Sunday, September 04, 2016

'हरितालिका व्रत' - चिकित्सा

स्त्रियांना मुळात शिक्षणाची संधी अगदी अलिकडे मिळाली. स्त्रियांच्या शिक्षणाचा या देशामधला इतिहास काही दीडशे वर्षांपेक्षा जास्त नाही. आणि खरं बोलायचं तर तो स्वातंत्रानंतरच थोड्या अधिक प्रभावीपणे सुरु झाला.
स्त्रियांचे म्हणजे खास विषय आहेत. उदा. होमसायन्स हा शास्त्राचा विषय आहे आणि शिक्षणाचा आभ्यासक्रम आहे हे अलिकडे विद्यापीठामध्ये अवघे पन्नास वर्षांपूर्वी आलं. आणि शिक्षणाची संधी ज्यावेळी स्त्रीला मिळाली, मुली मोठ्याप्रमाणात शिकायला लागल्या. त्यावेळेला मग स्वाभाविकपणे त्या शिक्षणाने चिकित्सा येण्याच्या ऐवजी कुशल रोजगाराची संधी असं त्या शिक्षणाकडे बघण्यात आलं, त्यामुळे त्या सबंध शिक्षणामध्ये ती बाई जरी BSC BED झाली तरी आपण व्रत का करतो ? आणि त्या व्रताचा अर्थ काय असतो ? याचा चिकित्सकपणे डोळसपणे विचार करण्याची गरज तिला भासत नाही. मग कुठलेही व्रत ती डोळे झाकून करते.
उदा. हरतालिकेचं व्रत
कोणालाही विचारले कि हरतालिकेचं व्रत का करतात सांगा बरं. तर उत्तर येते कि चांगला नवरा मिळण्यासाठी आपल्या लग्न व्हायच्या मुलीला सगळ्या बायका करायला लावतात तेच हे व्रत.

पण व्रत काय आहे ?
प्रजापिता ब्रम्हाची मुलगी पार्वती, ती उपवर झाली, तिला लग्न करायचं होतं  शंकराशी, शंकर बसले होते कैलासावर, लग्न करायला ते आजिबात तयार नव्हते त्यामुळे तिने जाळून घेऊन स्वतःचा जीव दिला. पुन्हा दुसऱ्या जन्मी ती प्रजापिता ब्रम्हाच्या पोटीच जन्माला आली. पुन्हा उपवर झाली. अतिशय सुंदर होती. त्यामुळे ब्रम्हाने त्रिखंडात संचार करणारा नारदाला जेव्हा विचारले कि नारदा माझी मुलगी अतिशय सुंदर आहे. उपवर आहे. तिला एक चांगला नवरा सुचव. नारदाने सुचवले कि तुझ्या मुलीला त्रिखंडामध्ये एकच नवरा आहे आणि तो म्हणजे शेषशाही विष्णू भगवान. त्याप्रमाणे ब्रम्हाने पार्वतीचं लग्न शेषशाही विष्णू भगवानाशी करायचं ठरवलं.
हे ठरताच ज्यावेळी पार्वतीला ते कळलं त्यावेळी पार्वती स्वतःच्या मैत्रिणीला घेऊन घरातून निघून गेली, जंगलात नदीच्या काठी गेली, तिने वाळूचे शवलिंग केलं, शिवाची आराधना सुरु केली. मग जे शंकर कैलासावर होते, त्यांना आपोआप कळाले कि आता काही खरं नाही, शंकर आले त्यांचे पार्वती बरोबर मिलन झाले.
आता प्रश्न हा कि हरितालिका म्हणजे काय ? हरित म्हणजे 'वन', आणि आली म्हणजे 'सखी'. सखीला घेऊन वनात जाऊन केलेलं व्रत म्हणजे हरितालिका व्रत.
आता हे सगळं आपल्या मुलीने चांगला नवरा मिळण्यासाठी लग्नापूर्वी करावं, असं जर त्यांना घरी सांगितलं जात असेल तर हे व्रत असं सांगतं, कि मुलीला ज्याच्याशी लग्न करावंसं वाटेल त्याला लग्न करायला जर घरच्यांनी विरोध केला तर स्वतःच्या मैत्रिणीला घेऊन त्यांनी घरातून निघून जावे, आणि त्याच्याशीच लग्न करावं. असं नुसतं म्हटलं तरी शास्त्र महाविद्यालयातील मुली देखील अवाक होऊन किंवा हसून पहात राहतात याचं कारण शिक्षणाचं जे मुख्य प्रयोजन आहे, कि तुमच्या जाणीव प्रगल्भ, उन्नत आणि चिकित्सक झाल्या पाहिजे त्याची संधी स्त्री वर्गाला फार कमी मिळालेली आहे.

म्हणून फक्त आपले पूर्वज सांगतात म्हणून कुठलीही गोष्ट करणे,  ग्रंथप्रामाण्य आहे म्हणून स्वीकारणे, चिकित्सा न करता फक्त ते देवाचे असते असे म्हणून त्याचा अंगीकार करणे, हे अविवेकीपणाचे लक्षण आहे

सौजन्य :- वाट्सअँप फॉरवर्ड, अपर्णा एस एम

No comments: