Wednesday, August 31, 2011

हरतालिका- पार्वतीच्या प्रेमाची कथा

दक्षकन्या पार्वतीने आपल्याला मनाजोगता वर मिळवण्यासाठी केलेली उपासना म्हणजे हरतालिका व्रत होय. हिमालयाने आपल्या स्वरूपसुंदरी मुलीचा विवाह विष्णूशी करण्याचे योजिले होते. पण पार्वतीच्या मनात मात्र भोळा सांब वसला होता. त्यामुळे पार्वतीने आपल्या आराध्याचे वाळूचे शिवलिंग स्थापून पत्री, फूल फळांनी त्याचे पूजन केले व त्याला प्रसन्न करून घेतले याकामी तिला तिच्या सखीचे सहकार्य लाभले.


म्हणजे बघा पूर्वीपासूनच एका पट्टमैत्रिणीला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. त्यावेळी पित्याने ठरवलेल्या श्रीमंत वराला नाकारून आपल्या पसंतीच्या गरीबाशी (लौकिकार्थाने विष्णूपेक्षा शंकर साधेच!) लग्न करून त्याच्या बरोबर 'लंकेची पार्वती' बनून राहण्याचे धैर्य दाघवणारी उमा ही आजच्या समस्त स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य ह्या विचारांची उद्गातीच ठरते.

आजच्या काळातही जिथे अजूनही मुलीने पित्याच्या बोट दाखवलेल्या वराशी विवाह करण्याचाच आग्रह धरणार्‍या घरातून प्रेमविवाह म्हणजे 'अब्रह्मण्यम' तेव्हा ही या हिमगौरीने 'जब प्यार किया तो डरना क्या' ह्या ध्येयाने तिने शंकराला मिळवले.

आजच्या जमान्यातही आपल्या मनपसंत जोडीदाराला लग्नासाठी 'प्रपोज' करण्याचं धाडस किती जणीत असतं? उगीच पोकळ उसासे टाकत मनात झुरत सोन्याच्या पिंजर्‍यातील बंद मैना होण्यापेक्षा मोकळ्या रानातील राघूबरोबर त्याच्या हृदयाची स्वामिनी बनून राहण्यासाठी भरारी होण्याचे सामर्थ्य किती जणीत असते?

उमेने शंकराचे महत्त्व जाणले होते त्याच्या विरक्त वृत्तीवरच ती भाळली अन शेवटपर्यंत त्याच्या बरोबर कैलासावरच राहिली. लक्ष्मीप्रमाणे वैकुंठात रुसवे फुगवे केले नाहीत की आपल्या श्रीमंत माहेराचे गोडवे गायले नाहीत, बापाच्या घरून संपत्ती आणली नाही.

वास्तविक विष्णू त्यांच्या जातीचा (जात म्हणजे तरी काय एकाचप्रकारचे संस्कार, सांपत्तिक स्थिती याने निर्माण होणारे 'स्टेटस') त्याच्याशी लग्न करून ती सुखाने वैभवात लोळू शकली असती. मात्र, तिने स्वबळावर आणि आपल्या पतीच्या सामर्थ्यावर कैलासावर राज्य केले अन ती आदिमाता म्हणून गौरवली गेली. शंकराच्या तेजाने ती झाकोळली तर नाहीच पण उलट 'उमा-महेश्वरा'चा जोडा तर 'अर्धनारी नटेश्वर' म्हणून शोभला.
आजच्या काळातल्या मुलीच नव्हे तर स्त्रियाही हरतालिकेचे व्रत करतात अगदी निरंकार, रात्रभर जागरण करून व्रत करण्याची प्रथा उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर आहे. पण ते जागरण आपण योग्य गोष्टी करून, सत्कार्य करून किंवा किमान इतरांची कुचेष्टा न करता करतो का? उपवासाचा देवाच्या जवळ वास, त्याची आराधना हा उद्देश थोडाफार तरी साध्य होतो का? घरातील राजकारण त्या एका दिवशीही आपण थांबवतो का? हा विचार प्रत्येकीने करायला हवा.

सुरवातीला ज्या गुणावर भाळून आपण 'त्या'च्याशी लग्न केले नंतर तोच भांडणाचा मुद्दा का होतो? नवर्‍याची निस्पृहवृत्ती पाहून लग्न करणारी, नंतर तीच त्यालाच लाच घेण्यास प्रवृत्त करते असं का? आजच्या काळात जर स्त्रीने ठरवले तर भ्रष्टाचार बंद होईल. फक्त त्याची सुरवात प्रत्येकीने घरापासून करावी.

माझा तुझा नातेवाईक, मित्र-मैत्रीण असा भेद न करता जर योग्य व गरजू माणसाला मदत करण्याचा गुण मनाचा कोतेपणा कमी करून थोडासा वैचारिक, सामाजिक विचार प्रत्येकीने केला तर समाजात शांतता, प्रस्थापित होईल. उन्नती व विकास होईल. टाळी एका हाताने वाजत नाही पार्वतीला 'शिव' मिळाला तसाच प्रत्येकीला योग्य जोडीदार व महेश्वराला 'उमा' मिळाली तशी प्रत्येकाला सुज्ञ व धोरणी पत्नी मिळाली तरच जोडा शोभून दिसतो.

चांगलं माणूस मिळत नसतं ते व्हावं लागतं. अनुभवाने, सहवासाने, चांगल्या वाचनाने, चांगल्या आचरणाने मनातली किल्मिष काढून सहजीवन जगल्यास प्रत्येक जोडी आदर्श होऊ शकते. दोघांनी वादात एकेक पाऊल मागे जावे, सामंजस्य, योग्य सुधारणांत वाईट प्रथा सोडण्यात एकेक पाऊल पुढेच राहिले तर आपल्याबरोबर समाजही सुधारेल.

हे सणवार व्रत वैकल्य जोखड, जबाबदारी किंवा बोजा न वाटता त्यातून आत्मशुद्धी, आत्मिक उन्नती साधली तरच त्याचा खरा उद्देश्य साध्य होईल.

सौजन्य:-

हरतालिका….आपले सण समजून घ्या.

आपल्या भारतीय संस्कृतीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी विशेष सण आहेत. त्यातीलच हरतालिका हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. सौभाग्यप्राप्ती करावयाचे हे एक व्रत आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. हे व्रत सुवासिनीदेखील करू शकतात.


हरतालिकेला नदी वा समुद्रातून वाळू आणून मैत्रीण, पार्वती वं तीन शिवलिंगाची प्रतिमा स्थापन करून त्याची पूजा करतात. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. फलाहार करतात. रात्री कथाकथन, जागरण करून सकाळी उत्तरपूजा करतात. देवीला खिचडीचा नैवद्य दाखवून देवीचे विसर्जन करतात.

हे व्रत भक्तीभावाने, निष्ठेने केल्यास मुलींना आपल्या मनाजोगा वर, अखंड सौभाग्य, आरोग्य, संतती वं संपत्तीचा लाभ होतो.

हरतालिका हे पार्वतीचे नाव आहे. पार्वतीने प्रबळ इच्छाशक्तीने तपश्चर्येने आपल्या मनाजोगता पती मिळविला. हे करताना तिला “आली” नावाच्या मैत्रिणीने मदत केली. आलीच्या मदतीने हर पती मिळाला म्हणून पार्वतीचे नाव हरतालिका पडले.

ह्या व्रताची कथा मुलीसाठी प्रेरणादायक आहे. हिमाचल पर्वताची मुलगी गौरी ही पर्वताची कन्या म्हणून पार्वतीदेखील म्हणतात. हिला भगवान विष्णूचे मागणे घेऊन नारदमुनी हिमालयाकडे आले. ह्या सुवार्तेने हिमालयाला अतिशय आनंद झाला त्याने पार्वतीला ही गोड बातमी सांगितली पण पार्वती तर खूप आधीपासून भोळे सांब म्हणजेच श्री शंकराला वरून बसली होती. मनातल्या मनात तीने सदाशीवालाच आपला पती मानले होते.

पित्याने विष्णूशी लग्न ठरविल्यामुळे ती आपली मैत्रीण आली हिला घेऊन अरण्यात निघून गेली. तिथे तीने कठोर तपश्चर्या व शिवाच्या अखंड चिंतनाने, उपासनेने शंकराला प्रसन्न केले. व आपला पती होण्याची कृपा करावी असा वर मागितला. शंकराने तथास्तु म्हटले.

ही बातमी कळताच हिमालयाने भगवान शंकराला आमंत्रण देऊन शिव पार्वतीचा मंगल विवाह सोहळा घडवून आणला. अशा तऱ्हेने पार्वतीने आत्यंतिक प्रेमाने, निष्ठेने शंकराला मिळविले म्हणून लोक शंकराला ‘पार्वतीपतये’ असे म्हणू लागले. पार्वतीने शंकराच्या गुणांवर प्रेम केले. शंकर भोला होता पण कलागुणी, कर्तबगार, तपस्वी, शक्तीमान, दयाळू होता.

हल्लीच्या मुलींनी वं त्यांच्या पालकांनीदेखील या सणातून शिकण्यासारखे आहे. फक्त संपत्ती, ऐश्वर्य वा दिखाऊपणावर जाऊन लग्नाचा निर्णय घेऊ नये तर मुलाच्या कर्तबगारीवर, गुणांवर, कर्तुत्वावर विश्वास ठेवावा. ऐश्वर्याची खात्री देता येत नाही परंतू सदगुणांची खात्री देता येते. हाच खरा हरतालीकेचा संदेश आहे.

सौजन्य:- http://zampya.wordpress.com/

Tuesday, August 30, 2011

भाद्रपद - हरतालिका पूजन

नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे 'हरतालिका' हे व्रत सर्वांत श्रेष्ठ मानले जाते. हे व्रत केल्यामुळेच पार्वतीला भगवान शंकर वर म्हणुन प्राप्त झाले, अशी कथा आहे.


भाद्रपद शुद्ध तृतीयेला मुली, सुवासिनी हे व्रत करतात. आंघोळ करुन, नदीतील वाळू आणतात. त्या वाळूची शिवलिंगे स्थापन करतात. परंतु अता बहुतेक ठिकाणी सखीसह पार्वतीच्या मातीच्या मूर्ति मिळतात. त्या स्थापून त्यांची पूजा करतात. पूजेचे ठिकाणी तोरण, केळीचे खुंट बांधतात, रांगोळी काढतात. फुले, विविध फुलाफळांच्या झाडांची पाने पत्री म्हणुन वाहतात. दिवसभर कडक (पाणी पण न पिता) उपास करतात.रात्री कहाणी व जागरण करतात. रात्री बारानंतर रुईच्या पानावर दही घालुन चाटतात. नंतर सकाळी उत्तरपूजा करुन व्रताचे विसर्जन करतात. हे व्रत केल्यामुळे स्त्रियांचे सौभाग्य वाढते, असे म्हणतात.

Sunday, August 28, 2011

पोळा

पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात, व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पिकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकुण आनंदाचे वातावरण असते.




या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासुन आराम असतो. तुतारी(बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन धुण्यात येते. नंतर चारुन घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकल्या जाते. त्यांचे पाठीवर सुरेख नक्षिकाम केलेली झुल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार) गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य. बैलाची निगा राखणार्‍या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.

पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात, व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पिकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकुण आनंदाचे वातावरण असते.




या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासुन आराम असतो. तुतारी(बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन धुण्यात येते. नंतर चारुन घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकल्या जाते. त्यांचे पाठीवर सुरेख नक्षिकाम केलेली झुल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार) गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य. बैलाची निगा राखणार्‍या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.

चित्र:Polaa10.jpg
 
या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठुन दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.गावाच्या सिमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पध्दत आहे.त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमिनदार) याचेतर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेउन ओवाळण्यात येते.बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.
असा हा पोळ्याचा सण आहे. दिवसेंदिवस होणार्‍या नापिकीमुळे व खालावणार्‍या आर्थिक परिस्थितीमुळे याचा उत्साह कमी होत आहे.

सौजन्य:-

Saturday, August 27, 2011

हॅकर्सचा हल्लाबोल

‘इंटरनेट’ संपर्कासाठी वापरण्यात येणार्‍या माध्यमांपैकी एक प्रमुख माध्यम. इंटरनेटने जग जवळ आले. केवळ एका क्लिकवर घरबसल्या जगाच्या कानाकोपर्‍यातील कशाचीही माहिती मिळवता येते. जगात कुठेही आपल्या संदेश ई-मेलद्वारे क्षणार्धात पाठविता येतो. कोणतीही खासगी संस्था, सरकारी आस्थापना, कॉर्पोरेट कंपन्या यांची माहिती हवी तेव्हा त्यांच्या वेबसाईटवरून घेता येते. जग जोडणार्‍या या माध्यमाचे फायदे अनेक आहेत, पण त्यापेक्षा या माध्यमाचा गैरवापर करणार्‍यांची संख्या अधिक आहे. ज्याप्रमाणे एका क्लिकवर जगाची माहिती मिळवता येते त्याचप्रमाणे ‘हॅकर्स’ एका क्लिकवर तुमचा ई-मेल आयडी किंवा वेबसाईट हॅक करतात. ‘हॅकर्स’ हे संगणक क्षेत्रात उच्चशिक्षित असतात. केंद्र सरकारची े.ुदन्.ग्ह ही वेबसाईट नुकतीच हॅक करण्यात आली. यावर पाकिस्तानी चिथावणीखोर संदेश टाकण्यात आले. ही वेबसाईट कुणी आणि कशी हॅक केली याचा शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयची वेबसाईटदेखील हॅक करण्यात आली होती. जवळपास महिनाभरानंतर ती पुन्हा सुरू झाली. वेबसाईट हॅक करण्याच्या घटना काही नवीन नाहीत. गेल्या पाच वर्षांत देशभरात तब्बल ३६७ वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आयटी सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बंगळुरूमध्ये दरवर्षी हॅकिंगचे सर्वाधिक गुन्हे नोंद होतात. हॅकर्स एखादे सॉफ्टवेअर अथवा व्हायरसचा वापर करून वेबसाईट हॅक करतात. वेबसाईटवर संबंधित संस्था किंवा तिच्या पदाधिकार्‍यांची वैयक्तिक माहिती असते. या माहितीचा गैरवापर हॅकर्सद्वारे केला जाऊ शकतो. संस्थेच्या सर्व डेटा नष्ट करून तिचे नुकसान व्हावे या उद्देशानेदेखील वेबसाईट हॅक केल्या जातात. त्यामुळे वेबसाईटवर स्वत:ची किंवा संस्थेची इत्थंभूत माहिती देताना काळजी घेण्याची गरज आहे. वेबसाईटबरोबरच ई-मेल आयडीदेखील हॅक करण्यात हे हॅकर्स माहीर असतात. अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचा ई-मेल आयडी हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. अंबानी यांच्या संपर्कातील व्यक्ती, त्यांनी ई-मेलवरून पाठविलेली माहिती हे सर्व चोरी करण्याच्या उद्देशानेच करण्यात आले. याआधीदेखील अनेक कंपन्या आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांचे ई-मेल हॅक करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. एखादा नातेवाईक, मित्र किंवा कंपनीतील सहकारी अशा ओळखीच्या व्यक्तींच्या नावावर हॅकर्स ई-मेल आयडी उघडतात आणि त्याद्वारे ई-मेल पाठविला जातो. ओळखीचे नाव दिसल्याने आपणही कोणताही विचार न करता मेल उघडतो. या मेलमध्ये माहितीऐवजी एखाद्या हॅक करणारा सॉफ्टवेअर किंवा व्हायरस असतो. संगणक अचानक हँग झाल्यानंतर आपल्या लक्षात येते. हॅकर्सची आणखी एक मोडस् ऑपरेंडी आहे. ‘तत्काळ मदतीची गरज’ तुमजा मित्र परदेशात अडचणीत आहे. त्याचे पाकीट व इतर सामान चोरीला गेले असून घरी परतण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. त्याला मदत करण्यासाठी काही रक्कम दिलेल्या बँक खात्यात जमा करा’ असा ई-मेल वाचून आपण संभ्रमात पडतो. नेमका त्याच वेळी मित्राशी संपर्क न झाल्यास आपणही त्यावर सहज विश्‍वास ठेवतो आणि मित्रासाठी काही रक्कम मेलमध्ये उल्लेख केलेल्या बँक खात्यात जमा करतो, पण प्रत्यक्षात मित्र हा परदेशात गेलेलाच नसतो त्यावेळी फसवणूक झाल्याचे आपल्या निदर्शनास येते. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा ई-मेल देखील अशाचप्रकारे हॅक करण्यात आला होता. त्यामुळे ई-मेल हाताळताना जरा जपून. खासगी माहिती ई-मेलवर अथवा वेबसाईटवर ठेवू नका. तुमची एक चूक भविष्यात धोकादायक ठरू शकते. हॅकर्समुळे गेल्या दोन वर्षांत हिंदुस्थानला सुमारे एक हजार कोटींचा फटका बसला आहे. आर्थिक नुकसानीची ही रक्कम आपण काळजी न घेतल्यास वाढू शकते. इतकेच नाही तर देशातील सरकारी संस्थांची माहिती मिळवून समाजकंटक या माहितीचा गैरवापर करू शकतात.


ई-मेल उघडण्यापूर्वी हे तपासून पहा

- ई-मेल ओळखीच्याच व्यक्तीने पाठविला आहे का?

- याआधी त्या व्यक्तीने ई-मेल पाठविला होता का?

- ई-मेल पाठविणारा सोबत ‘अटॅचमेंट’ पाठविणार होता का?

- ई-मेलचा विषय आणि अटॅचमेंटचा विषय सारखाच आहे का?

- व्हायरसचा धोका आहे का? (अपडेटेड ऍण्टी व्हायरसची गरज असते.)

- व्हायरस ऍलर्टचा ई-मेल फॉरवर्ड करू नका.

वेबसाईट व ई-मेल हॅक होऊ नये म्हणून....

- ई-मेल आयडीचा पासवर्ड वारंवार बदलावा.

- नाव, टोपणनाव, मोबाईल क्रमांक ही सर्वसाधारण माहिती पासवर्डसाठी टाळा.

- ऑनलाईन किंवा फोनवर पासवर्डची देवाणघेवाण करू नका.

- ज्या माहितीमुळे नुकसान होईल अशी माहिती वेबसाईटवर टाकू नका.

- ऍण्टी व्हायरस नियमित अपडेट करा.

- मूळ सर्व्हरसाठी सॉफ्टवेअरची लायसन्स कॉपी वापरा.

- दीपेश मोरे
सौजन्य:- पंचनामा, सामना २६०८२०११.

Thursday, August 25, 2011

महागाई, भ्रष्टाचार आणि अण्णा हजारे....

"अण्णा हजारे आगे बढो, हम तुम्हारे साथ है." हे वाक्य जे पूर्वी फक्त राजकारणी लोकांसाठी वापरलं जायचं ते आज एका समाज सेवकासाठी वापरलं जातंय.

"देश का बच्चा कैसा हो, अण्णा हजारे जैसा हो," 

"एक दो तीन चार, अण्णा हजारे है लाजवाब."

अशी बरीच वाक्य गेल्या काही दिवसात ट्रेन मधून जाताना, रस्त्यावरून जाताना कानि पडत आहेत. तर हि सर्व वाक्ये कानि पडण्याचे एकाच कारण ते म्हणजे जेष्ठ समाज सेवक श्री. अण्णा हजारे. त्यांनी प्रथम महाराष्ट्रात उपोषण केले होते ते  "माहितीचा कायदा" बनण्यासाठी. त्या नंतर प्रथम महाराष्ट्रात व नंतर देश पातळीवर "RIGHT TO INFORMATION ACT "  अस्तित्वात आला.  ह्या कायद्याचा सारांश एवढाच होता कि, जन सामान्यांनी  शाशकीय कामकाजाची, तिथल्या यंत्रणेची माहिती मागावी व ती त्यांना योग्य पद्धतीने मिळावी.

अर्थात हा हि कायदा बनवून घेण्यात अण्णांनी जन सामन्यांचे हितच बघितले होते, परंतु ज्या जन सामन्यांसाठी हा कायदा बनला, त्याचा उपयोग किती जन सामान्यांनी केला हा पण मोठा प्रश्नच आहे.

तूर्तास, सध्या चाललेल्या अण्णांच्या उपोषण बद्दल चर्चा करूया. "जन लोकपाल बिल" हे पार पूर्वी पासून संसदेत प्रलंबित आहे व ज्या कॉंग्रेस ने सर्वात जास्त वेळ देशात सरकार सांभाळले त्यांनी देखील या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते, व या बिला बद्दल सर्वात प्रथम आवाज उठवला तो "अण्णा हजारे" यांनी.त्यांनी महाराष्ट्रातून दिल्लीला प्रस्थान केले होते तेच मुळी सरकारला सूचना देऊन कि "जन लोकपाल विधेयक" बनत नाही तो पर्यंत उपोषण आंदोलन करणार, मग प्राण गेला तरी बेहत्तर.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हे "जन लोकपाल बिल" आहे तरी काय ? तर या बिलातील काही प्रमुख मुद्दे सारांश रुपात पुढील प्रमाणे (shaileshchakatta.blogspot.com  वरून)-

१. केंद्रामध्ये "लोकपाल" नावाची संस्था काढली जाईल आणि प्रत्येक राज्यामध्ये या संस्थेचा "लोकायुक्त" निवडला जाईल.


२. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याप्रमाणेच लोकपाल आयोग हा सुद्धा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. कोणताही सारकारी अधिकारी किंवा नेता या आयोगावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.


३. भ्रष्टाचाराचा कुठलाही खटला वर्षानुवर्षे चालणार नाही. चौकशी साठी जास्तीत जास्त १ वर्ष आणि खटल्यासाठी १ वर्ष दिला जाईल, जेणेकरून २ वर्षांत शिक्षेची अंमलबजावणी होईल.


४.आरोप सिद्ध झाल्यावर सर्व नुकसान त्या व्यक्तीकडून वसूल केले जाईल.


५. सामान्य जनतेला या बिलाचा फायदा काय? .........आपले कुठलेही सरकारी काम जर सुनिश्चित वेळेत झाले नाही तर लोकपाल विधेयाकानुसार जबाबदार सरकारी अधिकार्‍याकडून दंड वसूल केला जाईल आणि तो नुकसानभरपाई म्हणून आपल्याला दिला जाईल.


६.म्हणजेच, जर तुमचे रेशनकार्ड/ मतदानओळखपत्र/ पासपोर्ट यासाठी निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला असेल तर तुम्ही लोकपाल आयोगाकडे जाऊ शकता. लोकपाल तुमचे काम १ महिन्याच्या अवधीत पूर्ण करेल. शिवाय रेशनदुकानावर खराब धान्य, खराब रस्ते, पंचायत फंड घोटाळा अश्या तक्रारीही तुम्ही लोकपालकडे करू शकता. लोकपाल आयोग जास्तीत जास्त २ वर्षांत याविषयी पूर्ण निर्णय देईल.


७.पण या आयोगवर आयुक्त सरकार नेमेल का? नाही! आयुक्ताची निवड ही नागरिक आणि न्यायमूर्ती करतील. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय!


८.आणि लोकपालमधलाच एखादा अधिकारी भ्रष्ट निघाला तर? नाही! या आयोगाचे काम पूर्णपणे पारदर्शक असेल. त्या अधिकर्‍याची २ महिन्यात चौकशी करून दोषी आढळल्यास त्वरित हकालपट्टी केली जाईल.


९.मग सध्याच्या भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा बंद पडणार का? नाही... या सर्व यंत्रणा "लोकपाल" मध्ये समाविष्ट कार्यात येतील.


१०.ज्या व्यक्तीने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आहे त्याच्या जिविताची काळजी घेण्याची पूर्ण जबबदारी लोकपाल आयोगाची असेल.


११.आणि सगळ्यात महत्वाचे... लोकपाल आयोगाकडे कोणताही अधिकारी, नेता आणि न्यायाधीश यांची चौकशी करण्याचे अधिकार असतील.

आता जर वरील मुद्द्यांचे विवेचन केले तरी काही मुद्दे माझ्या मनात उपस्थित होतात,

१. जर लोकपाल हा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल तर काय त्याच्या निर्णयावर राष्ट्रपतींचे पण अंकुश नसेल !

२. ज्या देशात सबळ पुराव्या अभावी बरेचसे खटले एका बाजूनेच बंद केले जातात, तिथे २ वर्षांत हे सगळ होणार नाही का !

३.  आणि आरोप सिद्ध होणे किंवा न होणे हि तर पुढची गोष्ट आहे.

४. आयुक्ताची नेमणूक नागरिक आणि न्यायमूर्ती करतील तर आता पर्यंत सरकारांची निवडणूक पण नागरिकच करत होते मग आता पर्यंत काय होत आले !

५. जर सर्व भ्रष्टाचार यंत्रणा "लोकपाल"  मध्ये समाविष्ट होतील तर चालेल पण इतर सर्व सरकारी यंत्रणांना सरकार, लोकपाल तसेच जनतेला उत्तर देत बसावी लागतील मग त्यांनी काम कधी करायचे!

६. या विधेयकामुळे कदाचित हुकुमशाही माजण्याची पण शक्यता आहे. आणि आपली तर लोकशाही आहे !
तर सध्या देशभर फक्त भ्रष्टाचार विरोधी लाट जोरात उसळली आहे. सोसीअल networking वर पण सध्या हा विषय जोरात चर्चिला जातोय. अण्णांचा प्रयत्न मात्र प्रामाणिक आहे.

पण सरकारने आंदोलन चिरडण्यासाठी जे केले होते ते खरच निंदनीय होते.

अण्णांच्या  गरजा कमी असल्यामुळेच निस्वार्थी पणे ते एवढा मोठा त्याग करू शकत आहेत. 
आता प्रश्न हाच उरतो कि, जी जनता आता अण्णांना पाठींबा देत आहे, तीच जनता लोकपाल विधेयक आल्यावर काय त्याचा उपयोग करेल ?

आता हेच बघा एक छोटस उदाहरण -

आता जी जनता आंदोलनासाठी सकाळी बाहेर पडत असेल त्यांच्या घरी समजा सकाळी १/२ लिटर ची दुध पिशवी येत असेल.  ज्याची प्रथम M. R. P.  रु. १३.५० व आता १४.०० रु. आहे, तरी आपण सर्व मिळून रु. १५.०० देतो का ? तर सर्व देतात व धंदे वाले घेतात म्हणून. बर माझ्यासारख्या कुणी विचारलं तर तो अजबपणा ठरतो. आता तुम्हीच विचार करा ज्या देशाची लोकसंख्या १२५ करोड च्या वर आहे, तिथे जरी २५ करोड अश्या पिशव्या दर दिवशी विकल्या जात असतील, तर आपणच आपल्या हाताने हा पैसा दरदिवशी कशात टाकत आहोत ते. Accounting पद्धतीने म्हणाल तर हा सगळा पैसा रु. १ प्रमाणे black  मध्ये जातोय. मग हि महागाई आणि भ्रष्टाचार नाही तर काय आहे.
आणि काय आपण इथे ग्राहक संरक्षण कायदा उपयोगात आणू शकत नाही !


अर्थात वरील उदाहरण हे फक्त दिशा दर्शक आहे.

आपणच आधी भ्रष्टाचाराला आणि महागाईला खतपाणी घालायचे आणि मग अण्णांना  सारख्या    निस्वार्थी व देश भक्त मनुष्याचा  आधार घायचा. का, कशासाठी ?

अवेअरनेस रिबीन

अनेकदा आपण क्रिकेटर्सच्या टिशर्टवर कुठल्यातरी रंगाची रिबीन लावलेली बघतो. बर्‍याचजणांना या रिबीनविषयी अनेक प्रश्‍न असतात. एखाद्या गोष्टीच्या जनजागृतीसाठी किंवा निषेधासाठी अशा रंगीत रिबिन्सचा वापर केला जातो. या रिबीन अनेक रंगाच्या आहेत आणि प्रत्येक रंग हा एका विशेष कारणासाठी वापरण्यात आला आहे. आजारांशीही या रिबिनींचा संबंध आहे


व्हाईट रिबिन्स :


- सुरक्षित गर्भधारणा आणि मातृत्व

- किडनीचा कर्करोग






 यल्लो रिबीन :


- हाडाचा कर्करोग

- आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येणारी जागृती

- मूत्राशयाचा कर्करोग

- पृष्ठभागाचा कर्करोग

 
 
ब्ल्यु रिबन :


- मोठ्या आतड्याचा कर्करोग

- आंतरराष्ट्रिय ‘नो डाएट डे’









पर्पल रिबन:


- बालपणी झालेला आघात

- अल्झायमर

- स्वादुपिंडाचा कर्करोग

- मिरगीच्या जनजागृतीसाठी








रेड रिबन :


- ह्दय विकार

- एड्स अवेरनेस










ग्रे रिबन :


- मानसिक आजार

- मधुमेह जागृती

- मेंदुचा कर्करोग

- दमा








ग्रीन रिबन :


- डोक्याचा पक्षाघात

- जठराशी संबंधित आजार

- नैराश्य

- अवयव रोपन व अवयव दान जनजागृती

- किडनी कर्करोग










ऑरेंज रिबन :


- ल्युकेमेनिया

- किडनीच्या कर्करोगवर









पिंक रिबन :


- स्तनाचा कर्करोग









टिल/ टर्किश रिबन :


- गर्भाशयाशी संबंधित कर्करोग

- भितीशी संबंधित विकार

- व्यसनमुक्ती

- पदार्थाची ऍलजी










सौजन्य:- चिरायू, सामना २५०८२०११.

Sunday, August 21, 2011

गोकुळाष्टमीचा गोडवा

गोकुळाष्टमीचा सोहळा सगळ्याच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे जन्मोत्सवाचा प्रसाद. एकीकडे भाकरी, आंबोळ्या असा आहार, तर दुसरीकडे खीर, मसाला दूध असा गोडवा. उद्यापासून कृष्णजन्माचा सोहळा सुरू होतोय. जन्मोत्सवाच्या प्रसादासाठी तुम्ही तयार आहात ना...

रात्री बारा वाजतात आणि घराघरात, मंदिरात कृष्ण जन्मोत्सवाचा जल्लोष सुरू होतो. कृष्णभक्तांचा गोकुळाष्टमीचा उपवास, श्रीमद्भगवद्गीतेचं पठण पूर्ण होतं आणि सगळेच कृष्णाच्या नामस्मरणात दंग होतात. उत्सवाचं खास आकर्षण असतं ते यावेळी तयार होणारा सात्त्विक आहार. कृष्णाच्या आवडीचे पदार्थ हे गोकुळाष्टमी आणि त्यानंतरच्या दहीहंडीच्या दिवशीचा खास मेन्यू असतो.


गोकुळाष्टमीच्या उपवासादरम्यान कृष्णमूर्तीसमोर पाचपेक्षा जास्त प्रकारची फळं ठेवली जातात. कृष्णजन्मानंतर ही फळं कापून त्याचा काला तयार केला जातो. कृष्णभक्तांबरोबरच दहीहंडी फोडणार्‍या गोविंदाच्या टोळीलाही या काल्याचा प्रसाद वाटला जातो. काही ठिकाणी दुधापासून तयार केलेल्या विविध मिठाई एकत्र करून हा काला तयार केला जातो.


रात्री बारानंतर उपवास सोडणारे कृष्णभक्त परंपरेने चालता आलेला एक ठरावीक आहार घेतात. यात भाकरी, आंबोळ्या, उसळ, मुगाची भाजी यापैकी पदार्थांचा समावेश असतो. काही भक्त दूध, दही, खीर यांसारखे पदार्थच घेतात. एकूणच कृष्णभक्त उपवासानंतर हलकाफुलका आहार घेण्यावर भर देतात.


कृष्णजन्मोत्सवाचा सोहळा रात्री बाराला सुरू होऊन दुसर्‍या दिवशीही सुरू राहतो. एका बाजूला रस्त्यारस्त्यावर दहीहंडीचा जल्लोष असतो तर दुसर्‍या बाजूला कृष्णभक्त नावाजलेल्या मंदिरात आवडीने घेतला जातो. त्यामुळेच गोकुळाष्टमीला मिठाईमध्ये नेहमीच्या पर्यायांबरोबर फ्रुटस्, मिक्स फ्लेवर असे विविध पर्याय उपलब्ध असतात. गोल, चौकोनी मिठाईचा जमाना तर कधीच गेलाय. त्याऐवजी सफरचंद, केळी, कलिंगड यांसारख्या विविध फळांच्या आकाराच्या मिठाई आवडीने घेतल्या जातात. गोकुळाष्टमीचा उत्सव हिंदुस्थानातल्या कानाकोपर्‍यात साजरा केला जातो. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू यासारख्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीनं धार्मिक पूजाअर्चा केल्या जातात. त्यामुळे त्या त्या राज्याची स्पेशालिटी असलेले गोडधोड पदार्थ तयार करण्याची पद्धत आहे.

- क्षितिजा परब
saamana.phulora @gmail.com

परदेशातील कृप्णभक्ती

न्यूझीलंडमध्ये ‘हरे कृष्ण’चा गजर, कॅनडामध्ये बाळकृष्णाचा पाळणा, पॅरिसमध्ये गंगाजल घालून दूध-मधाचा प्रसाद.... आश्चर्यकारक आणि तितकंच अद्भुत... हिंदुस्थानात मनोभावे साजरा होणारा कृष्णजन्माचा सोहळा इतरही अनेक देशांत उत्साहाने साजरा केला जातो. आज आपण कृष्णभक्तीने रंगलेल्या अशाच काही देशांची सफर करणार आहोत.


हिंदुस्थानी सण आणि परंपरा जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली आहे. सण, उत्सव यांच्या निमित्ताने होणारी उत्साही वातावरण निर्मिती अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतो. उद्यापासून सुरू होणार्‍या कृष्णजन्माच्या सोहळ्याचंही हेच वैशिष्ट्य आहे. हा सोहळा हिंदुस्थानात जितका भक्तिपूर्वक साजरा होतो, तसाच प्रयत्न इतर देशांतही केला जातो.

एसएमधली कृष्णभक्ती
कृष्णजन्माचा सोहळा अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियापासून ऑरलॅण्डोपर्यंत आणि मॅसेच्युसेट्सपासून न्यूयॉर्कपर्यंत सर्वत्र पहायला मिळतो. जन्मसोहळा मध्यरात्री होत असला, तरी त्या पहाटेपासून अमेरिकन भाविक एकत्र येतात. कृष्णजन्माचा आनंद अमेरिकन वातावरणात कधी पूजेच्या रूपात तर कधी मेजवानीच्या रूपात एकमेकांमध्ये शेअर केला जातो. यात हिंदुस्थानींप्रमाणेच अमेरिकन आणि युरोपीयनसुद्धा सहभागी होतात हे विशेष. बाळकृष्णाचा पाळणा बांधून गाणी आणि आरत्यांमध्ये रंगून जाणं हे दृश्य अमेरिकेच्या कृष्णाच्या मंदिरांमध्ये बघण्यासारखं असतं.


कॅनडामध्ये जन्माष्टमी

टोरोण्टोच्या राधाकृष्ण मंदिरात श्‍लोक आणि मंत्रांचा आवाज जन्माष्टमीचा उत्साह दर्शवून देत असतो. कृष्णभक्तीत जास्तीत जास्त भाविकांना रंगून जाता यावं यासाठी कॅनडातील काही संस्था विविध उपक्रम राबवत असतात. म्हणूनच जन्माष्टमीच्या दिवशी खास संगीत कार्यक्रम आयोजित करण्याकडे त्यांचा कल असतो. कॅनडातील भक्त कृष्णाचा पाळणाही राजेशाही पद्धतीने तयार करतात. फुलांच्या पाकळ्यांइतकेच लक्षवेधक असतात ते बाळकृष्णाचे दागिने आणि भरजरी कपडे. मॉण्ट्रिअलमध्ये कार्यरत असणार्‍या काही संस्था विविध कार्यक्रम आयोजित करून कृष्णाची गाथा सादर करण्यावर भर देतात. नाम संकीर्तनाच्या रूपात ही मंडळं जन्माष्टमीच्या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करतात.

पॅरिसमध्ये कृष्णलीला

पॅरिससारख्या फुलपंखी शहरातही कृष्णाची लीला पोहोचली आहे. इथल्या हिंदुस्थानींनी जन्माष्टमीच्या रूपात खर्‍या अर्थाने हिंदुस्थानी सणांची परंपरा जपल्याचं दिसून येतं. कृष्णजन्माच्या वेळी बाळकृष्णाला स्नान घालण्यासाठी खास हिंदुस्थानातून आणलेलं गंगाजल उपयोगात आणलं जातं. या गंगाजलामध्ये दूध, मध घालून त्याचा प्रसाद केला जातो. मोठ्या संख्येने भक्त या सोहळ्यासाठी हजर असतात.

सिंगापूरचा सोहळा

सिंगापूरमध्ये लक्ष्मी नारायणसारखी अनेक मंदिरं आहेत. त्यामुळे इथला जन्माष्टमीचा सोहळा अवर्णनीय असतो. सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक यांची इथे रेलचेल असते. मंदिरांना भक्तीचा रंग चढतो आणि त्याचे पडसाद रस्त्यारस्त्यावर उमटतात.

मलेशियाचा कृष्णमहिमा

भजन, पूजा, नाट्य, संगीत असा सुसज्ज बेत घेऊन मलेशियावासी कृष्णजन्मासाठी दरवर्षी सज्ज असतात. बाळकृष्णाचं स्नान असो, दर्शन असो किंवा प्रसादाची रेलचेल, मलेशियामध्ये सगळ्याच बाबतीत विशेष उत्साह दिसून येतो. इथे जन्माष्टमीचा घरगुती सोहळादेखील असतो आणि दर्शन, प्रसाद, जागरणासाठी एकमेकांच्या घरी जाण्याची पद्धतही आहे.

न्यूझीलंडचं कृष्णप्रेम

खणखणीत आवाजात शुद्ध संस्कृत मंत्रोच्चार यांनी कृष्णजन्माचा सोहळा न्यूझीलंडमध्ये सुरू होतो. पूजाअर्चा, नैवेद्य, प्रसाद यांमध्ये मग्न असणारे भक्त महाभारतातील प्रसंगांचं सादरीकरणही आवर्जून करतात. या सगळ्यात तरुणाईचा सहभाग विशेष असतो.

- सुरेखा घोगळे

Saturday, August 20, 2011

दही खा

अनेकांच्या आहारात दही हा पदार्थ असतो अनेकांना तर दही खाल्याशिवाय जमतच नाही फारसे आंबट नसलेले, मधुर आणि चांगले लागलेले दही उत्तम प्रकारचे मानले जाते दही आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे


- चांगले लागलेले दही वायुनाशक, मधुर, रक्तपित्तहारक, मेद आणि कफकारक असते

- दही स्वादीष्ट, आंबट, उष्ण, पौष्टिक, स्निग्ध, बलवर्धक, तृप्तीदायक असते

- दह्यात साखर घालून खाल्ल्यास रक्त-पित्त दोष, दाह कमी होतात

- साखर घातलेले दही तृषाशामक, पित्तनाशक, पाचनशक्ती वाढवणारे आहे

- मुरडा झाल्यास दह्यात शंखजिर्‍याची पूड घालून ते खावे

- दह्याची निवळी गोड, हलकी, भूक वाढवणारी, बलदायक, तृप्तीदायक असते

- सूर्योदयापूर्वी दही-भात आठवडाभर खाल्ल्यास अर्धशिशीवर फायदा मिळतो

- दही आणि गूळ खाल्ल्यास कफाचा जोर कमी होतो

दही कधी खाऊ नये

- रात्री दही खाणे टाळावे

- सर्दी, कफविकाराचा त्रास असणार्‍यांनी दह्याचे सेवन टाळावे सर्दी झाली असता दही खाण्याची इच्छा होत असल्यास ताज्या दह्यात मिरपूड आणि गूळ घालून ते खावे

- शरद, ग्रीष्म आणि वसंत ऋतूंमध्ये दह्याचे सेवन टाळावे

- अति आंबट, ज्याच्या सेवनाने दात आंबट होतात, अंगावर शहारे येतात असे दही उपयोगी न पडणारे, त्रिदोष उत्पन्न करणारे असे असते

- आंबट दही रक्त दूषित करणारे असते

सौजन्य:- सामना.

गोड खाणार्‍यांसाठी

सणांचा मौसम सुरू झाला की घराघरात गोड पदार्थांचा घमघमाट सुरु असतो. गोड पदार्थाशिवाय सण पूर्ण होतच नाही त्यातही आपल्याकडे आग्रहाची संस्कृती! त्यामुळे ‘आजचा दिवस खा उद्यापासून पथ्य करा’ असा आग्रह केला की खवय्यांचा ताबा सुटलाच म्हणून समजा. पण मधुमेह आणि वजन वाढण्याच्या समस्यांपासून दूर राहायचं असेल तर गोड खाण्यावर संयम ठेवायलाच हवा. पण हा संयम ठेवायचा कसा हे सांगणार्‍या या काही युक्ती नक्कीच उपयोगी येतील.

- गोड पदार्थ पाहिला की तो खाण्याची इच्छा अनावर होते. अशावेळी त्या गोड पदार्थाचा लहानसा तुकडा उचला. म्हणजे कमीतकमी गोड तुमच्या पोटात जाईल. शिवाय दुसर्‍यांदा गोड मागून खाताना तुम्ही लाजेखातर मागणार नाही.


- कॉम्बिनेशन करून खा. म्हणजे एखादा गोड पदार्थ पुढे केला तर तो पदार्थ दुसर्‍या एखाद्या तिखट पदार्थासोेबत किंवा हेल्दी पदार्थासोबत मिसळून खा.

- थोडासा गोड पदार्थ खाल्यावर लगेचच वेगळा एखादा पदार्थ चाखून बघा म्हणजे तुमच्या जीभेची चव बदलेल आणि तोच गोड पदार्थ पुन्हा खाऊन बघण्याची इच्छा होणार नाही.

- च्युइंग गम खा. ज्यांचे सिगरेटचे व्यसन सुटत नाही त्यांना हा सल्ला दिला जातो. गोड खाणार्‍यांनीही हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. तोंडात च्युइंग गम असल्यामुळे सहाजिकच हात गोड पदार्थाकडे जात नाही.

- तुमच्या समोर गोड पदार्थाचं ताट आलं आणि तुम्ही स्वत:ला रोखू शकला नाहीत तर सरळ तिथून निघून दुसरीकडे जा. म्हणजे तुमच्या डोक्यातून गोडाची इच्छा निघून जाईल.


- काही लोकांना सतत चॉकलेट, आईस्क्रीम, केक खाण्याची इच्छा होते. अशा लोकांनी आकाराने छोटा चॉकलेट किंवा आईस्क्रीमचा बार घ्यावा. म्हणजे तुलनेने कमी गोड खाणेे होते.

- आस्वाद घेऊन खा. खूप गोड पदार्थ भराभर खाण्यापेक्षा एकेक घास जीभेवर चघळून त्याचा आस्वाद घेऊन खा. म्हणजे तुलनेने कमी गोड खाल्ले जाते.

- उपाशी राहू नका. दोन जेवणांच्यामध्ये खूप उपाशी राहिले की गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. हा काळ तुमच्यासाठी धोकादायक असतो. त्यामुळे शक्यतो दोन जेवणाच्यामध्ये काहीतरी आरोग्यवर्धक पदार्थ खावेत म्हणजे गोड खाण्याची इच्छा होत नाही.

सौजन्य:- चिरायू, सामना.

Tuesday, August 16, 2011

कॉर्पोरेट मंत्र - त्याग ृ स्वार्थ

माणसाला अनेक छंद असतात. त्यातलाच एक म्हणजे त्याग. त्याला महान बनायला फार आवडते. ‘मी याच्यासाठी हे सोडले, त्याच्यासाठी ते केले, त्यांच्यासाठी असं नाही केले, यांच्यासाठी तसे केले’ असे पोस्टर लावत फिरण्यात माणसाला मजा येते. आपण कसा त्याग केला, बलिदान केले व किती नुकसान आणि त्रास सोसला याचा जप करून कुढणे हा अगदी ‘हॉट फेवरेट’ खेळ झालाय सध्या. असे करून प्रत्येक जण आपापल्या अहंकाराला खत-पाणी घालत असतो. आपल्यातल्या ‘मी’चे पालनपोषण करीत असतो. पण हे सारे व्यर्थ आहे. त्याग म्हणजे स्वार्थ. आता तुम्ही विचार कराल स्वार्थ म्हणजे काय तर पहा. स्व अर्थ ृ स्वार्थ. एखाद्या भावनेला, कृतीला, परिस्थितीला आपण स्वत:चा अर्थ लावून पाहतो त्याला स्वार्थ म्हणतात. ‘काय करायला हवे?’ हा प्रश्‍न न विचारता ‘मला काय करायचे आहे?’ हा प्रश्‍न विचारता हाच स्वार्थ. आणि ते काही वाईट नाही. उलट आयुष्याच्या पहिल्या श्‍वासापासून ते शेवटच्या श्‍वासापर्यंत आपण प्रत्येक घडीला आपले अर्थ लावूनच हे जग पाहत असतो. स्वार्थापासून कुणाचीही सुटका नाही. मग महानपणाचे नाटक कशाला. ‘मी जे केले ते आनंदाने, स्वखुशीने आणि मनापासून केले’ हे म्हणायला जीभ जड होता कामा नये. तासभर चुलीसमोर उभे राहून आपल्या बाळराजाला आवडणारा खाऊ बनवणारी आई त्याग म्हणून ते करीत नसते. प्रेम हाच तिचा स्वार्थ असतो. तो खाऊ पाहून तिच्या तान्ह्याच्या गालावर पडणारी खळी पाहण्यासाठी ती एवढे श्रम घेते. याला त्याग म्हणून त्या भावनेतला जिवंतपणा व रस मारू नका. भगतसिंग फासावर चढला. त्यामागे त्याचा देशवेडाचा ‘स्व अर्थ’च होता. देशप्रेम आणि स्वातंत्र्य या स्वार्थापायी त्याने जीव देण्याचा विचार धरला. त्याच्या या देशवेडाच्या ‘स्वार्था’त कोणतेही दान नव्हते. त्यागाची पाटी गळ्यात लटकवून फिरणारे कधी भगतसिंग होऊ नाही शकणार. त्यासाठी विचार लागतात. स्वत:चे अर्थ लागतात व त्या अर्थाला आयुष्याशी जोडण्याची अक्कल लागते.जगात ‘त्याग’ असे काहीच नसते. जे काहीच करू शकत नाहीत ते आपले दु:ख त्याग म्हणून कुरवाळत बसतात. ही लोकं नेहमीच बिचारी राहतात. जी कर्तृत्ववान असतात ती जगण्याला, त्रासाला, वेदनेला, अनुभवांना स्वत:चे अर्थ लावून आपल्या आयुष्याच्या चित्रात स्वत: रंग भरतात. जीवनात जे करता ते आनंदाने करा. त्यागाचे लेबल लावून बिचार्‍यांच्या रांगेत उभे नका राहू. कदाचित पटले असेल, कदाचित पटणार नाही, पण एक मात्र करा, तुम्हाला त्याग वाटत असलेल्या एखाद्या प्रसंगाला परत एकदा आठवा व विचार करा. त्यात तुम्हाला तुमचा स्वार्थ (स्वत:चा ते करण्याचा अर्थ) नक्कीच सापडेल.

