Tuesday, October 22, 2013

ए—सॅटर्न

शनीचे आतापर्यंत ६२ चंद्र सापडले आहेत. त्यांची नावे टायटन, एन्केलेडस, टेलेस्टो अशी आहेत. ही वैशिष्ट्यपूर्ण नावे त्यांना कोण देतो? एखादा नवीन चंद्र सापडला तर त्याला प्रथम एक तात्पुरते नाव दिले जाते. त्यात तो कोणत्या ग्रहाचा चंद्र आहे, सापडण्याचे वर्ष आणि त्या वर्षातील शोध क्रमांक उदा. शनीचा चंद्र असल्यास ए/२००५-ए१, ए/२००५-ए२ याप्रमाणे नावे दिली जातात. यातील पहिला ए—सॅटर्न म्हणून तर दुसरा ए सॅटेलाईट म्हणून वापरला गेला आहे. एकदा का त्या चंद्राची कक्षा निश्चित झाली की इंटरनॅशनल अस्ट्रोनोमिकल युनियन या संघटनेकडे त्याचे बारसे करण्याचे काम सोपवले जाते. साधारणपणे ही नावे ग्रीक किंवा रोमन पुराणातून घेतली जातात.
- योगेश नगरदेवळेकर
सौजन्य - फुलोरा सामना १९१०१३

सावंतवाडीत मँगो

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी संस्थानकालीन मोती तलावाच्या काठावर नव्याने सुरू झालेल्या पर्यटन स्वागत कक्ष म्हणजेच मँगो- II च्या व्यवस्थापनाने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी देशी-विदेशी पर्यटकांना सुसज्ज असे हॉटेल मँगोमध्ये खवय्यांना मनपसंत पेटपूजा करता येते. निवासाची उत्तम सोय हॉटेल मँगोमध्ये आहेच. हॉटेल मँगो व मँगो II ही दोन्ही हॉटेलस् एकमेकांपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. जिल्हा पर्यटनात मानाचा तुरा लावणारे हॉटेल मँगोनंतर हॉटेल मँगो II सुद्धा सावंतवाडी शहरात सुरू झाले आहे. सावंतवाडी संस्थानच्या ईस्टर राजवाडा गेटसमोरील बाजूने हे पर्यटन स्वागत कक्ष पर्यटकांची पसंती ठरत आहे.सावंतवाडी नगर परिषदेने पर्यटकांना सुविधा निर्माण व्हावी, जिल्ह्यातील पर्यटनाची माहिती व मार्गदर्शन मिळावे म्हणून टीआरसी म्हणजेच (टुरिस्ट रिसेप्शन सेंटर) पर्यटन स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. हे टीआरसी मँगो हॉटेलच्या महेश कुमठेकर यांच्या व्यवस्थापनाने पर्यटन सेवा सुरू केली आहे.
शहरातून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गावर तलावाकाठी हे मँगो-II हॉटेल वसले आहे. ‘मँगो’ व ‘मँगो II’ मध्ये विविध खाद्यपदार्थ मिळतात. दोन्ही हॉटेल्समध्ये एकूण ५२ सुसज्ज अशी रूम्स आहेत.
मँगोमध्ये मिळणार्‍या खाद्यपदार्थांव्यतिरिक्त मँगो II मध्ये पदार्थ आहेत. मोगलाई, पंजाबी डिशेसबरोबर मॅगोने ‘मँगोथाली’ ही सर्वसामान्यांना परवडेल अशी जेवणाची डीश सुरू केली आहे.
चायनीज पदार्थांचा आस्वाद घ्यायचा तर हॉटेल मँगोशिवाय पर्याय नाही. तर सायंकाळच्या ‘मँगो II’ च्या पावभाजीसाठी पर्यटकांबरोबर सावंतवाडीकरांची झुंबड उडते.
दोन्ही हॉटेल्समध्ये निवासाची सोय आहे तशी रेस्टॉरंटची सोय आहे. मालवणी खाद्यपदार्थांबरोबर मसाले, लोणची, जाम, पापड तसेच शिल्पकाठळे, विविध कलाकुसर याचेही प्रदर्शन मँगो II मध्ये करण्यात आले आहे.
घरानंतर मँगोमधील आदरातिथ्य पर्यटकांना भावते. जिवाचा गोवा करण्यासाठी जाताना पर्यटक या ‘मँगो’मध्ये आदरातिथ्याचा आवर्जून घेतात. मुंबई-पुणे येथील पर्यटकांबरोबर देशी-विदेशीतील पर्यटकांना सर्व सेवा-सुविधा मँगोमध्ये आहेत.
मांसाहारासाठी चिकन मँगोस्पेशल ही थाळी प्रसिद्ध आहे. १२ रुपयांच्या रोटीपासून पनीर चीज पराठा मिळतोच, शिवाय फ्राय पापलेट, बांगडा व प्रॉन्झ ही तर मँगोची खासियत आहे.
सावंतवाडी हे ऐतिहासिक शहर आहे. येथील लाकडी खेळण्यांना देश-विदेशात मागणी आहे. देश-विदेशातील पर्यटकांना सिंधुदुर्गात पर्यायाने सावंतवाडी शहरात त्यांना साजेशी पर्यटन सुविधा देण्याचा प्रयत्न करू.
- महेश कुमठेकर व्यवस्थापकीय संचालक, मँगो ग्रुप
सौजन्य - हरिश्चंद्र पवार, फुलोरा सामना १९१०१३

