‘यायच्या आधी मला फोनव रे’ किंवा ‘खरड टाक मला’ अशी भाषा कानावर पडली किंवा फेसबुक, ऑर्कुटवर वाचायला मिळाली तरी आजकाल आपल्याला काही अगम्य वाचल्यासारखे वाटत नाही. ‘फोनवणे, खरडणे, व्यनी करणे’ असे शब्द आता हळूहळू चांगलेच रुळायला लागले आहेत. इंग्रजाळलेल्या फोनवणे अर्थात फोन करणे या शब्दाबरोबरच माय मराठी शब्दकोशात आता खरड, अनुदिनी, विदा, व्यनी अशा कदाचित तुम्ही पूर्वी कधीही न ऐकलेल्या शब्दांची भर पडत चालली आहे.
मराठी भाषेचे भवितव्य काय? मराठी भाषा संकटात आहे का? मराठी नामशेष होणार का? सध्या सगळीकडे या प्रश्नांनी नुसता धुमाकूळ घातला आहे. स्वयंघोषित विचारवंत ब्लॉगवर, संस्थळांवर, वर्तमानपत्रांतून आपापले विचार मांडत आहेत आणि चर्चा झडत आहेत. या सगळ्यापासून दूर इंटरनेटचा मुक्त हस्ताने वापर करणार्या आणि दिवस दिवस इंटरनेटवर ठाण मांडून असलेल्या मराठी नेटिझन्सनी मातर आपल्या परीने ही मायमराठी जपली आहे आणि तिला छान छान वेगवेगळे शब्ददेखील बहाल केले आहेत.
‘यायच्या आधी मला फोनव रे’ किंवा ‘खरड टाक मला’ अशी भाषा कानावर पडली किंवा फेसबुक, ऑर्कुटवर वाचायला मिळाली तरी आजकाल आपल्याला काही अगम्य वाचल्यासारखे वाटत नाही. ‘फोनवणे, खरडणे, व्यनी करणे’ असे शब्द आता हळूहळू चांगलेच रुळायला लागले आहेत. इंग्रजाळलेल्या फोनवणे अर्थात फोन करणे या शब्दाबरोबरच माय मराठी शब्दकोशात आता खरड, अनुदिनी, विदा, व्यनी अशा कदाचित तुम्ही पूर्वी कधीही न ऐकलेल्या शब्दांची भर पडत चालली आहे. नाही नाही असे दचकू नका.. अहो हे शब्द म्हणजे इंग्रजी शब्दांसाठी आपल्या मराठी नेटिझन्सनी शोधलेले मराठी शब्द आहेत. अनुदिनी म्हणजे ब्लॉग, खरड म्हणजे मेसेज अथवा स्क्रॅप, व्यनी म्हणजे व्यक्तिगत निरोप, समस म्हणजे एस.एम.एस. अशी ही मराठी रूपे आहेत. कौतुकाचा भाग म्हणजे ‘विदा’ अर्थात डेटासारख्या शब्दांनी आता विकीसारख्या ठिकाणीदेखील मान्यता मिळवली आहे.
इंटरनेट म्हणजे आंतरजाल, ऑनलाइन असणे म्हणजे रेषेवर असणे, वेबसाईट म्हणजे संस्थळ किंवा frequently asked questions (FAQ) अर्थात वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र) अशी सुंदर आणि सुटसुटीत रूपे आता आंतरजालावर सर्रास वापरात आली आहेत. गमतीचा भाग म्हणजे अनेक मराठी संस्थळांवर फेसबुकचा उल्लेख चेपू अर्थात चेहरा पुस्तक तर जी टॉकचा उल्लेख ग-बोल्या म्हणून केला जाताना दिसतो. अर्थात या विश्वात नवीनच प्रवेश घेतलेल्या माणसाला हे थोडे अवघड खरेतर आंतरजालीय भाषेत अनझेपेबलच वाटते.
असेच अजून काही नेटिझन्सनी मराठी भाषेला बहाल केलेले शब्द आहेत:-
कॉम्प्युटर ृ संगणक
संगणक रायटिंग / लिखाण ृ टंकन
कीबोर्ड ृ कळफलक
माऊस ृ उंदीर
माहितीचा स्रोत ृ विदागार
लिंक ृ दुवा
रिप्लाय ृ प्रतिसाद
ई-मेल ृ विरोप पत्ता
फॉर्वर्डेड ई-मेल ृ ढकलपत्र
अकाऊंट ृ सदस्य खाते
ओपन सोर्स ृ मुक्तस्रोत
या अशा शब्दांसाठी एक उपक्रमदेखील सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाविषयी व इतर गोष्टींच्या माहितीसाठी आपल्याला विकिपीडियावर सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. मराठी विकिपीडियावर तर आता चक्क मराठी लेखक हवे आहेत म्हणून जाहिरात देण्यात आली आहे. ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाददेखील मिळाला आहे. या सर्वांविषयी आपल्याला http://mr.wikipedia.org इथे जाणून घेता येईल.
विकिपीडियावर नमूद केल्याप्रमाणे विकिपीडिया समूहाचा भाग असणार्या ‘विक्शनरी’, ‘विकिबुक्स’, ‘विकिकोट्स’ आदी वेबपेजेसच्या लिंक्सही मराठी विकिपीडियाच्या होमपेजवर क्लिक करता येतात. ‘विक्शनरी’मध्ये ऑनलाइन शब्दकोश पाहता येतो तर ‘विकिबुक’ या लिंकवर ज्ञानेश्वरी, गीताई आदी काही वाचता येते. ‘विकिकोट्स’ या पेजवर विचार, सुविचार, म्हणी, वाक्प्रचार यांचा संग्रह करण्यात आला आहे.

सौजन्य:- फुलोरा, सामना
prasad.tamhankar@gmail.com
No comments:
Post a Comment