- स्वप्ना पाटकर
dr.swapnapatker@gmail.com


सौजन्य :- एक मराठी ज्वलंत दैनिक वृत्तपत्र.

श्री. व सौ. आयकर

लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं सहजीवन नसतं. सहचारिणी बनताना स्त्री आपलं स्वत:चं म्हणून एक आर्थिक आस्तत्व घेऊन येत असते. लग्नानंतर आपल्या जोडिदाराने आपल्या आर्थिक व्यवहारांसंबंधी नीट माहिती देणं जरुरीचं आहे. लग्न दोन व्यक्तींचं होत असलं,तरी आजच्या आर्थिक समानतेच्या काळात पती-पत्नी दोघे आपले आर्थिक भूतकाळ एक सामायिक करत असतात. दोघांकडे असणारे असेट्स आणि लायबिलिटिज यांची पूर्ण कल्पना दोघांनाही असलेली उत्तम. गुंतवणुका, घेतलेली कर्जे, काढलेल्या पॉलिसिज, इन्श्युरन्स,मेडिक्लेम यांची माहिती विश्‍वासाने दिलेली नेहमीच चांगली. आयकर कायद्याच्या दृष्टीने पतीचे उत्पन्न पत्नी स्वत:च्या रिटर्नमध्ये दाखवू शकते. परंतु त्याकरिता तिचा उत्पन्नाशी असणारा थेट संबंध स्पष्ट दाखवता आला पाहिजे. पतीचे उत्पन्न जर तिने स्वत:च्या कोणत्याही प्रयत्नाशिवाय तिला मिळाले असेल, तर आयकर अधिनियम ६० ते ६४ अन्वये ते उत्पन्न पतीचे म्हणून गणले जाते आणि अर्थातच पतीला त्यावर टॅक्स भरावा लागतो. यालाच क्लबिंग ऑफ इन्कम असे म्हटले जाते. कंपनीच्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या पतीची पत्नी त्याचकंपनीकडून भरघोस वेतन घेत असेल तर तेही त्या पतीचे उत्पन्न समजले जाते. हे ही क्लबिंग होय. एखाद्या असेटमधून कमावलेले उत्पन्न जर पतीने पत्नीच्या नावावर ट्रान्सफर केले आणि त्यासाठी पत्नीकडून पुरेसा मोबदला घेतला नाही तर अशी ट्रान्सफरही पतीचेच उत्पन्न ठरू शकते. अर्थात लग्नाआधी केलेली ट्रान्सफ़र किंवा घटस्फोटानंतर केलेली ट्रान्सफर मात्र यात मोडत नाही. स्त्रियांना जास्त डिडक्शन असल्याने बर्‍याचदा पती लग्नानंतर पत्नीचे स्वतंत्र रिटर्न भरू लागतात. उदा. स्वत:च्या मालकीचे घर भाड्याने दिले असेल आणि ते भाडे स्वत:चे उत्पन्न म्हणून दाखवत असाल, तर ते घर आपल्या पत्नीला गिफ्ट द्या. आता त्याचे भाडे हे तिचे उत्पन्न असेल आणि अर्थात त्यावर कमी कर भरावा लागेल. (गिफ्ट पती पत्नीला किंवा पत्नी पतीला देऊ शकते. परंतु त्याकरता प्रसंग आयकर खाते फार महत्त्वाचे मानते. उदा. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस इत्यादी. इतर वेळी अकाली दिलेली गिफ्ट आयकर कायद्याच्या कचाट्यात सापडू शकते) गिफ्ट संबंधात जर अडचण येत असेल तर पती पत्नीला कर्ज देऊ शकतो. ते करताना बाजारभावाच्या जवळपास व्याज आकारायला मात्र विसरू नका. गिफ़्ट संबंधात सासू, सासरे व पती सोडून इतर व्यक्तींनी लग्नात दिलेली गिफ्ट आयकर खात्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरत नाही.

- कनका घोसाळकर phoenixsoar@rediffmail.com


सौजन्य :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.

गुंतवणुकीची मूलतत्त्वे

आयुष्यातील आर्थिक उद्दिष्ट्ये गाठायची असतील तर योग्य वेळी आणि योग्य त्या प्रमाणात गुंतवणुकीस सुरुवात करणे आणि त्यातून योग्य तो समतोल साधणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी गुंतवणूक करताना काही मूलतत्त्वे प्रत्येकाने ध्यानात ठेवायलाच हवी. सांगताहेत गुंतवणूक तज्ज्ञ विक्रम कोटक.
* नियमितपणे गुंतवणूक करा : कितीही छोटी असली तरी नियमितपणे गुंतवणूक केल्यास ती येणार्‍या वर्षांमध्ये संपत्तीचा एक मोठा एकत्रित वाटा तुम्हाला मिळवून देते. दीर्घकालीन गुंतवणूक कालावधी असेल तर तुम्हाला त्यातून चक्रवाढ परिणाम मिळू शकतो.

* उद्दिष्ट स्पष्ट ठेवा : तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला सुरुवात करण्याआधी दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे असते. गुंतवणूक आणि ऍसेट अलोकेशन यांच्या स्वरूपावर हे अवलंबून असेल. तुमच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट हे लिक्विडिटी आहे, भांडवल संरक्षण आहे, स्थिर परतावा आहे की भांडवली वाढ आहे हे तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे असते.

* तुमची जोखीम क्षमता समजून घ्या आणि तिचे विश्‍लेषण करा : विविध ऍसेट श्रेणींमध्ये वैविध्यपूर्ण जोखीम आणि संबंधित परतावा पध्दती सामावलेली असते. इक्विटी या मुदत ठेव योजनांपेक्षा अधिक परतावा मिळवून देण्याच्या क्षमता ठेवून असतात, पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये मुदत ठेवीच्या तुलनेत जोखीमही मोठी असते. तुम्ही अशा ऍसेट वर्गांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे की, ठरलेल्या जोखीम पातळीवर तुमचे आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्हाला पुरेसा परतावा मिळवून देतील.

* दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करा : अल्पकालीन कालावधीत बाजारपेठ ही अगदी दोलायमान असू शकते आणि बाजारपेठेतील ही अनिश्चितता ही तुम्हाला अस्वस्थ करणारा अनुभव ठरू शकते. गुंतवणूक ही दीर्घकालीन दृष्टिकोनातून केली पाहिजे. कारण दीर्घकालीन मार्केट दोलायमानता ही कमी परिणामकारक असते.

* मार्केटला वेळेचे बंधन घालू नका : संशोधनातून असे दिसून आले आहे की जर दीर्घकालीन गुंतवणूक दृष्टिकोन ठेवला आणि अनिश्चिततेच्या काळातही गुंतवणूक कायम ठेवली तर गुंतवणूकदाराला कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीची योग्य ती फळे चाखता येतात.

* दर्जावर भर द्या, ट्रेन्डच्या मागे लागू नका : नेहमीच चांगल्या मूलतत्त्वांसाठी ओळखल्या जाणार्‍या चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे नेहमीच हिताचे असते. निरंतर आणि उच्च प्रतीचे बिझनेस मॉडेल, दूरदृष्टी असलेले व्यवस्थापन आणि उत्तम पूर्वेतिहास तसेच चांगले भवितव्य असलेल्या कंपन्यांची निवड करणे गरजेचे असते.

* घाबरून जाऊ नका : शेअर मार्केटमध्ये घाबरून जाऊ नका किंवा गुंतवणूक काढून टाकायची घाई करू नका, संयम बाळगा. बाजारपेठेत येणार्‍या स्थित्यंतरांकडे तुमचे दुश्मन म्हणून न पाहता तुमचे मित्र म्हणून पहा. या स्थित्यंतरांमध्ये सहभागी होण्यापेक्षा त्यापासून फायदा कसा होईल याकडे लक्ष द्या.

* तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करा : तुम्ही जीवनाच्या एका टप्प्यावरून दुसर्‍या टप्प्याकडे जात असताना तुमच्या गुंतवणुकीची ध्येयेही बदलू शकतात. तुमच्या बदलत्या गरजा ध्यानात घेऊन तुम्ही तुमच्या आर्थिक गुंतवणुकीचे मोजमाप करणे गरजेचे असते.

* तुमचा गृहपाठ पक्का करा : गुंतवणूक करताना कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीचे सखोल विश्‍लेषण करणे आणि गुंतवणूक करण्यापूर्वी जोखीम-परतावा या गोष्टी समजून घेणे फार गरजेचे असते. जर तुमच्याकडे आवश्यक स्रोत किंवा कौशल्य नसेल तर मग ही कामगिरी व्यावसायिक तज्ज्ञांवर सोपवा.

(लेखक बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत)

सौजन्य :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.

ओळख सेकंडरी मार्केटची - तेजीची आणि मंदीची दंगल - ६

कल्याण आणि वरळी-मेनमुळे ओपन आणि क्लोज हे दोन्ही शब्द बर्‍याच जणांच्या परिचयाचे असतीलच. आपल्या बाजारातसुद्धा हे दोन्ही शब्द वारंवार वापरले जातात. ओपन -खुलता भाव म्हणजे सकाळी बाजार सुरू झाल्यावरचा भाव आणि क्लोज -बंद भाव म्हणजे बाजार बंद होतानाचा भाव. याखेरीज महत्त्वाचे शब्द म्हणजे हाय आणि लो. हाय म्हणजे त्या दिवसाचा जास्तीत जास्त भाव आणि लो म्हणजे त्या दिवशीचा कमीत कमी भाव. या दोन्ही शब्दांना जोडून ५२ वीक हाय -लो असा शब्दप्रयोगदेखील होताना दिसतो.

त्याचा सरळ साधा अर्थ म्हणजे गेल्या वर्षभरातला जास्तीत जास्त आणि कमीत कमी भाव. एखाद्या शेअरच्या भावाचा विचार करताना त्याचा टप्पा म्हणजे वधघटीची कुवत समजण्यासाठी याचा उपयोग होतो. हे सगळे शब्द शेअरचा भाव सांगण्यासाठी वापरले जातात.
शेअर बाजार आज कसा आहे किंवा गेले काही दिवस कसा आहे हे सांगण्यासाठीचे जे शब्दप्रयोग केले जातात त्याची पण ओळख करून घेऊया. बुल फेज म्हणजे सरासरीनुसार रोज बाजारातले शेअरचे भाव वाढत जातात तो कालखंड (तेजीचा बाजार). बेअर फेजमध्ये अगदी याच्या उलट म्हणजेच सरासरीनुसार शेअरच्या भावामध्ये रोज घट होते तो कालखंड (मंदीचा बाजार). काही वेळा बाजार तेज आहे असेही म्हणता येत नाही किंवा मंद आहे असेही सांगता येत नाही त्या कालखंडाचा उल्लेख साईडवेज मार्केट असा होतो.

मराठीत या सगळ्या शब्दांसाठी निश्‍चित असे काही शब्द नाहीत त्यामुळे आपण जेथे शक्य आहे तेथे मराठी शब्द वापरू किंवा जेथे नवीन शब्दप्रयोग अमलात आणणे आहे तेथे नवीन प्रयोग करू. उदाहरणार्थ साईडवेज मार्केटला लेझीम हा शब्द वापरू या. जसे लेझीम खेळताना दोन पावले पुढे आणि एक पाऊल मागे अशी हालचाल होते तसेच साईडवेज मार्केट असते. काही जण याला ग्यानबा-तुकाराम बाजार म्हणतात. ग्यानबा म्हटले की दोन पावले पुढे आणि तुकाराम म्हटले की एक पाऊल मागे.

बर्‍याच वेळा रेंज बाऊंड मार्केट आहे असे म्हटले जाते. रेंज बाऊंड म्हणजे विशिष्ट टप्प्याच्या पलीकडे बाजार हलत नाही अशी स्थिती. यासाठी मराठी शब्द आहे टप्पाबंद बाजार.
सकाळी शेअर बाजाराची वेगवेगळी चॅनेल बघताना बर्‍याच वेळा रॅली हा शब्द कानावर पडत असेल. रॅली दोन प्रकारची असते बुल रॅली किंवा बेअर रॅली. आधी हे लक्षात घेऊया की बुल म्हणजे तेजी आणि बेअर म्हणजे मंदी. आता बुल रॅली म्हणजे बाजाराची गतिमान हालचाल ज्यात बाजार वेगाने तेजीच्या दिशेने जात असतो. अर्थातच बेअर रॅलीत या उलट हालचाल होत असते. रॅलीसाठी मराठीत दंगल हा शब्द तुम्हाला सुचवतो आहे. तेजीची दंगल आणि मंदीची दंगल. बघा हे शब्द जमतात का?

सौजन्य:- फुलोरा, सामना.

Saturday, August 13, 2011

ओळख सेकंडरी मार्केटची - ५

गेले काही दिवस उत्तर हिंदुस्थानात गोठवणारी थंडी पडते आहे. मुंबईच्या समशीतोष्ण हवामानात मात्र गुंतवणूकदारांना हुडहुडी भरते आहे ते रोज घसरणारा बाजार बघून. आजच्या लेखात विचार करू या संधीचा फायदा करून घेण्याचा.

सेकंडरी मार्केटमध्ये खरेदीची सुरुवात आज आपण करूया. या खरेदीच्या प्रस्तावापूर्वी काही महत्त्वाची सूत्रे.

१)
अ : ट्रेडिंग खाते आहे आणि हातात रोख रक्कम आहे म्हणून रोज खरेदी-विक्री करावी असे नाही.

ब: जास्त उलाढाल म्हणजे जास्त नफा असे नाही.

क: बाजारात केवळ निरीक्षकाच्या भूमिकेत हजर राहणेसुद्धा बाजारात असण्यासारखे आहे.

क्रिकेटच्या खेळात फलंदाज प्रत्येक बॉलवर रन काढतोच असे नाही. काही बॉल फक्त तटवायचे असतात. काही बॉलवर किरकोळ धावा काढायच्या असतात. योग्य संधी मिळताच काही बॉल सीमापार करायचे असतात, तर काही वेळा पिचवर टिकून उभे राहणे हाच खेळ असतो.

२)
अ: काही गुंतवणूकदारांची पैसे गुंतवल्यानंतर वर्षभर थांबण्याची तयारी आणि कुवत असेल तर काही गुंतवणूकदारांचा धीर तीन महिन्यांत संपेल. म्हणून खरेदी करण्यापूर्वी गुंतवणुकीचा कालावधी नक्की करावा.

ब: हा कालावधी निश्‍चित केल्यावर नफ्याचे अपेक्षित प्रमाण टक्केवारीतच ठरवावे.

क : ही टक्केवारी कालावधीच्या आधीच मिळत असेल तर विक्री करून नफा जमा करावा. कालच्यापेक्षा आजचा दिवस बरा असेल या भ्रमात जमा झालेला नफा काही वेळा अनपेक्षितरीत्या वाया जातो.

येथे टक्केवारीतच नफ्याचा विचार करावा असे सांगतो आहे. कारण वर्षानुवर्षे गुंतवणुकीची काही विचित्र कल्पना आपल्या मनात कळत-नकळत जमा झालेल्या असतात.

उदाहरणार्थ, किती वर्षात दुप्पट? हा प्रश्‍न. गुंतवणुकीचा प्रस्ताव केवळ दुपटीच्या कसावर तपासून बघण्याची सवय आपल्याला लागली १९८५ च्या बजेटनंतर. या बजेटमध्ये सहा वर्षांत दुपटीचा फायदा देणार्‍या नॅशनल सेव्ंिहग सर्टिफिकेटचा समावेश आयकरातील सूट मिळण्यासाठी केला गेला होता. अर्थात ही स्किम लोकप्रिय झाल्यामुळे भविष्यकाळातल्या कुठल्याही प्रस्तावाला किती वर्षात दुप्पट हा एकच नियम लागू केला गेला. दुप्पट म्हणजे वार्षिक बारा-साडेबारा टक्क्यांचा परतावा म्हटले की लोकांना समजेनासे झाले. सहा किंवा साडेसहा वर्षांत दुप्पट म्हटले की गुंतवणूक चांगली हा नियम सगळ्यांना सरसकट लावायला सुरुवात झाली. अशा अडाणी अनुमानाने शेअर बाजारात गुंतवणूक करू नये हा माझा सल्ला आहे. पटीत बोलण्यापेक्षा टक्केवारीत बोलणे जास्त योग्य आहे. दुप्पट म्हणजे स्वत:च्या मनाची सोयीस्कर समजूत आहे, तर टक्केवारी म्हणजे गुंतवणुकीचे योग्य माप आहे.