विविध महत्त्वाच्या समित्या व आयोग-

- राम प्रधान समिती - मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती 
- किरीट पारीख समिती - पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नियुक्त केलेली समिती
- अभिजित सेन समिती - देशातील अन्नधान्य किमतीवर वायदे बाजाराचा कितपत परिणाम होतो हे तपासण्यासाठी नेमण्यात आली. 
- डॉ. यु. म. पठाण समिती - महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात संत साहित्याच्या समावेशाकरिता नेमण्यात आलेली समिती 
- माधवराव चितळे समिती - मुंबईतील पूरस्थितीवर अभ्यास करण्याकरिता 
- डॉ. अभय बंग - राज्यातील कुपोषित बालमृत्यू मूल्यमापन करण्याकरिता 
- न्या. राजेंद्र सच्चर आयोग - मुस्लीम समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीच्या मागासलेपणाची कारणे शोधण्यासाठी 
- रघुनाथ माशेलकर समिती - बनावट औषधांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुचविणे 
- शरद पवार समिती - शीतपेयातील हानिकारक घटक शोधण्यासाठी 
- इंद्रजित गुप्ता समिती - निवडणुकीतील भ्रष्टाचार शोधण्यासाठी 
- अरुण बोंगिरवार समिती - केंद्रीय नागरी सेवेत महाराष्ट्रीय तरुणांचे प्रमाण वाढविण्याकरिता 
- कुरूदीपसिंह आयोग - लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याकरिता 
- डॉ. नरेंद्र जाधव समिती - विदर्भातील शेतक्रयांच्या आत्महत्या रोखण्याकरिता व कारणे, उपाययोजना शोधण्याकरिता 
- आर. के. राघवन समिती - शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंगचे प्रकरण रोखण्याकरिता 
- न्या. नानावटी आयोग - गोध्रा हत्याकांड (गुजरात) चौकशी करण्याकरिता

