Monday, September 26, 2016

डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड फसवणूक



आज पुन्हा एक प्रसंग बँक डेबिट कार्ड फसवणुकीचा ह्या वेळी बदलापूर मध्ये  वाट्सअँप मध्ये समोर आला. आणि मग मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकाला पोहचली. आपण एवढा कष्टाने कमावलेला पैसा जेव्हा असा तिऱ्हाईत लुटून नेतो, तेव्हा मन किती अस्वस्थ होते हे एखाद्या शेयर मार्केट मधल्या इंट्राडे ट्रेडर ला विचारून बघा, मग कळेल कॅश लॉस काय असतो  ते.....
प्रसंग  :-

एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह एका हॉटेल मध्ये खानपानासाठी गेले होते. बिल पेयमेन्ट  करताना तिथे त्यांनी वेटर च्या सांगण्यावरून त्यांनी वेटरच्या हातात १. डेबिट कार्ड आणि एका कागदावर परत २. डेबिट कार्ड क्र. ३. डेबिट कार्ड पिन लिहून दिले. त्या दिवशी त्यांच्या व्यवहार पूर्ण झाला, ते घरी परतले.  आणि दोन दिवसांनी त्यांना शॉक बसला त्यांच्या खात्यातून रु ८१०००/- वजा झाले होते. पुढील ट्रांसकशन च्या नावे - 1. SBI Buddy, 2. Snapdeal, 3. ICICI Card, 4. Pay U Money, 5. Ola Cab, 6. Paytm Mobile. त्या गृहस्थांनी मग त्यांच्या परीने बरेच प्रयत्न केले. पोलिसात सायबर सेल मध्ये तक्रार ते हॉटेल च्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची विनंती पण प्रयत्न विफल ठरले. म्हणून त्यांनी आवाहन केले आहे गुन्हेगाराला पकडून देण्यासाठी त्यांच्याशी ९८९०४९७७९१ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.

विवरण :- वरील प्रसंगातून समोर आलेल्या काही बाबी व चुका पुढील प्रमाणे :-

१. डेबिट कार्ड जेव्हा आपल्या हातात येते तेव्हा ते एका बँक पत्रासोबत जोडलेले असते व त्यात ठळक अक्षरात लिहिलेले असते,, "आपला पिन क्र. कुणाशी शेयर करू नये. व ऑनलाईन किंवा इतर बाहेर कुठेही पेयमेन्ट करताना आपला पिन क्र. आपणच टाकावा व तो इतर कुणी पाहणार नाही याची काळजी घ्यावी". ह्या प्रसंगात पीडित व्यक्तीने आपला पिन क्र. शेयर केला, XX चूक.

२. ह्या प्रसंगात पीडित  व्यक्तीने स्वतः आपल्या हाताने डेबिट कार्ड दिलेले असताना सुद्धा पुन्हा कागदावर डेबिट कार्ड क्र. व पिन लिहून दिला. XX चूक.

३. पेयमेन्ट झाल्यावर पीडित व्यक्तीने आपला कागद परत मागितला नाही. आता एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये समजा तो कागद इतर कुणा गिर्हाईकाच्या हाती लागला असण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे हा निष्काळजीपणा.. XX चूक....  कुणाचाही ... पीडित व्यक्ती किंवा हॉटेल स्टाफ... 

४. बरं,, त्या पीडित व्यक्तीने हॉटेल मधून बाहेर पडल्यावर आपला पिन क्र. बदलणे गरजेचे होते. वरील प्रसंगातील हॉटेल च्या आजू बाजूस ५ ते ६ ATM आहेत. पण त्यांनी तसे केले नाही. XX चूक 

५. ती पीडित व्यक्ती हॉटेल काउंटर पर्यंत जाऊ शकली असती. कारण सर्व हॉटेल मध्ये बिल पेयमेन्ट हे कॉउंटर वरच असते. पण तो हि निष्काळजीपणा दाखवला.. XX चूक