शेअर खरेदीचे काही बारकावे आता बघूया. समजा पन्नास शेअरची खरेदी करायची असेल तर एकाच वेळी एकाच भावात पन्नास शेअर खरेदी करण्याची ऑर्डर देऊ नये. समजा त्या शेअरचा भाव २१० दहा रुपये असेल तर २०५ ते २१० या दरम्यान दहा किंवा पंधरा शेअर खरेदी करण्याची ऑर्डर डिलरला द्यावी. अशी ऑर्डर देण्याचा हेतू असा की सकाळपासून सुरू होणार्‍या ट्रेडिंग सेशनच्या चढउताराचा पूर्ण फायदा आपल्याला व्हावा. काही वेळा असे होण्याची शक्यता असते की सगळे पन्नास शेअर एकाच दिवसात खरेदी होणार नाहीत. हरकत नाही. दुसर्‍या दिवशी खरेदी करता येईल. खरेदीची सरासरी कमी ठेवणे म्हणजेच नफ्याकडे वाटचाल.

अपेक्षित नफा कमावण्यासाठी शेअर खरेदी करण्यापूर्वी खरेदी कशी करावी हे ठरवण्याची अनेक तंत्रे आहेत. बाजारातला प्रत्येक गुंतवणूकदार स्वत:च्या अनुभवानुसार आपले तंत्र वापरत असतो. माझ्या अभ्यासातील दोन तंत्रे आज मी तुम्हाला सांगणार आहे.

१) आयपीओतल्या नवीन समभागाची नोंदणी झाल्यानंतर काही दिवसांनी त्या समभागाचे भाव स्थिरावतात. त्यानंतरच्या मंदीच्या काळात हे समभाग आणखी स्वस्तात मिळतात. हीच योग्य वेळ असते हे समभाग खरेदी करण्याची. या तंत्रानुसार काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेल्या गुजरात पिपावाव पोर्ट लिमिटेड या कंपनीचे समभाग सध्या स्थिरावलेल्या भावात उपलब्ध आहेत. साधारण ५७ ते ५८ रुपयांच्या सरासरीत खरेदी करून गुंतवणुकीचा कालावधी अठरा महिन्यांचा ठेवल्यास ४० ते ५० टक्के नफ्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही. (आयपीओ ग्रेड ४ किंवा ५ चा असावा)

२) बोनससहित मिळणारे सरकारी कंपन्यांचे शेअर खरेदी करणे हा दुसरा सोपा मार्ग आहे. बोनस म्हणजे हा समभाग खरेदी केल्यावर वाढीव शेअर मोफत मिळतात. (त्याचे प्रमाण आधीच जाहीर झालेले असते. ) गेल्या काही आठवड्यांत ओएनजीसी या सरकारी कंपनीचे शेअर बर्‍याच म्युच्युअल फंडनी विकण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे हा समभाग बोनससहित स्वस्तात मिळतो आहे. समजा दहा समभाग खरेदी केले तर दहा समभाग मोफत मिळणार आहेत. अर्थात तारीख गेल्यानंतर या समभागाची किंमत कमी होईल.

जे गुंतवणूकदार दोन वर्षे थांबण्याच्या मन:स्थितीत असतील त्यांनी हा समभाग खरेदी करून भरघोस नफा कमवावा अशी माझी सूचना आहे. ही दोन्ही खरेदीची तंत्रे झाली, पण अमुक एक कंपनीची निवड का करावी याचा अभ्यास वेगळा असतो. त्या अभ्यासाची सुरुवात पुढच्या भागात करूया.

लक्षात घ्या. समभाग खरेदी -विक्रीचे तंत्र हा अनुशासनाचा किंवा शिस्तीचा भाग आहे. या तंत्रांची अंमलबजावणी शिस्तीत करणार्‍याला बक्षीस म्हणून (फायद्याचा) मौका हमेशा मिलता है.

shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना

कॉर्पोरेट मंत्र - मानला तर देव, नाहीतर दगड

हे एवढे मोठे अवाढव्य जग चालते तरी कसे? काय खरं आणि काय खोटं? काय चांगले आणि काय वाईट? हे जग हवापाण्यावर तर चालतेच, पण त्याहून जास्त ते चालते आपल्या मानण्यावर. दगडाचा देव बनवणारे आपण तसेच देवाचा दगडही आपणच करतो. तासन्तास पूजा-अर्चना करून पाणावलेल्या डोळ्यांनी नवस मागतो आणि मग छिन्नी-हातोड्याने त्या नवसाच्या धन्याला मोडून काढतो. जगात तसे पाहिले तर बरेच काही आपणच ठरवतो आणि नशिबावर ओझे लादत राहतो. एका गावातला पुजारी देवळातली पूजा आटोपून घरच्या दिशेने निघाला, घाईत हाताला लागलेला शेंदूर पुसायचा राहून गेला. वाटेत एका दगडाला त्याने हात पुसले आणि पुढे निघून गेला. त्याच वाटेवरून प्रवास करणार्‍या काहींनी तो दगड पाहिला. शेंदूर लागलेल्या त्या दगडात त्यांना स्वयंभू देवाचे तेज वाटले. त्यांनी त्या दगडाला नमस्कार केला, फुले वाहिली. येणार्‍या-जाणार्‍या सर्वांनी तेच केले आणि हात पुसलेल्या दगडाचा देव झाला. देव सगळीकडेच असतो. त्या दगडातही असणारच. असे अनेक हात पुसलेले दगड आयुष्यात आढळतात. त्यांना नमस्कार करणे काही वाईट नाही. ऑफिस, घर... सारीकडे हे असेच होते. मनाचा खेळ संपतच नाही. आपण ‘टाईम प्लीज’ म्हणून काही काळ थांबतही नाही. हे असेच, तो तसाच... हा हट्ट आपणच आपल्याशी करीत राहतो. नकारार्थी विचार, गैरसमज व त्रागा यात सत्य कुठेतरी राहूनच जाते. आपण विसरतो की, प्रसंगाहून महत्त्वाची ‘माणसं’ असतात. आपण ठरवले तर आनंद, आपण ठरवले तर दु:ख. आपण ठरवले तर जग आपले आणि आपण ठरवले तर आपणही जगाचे नाही. सगळीच माणसं चांगली नसतात. म्हणून प्रत्येकाची परीक्षा घेऊ नका. सगळेच दगड देव नसतील म्हणून सगळ्या दगडांना लाथ मारून पाहू नका. त्यापेक्षा सर्व दगडांना नमस्कार केलेला परवडला. चांगले माना, आनंद माना, सुख माना, प्रेम माना, आपलेपणा माना, शांतता माना, सत्य माना. कारण मानण्यावरच सारे काही निर्भर आहे. तुम्ही मानाल तसे तुमचे आयुष्य. मानले तर जग, नाही तर बंदिशाळा, मानले तर प्रवास, नाहीतर फरफट आणि मानला तर देव, नाहीतर फक्त दगड!
dr.swapnapatker@gmail.com
सौजन्य:- थर्ड जनरेशन, सामना १३०८२०११.

Tuesday, August 09, 2011

दिलवाले आणि दिमागवाले - ४

दिमागवाल्यांना भावनेपेक्षा भाव महत्त्वाचा वाटतो. गल्ल्यात खणखणीत नाण्यांची भरती होताना (एखाद्या समभागाचा भाव वाढवताना) ते दिलवाल्यांच्या टोळीत सामील होतात आणि गल्ला भरला की गंगाराम झोळीत भरून या रंगमंचावरून पोबारा करतात.

सेकंडरी मार्केट म्हणजे खरा शेअर बाजार. क्षणाक्षणाला हलणारे भाव -एका क्षणी साकार होणारी स्वप्ने आणि तर दुसर्‍या क्षणात हवेत विरून जाणार्‍या आकांक्षा - एका क्षणात आकाशात तर दुसर्‍या क्षणी जमिनीवर तर पुढच्या क्षणाला पायाखालची जमीन खचण्याचा भास. हे सगळे रोज. सकाळी सवानऊ ते साडेतीन. रोज हजारो कंपन्यांच्या लाखो शेअर्सची अब्जावधी रुपयांची उलाढाल. ११ जानेवारीला बाजार चारशे अंकांनी ढासळला तर १२ जानेवारीला बाजार साडेतीनशे अंकांनी वर १३ जानेवारीला तिनशे अंक ढासळून १४ तारखेस शंभर अंकांची घसरण....

चला तर, चला जाऊ या, या थर्रार नाटकाच्या रंगमचावर. एक सूचना : इथे आहेत दोन रंगमच. सरकणारे -फिरणारे आणि सवय होईस्तो घेरी आणणारे. एक बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि दुसरा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज.

आपण मनास येईल तेथे जाऊ शकतो. या नाटकाचे लेखक आपणच. तुम्ही सोडून एकच पात्र आहे या मंचावर : तुमचा ब्रोकर. बाकी नायक -नायिका -खलनायक आणि प्रेक्षक सगळे काही तुम्हीच. टाळ्या तुम्हीच वाजवायच्या आणि डोळे भरून आले तरी तुम्हीच पुसायचे. या दोन रंगमचावर एकाच वेळी लाखो नायक असतात तरी प्रत्येकाचे नाटक वेगळे आणि स्वत:पुरतेच.
काय? कसे वाटले शेअर बाजाराचे नाट्यीकरण. आवडले?

तर मग चला या आणि करा कामाला सुरुवात. नाटकात भाग घायचा म्हणजे भूमिका करायला हवी. या रंगमचावर दोन भूमिका आहेत. एक दिलवाल्याची आणि दुसरी दिमागवाल्याची. यापैकी आपली भूमिका कोणती हे ठरवण्यासाठी दोन्ही भूमिका आधीच सांगतो. दिलवाल्यांचा गुंतवणुकीचा खेळ भावनांवर आधारित असतो. त्यांना ज्या दिवशी बाजार हिरवा दिसतो त्या दिवशी ते खरेदी आणि ज्या दिवशी काळा दिसतो त्या दिवशी विक्री ..मग हे रंग दिसतात तरी कसे? सकाळी जाग आल्यापासून दिनक्रम सुरू असेपर्यंत खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यात जे काही घडत असेल त्याचे प्रतिबिंब दिलवाल्यांच्या खेळावर पडते. शंभरापैकी पंचाण्णव माणसे दिलवाली असतात. ज्या दिवशी मंदी दिसते त्या दिवशी विक्री तर ज्या दिवशी तेजी दिसते त्या दिवशी खरेदी. गंगा गये गंगादास -जमना गये जमनादास. (एखाद्या समभागाचा भाव वाढवणारे हेच आणि एखाद्या समभागाचे भाव घटवणारे पण हेच.) परिणामी दिलवाल्यांचा गल्ला जसा क्षणात गच्च भरतो तसा दुसर्‍या क्षणी रिकामा पण होतो. दिलवाले कमावतात ज्या पध्दतीने त्याच पध्दतीने गमावतात पण. आता दुसरी जमात दिमागवाल्यांची. यांना भावनेपेक्षा भाव महत्त्वाचा वाटतो.गल्ल्यात खणखणीत नाण्यांची भरती होताना (एखाद्या समभागाचा भाव वाढवताना) ते दिलवाल्यांच्या टोळीत सामील होतात आणि गल्ला भरला की गंगाराम झोळीत भरून या रंगमंचावरून पोबारा करतात. (आपले उद्दिष्ट नजरेस आले की दुप्पट जोमाने विक्री करून टोळीच्या बाहेर पडतात.) सराईत बहुरूप्याला लाजवील असे बहुरूपी. आता ठरवा या रंगमचावर तुम्ही कोण आहात? दिलवाले की दिमागवाले?
 
मुंबई शेअर बाजाराचा पारा किती वर-खाली आहे हे दर्शवणारा अंक. निवडक तीस शेअरचा त्या दिवशीचा जो भाव असेल त्याआधारे हा अंक ठरतो. आज बाजारात तेजी आहे असे जेव्हा म्हणतात तेव्हा हा अंक कालच्या अंकापेक्षा जास्त असतो.
 
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा पारा वरखाली दाखवणारा अंक. हा अंक त्या बाजारातल्या निवडक पन्नास शेअरच्या त्या दिवशीच्या भावावर ठरवला जातो. या अंकाचा उपयोग करून रोज सट्टा करता येतो म्हणून याची लोकप्रियता जास्त आहे. रोजच्या रोज कमाई करण्याची इच्छा असणारांनी हा अंक रोज दर तासांनी बघावा. हे रोजच्या कमाईचे तंत्र आपण फ्युचर आणि ऑप्शनचा अभ्यास करताना करणार आहोतच.
ङ आजचा गृहपाठ :

डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते तयार असेल तर सेन्सेक्स आणि निफ्टीचा अभ्यास करा. पुढच्या शनिवारी शेअर खरेेदी-विक्रीचे निर्णय कसे घ्यायचे? हे पाहू.

ङ मी आणि माझा ब्रोकर

बाजारात खरेदी-विक्री करायची म्हणजे ब्रोकरच्या (दलालाच्या) माध्यमातून जावे लागते. दलालाची सोबत म्हणजे दलालीचा पण प्रश्‍न आलाच. दलाली असते ०.१०ज्ञ् ते ०.५०ज्ञ्. प्रत्येक दलाल आपल्या गिर्‍हाइकाला वेगवेगळ्या प्रकारे दलाली मागू शकतो.

ज्या ग्राहकाची उलाढाल जास्त त्याला दलाली कमी. डे ट्रेडिंग करणार्‍याला दलाली सगळ्यात कमी म्हणजे ०.१० किंवा अपवादात्मक परिस्थितीत ०.०३ज्ञ् सुध्दा. सूज्ञ ग्राहकांनी दलालीच्या दरासाठी खळखळ करू नये. दलालाचे पोट दलालीवर भरते. दलाल सोनारासारखा असतो. सोनाराला दुकानात एका वेळी पाच लाखांचे खरेदी करणार्‍या बायकांपेक्षा दरवर्षी एक लाखाचे दागिने मोडून नवीन दागिने करणार्‍या बायका जास्त आवडतात. कारण स्पष्टच आहे. सोनाराची कमाई सोन्यात नसते. त्याची कमाई घडणावळीत असते. त्याचप्रमाणे शेअर दलाल असतात. त्याची कमाई असते दलालीत. तुमच्या नफ्या-तोट्यात नाही. एकाच वेळी पन्नास लाखांचे शेअर घेऊन पाच वर्षे काही न करणार्‍या ग्राहकापेक्षा रोज दहा- वीस हजारांची उलाढाल करणारा ग्राहक त्याला जास्त प्रिय असतो. त्यामुळे दलालीच्या बाबतीत घासाघीस करू नये. शेवटी दलाल आपल्या वाण्यासारखा बनीया. तुम्ही साखरेच्या पोत्यात हात घालून फक्की मारली तर तो तेलाची धार ऍडजस्ट करतो. दलालाला त्याचे पैसे कमावू द्या. पण एक महत्त्वाची सूचना. दलालाशी संबंध मैत्रीपूर्ण असावेत, पण सलगीचे नसावेत. आपल्या खात्यात लुडबूड करण्याचा अधिकार त्याला देऊ नये. गेल्या काही वर्षांत उलाढाल इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की ग्राहकांशी संपर्क ठेवण्यासाठी कस्टमर रिलेशन मॅनेजरची नेमणूक केलेली असते. या प्राण्यापासून तर फारच जपून राहावे. दलालीची उद्दिष्टे पार करण्यासाठी हा दिवसातून दहा वेळा वेगवेगळी बातमी तुमच्यापर्यंत आणत असतो. या सगळ्या बातम्या देण्याचे कारण एकच. ग्राहकाला जास्तीत जास्त खरेदी-विक्री करायला लावून जास्तीत जास्त दलाली कमवायची. त्याच्या कमाईच्या नादात बर्‍याच वेळा ग्राहकाचे भांडवल संपून जाते. अशी बरीच ब्रोकरेज हाऊस आहेत जेथे ग्राहकाच्या ट्रेडिंग खात्याचे आयुष्य सात-आठ महिनेच असते. या दरम्यान ग्राहकाचे भांडवल संपते. तात्पर्य ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. पण दलाल म्हणजे खलनायक नाहीत. आपल्याला सौदा करताना मदत व्हावी म्हणून आता प्रत्येक दलालाकडे रिसर्च डिपार्टमेंट असते. वेळोवेळी विशिष्ट क्षेत्राचा -विशिष्ट कंपनीचा अभ्यासपूर्ण तपशीलवार आढावा घेऊन त्याचा रिसर्च रिपोर्ट ग्राहकांना मोफत पुरवला जातो. या लेखाचा अभ्यास करून गुंतवणूक केल्यास बर्‍याच वेळा नफा होण्याची शक्यता असते.

shreemant2011@gmail.काम
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना

न अडखळता पहिले पाऊल टाका! - ३

 आपण शेअर बाजारात आलो आहोत नफा कमवायला. चर्चा करून वाद जिंकू, पण नफा मिळणार नाही. यावर उपाय म्हणजे रेटिंग एजन्सीनी आयपीओला कोणता दर्जा बहाल केला आहे ते बघायचे आणि अर्ज करायचा.