सौजन्य - फुलोरा सामना १९१०१३

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयाचे लोकार्पण

जोगेश्‍वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले. सोबत भाजप लोकसभा उपनेते गोपीनाथ मुंडे, रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, महापौर सुनील प्रभू, आमदार रवींद्र वायकर, पालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर, उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख अधीक्षिका सीमा मलिक आदी मान्यवर.
मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) - कॉंग्रेस आघाडीने महाराष्ट्राला बकाल करून असुविधेच्या ‘ट्रॉमा’मध्ये ढकलले आहे. शिवसेना, भाजप आणि रिपाइं महायुतीची सत्ता आल्यावर मुंबईसह महाराष्ट्राला या असुविधेच्या ‘ट्रॉमा’तून बाहेर काढू, असा जबरदस्त विश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.
जोगेश्‍वरी येथील पालिकेच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर मनपा रुग्णालया’चे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सुनील प्रभू होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची जबरदस्त पिसे काढली.
उद्धव ठाकरे म्हणाले, सत्ताधार्‍यांनी महाराष्ट्राला असुविधेच्या गर्तेत ढकलले आहे. आपली सत्ता आल्यावर महाराष्ट्रात सर्व सुविधा देऊ. आपल्या राज्याला स्वच्छ आणि सुंदर करू.
बाळासाहेबांच्या स्वप्नातली मुंबईमुंबईकरांना जास्तीत जास्त सुविधा मिळतील. त्यांना मुंबईबाहेर जावे लागणार नाही आणि कुणालाही हेवा वाटेल अशी मुंबई निर्माण करू. अगदी बाळासाहेबांच्या स्वप्नातली मुंबई निर्माण करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
...तर ‘आदर्श नंबर-२’ उभी राहिली असतीशिवसेनाप्रमुखांचे मुंबईवर विशेष प्रेम होते. शिवसेनेकडे पालिकेची सत्ता नसती तर या रुग्णालयाच्या जागेवर ‘आदर्श नंबर-टू’ उभी राहिली असती, असा टोला लगावतानाच शिवसेनाप्रमुखांनी जनतेचे नेहमीच ऋण मानले. त्यामुळेच हे रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी निर्माण होऊ शकले, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आता भोगतोययावेळी मुंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. युतीची सत्ता होती तेव्हा पुन्हा युतीचीच सत्ता येईल म्हणून आम्हीच सहा महिने सत्ता कमी केली. हा निर्णय घेतला तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले, संपूर्ण सत्ता भोगा. आम्ही ऐकले नाही. आता भोगतोय अशी कबुलीही मुंडे यांनी दिली.
हा अपघात नाहीआम्ही एकत्र आलो. हा अपघात नाही. अनेकांना वाटते आमच्यात अपघात व्हावा. पण अपघात होणार नाही. कारण आम्ही एकत्र बसून गाडी चालवतो, असे रामदास आठवले यांनी सांगताच एकच खसखस पिकली.
मुंबईकरांना काटा टोचला तर वेदना बाळासाहेबांना होत मुंबईचे शांघाय करू नका. मुंबईला मुंबईच राहू द्या. मुंबई पुढे जाईल असे सांगणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईवर विशेष प्रेम होते. युतीची सत्ता असताना वर्तमानपत्रांची कात्रणे पाठवून ते आम्हाला कामाला लावायचे. मुंबईकरांना काटा टोचला तर वेदना बाळासाहेबांना व्हायच्या. मुंबईकरांवर एवढे प्रेम करणारा नेता मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही, अशा शब्दांत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी जागवल्या त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
भांडुपला रुग्णालय द्या!पश्‍चिम उपनगरात अद्ययावत रुग्णालय दिले. आता पूर्व उपनगरात भांडुप येथे यापेक्षाही सरस रुग्णालय द्या, तसे वचनच द्या, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांना दिल्या.
ट्रॉमा आणि शिवसेनाप्रमुखभाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी ट्रॉमा आणि शिवसेनाप्रमुखांचा संबंध कसा आहे हे सांगितले. त्यासाठी त्यांनी ‘ट्रॉमा’ची व्याख्या केली. ट्रॉमा म्हणजे भावनात्मक जखम (ऍन इमोशनल होल्ड). शिवसेनाप्रमुखांच्या निधनाने सुद्धा भावनात्मक जखम निर्माण झाली आहे. त्यांच्या नावाने निर्माण झालेल्या या रुग्णालयाच्या माध्यमातून या जखमेवर ओलावा देण्याचे काम होईल. 
याप्रसंगी शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, उपमहापौर मोहन मिठबावकर, पालिका सभागृहनेते यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब, विनोद घोसाळकर, गटनेते दिलीप पटेल, बेस्ट समिती अध्यक्ष संजय (नाना) आंबोले, नगरसेविका गीता गवळी, श्रद्धा जाधव, शुभा राऊळ, किशोरी पेडणेकर, उज्ज्वला मोडक, प्रमोद सावंत, राम बारोट, कृष्णा पारकर, साब रेड्डी बोरा, रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे आदी मान्यवरांसह शिवसेना-भाजपचे सर्व नगरसेवक, समिती अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले.
- एटीएम फुटणार नाही, तुटणार नाहीभाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी एटीएम (आठवले, ठाकरे, मुंडे) तुटणार नाही, फुटणार नाही. एकत्रच राहणार. कोणी काहीही केले तरी आम्ही तिघे एकत्रच राहू, अशी जोरदार घोषणा देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
सरकारवर विश्‍वासच नाहीमुंबईत साथीच्या आजाराने थैमान घातले म्हणून मी स्वत: रुग्णालयांना भेट दिली. पालिकेची रुग्णालये रुग्णांनी भरून गेली होती. तेव्हा पालिकेवर टीका झाली होती. पण नंतर सरकारी रुग्णालयाची पाहणी केली असता शासनाची रुग्णालये सामसूम होती. रुग्ण नव्हते. यावरून जनतेचा पालिकेवर विश्‍वास आहे, सरकारवर अजिबात विश्‍वास नसल्याचेच स्पष्ट होते अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी लगावली.
मुलुंड-कांजूरला ट्रॉमा केअरहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामुळे जोगेश्‍वरी परिसरातील १५ लाख लोकांना उपचार घेता येणार आहे. त्यांची ससेहोलपट थंाबणार आहे असे सांगतानाच मुलुंड-कांजूर येथे ट्रॉमा केअर रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा महापौर सुनील प्रभू यांनी केली, तर जोगेश्‍वरी विधानसभेतील सहा विभागांतील लोकोपयोगी प्रकल्पांना शिवसेनाप्रमुखांचे नाव देणार असल्याचे आमदार रवींद्र वायकर यांनी स्पष्ट केले. येथील मंडईला आणि आदिवासी मुलांच्या वेरावली शाळेलासुद्धा शिवसेनाप्रमुखांचे नाव देणार असल्याचे वायकर म्हणाले.