 ६. वरील प्रसंगात एक वस्तुस्थिती अशी आहे की, लुबाडणार्याने ६ वेग वेगळ्या वेबसाईट वर पेयमेन्ट केलेली आहेत. म्हणजे असे आहे जर तुम्ही एखाद्या वेबसाईट वर वस्तू सिलेक्ट करून ती कार्ट (बॅगेत) ठेवली असेल व फक्त पेयमेन्ट करायचा असेल तर साधारण पाच मिनिटे वेळ लागतो. म्हणजेच जेव्हा पहिले पेयमेन्ट झाले व त्या पीडित व्यक्तीच्या मोबाइलला मेसेज आला तेव्हाच त्यांनी त्यांच्या बँक ग्राहक केंद्राशी फोन वरून संपर्क साधून कार्ड ब्लॉक करावयास हवे होते. पण नाही केले... XX चूक.
जर तसे झाले असते तर चोर पुढील २५ मिनिटे त्यांना लुबाडू शकला नसता.

७. कोणत्याही वेबसाईट वर डेबिट कार्ड द्वारे पेयमेन्ट करताना पुढील बाबींची आवश्यकता असते...
१. डेबिट कार्ड होल्डर चे नाव
२. डेबिट कार्ड क्रमांक
३. कार्ड मागील सीविवि क्रमांक
४. डेबिट कार्ड पिन.
वरील पैकी दोन बाबी तर पीडित व्यक्तीने स्वतःच उघड केल्या आहेत....XX चूक.


म्हणजे कायदेशीर दृष्ट्या हाताएवढे डेबिट कार्ड वापरण्याची पूर्ण जबाबदारी हि पूर्णपणे बँक ग्राहकाची असते. तो जर अश्या प्रकारे डेबिट कार्ड लुबाडणुकीला बळी पडला तर फक्त तक्रार करण्याशिवाय काही पर्याय नसतो. ह्याचे कारण पुढील तांत्रिक बाबी मध्ये पाहुयात.

तंत्रज्ञान :- अश्या डेबिट कार्ड लुबाडणुकीच्या केसेस मध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे अश्या प्रकारे लुबाडणूक करणारे चोर हे कधीही एखाद्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करत नाहीत. ते वेगवेगळ्या खरेदी वेबसाईट वरून वस्तू खरेदी करतात. जसे आता ह्या केस मध्ये SBI Buddy हे एक पॉकेट आहे ज्यात पैसे भरून मग बिल पेयमेन्ट, खरेदी करता वापरता येतात. स्नॅपडील हि ऑनलाइन खरेदी साठी उपयोगात येते. Pay U Money, Ola Cab, Paytm Mobile ह्या सर्व वेबसाईट पेयमेन्ट करता वापरता येतात. आणि त्यामुळे दिवसाला ह्या प्रत्येक किंवा इतर अनेक वेबसाईट वर इतके पेयमेन्ट होत असतात कि त्यातून वरील डेबिट कार्ड चे पेयमेन्ट कुठून, कधी झाले हे शोधणे अशक्य नाही पण खूप कठीण गोष्ट आहे. तसेच असे चोर एकाच संगणकावरून नाही तर वेगवेगळया संगणक किंवा वेग वेगळया मोबाईल वरून देखील पेयमेन्ट करतात. 
 सूचना :- 

१. सध्या ऑनलाईन पेयमेन्ट चे मार्केट एवढे गतिमान झाले आहे कि, तुमचे डेबिट / क्रेडिट कार्ड वापरून कुठून कुठे कधी किती पेयमेन्ट केले जाईल हे सांगता येणार नाही. 

२. इंटरनेट बँकिंग द्वारे पेयमेन्ट करताना OTP (वन टाइम पासवर्ड)  आपल्या मोबाइलला येतो तो फीड केल्याशिवाय पेयमेन्ट पूर्ण होत नाही. त्यामुळे ते सुरक्षित आहे.

३. आपले डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड कोणत्याही हॉटेल किंवा दुकानात स्वाईप करताना कृपया स्वाइपिंग मशीन आपल्या हातात घ्यावी व मगच पिन क्रमांक टाकून द्यावी. अश्या वेळी आजू बाजूला कुणी उभे नाही याची खात्री करावी.