आपण शेअर बाजारात आलो आहोत नफा कमवायला. चर्चा करून वाद जिंकू, पण नफा मिळणार नाही. यावर उपाय म्हणजे रेटिंग एजन्सीनी आयपीओला कोणता दर्जा बहाल केला आहे ते बघायचे आणि अर्ज करायचा.

गेल्या आठवड्यातला गृहपाठ केला असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की यादीतल्या एखाद्या कंपनीचा अपवाद वगळता या कंपन्यांच्या आयपीओमध्ये ज्यांना शेअर मिळाले असतील ते सर्व फायद्यात आहेत. म्हणजेच तुम्ही या यादीतल्या शेअर्ससाठी अर्ज भरला असता तर भरपूर नफा मिळवला असता. पण नफा मिळवणे सोपे नसते. ज्या कंपनींची नावे या यादीत आहेत ते सगळे जेते आहेत. यासोबत अशाही बर्‍याच कंपन्या २०१० साली आयपीओ घेऊन बाजारात आल्या होत्या की त्या कंपन्याचे शेअर तुम्हाला मिळाले असते तर हातात मुद्दलाचा एकही रुपया शिल्ल्क राहिला नसता. २०१० या एका वर्षात एकूण ७२ कंपन्यांचे आयपीओ आले.
त्यापैकी २२ कंपन्यांचे भागधारक आजच्या तारखेस फायद्यात आहेत. आजचा पहिला धडा. सगळ्याच आयपीओत अर्ज करून फायदा होत नाही. असे जर असेल तर निश्‍चित स्वरूपाचा फायदा मिळण्यासाठी काय करावे? चला आजचा दुसरा धडा शिकूया.

एखाद्या कंपनीला आयपीओ बाजारात आणायचा असेल तर त्या कंपनीला जनतेकडून भांडवलासाठी मागणी करण्यापूर्वी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सेबीची परवानगी. ही परवानगी मिळण्यासाठी सेबीकडे रेड हेरींग प्रॉस्पेक्ट्स (आरएचपी) सादर करून त्याची मान्यता घ्यावी लागते. या (आरएचपी)मध्ये महत्त्वाचे काय असते हे जाणून घ्यायचे झाले तर आपल्यासारख्यांना सहा महिने लागतील. पण नफा कमवायचा असेल तर त्यात काय आहे ते समजून घ्यावे लागेल. त्यासाठी सोपा रस्ता असा आहे की कुठल्याही आयपीओचा फॉर्म आणा आणि तो वाचून काढा. हा प्रयोग एकदाच करा कारण यापेक्षाही सोपा मार्ग आपण बघणार आहोतच. आयपीओच्या या फॉर्ममध्ये संक्षिप्त स्वरूपात (म्हणजे दहा-बारा पानांत ) कंपनीची सगळी माहिती दिलेली असते.

आपल्या दृष्टीने महत्त्वाची माहिती म्हणजे संचालक मंडळाच्या सदस्यांची माहिती, कंपनीचा भांडवल उन्हे करण्याचा हेतू, कंपनी ज्या क्षेत्रात काम करणार आहे त्या क्षेत्राची सध्याची परिस्थिती आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे कंपनीला ज्यामुळे नुकसान होऊ शकेल अशा कारणांची यादी. इतका सगळा अभ्यास करायचा तर मग नफा कधी कमवायचा? धीर धरा. सोपा रस्ता आपण बघणार आहोतच. पण त्यापूर्वी काही कारणमीमांसेची चर्चा करूया.

सी. महेंद्र एक्स्पोर्ट नावाची कंपनी डिसेंबरच्या ३१ तारखेपासून बाजारात आली आहे. या कंपनीचे कामकाज हिर्‍यांच्या निर्यातीचे आहे. कच्चे हिरे आयात करून त्यांना पैलू पाडून ते परत निर्यात करण्याचा उद्योग ही कंपनी करते आहे. आता या हिरे आयात निर्यात क्षेत्राची सध्याची स्थिती बघा. या कंपनीचे ग्राहक युरोप—अमेरिकेत आहेत. अगत्याच्या खरेदी यादीत हिरे आणि हिर्‍यांचे दागिने सगळ्यात शेवटी येतात. परदेशातील सध्याची मंदी बघता ही कंपनी त्यांच्या विक्रीचे लक्ष्य पूर्ण करू शकेल किंवा नाही याबद्दल शंकाच आहे. जोपर्यंत अमेरिकेत/युरोपात सुबत्तेचे वारे वाहायला सुरुवात होत नाही तोपर्यंत अपेक्षित नफा होणे कठीणच आहे. या क्षेत्रातल्या एकूण सतरा कंपन्या सध्या बाजारात आहेत.
या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांना गेल्या वर्षभरात नफा झालेला नाही. मंदीची झळ या सगळ्याच कंपन्यांना लागली आहे .मग तुम्ही तुमचे पैसे या आयपीओत टाकणार का? उत्तर अर्थातच नाही असेच आहे.

आता एक दुसरे उदाहरण बघूया. मिड व्हॅली एंटरटेनमेंट लिमिटेड नावाची कंपनी साठ कोटींच्या भांडवलाच्या मागणीसाठी १० जानेवारीपासून बाजारात येत आहे. या कंपनीचे मुख्य प्रवर्तक दातुक किथेस्वरन नावाचे मलेशियन सज्जन आहेत. बाकीच्या व्यवस्थापकीय मंडळाकडे नजर टाकली तर असे लक्षात येते की जरी संचालक व्यावसायिक असले तरी त्यांची मंडळावर नियुक्ती गेल्या सहा महिन्यांत झाली आहे. कदाचित आयपीओ पूर्ण झाल्यावर ते राजीनामा देऊन गेले तर? थोडक्यात काय तर ही संचालकांची भरती केवळ मांडवशोभा वाढवण्यासाठी केली असावी असे वाटते.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कंपनीचा आयपीओ साठ कोटी रुपयांचा आहे आणि नियोजित व्यवसाय चित्रपट निर्मितीचा आणि वितरणाचा आहे. या उद्योगात साठ कोटी रुपये म्हणजे दरियामे खसखस. मग हे कंपनीला माहिती नसेल का? असे बरेच चर्चा करण्यासारखे मुद्दे प्रत्येक आयपीओत असतात.

आपण बाजारात आलो आहोत नफा कमवायला. चर्चा करून वाद जिंकू, पण नफा मिळणार नाही. यावर उपाय म्हणजे रेटिंग एजन्सीनी आयपीओला कोणता दर्जा बहाल केला आहे ते बघायचे आणि अर्ज करायचा. रेटिंग एजन्सी कंपनीच्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करून त्यांना दर्जात्मक गुणांकन बहाल करतात. हे गुणांकन एक ते पाच अशा मोजपट्टीवर मोजतात. पाच हे सगळ्यात वरच्या दर्जाचे लक्षण आहे आणि गुणांकन एक. अर्थातच वेगळे सांगायला नको. आपण चर्चा केलेल्या दोन्ही कंपन्यांना काय गुणांकन मिळाले ते बघूया.

मिड व्हॅली एंटरटेनमेंट लिमिटेडला ब्रिकवर्क या एजन्सीने गुणांकन (आयपीओ ग्रेड १) दिले आहे म्हणजे व्हेरी पूअर फंडामेंटल आणि सी. महेंद्रला दर्जा मिळाला आहे (आयपीओ ग्रेड २) म्हणजे व्हेरी पूअर फंडामेंटल. या गुणांकन करणार्‍या कंपन्यांनी सगळा ऊहापोह करूनच हा दर्जा दिला असतो. म्हणजेच काय तर दर्जा चार किंवा पाच असेल तर कंपनी पैसे टाकण्यायोग्य. बाकी सब माया. काय म्हणता?

या गुणांकन करणार्‍या कंपन्या कोणत्या त्यांची नावे बघूया. १) क्रिसील लिमिटेड २) इक्रा लिमिटेड ३) केअर लिमिटेड ४) ब्रिकवर्क रेटिंग्ज लिमिटेड. ५) फिच रेटिंग्ज लिमिटेड.
आता गेल्या आठवड्यातील कंपन्यांची नावे आणि त्यांचे गुणांकन बघितले तर सगळ्या नफा कमवून देणारे आयपीओ ग्रेड ४/५ अशी होती.

आजच्या लेखातला शेवटचा धडा. आयपीओ रेटिंग जर ४ किंवा ५ असेल तरच त्या आयपीओत अर्ज भरायचा.

या नियमाला अपवाद : सरकारी कंपन्यांचा. यासाठी काही वेगळे निकष बघावे लागतात.

आजचा गृहपाठ : आयपीओचा एक अर्ज आणून तो भरण्याचा सराव करा.
आयपीओ इनिशीअल पब्लिक ऑफर

नव्या कंपन्यांच्या समभाग भरतीला आयपीओ म्हणतात. या कंपन्यांची नोंद अद्यापि बाजारात झाली नसते. एफपीओ (फॉलो ऑन पब्लिक ऑफर): बाजारात नोंद असलेल्या कंपन्या वाढीव भांडवलासाठी बाजारात येतात त्याला एफपीओ म्हणतात. एनएफओ (न्यू फंड ऑफर) : म्युच्युअल फंडच्या नव्या स्कीमला एनएफओ म्हणतात. हे शब्द २०११ साली वारंवार कानावर पडणार आहेत कारण या नवीन वर्षात कदाचित शंभराहून अधिक कंपन्या भागभांडवल गोळा करण्यासाठी बाजारात येणार आहेत.

यापैकी पस्तीस कंपन्यांना सेबीची परवानगी मिळाली आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सरकार निर्गुंतवणुकी- करणातून मोठा निधी जमा करणार आहे. त्यामुळे सरकारी भागभांडवलाचे प्रमाण कमी होईल आणि जनतेचे वाढेल. त्यात हिंदुस्थान कॉपर आयओसी आणि ओएनजीसी या कंपन्यांचा मोठा हिस्सा असेल. सरकार या वर्षभरात ४०,००० कोटी एफपीओतून जमा करण्याच्या खटपटीत आहे. खासगी, सरकारी कंपन्या मिळून नव्वद हजार कोटी बाजारातून जमा करण्यासाठी कंबर कसून तयार आहेत.
या वर्षी नफा कमवण्याचे अनेक योग येणार आहेत. सरकारी भागभांडवलाचे मूल्यांकन कसे येते यावर बरेचसे अवलंबून असले तरी सरकारचा कल जनतेला नफा कमावून देण्याचा आहे हे कोल इंडिया आणि मॉइलच्या एफपीओवरून कळण्यासारखे आहे. प्रश्‍न एकच आहे की तुम्ही डीमॅट खाते उघडून तयार आहात काय?
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना.

डीमॅट म्हणजे काय रे भाऊ? २

 सुरुवात करू या डीमॅट अकाऊंट सुरू करण्यापासून. हे डिमॅट खाते आहे तरी काय? फार सोपे आहे. आपण पैसे बचत करण्यासाठी बँकेत खाते उघडतो. तसेच शेअर घेऊन जमा करण्यासाठी आणि विक्री केल्यानंतर शेअर काढण्यासाठी जे खाते असते त्याला म्हणतात डीमॅट खाते. 
आता डीमॅट अकाऊंट उघडायचे कसे? हा प्रश्‍न आलाच. डीमॅट म्हणजे डिमटेरीअलाइज्ड खाते. कागदी शेअर हातात ठेवण्याऐवजी शेअर या खात्यात जमा करता येतात .जवळजवळ सगळेच दलाल ट्रेडिंग अकाऊंट उघडताना डीमॅट अकाऊंट उघडून देतात. असे खाते उघडण्यात आपली आणि दलालाची सोय असते. याखेरीज बर्‍याचशा सरकारी आणि सहकारी बँका पण डीमॅट खाते उघडून देतात. हे खाते उघडल्यावर शेअरची खरेदी विक्री सुरू करण्यासाठी तुम्ही सज्ज झालात असे समजा...


आता या खात्यात जमा करण्यासाठी शेअर विकत घ्यायला हवेत ते घ्यायचे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधून किंवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधून. या बाजारात खरेदी करण्यासाठी आपल्याला ब्रोकर किंवा मराठीत ज्याला आपण दलाल म्हणतो त्यांच्या मार्फत जावे लागते. तुमच्या पसंतीनुसार दलाल निवडा आणि त्याच्याकडे ट्रेडिंग खाते उघडा. थोडक्यात आता तुमच्याकडे तीन खाती झाली. एक तुमचे बचत खाते -दुसरे डीमॅट खाते -तिसरे ट्रेडिंग खाते. बचत खाते बँकेत उघडताना जी कागदपत्रे लागतात तीच कागदपत्रे बाकीची दोन खाती उघडताना लागतात.

ही खाती सुरू केली की शेअर बाजारात येण्याची तयारी पूर्ण झाली.

आता गुंतवणूक करायची म्हणजे भांडवल हवे. भांडवल म्हणजे डोळ्यांसमोर लाखांचे आकडे यायला नकोत. हाताशी असलेल्या पाचशे रुपयांपासून ते वीस पंचवीस हजारांतही हा व्यवसाय सुरू करता येतो. दुसरा प्रश्‍न असा की, वेळेची गुंतवणूक किती? सुरुवातीला ट्रेनमधून येण्या-जाण्याचा वेळ वाचनाला द्यावा आणि व्यवहारासाठी दहा ते पंधरा मिनिटे.

मग हा आटापिटा करून मिळकत किती होणार? समजून व्यवहार केला तर मुद्दल सुरक्षित ठेवून वर्षाकाठी मुद्दलावर चाळीस टक्के कमावणे फारसे कठीण नाही. उदा: दोन वर्षांपूर्वी ज्यांनी ओएनजीसीचे शेअर घेतले असतील त्यांच्या पाच हजारांचे आतापर्यंत साडेनऊ हजार झाले असतील. म्हणजे जवळजवळ दुप्पट.

आता विचार करा दोन वर्षांत आपले पैसे आपल्या हातात ठेवून दुप्पट होत असतील तर महिन्याला सात-आठ टक्के देणार्‍या धोकादायक स्किमकडे जा कशाला?
चला,शेअर बाजाराचा पासपोर्ट घेऊ या? हा पासपोर्ट म्हणजे काय तर डीमॅट अकाऊंट.

ते आजच उघडा...