सौजन्य - सामना २२१०१३

Sunday, October 06, 2013

श्री पार्वती मां की आरती

जय पार्वती माता, मैया जय पार्वती माता,
ब्रह्म सनातन देवी, शुभ फल की दाता ।
ॐ जय ……

अरिकुल पद्म विनासनि, जय सेवक त्राता,
जग जीवन जगदंबा, हरिहर गुण गाता ।
ॐ जय ……


सिंह को वाहन साजे, कुण्डल है साथा,
देव वधू जहं गावत, नृत्य करत ता था ।
ॐ जय ……


सतयुग शील सुसुंदर, नाम सति कहलाता,
हेमांचल घर जन्मी, सखियन रंगराता ।
ॐ जय ……


शुंभ निशुंभ विदारे, हेमांचल स्याता,
सहस भुजा तनु धरिके, चक्र लियो हाथा ।
ॐ जय ……


सृष्टि रूप तू ही जननी, शिव संग रंगराता,
नंदी भृंगी बीन लही, सारा मदमाता ।
ॐ जय ……


देवन अरज करत हम, चित को लाता,
गावत दे दे ताली, मन में रंगराता ।
ॐ जय ……


श्री प्रताप आरती मैया की, जो कोई गाता,
सदा सुखी नित रहता, सुख संपति पाता ।
ॐ जय ……

सणासुदीला घ्यावयाचे उखाणे



कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
..... आहेत माझे पूर्व संचित 

लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
.... च्या जीवावर कर्ते मी मजा. 

सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा,
..... चे नाव घेऊन घेते मी रजा. 

नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोऴी,
.....नी आणली माझ्याकरिता कटकीची चोऴी

वारुळाला जाऊन मी नागाची पुजा करते,
..... चे नाव घेऊन सौभाग्याचे आशिर्वाद मागते. 

अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या
एकरुपतेने बनत असतो संसार,
..... चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार. 

धरतीताईने आकाशाला राखी बांधुनी जोडीले बंधुत्वाचे नाते,
..... च्या सोबत मी अमरप्रेमगीत गाते 

भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा,
..... चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा.
  