४. सध्या बँक डिटेल्स घेण्याची नवी पद्धत सुरु झाली आहे. आपल्या मोबाइलला एक कॉल येतो व गोड आवाजात "तुमचे कार्ड वैधता संपली आहे व नवीन कार्ड पाठवण्यासाठी जुने कार्ड क्र. व पिन मागतात व आपण पटकन सर्व देऊन मोकळे होतो व मग आपले बँक खाते पण मोकळे होते. तेव्हा RBI व आपल्या बँकेच्या वारंवार सांगण्यानुसार आपले बँक कार्ड डिटेल्स  फोन वर देऊ नये.

५. सर्वात सोपा उपाय शक्य असल्यास दोन बँक खाती ठेवणे. एक खाते मेन ठेवणे व दुसरे खात्यात जेवढी रक्कम महिन्यात खर्च करावी लागते तेवढीच ट्रान्सफर करणे. व अश्या दुसऱ्या खातेच ऑनलाईन पेयमेन्ट किंवा कार्ड वापरासाठी वापरणे. म्हणजे अश्या दुसऱ्या खात्यात रक्कम कमी राहील व लुबाडणाऱ्यांची पंचाईत होईल.

===================
आपल्या बँकेची सुरक्षा आपल्या हाती
========================
छायाचित्रे डाउनलोड :- गूगल.कॉम 

Saturday, September 24, 2016

कापूर पवित्र का मानला जातो ?

प्राचीन काळातील आपल्या देशातील धार्मिक विधींमध्ये कापराचा वापर केला जातो. कापराचा सर्वाधिक वापर आरतीत केला जातो.
कापराचे काही गुणधर्म  👇

💥 धार्मिक कारण ;-

शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.

💥 वैज्ञानिक महत्त्व ;-

  वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की , कापराच्या सुगंधाने जीवाणू , विषाणू , लहान किटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर रहातात.

✨ कापूराचे अजून काही फायदे ;-

१) सर्दि-पडस व्हायची लक्षणे आसताना एका रूमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दि-पडसे होत नाही.

२) कापूराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो.

३) कपूराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस् नामक रसायन अधिक सक्रीय होते. याचा उपयोग आपल्याला निर्णयक्षमतेत होतो.

४) कापूराचा रोज ३ वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते.

५) घरात कापूर रोज लावल्यावे अॉक्सिजन ९-११% टक्के ईतका वाढतो.

६) मुठभर कापूर तव्यावर ४० सेकंद तापवून ते एका रूमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास , घसा बसला असेल तर बरा होतो. तसेच हा शेक भुवयांच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.

७) मुठभर कापूर + दालचीनी + लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेट च्या आत ही पूडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर व घूशी येत नाहीत.

८) पण कापूर हा उगाच अति जाळू नये. कारण अति धूराने डोळे झोंबतात आणि त्याचा वाईट परीणामा भुबुळाच्या 👀 पाठील टिशूस् वर होतो.

९) गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने दुखाणे कमी होते व फुगलेल्या शीरा खाली बसतात. ( ५०शी ओलांडलेल्यांना अधिक उपयोगी )


कापूराच्या सुगंधाने एक नवचैतन्य निर्माण होते मनात

डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ञ, मुंबई

सौजन्य :- वाट्सअँप फॉरवर्ड

बदलते शहर बदलापूर





महान्यूज        
बदलते शहर बदलापूर                                                                                 शुक्रवार, ०२ सप्टेंबर, २०१६
मुंबई पुणे रेल्वे मार्गावर सह्याद्रीच्या डोगररागांच्या कुशीत कोकणातील ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेस वसलेलं गाव म्हणजे बदलापूर. मुंबईला जवळ असल्याने भरभराटीला आलेले गाव वजा शहर तसेच इतिहासाचा वारसा जपणारे आणि आधुनिक काळात उद्योग धंदे व चाकरमान्यांचे शहर म्हणून देखील हे गाव प्रसिद्ध झाले आहे. भौगोलिक दृष्टीने कोकणच्या उत्तरेला सरकलेले, दक्षिणेकडे पूर्व पश्चिम पर्वत रांगा, पूर्वेकडे खंडोबाचा डोंगर आणि बारमाही वाहणारी उल्हास नदीमुळे सदा हिरवेगार नटलेले हे शहर निसर्ग प्रेमी पर्यटकांना सतत भुलविणारे गाव ठरले आहे.