पैसा कसा कमवाल? या लेख मालिकेतील हा पहिला लेख आहे. येत्या वर्षभरात वाचकांची शेअर बाजार ते सरप्लस कमोडिटीपर्यंत सगळ्या बाजाराची ओळख या मालिकेतून करण्याचा प्रयत्न आहे. अनेक वेगवेगळ्या बाजारांचा एकत्रित परिचय करून देण्यासाठी पाच विभागांत या लेखांची मांडणी करण्यात येणार आहे.
* शेअर बाजाराची ओळख :

- आयपीओ अर्थात नवीन शेअरची विक्री आणि नोंदणी.

- सेकंडरी मार्केट : बाजारातून खरेदी /विक्री आणि नफा कमावण्याच्या अनेक क्लृप्त्या
- फ्युचर आणि ऑप्शन मार्केट : कमीत कमी भांडवलात कल्पनेपलीकडची कमाई कशी करावी.

* कमोडिटी मार्केट : या लेखात कमोडिटी म्हणजे नॉन ब्रँडॅड वस्तूंची खरेदी विक्री करून नफा कमावण्याच्या युक्त्या.
* विदेशी मुद्रा : फॉरेक्स मार्केटमधून पाच हजारांच्या छोट्या गुंतवणुकीतून लाखो रुपयांची कमाई कशी कराल याची ओळख.

* इन्शुरन्स मार्केट : सर्वसाधारण विमा ते जीवन विमा याची विक्री आणि त्यातून आयुष्यभर निरंतर उत्पन्न मिळवण्याची साधने कशी उपलब्ध आहेत याची ओळख.
* सरप्लस मार्केट. १) डोमेस्टिक सरप्लस, २) एक्सपोर्ट सरप्लस ३) इंपोर्ट सरप्लस ४) शेल्फ पूलआऊटस् या बाजारांची ओळख.

या विभागाची ओळख अशी की या विषयात मराठीत काय किंवा इंग्रजी मीडियात काय कुठेही एकसंध माहिती मिळणार नाही जी आमच्या विभागात मिळेल.

* स्क्रॅप आणि नॉन मूव्हिंग : या बाजारातल्या उलाढालीची एकत्र नोंदणी कुठेच नसल्यामुळे या बाजारात फायदा किती आहे याची कल्पना फक्त या बाजारातील माणसांना आहे परंतु आपल्या लेखातून जी माहिती दिली जाईल त्यातून अनेक तरुणांना करोडपती बनण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

थोडासा गृहपाठ

गेल्या वर्षभरात बक्कळ नफा कमवून देणार्‍या नवीन कंपन्यांची यादी खाली देतो आहे आणि सोबत त्यांची सुरुवातीची किंमत .

तुम्ही एकच काम करा शेअर बाजाराचे पान उघडून आज त्या शेअरची काय किंमत आहे ते पडताळून बघा.

जानेवारी २०१०
DB Corp
२१२.००

Godrej Proper
४९०.००

फेब्रुवारी २०१०
Jubilant Food
१४५.००

मार्च २०१०
United Bank
६६.००

एप्रिल २०१०
Persistent
३१०.००

मे २०१०
Talwalkars Fitn
१२८.००

जुलै २०१०
Aster Silicates
११८.००

ऑगस्ट २०१०
Prakash Steelag
११०.००

सप्टेंबर २०१०
Gujarat Pipavav
४६.००

ऑक्टोबर २०१०
Electrosteel St
११.००

नोव्हेंबर २०१०
Coal India
२४५.००
डिसेंबर २०१०
MOIL
३७५.००

(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)

सौजन्य:- फुलोरा, सामना.

नवीन वर्षात पैशाचे उड्डाणपूल बांधूया! - १

 या, श्रीमंत होण्याची सुरुवात करूया! चला या नवीन वर्षाचा एक संकल्प करूया... नवीन वर्षात मी पैसा कमावणार. माझी गुंतवणूक मीच करणार आणि माझा नफा मीच कमावणार. माझी कर्जे मीच फेडणार. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक आर्थिक अडचणींवर उड्डाणपूल बांधण्याचा कार्यक्रम मी या नवीन वर्षात सुरू करणार!
शेअर बाजार -सट्टा-असं काही म्हटलं की नुकसान -कर्ज -दिवाळखोरी-असंच चित्र डोळ्यांसमोर उभे राहण्याचे दिवस आता राहिले नाहीत, पण अजूनही मराठी माणसाला शेअर बाजाराची आणि त्यातल्या गुंतवणुकीबद्दल जी अढी आहे ती नाहिशी झालेली नाही.

योग्य वेळी कमीत कमी गुंतवणूक करणारा भवसागर तरून जातो आणि न करणारा नवसागरात बुडून जातो हे समजूनही अंगवळणी न पडणे ही आपली शोकांतिका आहे. मुळात मनात पैशाची सांगड पाप पुण्याशी घातलेली आहे ती वर्षानुवर्षाच्या गरिबीने. त्यामुळे गुंतवणुकीला सट्टा समजणारी आपण माणसे. जास्त पैसे कमावणे -गरजेपेक्षा चार पैसे जास्त खिशात असणे याची पण आपल्याला भीती.


मराठी माणसाची (शेअर बाजारातील ) प्रतिमा उत्तम नोकरी करणारा माणूस अशी आहे. सचोटीने काम करणे हे त्याचे भांडवल आहे. त्यामुळे कर्ज देणार्‍याला हवी तशी प्रतिमा (प्रोफाईल)मराठी माणसाची आहे. त्यामुळे गरजेला कर्ज घेणारा मराठी माणूस गूंतवणूक करून पैसे कमावण्याच्या मार्गाला न जाता कर्ज काढून गरज भागवण्याच्या मागे असतो. साहजिकच आहे की मराठी माणसाच्या हातात शेअर बाजारातला एकही शेअर नसेल पण को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे शेअर पहिल्या पगाराच्या दिवशी असतील.

कदाचित ही विधाने अतिरंजित वाटत असतील तर फोर्टमधल्या एखाद्या पेपर स्टॉलवर नजर ठेवा. बर्‍याच वेळा नव्या नोकरीचे फॉर्म आणि शेअर्सच्या नव्या इश्यूचे फॉर्म एकाच पेपरवाल्याकडे असतात. तासाभरात पन्नास नोकरीचे फॉर्म विकले जातात पण आमचा मराठी माणूस फुकट मिळणारा गुंतवणुकीचा फॉर्म उचलताना दिसणार नाही.

पण नोकरीतला माणूस दरवर्षी गरीब होत जातो हे सत्य आपल्या लक्षात येत नाही.
आपर्‍याला पगार मिळतात वर्षभरात फक्त बारा.

त्यापैकी एक फंडात जमा होतो.

एक आयकरात जातो.

एक वैयक्तिक कर्ज फेडण्यात जातो.

एक पगार लग्न-बारशी किंवा इतर सामाजिक जबाबदार्‍यांसाठी.

अचानक उद्भवणार्‍या समस्यांसाठी एक पगार जातो.

एक पगार विम्याचे हप्ते भरण्यात.

हातात उरले पगार सहा. त्यात खर्च चालवायचा बारा महिन्यांचा.

पुढच्या दोन वर्षांत महागाई वाढली की हे प्रमाण पाच पगार आणि बारा महिने असे होईल.

म्हणजे एकूण अंदाजपत्रक असलंच तर ते तुटीचे आहे.

मग आपला संसार चालतो कसा?

तो चालतो कर्ज काढून किंवा हातात अचानक लाभानी येणारे पैसे वापरून. दरवर्षी नवीन कर्ज काढून किंवा असलेल्या कर्जाची मुदत वाढवून.

थोडक्यात काय तर आगामी भविष्यकाळातील मिळणारा वाढीव पगार वर्तमान काळातच संपून जातो.

मग या दुष्टचक्रातून सुटका होणार कशी?

दरवर्षी पैसे कमी पडत असल्याची भावना वारंवार जागृत झाल्यावर खटपट सुरू होते जास्त पैसे मिळवण्याच्या सोप्या तोडग्याची आणि मग आपली गाठ पडते पैसे खाणार्‍या लांडग्यांशी. हे लांडगे वेगवेगळ्या नावानी आपल्या समाजात फिरत असतात. कधी त्यांचे नाव कल्पवृक्ष असते तर कधी शेरेकर तर कधी उदय आचार्य तर कधी लिमोझिन. गेल्या दहा वर्षांत अशा लांडग्यांनी आपल्याला जवळजवळ दहा हजार कोटींना नागवले आहे.

या लांडग्यांच्या तोंडी घास घालण्यापेक्षा तेच पैसे फक्त आय.पी.ओ. म्हणजे नव्या कंपन्यांच्या निर्धोक गुंतवणुकीत टाकले असते तर काय झाले असते ते पहा. फक्त गेल्या वर्षाचा म्हणजे २०१०चा विचार करा. समजा गुंतवणुकीची सुरुवात जानेवारी महिन्यापासून केली असती तर डिसेंबरपर्यंत प्रत्येक गुंतवणुकीवर चाळीस टक्क्यांचा नफा झाला असता. म्हणजे एक वर्षात एका लाखाचे कमीतकमी दोन लाख झाले असते. (आणि आपले पैसे आपल्याच ताब्यात राहिले असते. थोडक्यात एकच रस्ता आहे या गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर येण्याचा तो म्हणजे सुयोग्य गुंतवणुकीचा.

एक प्रश्‍न मनात नक्की येईल तो म्हणजे मी गुंतवणूक का करायची? कारण तुमची बचत खात्यातली रक्कम अडीच ते तीन टक्के व्याज देते -मुदतबंद खात्यावर परतावा फक्त आठ टक्के मिळतो आणि महागाई दहा टक्क्यांनी वाढते. म्हणजे दरवर्षी बचतीची किंमत वाढण्याऐवजी कमी होत जाते आहे. महागाईवर मात करायची असेल तर महागाईपेक्षा जास्त दरानी वाढ होईल अशाच क्षेत्रात जायला हवे. या साठी अनेक रस्ते आहेत .

क्रमांक एक : शेअर बाजारात गुंतवणूक .

क्रमांक दोन : कमोडिटी बाजारात गुंतवणूक करण.

क्रमांक तीन : फॉरेन एक्सेंजची खरेदी विक्री म्हणजेच फॉरेक्स मार्केट
तीन पर्यायातून कुठलाही निवडा. हे दर महिन्यात -दर आठवड्यात दर दिवशी उत्पन्न मिळवून देणारे तीन सोपान आहेत. सोपे आहेत म्हणून ते सोपान आहेत . सुरुवात मात्र शेअर बाजारातून करायला हवी.

सौजन्य:- फुलोरा, सामना.

Friday, August 05, 2011

सांडपाण्यातला शत्रू लेप्टो

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूसारखीच लक्षणे घेऊन एक शत्रू सांडपाण्यातून आपल्यावर हल्ला चढवतो. ताप, सर्दी-खोकला अशा लक्षणांनी तो आपल्याला संभ्रमात टाकतो. नक्की काय झालेय याचा अंदाज घेण्यापूर्वीच गंभीर स्वरूप घेतो. शरीरातील एकेक अवयव निकामी करायला सुरू करतो. जीवही घेऊ शकतो. त्याचे नाव लेप्टोस्पायरेसिस. पण वेळीच निदान केल्यास या ‘सांडपाण्यातल्या शत्रू’पासून आपण आपला बचाव करू शकतो. सांगत आहेत सर जे. जे. रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. विनायक जोगळेकर.


पावसाळ्यात शहराच्या सखल भागात पाणी साचते. बिळांमध्ये पाणी गेल्याने उंदीर बाहेर पडतात. बराच वेळ आडोसा न सापडल्यास पाण्यात गुदमरून मरतात. त्यांच्या शरीरातील घातक तत्त्वे पाण्यात मिसळतात. बचावलेल्या उंदरांचे मलमूत्रही पाण्यात एकजीव होते. स्पायरोशिट हा लेप्टोचा वाहक जीवाणू त्यात असतो. पायाला छोटी जखम असेल आणि अशा साचलेल्या पाण्यातून आपण गेलो तर जखमेतून हा जीवाणू शरीरात प्रवेश करतो. ग्रामीण भागात शेतामध्ये काम करताना हा जीवाणू नकळत आपल्या शरीरात प्रवेश करतो. कारण शेतात काम करताना छोट्या-छोट्या जखमा होतच राहतात.

- हिमोरेजिक लेप्टोस्पायरोसिस थोडा गंभीर स्वरूपाचा असतो. त्यात रुग्णाला कावीळ होते. अंगावर लाल चट्टे उठतात. शरीरातील प्लेटलेटस् मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने लघवी आणि थुंकीतून रक्त पडते. इतर अंतर्गत अवयवांमधूनही नकळत रक्तस्राव होतो. लिव्हर आणि किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी होते आणि रुग्ण दगावतो.

लक्षणे
 
- डोकेदुखी

- अंगदुखी
- प्रकाशात डोळे चुरचुरणे
- कापरे भरून ताप
- डोळे लाल होऊन पाणी येणे
- मानेला पुरळ उठणे
- पोटात वरच्या बाजूला वेदना होणे

काय काळजी घ्याल?
 
- शक्यतो साचलेल्या पाण्यातून जाणे टाळावे.

- जावे लागल्यास पाय घरी आल्यानंतर स्वच्छ धुवावेत.
- पायाच्या जखमांमध्ये पाणी शिरणार नाही यासाठी जखमा उघड्या ठेवू नयेत.
- तळव्यांना तेल लावावे, जेणेकरून पाणी शरीराला चिकटणार नाही.
- लेप्टोची लक्षणे दिसल्यास त्वरित रक्तचाचणी करावी.

सौजन्य:- चिरायू, सामना ०४०८२०११.

आरोग्यदायी तांबे

तांबे या धातूचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतेही धार्मिक कार्य करताना तांब्याच्या भांड्याचा वापर केला जातो. शुभ कार्यात तांब्याचे भांडे वापरणे शुभ मानले जाते. असे हे बहुगुणी तांबे आरोग्यासाठीही अतिशय उत्तम असल्याचा उल्लेख आयुर्वेदात केला आहे. खनिज स्वरूपात असलेला तांबा या धातूंचा अंश आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करते.


प्राचीन काळापासून चांगले आरोग्य लाभावे म्हणून तांब्याचा वापर केला जात होता. आजही हे महत्त्व कायम आहे. तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ते सकाळी अनशापोटी घेतल्याने अनेक आजार नाहीसे होतात. इतर धातूंच्या तुलनेत तांब्यावर विषाणूंची संख्या सुमारे ९० टक्क्यांनी कमी आढळते असे एका अभ्यासातून निदर्शनास आले आहे. दैनंदिन जीवनात स्टील, लोखंड, ऍल्युमिनिअम अशा अनेक धातूंचा संपर्क येत असतो. यामुळे मोठ्या प्रमाणात विषाणू आपल्या शरीरात जातात. याला पर्याय म्हणून फायबर हा प्रकार वापरात आणण्यात आला. मात्र यावरही विषाणू अधिक आढळून आले.

तांब्याच्या भांड्याचा जेवण करताना किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सातत्याने वापर झाल्याने आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. या दरम्यान त्या व्यक्तींमधली रोगप्रतिकारशक्तीही वाढली आहे. यामुळे आजारांशी दोन हात करताना खबरदारी म्हणून तांब्याच्या भांड्याचा वापर केला पाहिजे.

सौजन्य:- चिरायू, सामना ०४०८२०११.

सीताफळ

सीताफळ हे झाड मूळात वेस्ट इंडिजचे सीताफळात व्हीटॅमिन सी, फायबर, कर्बोदके आणि खनिजे याचे प्रमाण भरपूर प्रमाणात असतेे सीताफळाच्या झाडांना सहसा कीड लागत नाही सीताफळाचा औषधी उपयोगही करण्यात येतो


- सीताफळ थंड, मधुर, पित्त-तृषाशामक, वातूळ, कफकारक व उलटी बंद करणारे आहे

- सीताफळ हे बलवर्धक असल्याने अशक्तपणात व थकवा आल्यास त्याचे सेवन करावे

- दीर्घ आजारानंतर येणारा अशक्तपणा तसेच ह्रदयाच्या मासपेशींनी दुर्बलपणा आला असल्यास सीताफळाचे सेवन करावे

- कच्च्या सीताफळाचा मुरड्यावर फायदा होतो

- बियांचे चूर्ण केसांना लावल्यास केसातील उवा नाहीशा होतात पण हे चूर्ण डोळ्यांपासून लांब ठेवा नाहीतर डोळ्यांची आग होईल

- सीताफळाची पाने वाटून ती पोटीस गळवांवर बांधता येते त्यामुळे गळू लवकर पिकते तसेच आतली घाणही स्वच्छ होण्यास मदत होते

सौजन्य:- चिरायू, सामना ०४०८२०११.