*****चैत्रागौरी*****


१) गौरीपुढे लावली  समईची जोडी
    .......च्या नावाची मला आहे गोडी!!!!!
२) गौरीपुढे वाजते सनई
     ....चे नाव घ्यायला मला वाटते नवलाई!!!!!
३) गौरीपुढे मांडली कुलस्वामिनीची तसबीर
     ....चे नाव घ्यायला मी नेहमी अधीर!!!!
४) गौरीची आरास सर्वांना पसंत
     ....चे नाव घेते ऋतू आहे वसंत!!!!!
५) गौरीच्या पुढे केसर-अत्तराचे सडे
     ...चे नाव घ्यायला मी सर्वांच्या पुढे!!!!!
६) गौरीच्या पुढे तबकात ठेवले केसरी पेढे
    ....चे नाव घ्यायला मी नाही घेत आढेवेढे!!!!!
७) गौरीपुढे ठेवल्या फुलांच्या राशी
     ....चे नाव घेते हळदीकुंकवाच्या दिवशी!!!!!
८) गौरीला लावते वाळ्याचे अत्तर
    ....चे नाव घ्यायला मी सदैव तत्पर!!!!!
९) गौरीच्या डोला-याला सोन्याचा कळस
    ....चे नाव घ्यायला मला नाही आळस!!!!!
१०)गौरीच्या पुढं मांडलं फराळाचं ताटं
     ....राव माझी बघतात वाट!!!!!

Saturday, October 05, 2013

मालवणी तिखला

    हॉटेल अतिथी बांबूचा (खानावळ) मालवणी माशांचा तिखला

मालवणी भाषेची अविट गोडी आणि जोडीला मालवणी जेवणाचा फक्कड बेत असेल तर खवय्यांना यापेक्षा वेगळा भोजनानंद नाही. कॉन्टीनेंटल, चायनीज, मोगलाई, ईटालीयन अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आज मालवणी जेवणाची आगळीवेगळी ओळख मालवणमधील संजय गावडे यांच्या हॉटेल अतिथी बांबूने (खानावळ) आपली आगळी-वेगळी शैली निर्माण केली आहे. त्यामुळे मालवणास येणारे पर्यटक हॉटेल अतिथी बांबूला (खानावळ) भेट देण्यावाचून जात नाहीत.
मालवण माघी गणेश चौकापासून अवघ्या १०० मीटरवर कचेरी रोडवर हॉटेल अतिथी बांबू खवय्यांचा प्रदीप्त झालेला जठराग्नी थंड करण्यासाठी मालवणी मच्छी जेवण असो वा वडेसागोती, मोरीमटण, विविध चमचमीत खुमासदार पदार्थांचा आस्वाद घेऊन सर्वजण तृप्त होतात. हॉटेल अतिथी बांबूच्या (खानावळ) मालवण बांगड्याच्या तिखल्याची चवच न्यारी, शिवाय पापलेट, सरंगा, सुरमई, कोळंबी, तारले, कर्लीचेही कालवण येणा-यांच्या पसंतीस उतरते. याबरोबर खास नारळाच्या रसात बनविलेली सोलकढीचा फक्कड बेत त्यामुळे मालवणी जेवणाला खुमासदार उपमाही दिलेल्या आहेत.
आचार्य प्र. के. अत्रे यांनी तर गेल्या दहा हजार वर्षात अशी सोलकढी झाली नाही असा शिक्कामोर्तबही केला, याची प्रचिती हॉटेल अतिथी बांबूमध्ये आल्याशिवाय राहत नाही.
याबाबत बोलताना हॉटेल अतिथी बांबूचे मालक संजय गावडे म्हणाले सर्वप्रथम मी हॉटेल चैतन्यमध्ये जवळजवळ १४ वर्षे कुक म्हणून काम केले. यानंतर ग्रीनपार्क मालक बबन तिनईकर यांनी तु स्वत: का करत नाही हा व्यवसाय. यातून मला प्रेरणाही मिळाली आणि हा व्यवसाय सुरु करताना कोकणी माणसाची वृत्तीही आड आली. यातूनही मी मात करीत आज स्वत:च्या जागेत तब्बल २५०० स्क्वे. फूटावर हे हॉटेल उभारले असून जेवणासाठी येणारा प्रत्येक माणूस जाताना समाधानाने जावा हेच मी स्वामी समर्थांच्या कृपेने जपलं आहे. याच माध्यमातून जनसेवा म्हणजेच ईश्वरसेवा होते. आज मालवणात पर्यटन हंगामात माशांच्या थाळीचे दर गगनाला भिडलेले असताना मात्र अतिथी बांबूमध्ये वर्षाच्या बारामहिने दर सर्वसामान्यालाही परवडतील असे असतात. सुरमई १९० रु., पापलेट २७० रु. बांगडा, मोरीमटण १००-१५०-२०० रु., शाकाहारी ६० रु. असे आहे आणि विशेष म्हणजे संजय गावडे हे सर्व पदार्थ स्वत: बनवितात. तर मग येताय ना, मालवणला मालवणी तिखल्याची चव पाहायला !

