेफिशिन्सीचा त्रास होतो. या डेफिशियन्सीची सगळ्यात आधी आढळून येणारी लक्षणं म्हणजे दम लागणं, छातीत धडधडणं, चेहरा निस्तेज होणं, अकारण थकवा, चिडचिड होणं इ. बरेचदा अगदी व्यवस्थित सकाळ संध्याकाळ पोळीभाजी, आमटी-भात असा आहार असलेल्या व्यक्तींना पण अशी बी १२ची उणीव होऊ शकते. हे असं का होतं? तेच आज जाणून घेऊया.
आहारात बी १२ ची मात्रा कमी असणे किंवा शरीरात बी १२ कमी शोषले जाण्याने त्याची उणीव होते. ही उणीव एक गंभीर स्वरूप घेऊन आपल्या शरीरातल्या लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी करते. परिणामाने बी १२ डेफिश्यन्सी अनिमिया किंवा पर्निशियस अनिमिया होऊ शकतो. या व्यतिरिक्त बी १२ आपल्या त्वचा, केस, रक्तपेशी, मज्जातंतू आणि बाकी स्वास्थ्यासाठी पण गरजेचे असते.
बी १२ जीवनसत्त्वाची उणीव एवढी सहजासहजी कशी होऊ शकते? सर्व बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्व विद्राव्य असल्यामुळे रोज शरीरातले अतिरिक्त बी १२ मूत्रमार्गे काढून टाकले जाते. म्हणून रोज आपल्या आहारात हे जीवनसत्त्व असणे गरजेचे असते. दुसरं कारण म्हणजे बी १२ जीवनसत्त्वाचे स्रोत. हे जीवनसत्त्व आपल्याल्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस/ चिकन, अंडी आणि सी फूड (मासे) यातून मिळतं. म्हणून मांसाहारी मंडळींना याची डेफिश्यन्सी सहज होत नाही. शाकाहारी आहारात जर दूध, दही, ताक याचे प्रमाण खूप कमी असेल तर बी १२ ची उणीव होऊ शकते आणि जे विगन आहार (मांस/अंडी/दूध असे कुठलेच पदार्थ नाही) घेतात त्यांना तर फोर्टिफाइड पीठ किंवा व्हिटामिन सप्लिमेंटची गरज असते. शिवाय ज्यांना सिलिएक डिसीज किंवा क्रोहन्स डिसीज झालेला असतो त्यांच्यात पण बी १२ ची उणीव आढळते.
आपल्या शरीरात थोड्या प्रमाणात जीवनसत्त्व बी १२ साठवून ठेवलेले असते. पण जेव्हा दीर्घ काळ आहारातून हे जीवनसत्त्व मिळत नाही, तेव्हा त्याच्या डेफिशिन्सीची लक्षणं दिसायला लागतात. यावर उपचार म्हणजे बी १२ जीवनसत्त्वाची इंजेक्शन घ्यावी लागतात, पण एकदा ही इंजेक्शन घेतली म्हणजे काम झालं असं नसतं. हा उपचार झाल्यानंतर रोज कमीतकमी २ ग्लास दूध किंवा त्यापासून बनलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं. म्हणजे पुन्हा अशी उणीव उद्भवत नाही.

सौजन्य:- फुलोरा, सामना
No comments:
Post a Comment