गव्हाची ऍलर्जी

उत्तम आरोग्यासाठी भाताऐवजी गव्हाची पोळी खाण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देताना दिसतात. पण जर गव्हाचीच ऍलर्जी असेल तर! वास्तविक आपल्याला गव्हाची ऍलर्जी आहे हे सत्य अनेकांना माहितीच नसतं. उलट पोटात दुखतंय, सततच्या उलट्या होणं आणि पातळ शौचास होणे हा त्रास सहन करीत तात्पुरते वैद्यकीय उपचार घेण्यात धन्यता मानतात.


गव्हाच्या ऍलर्जीमुळे होणार्‍या आजाराला सिलीऍक डिसीज (मत्ग्म् ्र्ग्ेीेा) असं म्हणतात. गहू व गव्हापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये ग्ल्युटीन नावाचा घटक असतो. त्याची ऍलर्जी आतड्याला असते त्यामुळे वर सांगितलेल्या तक्रारी सुरूच असतात. बिस्कीटस्, ब्रेड, पोळी, पाव, पाकिटात मिळणारे कुरकुरीत पदार्थ, नूडल्स, चायनीज फूड, नान, पराठे, पिझ्झा या व अशा सर्वात मैदा किंवा गव्हाचे पीठ असते. हे पदार्थ कटाक्षाने बंद केले की रोग्याच्या तक्रारी मावळतात. ही ऍलर्जी शोधण्यासाठी गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट (उेूदाहूीदत्दुग्ेू) एक कॅप्सूल गिळायला देतात. ती कॅप्सूल लहान आतड्याचा तुकडा (ँग्दज्ेब्) घेऊन बाहेर पडते. हा आतड्याचा तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली तपासून व रक्ताच्या चाचण्या करून याचे निदान होते. तज्ज्ञ मग काय, कसे व किती खायचे ते लिहून देतात. रुग्ण मग या शुक्लकाष्ठातून मुक्त होतो.

गव्हाच्या ऍलर्जीने केवळ पचनसंस्थेवर परिणाम होत नाही तर शरीराच्या इतर अवयव व प्रक्रियेवरही होतो.

- लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो.

- सांधेदुखी, हाडांचा ठिसूळपणा, हाडांची झीज.

- नैराश्य

- हातपाय दुखणे, सुन्न होणे.

- महिलांना मासिक पाळी अनियमित होणे, गर्भपात, वंध्यत्व

- त्वचेला खाज सुटणे.

याशिवाय मधुमेह, थायरॉईड, हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी समस्याही उद्भवू शकतात.

गव्हाची ऍलर्जी आहे म्हणून गव्हापासून बनवलेले पदार्थ टाळून ही समस्या मुळापासून दूर होत नाही. ऍलर्जीची लक्षणं आढळल्यास सर्वप्रथम गॅस्ट्रॉएटरॉलॉजिस्टकडे जाऊन तपासणी करून घ्यायला हवी.

- डॉ. प्रकाश जावडेकर
सौजन्य :- चिरायू, सामना, ०४०८२०११

Tuesday, August 02, 2011

चाळ - एक संस्कृती...

मागे 'इमारती २ बीएचके 4 बीएचके'  हा लेख लिहित असताना 'चाळ' या शब्दाचा उल्लेख आला होता, व त्यानंतर मी पुन्हा एकदा त्या आमच्या विक्रोळीतील चाळी मधील आठवणीत रममाण झालो.

तसा माझा जन्म झाला तेव्हा आम्ही विक्रोळीतील 'मयुरेश को. ओप. हौसिंग सोसायटी' या तीन चाळी असलेल्या कॉलनीत राहत असू. मला आजही आठवत ते 'रामायण' हि दूरदर्शन वरील मालिका. तेव्हा वडिलांनी २७ इंची TELI RAD या कंपनीचा  T .V . आणला होता. त्यावर चित्र एवढे मोठे दिसायचे कि त्यामुळे शेजारी आमच्या कडेच येऊन ती
मालिका पाहत असत.
 
लहानपणी एक गोष्ट मात्र व्हायची मला आई रागावली कि मी डुंबरे मामांकडे जाऊन राहायचो व त्यांची मुले नितेश, पिंकी, रुपेश त्यांची आई रागावली कि आमच्या कडे येऊन राहत असू. मग त्या दिवशी माझे जेवण त्यांच्या कडेच व्हायचे व मी वडील घरी आल्याशिवाय घरी जात नसे. तेव्हाचा तो राग म्हणजे बालपणातला राग असे. पण त्यामुळे 'शेजार धर्म' या संस्काराचे बाल कडू मिळाले होते.
 
एकदा अशीच दुपारची बोंबाबोंब झाली, बाहेर आल्यावर समजले कि, शिंदे काकूंच्या घरात साप घुसलाय म्हणून. तेव्हा मग कोणीतरी एका माणसाला बोलावून आणले तो साप शोधण्यासाठी, तेव्हा तो साप कुठे मिळाला माहित आहे .... RADIO च्या बॉक्स मध्ये. त्या नंतर मला बर्याच वर्षांनी समजले कि तो माणूस ज्याने साप शोधला त्याला 'सर्प मित्र' म्हणतात म्हणून.
 
तिथेच 'सावंत' म्हणून एक कुटुंब राहत असे. त्यांची मोठी मुलगी... अं... आता नाव नाही आठवत, पण ती छान रांगोळी काढत असे. मी तिला एकदा असेच सांगितले कि ताई मला पण शिकव. तर तिने खरच मनावर घेतले व तिने प्रथम मला कागदावर ठिपके काढून त्यावर रांगोळी काढायला सांगितली. तसं शिकल्यावर मग तिने मला जमिनीवर ठिपक्यांची रांगोळी काढून त्यात रंग कसे भरायचे ते शिकवले. ती ताई मला विना ठिपक्याची पण रांगोळी शिकवणार होती पण... त्या आधीच आम्ही विक्रोळी सोडली. मग डोंबिवलीला आल्यावर व आजही बदलापूरला आल्यावर दिवाळी मध्ये जेव्हा मी रांगोळी काढतो व मला दोन शब्दांची वाहवा मिळते तेव्हा त्याचे सर्व श्रेय त्या ताईलाच जाते. जर आम्ही तिथे असलो असतो तर आज कदाचित मी मुक्त हस्त रांगोळी देखील काढू शकलो असतो.!
 
पूर्वी चाळी मध्ये एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवायची, ती म्हणजे तिथे सर्व सण गुढी पाढवा ते ख्रिसमस एकत्र साजरे केले जायचे. त्यावेळी आमच्या इथे जास्त मराठी व दोन तीन कुटुंबेच गुजराती व ख्रिस्चन होती. पण सर्व सण समभावाने साजरे केले जायचे. त्यातल्या त्यात तुळशीचे लग्न व ३१ डिसेंबर ची रात्र खास असायचे. तुळशी ची लग्न चाळी च्या मधोमध टेबल लाऊन त्याला सजावट करून केली जायची. तुलाशिना सजवणे हा पण एक वेगळाच उपक्रम असायचा. मग तुळशीची लग्न लागल्यावर आम्हा मुलां- मुली  मध्ये चुरस लागायची ती मोठांचे नजरा चुकवून अक्रोड पळवण्याची. मग आम्ही ती घरी घेऊन गेलो कि आमच्या आई आम्हाला सांगायच्या, नंतर सर्वाना वाटणार आहेत तेव्हा परत ठेऊन या. मग सर्व अक्रोड परत आपल्या आपल्या जागेवर येत असत. हि आठवण आजही माझ्या चेहऱ्यावर हसू उमटवून जाते.
 
तसंच, ३१ डिसेंबर ची रात्र पण एक मोठा उत्सव असे. तीच जर शनिवारी आली तर क्या कहने... त्या रात्री तिन्ही चाळी मधले लोक एकत्र येऊन दोन तीन प्रकारचे पदार्थ बनवत असत. मग आम्ही तिथेच मोठा परदा मागवून त्यावर चित्रपट पाहत असू व त्या पदार्थांची चव चाखत असू. त्या वेळी सर्व कुटुंबातील सर्व मंडळी हजार असत व एकही व्यक्ती कार्यक्रम पूर्ण होई पर्यंत जात नसे.

हं.... तो काळच वेगळा होता. आज मला ह्या आठवणीचे खूप महत्व वाटत आहे. ते क्षण आज छायाचित्र रूपाने जतन असायला हवे होते. पण ते वयच लहान होत व तेव्हा असे कॅमेरा वगैरे च फॅड पण नव्हते.
 
जीवन म्हटल्यावर जश्या बर्या आठवणी असतात  तश्याच त्रासदायक आठवणी पण असतात.  
 
आमच्या घरी दर श्रावण महिन्यात वडील 'श्री नवनाथ भक्तिसार' हा ग्रंथ पठण करून पूजा ठेवत असत. असेच एका वर्षी पूजेच्या दुसर्या दिवशी आम्ही प्रसादाच्या पुड्या बांधत असताना शेजारचे डोंगरे आजोबा आले. त्यांना पण देवांची आवड होती व वडिलांनी त्यावर्षी एक हनुमानाची फोटो फ्रेम आणली होती. तेव्हा ते आजोबा फोटो वर करून भिंतीला कुठे लावायचा ते दाखवत होते. त्याचवेळी पंख्याची पात फोटोला लागून काचा उडाल्या व त्यातील एक मोठी काच येऊन माझ्या डोक्यात घुसली, व एकदम धावपळ झाली, डुंबरे मामा आणि  वडील मला पटकन डॉक्टर कडे घेऊन गेले होते. नंतर मला डॉक्टर ने गुंगीचे इंजेक्शन दिले. जेव्हा जाग आली तेव्हा कळले कि २१ टाके घातले आहेत. त्या दिवसा पासून ते टाके काढायच्या दिवसा पर्यंत तिन्ही चाळी मधले कुणी न कुणी दिवसभरात येऊन माझी चोकशी करून जायचे. तेव्हा माणसां मधील  मधली 'आपुलकी' कळली.
 
तसंच एकदा रात्री बोंबा बोंब झाली आग लागल्याची. आमच्या मागील कापड कंपनीला आग लागली होती. त्या रात्री बाकी दोन्ही चाळीतले लोक आग आमच्या चाळी पर्यंत येईल म्हणून पटापट सर्व सामान बाहेर काढत होते व सर्वच रात्रभर जागे होते.  ह्या दोन्ही प्रसंगातील त्या वेळच्या लोकांची आपुलकी, सहकार्य हे खरच वाखाणण्याजोगे आहे.
 
तेव्हाचे लोक निस्वार्थी आणि  एकमेकांना मदत करणारे, सुख दुखात सहभागी होणारे, जात भेद न मानणारे असे होते.  खरच आमची ती चाळ म्हणजे एक संस्कार रुपी परिसरच होता.
 
मी स्वताला खरच भाग्यशाली समजतो कि माझ्या कडे अश्या आठवणींच  गाठोडं आहे, जे कधी तरी नकळत उघडलं कि, मनात एक वेगळीच हसू रुपी लकेर उमटते.
 
मला आज वाटते आहे कि आम्ही अजून हि तिथे राहायला हवे होते.  जस झाड एका जागी उगवल्यावर तिथे ते वाढत असताना आपण त्याला दुसर्या जागी लावतो व मग त्या झाडाला त्या मातीशी, परिस्थितीशी जुळवून घ्यायला वेळ लागतो, तशीच स्तिथी माझ्या सारख्या इतर अनेक जणांची झाली असेल, ज्यांना काही कारणास्तव आपले जन्म स्थान सोडावे लागले असेल.
 
मला आज वाटत आहे कि, तेव्हा मुंबई सोडायला नाही पाहिजे होती, मुंबईत मराठी माणसाला उद्योग धंदा करण्या साठी बर्याच संधी उपलब्ध आहेत. हे मला वाटले कारण, माझ्या सारख्याच एका मित्राचे CYBER  कॅफे लालबागला आहे. तसेच त्यांचा परंपरागत गणपती मूर्ती बनविण्याचा पण उद्योग आहे.  मला अश्या सर्व मराठी माणसांचा अभिमान वाटतो, ज्यांनी मुंबई न सोडता तिथेच आपले उद्योग धंदे सुरु केले आहेत.
 
ह्या सर्व आठवणी आठवल्यावर वाटते कि, पुढची पिढी फक्त ब्लोक मध्ये च जन्माला येणार, तिथेच वाढणार व तिथेच गतप्राण होणार. त्यांना कधी या   चाळ रूपी संस्काराचे बाळ कडू मिळणार नाही !!

कॉर्पोरेट मंत्र - हवामान मस्त आहे...

पावसाने कमालच केली आहे. पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न सोडवलाच आहे. त्यातून तप्त मनांना वेगळ्या वातावरणाच्या गुंगीने चिंब भिजवले आहे. हवामानाचा आपल्यावर खूप परिणाम होतो. पावसाळ्यात सकाळी उठावेच वाटत नाही, काम होत नाही. सारीकडे ‘मळभ’ असेच वाटते. काहींना ताजेतवाने वाटते, खूप छान वाटते. कुणाला पांघरुणात घुसून अंधारात पडणे मानवते तर कुणाला बाहेर पडून भिजायला. खरं तर आपल्याला काय वाटते हे बाहेरच्या हवामानावर ठरत नाही. ते ठरते आपल्या मानसिक हवामानावर. मानसिक हवामान म्हणजे आपला ‘मूड’. ते बिघडले की हिरवागार निसर्गदेखील वणव्यासारखा जाणवतो. मूड चांगला असेल तर वाईट काळही उत्सव वाटू शकतो. हा ‘मूडच’ आपल्या आयुष्यात फार मोठा खेळ खेळत असतो. भले भले मूडच्या आहारी जाऊन जीवनाचे मातेरे करतात. निसर्गातील हवामान आपल्या हातात नसते. ऊन-पावसाला अजून तरी स्वत:चे स्वातंत्र्य आहे. पण आपल्या मानसिक हवामानाला मात्र आपण हवे तसे बदलू शकतो. हवे तेव्हा बदलू शकतो. हे हवामान कोणतीही वेधशाळा सांगू शकणार नाही. पण आपल्या वागण्यात आपल्या मनातील पाऊस-उन्हाचा पत्ता सर्वांना लागतच असतो. मूडमुळे काम चुकवू नका, माणसांना दुखवू नका, विचारांमध्ये हरवू नका, नकारार्थी दिशा धरू नका, वादळ, वारा, ऊन, पाऊस जेवढे निसर्गात अनिवार्य आहे तेवढेच मानसिक पातळीवरही. मनातील हवामानही बदलत राहाते. कधी चांगले तर कधी कटू वाटते. जसे असेल तसे स्वीकारा. त्याचा आनंद घ्या. वादळात अडकण्याची मजा घ्या, माणसांच्या स्वभावांची मजा घ्या. उन्हाची ऊब अंगावर ओढा, काळजी करणार्‍यांची ऊब जाणवेल, त्रास जाणवणार नाही. पावसात भिजा, तुफान प्रसंगांचे थेंब झेला, नाचा त्या पावसात. तुमच्या मनाचे हवामान तुम्हीच ठरवणार. ते तुम्हीच ठरवा. पण नियमित पणे स्वत:ला सांगत राहा-


‘आज हवामान मस्त आहे!’

- स्वप्ना पाटकर
सौजन्य:- थर्ड जनरेशन, सामना ०१०८२०११.