Thanks :- - संदीप गोलतकर, fulora, saamana, 051013 

आंतरराष्ट्रीय करार व संमेलने

- डिसेंबर २००९ मध्ये पर्यावरण बदलासंबंधी बारा दिवसांचे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन. डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे आयोजित केले होते.
- नोव्हेंबर २००९ मध्ये हिंदुस्थान व कॅनडा या दोन देशांदरम्यान ऐतिहासिक परमाणू करार झाला. 
- २७ ऑक्टो. २००९ रोजी हिंदुस्थान व नेपाळ देशांदरम्यान व्यापार करार झाला.
- अर्जेटिना हा सातवा देश आहे की हिंदुस्थानने आंतरिक्ष सहकार्य करार केला.
- ४ ते ६ मार्च २०१० रोजी दुबई येथे पार पडलेल्या दुसर्‍या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर तर स्वागताध्यक्ष धनंजय दातार होते. 
- पुणे येथे होणार्‍या ८३ व्या अखिल हिंदुस्थानी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भी. कुलकर्णी यांची निवड
- पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन २००९ मध्ये सॅनहोजे अमेरिका येथे डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनाचे घोषवाक्य होते, ‘विश्वासी जडावे अवघे मराठी विश्व.
- हिंदुस्थान सरकारने राष्ट्रीय गंगा खोरे विकास प्राधिकरणाच्या बैठकीत ‘डॉल्फिन’ या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित केले.

Thanks :- Fulora, Saamana 051013

नवरात्रोत्सव

नवरात्रोत्सव

नऊ दिवस चालणारा हिंदूंचा उत्सव. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस दुर्गा देवीचा उत्सव असतो.
त्यास शारदीय नवरात्र असे म्हणतात. राम, कृष्ण, दत्त, खंडोबा इ. देवतांचेही नवरात्र-उत्सव
असतात; परंतु देवीच्या शारदीय नवरात्राचा उत्सव भारताच्या बहुतेक सर्व भागांत रूढ आहे.

महाराष्ट्रात चातुर्मासाला खुपच महत्व आहे. आषाढ महिन्याचे पंधरा दिवस, श्रावण, भाद्रपद,
आश्विन हे तीन पूर्ण आणि कार्तिक चे पंधरा दिवस असा चार्तुमास असतो. साधारण आश्विन
महिन्यात पावसाळा संपत आलेला असतो. पावसाळ्याच्या ओसरत्या सरी, निसर्गासौंदर्याची
उधळण पाहण्यास नेत्रसुखद वाटते. सगळीकडे उत्साही, आनंदी वातावरण असते. सणासुदीचे
दिवस असतात. या प्रसन्न वातावरणांत नवरात्राचे थाटात स्वागत केले जाते.नवरात्रोत्सव
म्हणजेच शारदोत्सव, शारदेचा उत्सव. शक्तीचें हे एक रुप आहे. शरद ऋतूंत तिचा उत्सव
साजरा करतात, म्हणुन तिला शारदा देवी, किंवा शारदोत्सव असे म्हणतात.नवरात्रीचे नऊ
दिवस हे शक्तीदेवीचा कालखंड म्हणून ओळखले जातात. आश्विन शुद्धप्रतिपदे पासून ते आश्विन
शुद्ध नवमी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो, हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून याला
नवरात्रोत्सव असे ही म्हटले जाते. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडाची
रेणुकामाता ही पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तीपीठ आहे. ही सर्व पीठे वेगवेगळ्या देवींची
जरी असली, तरी त्यातील मूळ शक्ती एकच आहे. असे म्हणतात कि, जेथे देवीला शेंदूर असेल ते
देवीचे रुप पार्वतीचे व जेथे कुंकू असेल त्या रुपाला लक्ष्मीचे रुप समजावे.

