Saturday, June 01, 2013

इंटरनेट कम्युनिकेशन

इंटरनेटमुळे खरंच जग खूप जवळ आलं आहे. अगदी एखाद्या ‘ग्लोबल व्हिलेज’प्रमाणे नेटीझन्स सदैव एकमेकांच्या टचमध्ये असतात. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी इंटरनेटवर असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. मग ते सोशल नेटवर्किंंगच्या माध्यमातून असो किंवा ई-मेल किंवा यंगस्टर्सचं आवडतं चॅटिंग असो. इंटरनेटच्या जगात आता एकमेकांच्या टचमध्ये राहण्याचा एक नवीन पर्याय समोर आला आहे व तो म्हणजे ‘आय पी फोन’ (VOIP) (व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलचा) वापर करून इंटरनेटवरून थेट एकमेकांशी फोनवर बोलता येऊ शकते किंवा अगदी व्हिडिओ कॉन्फरसिंगदेखील करता येऊ शकते. सध्या इंटरनेटवर आयपीफोन व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे असंख्य पर्याय आपल्यासमोर आहेत.


- गुगल फोन : गुगलचा वापर करून आपण हिंदुस्थानातून थेट अमेरिका किंवा कॅनडामधील कोणत्याही क्रमांकावर फोन करू शकतो व यासाठी तुम्हाला गरज आहे ती फक्त इंटरनेटची. गुगलच्या Gtalk चा वापर करून आपण ही सेवा वापरू शकतो.

- व्होनेज मोबाईल ऍप्लिकेशन फॉर फेसबुक - जर तुमच्याकडे आयफोन (आयपॅड किंवा कोणताही ऍड्रॉईड मोबाईल प्रणाली असणारा मोबाईल असेल व त्यावर इंटरनेटची सुविधा असेल तर तुम्ही तुमच्या फेसबुकमधील कोणत्याही मित्राला थेट मोबाईलवरून इंटरनेटद्वारे फोन करू शकता. अगदी जर तुमचा मित्र परदेशात असेल तरीही व यासाठी तुमच्या इंटरनेटचा वापर केला जातो. म्हणजेच तुमचा मोबाईल ऑपरेटर तुमच्याकडून कॉल चार्जेसऐवजी इंटरनेट वापराचे चार्जेस घेईल जे कॉल चार्जेसपेक्षा बरेच स्वस्त आहेत.

- स्कायपी - स्कायपी ही जगातील सर्वात मोठी इंटरनेट कम्युनिकेशन सेवा पुरवणारी कंपनी आहे. स्कायपीचा वापर करून तुम्ही कम्युनिकेशन व्यतिरिक्त अनेक युनिक सेवा वापरू शकता. या सेवेचा वापर करून तुम्ही थेट कोणत्याही क्रमांकावर फोन करू शकता.त्याचबरोबर व्हॉईसमेल व इन्स्टंट मेसेजिंगसारखे अनोखे पर्यायदेखील स्कायपी आपणास देते. www.skypi.com या संकेत स्थळावर आपणास स्कायपीच्या सर्व सेवांबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकेल.

- इंटरनेट फोन - भविष्यातील घरातील फोन हे इंटरनेट फोन असतील व हे फोन्स इंटरनेटवर चालतील. सध्या कॉर्पोरेट जगात इंटरनेट फोन (Ipphone)

ची प्रचंड चलती आहे व बहुतांशी सर्वजण जुन्या टेलिफोन तंत्रज्ञानाऐवजी घ्झ् फोनला प्राधान्य देत आहेत. इंटरनेट फोन हे थेट इंटरनेटवर चालतात म्हणजेच तुमच्या इंटरनेटची केबल थेट फोनमध्ये टाकली की तुम्ही इंटरनेट फोनवरून कोणालाही फोन करू शकता. सध्या बाजारात - D - Link चा GVC ३००० व GLV-५४० हे दोन इंटरनेट फोन्स उपलब्ध आहेत. GVC-३००० या फोनमध्ये एक थ्ण् व छोटा वेब कॅमदेखील देण्यात आला आहे. त्याचा वापर करून तुम्ही थेट फोनवरूनच व्हिडीओ कॉलदेखील करू शकता.

VOIP (व्हॉईस ओव्हर इंटरनेटचे फायदे)

- फोन कॉल किंवा व्हिडीओ कॉल इंटरनेटवरून केल्यामुळे कॉल चार्जेस् लागत नाहीत. फक्त तुमच्या इंटरनेट वापराचे पैसे मोजावे लागतात.

- ISD (इंटरनॅशनल) कॉलसाठी VOIP तंत्रज्ञाचा खूपच फायदा होतो व अर्थात ISD कॉल खूप स्वस्तात करता येतात.

- मोबाईल किंवा दूरध्वनी नसला तरीदेखील थेट संगणकावर एकमेकांशी बोलता येते.

- फेसबुक, याहू मेसेंजरसारख्या नेटीझन्सच्या आवडत्या ऍप्लिकेशनमधून एकमेकांशी संभाषण करता येते.

- व्हिडीओ कॉलिंग हे VOIP चे सर्वात मोठे व युनिक वैशिष्ट्य आहे व त्यामुळे सातासमुद्रापार असलेल्या व्यक्तीशीदेखील अगदी आपल्यासमोर असल्याप्रमाणे संभाषण करता येते.

सौजन्य :- अमित घोडेकर, फुलोरा, सामना ०१०६१३