इतिहासाचा वारसा - छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी घोडे बदलण्याचे आणि विश्रांतीचे स्थान म्हणून ह्या गावाला बदलापूर गाव असे नाव पडले. बदलापूर हे महाराष्ट्र राज्यातील एक निसर्ग सौंदर्याने नटलेले शहर आहे. ठाणे जिल्ह्यातील या शहराला कुळगाव बदलापूर या नावाने सुद्धा ओळखले जाते. मुंबई शहराशी बदलापूर शहर मध्ये उपनगरीय रेल्वेसेवेने जोडलेले असून दक्षिणेस वांगणी तर उत्तरेस अंबरनाथ स्थानक आहे. मुळातले बदलापूर गाव हे बदलापूर रेल्वे स्थानकापासून जवळपास ५ किलोमीटर अंतरावर आहे. आज बदलापूर शहरात जुने बदलापूर गाव, कुळगाव, मांजर्ली, बेलवली, कात्रप आणि अनेक छोट्या गावांचा समावेश आहे.

बदलापूर कुळगाव भागाला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व आहे, बदलापूर स्टेशन कुळगाव हद्दीत १८५८ मध्ये बांधले गेले. रा.सा.गोविंदराव सरदेसाई यांच्या रियासतीतील नोंदीनुसार १७७९ चे सुमारास कुळगाव आणि बदलापूर गावात इंग्रज व पेशवे यांच्यात अल्प मुदतीची लढाई झाल्याचे आढळते. दि. ११ डिसेंबर १७८० रोजी हार्टलने बदलापूरजवळ कुळगाव येथे मुक्काम केला होता. त्याचेवर मराठ्यांनी दि. १६ रोजी हल्ला केला. १७८१ साली गाईड नावाचा अधिकारी चालून आला तेव्हा हरिपंत सरदार व त्याची बदलापूर जवळ चकमक उडाली असे ऐतिहासिक माहिती अजूनही आपल्या संग्रहित आहे. त्याच संग्रहानुसार वासुदेव पटवर्धन व परशुराम भाऊ पटवर्धन यांची ता. ३ व ११ फेब्रुवारी १७८१ च्या पत्रात बदलापूरचा उल्लेख इंग्रजांबरोबर झालेल्या लढाईच्या वर्णनात आढळतो. म्हणजेच सुमारे १७७९ च्या सुमारास कुळगाव बदलापूर हद्दीत लढाई झाली व बदलापूर गाव २ दिवस इंग्रजांच्या ताब्यात होते असे आढळून येते.

राष्ट्रीय पुरस्कार

आधुनिक काळात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बदलापूर गावात भेट दिल्याचे व त्यांच्यात पुढाकाराने उल्हास नदीवर प्रथम पूल बांधल्याची नोंद आहे. सरकारने त्यांची आठवण ठेऊन या नदीच्या काठी त्याचे भव्य स्मारक उभारले आहे. असे हे बदलापूर शहर अपंग पुनर्वसन कामासाठी देखील देशात प्रसिद्ध पावले आहे. या कामासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेला २००३ साली राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच बदलापूर येथे अपंग व्यक्तींसाठी अनेक संस्था कार्यरत असून ठाणे जिल्ह्यातील एकमेव अंध शाळा असलेल्या प्रगती विद्यालयाने देशभर लौकिक प्राप्त केला आहे.