प्रतिपदेस देवळात किंवा घरी घटस्थापना केली जाते. घटस्थापना म्हणजे नऊ दिवस देवांची पुजा
देवांना देव्हा-यातून बाहेर न काढता करणे. प्रत्येक घरी काही वेगवेगळया पद्धती असतात.
घटस्था पनेला घरी सवाष्ण जेवायला बोलावतात. काही घरांमध्ये कुमारिकेला देवीचे प्रतिक मानून
तिची पुजा करून तिला जेवायला वाढतात. नऊ दिवस सप्तशतीचा पाठ वाचला जातो. नऊ दिवस
नंदादीप तेवत असतो. काही घरात फक्त तिळाच्या तेलाचाच दिवा लावतात. रोज एक माळ देवाच्या
डोक्यावरबांधली जाते. त्यामध्ये देखील तिळाच्या फुलांच्या माळेला अधिक महत्व आहे, अशा
एकूण नऊ माळा बांधल्या जातात. काही घरांमध्ये देवा शेजारी धान्याची पेरणी करतात. त्या
धान्याला अंकुर येतात. ते दस-याच्या दिवशी टोपीत किंवा पागोट्यात घालतात. नवरात्राचा
उत्सव हा एक कुलाचारही असल्याने त्यामध्ये विविधता दिसून येते. देवीच्या देवळातून सार्वजनिक
रीतीने हा उत्सव केला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना करतात. लहानशा मातीच्या ढिगावर
गहू पेरून त्यावर मातीचा घट ठेवतात. घटावर देवीची स्थापना करतात. कित्येक ठिकाणी
घटावर तांत्रिक यंत्राचीही स्थापना करतात. नऊ दिवस देवीची पूजा करतात. रोज माळ बांधणे,
कुमारीचे पूजन करणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे, ब्राह्मण-सुवासिनींना
भोजन घालणे इ. विविध आचार वेगवेगळ्या कुळांत पाळले जातात.

दुर्गा देवीने वेगवेगळे अवतार घेऊन शुंभ-निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांशी नऊ दिवस
युद्ध केले व त्यांचा वध केला. म्हणून हा नवरात्राचा उत्सव केला जातो. विजयादशमी हा
तिच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नवरात्रोत्सवातील अष्टमी ही महाअष्टमी
किंवा दुर्गाष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी दुर्गेची महालक्ष्मीस्वरूपात पूजा करतात. महालक्ष्मी,
महाकाली आणि महा सरस्वती ही दुर्गेची तीन महत्त्वाची रूपे आहेत. नवरात्रोत्सवाची समाप्ती नवव्या
दिवशी किंवा दहाव्या दिवशी करतात. कित्येक ठिकाणी भाद्रपद वद्य अष्टमीपासूनही या उत्सवास
सुरुवात होते.हा सण नऊ दिवस आदिशक्त्तीची आराधना करण्याचा आहे. घटामध्ये नंदादीप
प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदि शक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना
किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा
आदिशक्तीचे अखंड तेवणाऱ्या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव
साजरा करणे.

नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित
ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपांसहित भ्रमण करणे, म्हणजेच
दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणाऱ्या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे.हे
नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसेच आदिशक्तीच्या मारक व
चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते. या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व दुर्गादेवीच्या
शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्म शक्तींवर हल्ला करत असते, अशी कल्पना आहे.याचे
प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादीप यांना प्रतीकात्मक रूपात पूजले जाते. घटात दीपाच्या उष्णतेमुळे
निर्माण झालेले वातावरण हे ब्रह्मांडात नऊ दिवस अहोरात्र सुरू असलेल्या युद्धातून निर्माण झालेल्या
तप्त वायुमंडलाशी साधर्म्य दर्शवते, तर दीप हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून निर्माण होणाऱ्या तेजाचे
प्रतीक म्हणून कार्य करतो.अशी धार्मिक श्रद्धा आहे.

नवव्या दिवशी होम होतो. होमात कोहळा अर्पण करतात व शेवटच्या दिवशी होमहवन होऊन
याचे उत्थापन व विसर्जन विजयादशमीला होते. विजयादशमीला म्हणजेच दास-याला
आपट्याच्या पानांची पुजा करून ह्या उत्सवाची सांगता होते. अश्या पद्धतीने नवरात्रोत्सव
आपल्याकडे साजरा केला जातो.

Thanks :- http://shaileshchakatta.blogspot.in/2013/10/blog-post_4.html