बदलापूर परीसरातील ६५.१५ मीटर उंचीचे बारवी धरण हे बदलापूर स्थानकापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असलेले एक विशाल जलाशय स्रोत आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड येथील औद्योगिक वसाहतींना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २८०० ते ३००० मि.मी. पावसाची नोंद होते. बारवी, ब्यारेज आणि कोंडेश्वर येथील भोज धरणां व्यतिरिक्त बदलापूर स्थानकापासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर चिखलोली धरण आहे, या धरणांच्या परिसरातील निसर्गामुळे छोट्या सहलीसाठी जवळपासच्या शहरांतून पर्यटक येथे येतात. एकूणच नावाप्रमाणेच हे शहर बदलत असून येथील शिक्षण, वाचक व ग्रंथ प्रसार चळवळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रमामुळे हे शहर नावारूपाला आले आहे. वेगाने वाढते शहर पण अजूनही गावाचा चेहरा असलेले हे शहर सर्वांचे आवडणारे शहर आहे.

'महान्यूज' (www.mahanews.gov.in) मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

सौजन्य :- वाट्सअँप फॉरवर्ड

Sunday, September 18, 2016

मतदारांसाठी राष्ट्रीय सेवा पोर्टल - National Voters' Services Portal

भारतीय निवडणूक आयोगाने भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रम अंतर्गत संपूर्ण  देशातील मतदारांसाठी एक सेवा पोर्टल म्हणजेच इंटरनेट वेबसाईट तयार केली आहे.  http://www.nvsp.in/ त्याची माहिती पुढील प्रमाणे :-

Under the initiative of Digital India by Government, Election Commission of India has developed one centralised website for the voters across India. http://www.nvsp.in/ The details are provided further :-

१. Search your name in electoral roll मतदार यादीत आपले नाव शोधा :-
ह्यावर क्लीक केल्यावर दोन पद्धतीने आपण नाव शोधू शकतो. By clicking this link we can search our name in two styles
a. Search by Details :- ह्यात फक्त नाव, राज्य, जिल्हा व कोड एवढेच माहिती टाकून शोधा. जन्म तारीख व वय टाकण्याची गरज नाही. Just put your name, state, district & code and search. No need to put Birth Date or Age.
b. Search by Epic No. :- हे एकदम सोपे आहे. ह्यात फक्त मतदार ओळखपत्र क्र. , राज्य व कोड टाकून शोधा. It's simple. Just put your Voter ID Card No., State & Code and search.
वरील प्रमाणे आपले नाव मिळाल्यावर, नावासमोरील "view details" वर क्लीक करा. मग आपले डिटेल्स दिसतील व त्या बाजूला एक यादी दिसेल त्यात वेग वेगळे फॉर्म क्र. दिलेले आहेत. जर तुमचे डिटेल्स बरोबर असतील तर त्यावर क्लिक करू नये. त्या फॉर्म्स चा उपयोग पुढील प्रमाणे. सर्व ऑनलाईन फॉर्म्स आहेत व पटापट सबमिट करता येतात.
-------------------------------------
Form 6 फॉर्म ६ :- जर आपले विधानसभा / लोकसभा क्षेत्र बदलले असेल तर हा फॉर्म पूर्ण भरून सबमिट करा. ह्यात एक फोटो, एक ओळखपत्र, व एक पत्ता पुरावा स्कॅन करून टाकावा लागतो.
उदा. विवाहित स्त्री किंवा जागेत बदल.
If your assembly / parliamentary constituency is changed, then fill this form & submit. One photo, One ID proof, One Address proof is required to scan & submit.
Eg. Married Women or Change in place.
--------------------------------------
Form 6A फॉर्म ६A :- प्रवासी मतदारांसाठी मतदार क्षेत्र बदलल्यास भरावयाचा फॉर्म. Apply for shifting to a different Assembly Constituency (Only for overseas elector).
--------------------------------------
Form 7 फॉर्म ७ :- जर आपल्याला मतदार यादीत नावाबद्दल आक्षेप असेल किंवा मतदार यादीतून नाव कायमचे काढायचे असेल तर हा फॉर्म सबमिट करावा. Raise an objection for inclusion of this entry or Apply for deletion from electoral roll.
---------------------------------------
Form 8 फॉर्म ८ :- आपल्या मतदार माहिती मध्ये जर काही सुधारणा करायची असल्यास हा फॉर्म भरावा. Apply for corrections in electoral roll entry.
---------------------------------------
Form 8A फॉर्म ८A :- एकाच मतदार क्षेत्र पण मतदार केंद्र बदलायचे असल्यास हा फॉर्म भरावा. उदा. आपटेवाडी, बदलापूर पु वरून गांधी चौक, बदलापूर पु. मध्ये स्थलांतर.
Apply for shifting within Assembly Constituency. Eg. Shifting from Aptewadi, Badlapur e, to Gandhi Chowk, Badlapur e.
-----------------------------------------
२. Apply online for registration of new voter नवीन मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज:- ह्यात ऑनलाईन अर्ज फॉर्म ६ रूपात उपलब्ध आहे. तो सबमिट करावा. Fill online application in the form of Form 6. Fill & submit it.

३. Apply online for registration of overseas voter परदेशी मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज:- ह्यात ऑनलाईन अर्ज फॉर्म ६A रूपात उपलब्ध आहे. तो सबमिट करावा. Fill online application in the form of Form 6A. Fill & submit it.

४. Correction of entries in electoral roll मतदार नोंदी सुधारणा:- ह्यात जर तुम्ही कोणताही ऑनलाइन अर्ज भरला असल्यास व आपल्याकडे ट्रॅक क्र. असल्यास इथे "Track Application Status" वर क्लीक करून सद्यस्तिथी पाहू शकता. तसेच इथे PDF स्वरूपात सर्व फॉर्म दिलेले आहेत. ते देखील डाउनलोड करून, भरून जवळच्या मतदार अधिकारी कार्यालयात सबमिट करू शकता.
In this option,, you can track your application status for already submitted online forms.
And also all Forms are given here in PDF format which you can download, fill & submit to your nearest Election officer's office.

५. Know your booth, AC and PC:- ह्यात आपले मतदान केंद्र, विधानसभा क्षेत्र व लोकसभा क्षेत्र कोणते आहे ते समजते. In this option, you get information about your Election Booth, Assembly Constituency, Parliamentry Constituency.

६. Know your BLO, ERO and DEO :- ह्यात आपल्याला बूथ लेवल ऑफिसर,  इलेक्टोरल रेजिस्ट्रेशन ऑफिसर, डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर या बद्दल माहिती मिळते. Here we get information of out Booth Level Officer, Electoral Registration Officer, District Election Officer. 

आपण वरील प्रकारे अर्ज सबमिट केल्यावर, आपल्याला एक acknowledgement number   मिळेल. जो आपल्या ई-मेल मध्ये पण nvsp च्या नावाने आलेला असतो.  त्या क्रमांकाद्वारे आपण आपल्या अर्जाची सद्य स्तिथी पाहू शकता. आपल्या अर्जावर कार्यवाही सुरु झाली कि आपणास एक ई-मेल येईल ज्यात आपल्या नजीकच्या महापालिका किंवा मुनिसिपालिटी किंवा तहसील कार्यालयात बोलावण्यात येईल. (आमचा प्रभाग क्रमांक १३९ असल्यामुळे आम्हाला 139murbad@gmail.com  वरून ई-मेल आला होता. )
 त्या  दिवशी फक्त ऑनलाईन अर्ज सोबत जोडलेले मूळ कागदपत्रे वेरिफिकेशन करीत घेऊन जाणे व सोबत त्याची स्व स्वाक्षरी केलेलं झेरॉक्स प्रत पण सोबत घेऊन जाणे. झेरॉक्स कागदपत्रे जमा करून घेतली जातील. व पुढील अंतिम प्रक्रिया सुरु होईल. झेरॉक्स कागद पात्रांवर आपल्याला कोणत्या प्रभागात नाव टाकायचे आहे व पार्ट क्रमांक , ते सुद्धा लिहावे. जसे आमचा प्रभाग क्र. १३९ व पार्ट क्र १५२ आहे. 



तर वरील सर्व सुविधांचा उपयोग करून घ्या, आणि या वेळी नक्की मतदान करा. कारण ....
मतदान हा आपला अधिकार आहे.
- धन्यवाद.