नवरात्रोत्सव
नऊ दिवस चालणारा हिंदूंचा उत्सव. आश्विन
शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस दुर्गा देवीचा उत्सव असतो.
त्यास शारदीय नवरात्र असे म्हणतात.
राम, कृष्ण, दत्त, खंडोबा इ. देवतांचेही नवरात्र-उत्सव
असतात; परंतु देवीच्या शारदीय नवरात्राचा
उत्सव भारताच्या बहुतेक सर्व भागांत रूढ आहे.
महाराष्ट्रात चातुर्मासाला खुपच महत्व
आहे. आषाढ महिन्याचे पंधरा दिवस, श्रावण, भाद्रपद,
आश्विन हे तीन पूर्ण आणि कार्तिक चे
पंधरा दिवस असा चार्तुमास असतो. साधारण आश्विन
महिन्यात पावसाळा संपत आलेला असतो.
पावसाळ्याच्या ओसरत्या सरी, निसर्गासौंदर्याची
उधळण पाहण्यास नेत्रसुखद वाटते. सगळीकडे
उत्साही, आनंदी वातावरण असते. सणासुदीचे
दिवस असतात. या प्रसन्न वातावरणांत
नवरात्राचे थाटात स्वागत केले जाते.नवरात्रोत्सव
म्हणजेच शारदोत्सव, शारदेचा उत्सव.
शक्तीचें हे एक रुप आहे. शरद ऋतूंत तिचा उत्सव
साजरा करतात, म्हणुन तिला शारदा देवी,
किंवा शारदोत्सव असे म्हणतात.नवरात्रीचे नऊ
दिवस हे शक्तीदेवीचा कालखंड म्हणून
ओळखले जातात. आश्विन शुद्धप्रतिपदे पासून ते आश्विन
शुद्ध नवमी पर्यंत हा उत्सव साजरा
केला जातो, हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून याला
नवरात्रोत्सव असे ही म्हटले जाते.
तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडाची
रेणुकामाता ही पूर्ण तर वणीची सप्तशृंगी
हे अर्धे शक्तीपीठ आहे. ही सर्व पीठे वेगवेगळ्या देवींची
जरी असली, तरी त्यातील मूळ शक्ती एकच
आहे. असे म्हणतात कि, जेथे देवीला शेंदूर असेल ते
देवीचे रुप पार्वतीचे व जेथे कुंकू
असेल त्या रुपाला लक्ष्मीचे रुप समजावे.
प्रतिपदेस देवळात किंवा घरी घटस्थापना
केली जाते. घटस्थापना म्हणजे नऊ दिवस देवांची पुजा
देवांना देव्हा-यातून बाहेर न काढता
करणे. प्रत्येक घरी काही वेगवेगळया पद्धती असतात.
घटस्था पनेला घरी सवाष्ण जेवायला बोलावतात.
काही घरांमध्ये कुमारिकेला देवीचे प्रतिक मानून
तिची पुजा करून तिला जेवायला वाढतात.
नऊ दिवस सप्तशतीचा पाठ वाचला जातो. नऊ दिवस
नंदादीप तेवत असतो. काही घरात फक्त
तिळाच्या तेलाचाच दिवा लावतात. रोज एक माळ देवाच्या
डोक्यावरबांधली जाते. त्यामध्ये देखील
तिळाच्या फुलांच्या माळेला अधिक महत्व आहे, अशा
एकूण नऊ माळा बांधल्या जातात. काही
घरांमध्ये देवा शेजारी धान्याची पेरणी करतात. त्या
धान्याला अंकुर येतात. ते दस-याच्या
दिवशी टोपीत किंवा पागोट्यात घालतात. नवरात्राचा
उत्सव हा एक कुलाचारही असल्याने त्यामध्ये
विविधता दिसून येते. देवीच्या देवळातून सार्वजनिक
रीतीने हा उत्सव केला जातो. पहिल्या
दिवशी घटस्थापना करतात. लहानशा मातीच्या ढिगावर
गहू पेरून त्यावर मातीचा घट ठेवतात.
घटावर देवीची स्थापना करतात. कित्येक ठिकाणी
घटावर तांत्रिक यंत्राचीही स्थापना
करतात. नऊ दिवस देवीची पूजा करतात. रोज माळ बांधणे,
कुमारीचे पूजन करणे, अखंड दीप लावणे,
उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे, ब्राह्मण-सुवासिनींना
भोजन घालणे इ. विविध आचार वेगवेगळ्या
कुळांत पाळले जातात.
दुर्गा देवीने वेगवेगळे अवतार घेऊन
शुंभ-निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांशी नऊ दिवस
युद्ध केले व त्यांचा वध केला. म्हणून
हा नवरात्राचा उत्सव केला जातो. विजयादशमी हा
तिच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा
करण्यात येतो. नवरात्रोत्सवातील अष्टमी ही महाअष्टमी
किंवा दुर्गाष्टमी म्हणून प्रसिद्ध
आहे. या दिवशी दुर्गेची महालक्ष्मीस्वरूपात पूजा करतात. महालक्ष्मी,
महाकाली आणि महा सरस्वती ही दुर्गेची
तीन महत्त्वाची रूपे आहेत. नवरात्रोत्सवाची समाप्ती नवव्या
दिवशी किंवा दहाव्या दिवशी करतात.
कित्येक ठिकाणी भाद्रपद वद्य अष्टमीपासूनही या उत्सवास
सुरुवात होते.हा सण नऊ दिवस आदिशक्त्तीची
आराधना करण्याचा आहे. घटामध्ये नंदादीप
प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदि
शक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना
किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात
मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा
आदिशक्तीचे अखंड तेवणाऱ्या नंदादीपाच्या
माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव
साजरा करणे.
नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी
तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित
ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे.
आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपांसहित भ्रमण करणे, म्हणजेच
दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून
पृथ्वीवर येणाऱ्या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे.हे
नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी
प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसेच आदिशक्तीच्या मारक व
चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते.
या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व दुर्गादेवीच्या
शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने
सूक्ष्म शक्तींवर हल्ला करत असते, अशी कल्पना आहे.याचे
प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादीप
यांना प्रतीकात्मक रूपात पूजले जाते. घटात दीपाच्या उष्णतेमुळे
निर्माण झालेले वातावरण हे ब्रह्मांडात
नऊ दिवस अहोरात्र सुरू असलेल्या युद्धातून निर्माण झालेल्या
तप्त वायुमंडलाशी साधर्म्य दर्शवते,
तर दीप हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून निर्माण होणाऱ्या तेजाचे
प्रतीक म्हणून कार्य करतो.अशी धार्मिक
श्रद्धा आहे.
नवव्या दिवशी होम होतो. होमात कोहळा
अर्पण करतात व शेवटच्या दिवशी होमहवन होऊन
याचे उत्थापन व विसर्जन विजयादशमीला
होते. विजयादशमीला म्हणजेच दास-याला
आपट्याच्या पानांची पुजा करून ह्या
उत्सवाची सांगता होते. अश्या पद्धतीने नवरात्रोत्सव
आपल्याकडे साजरा केला जातो.
Thanks :-
http://shaileshchakatta.blogspot.in/2013/10/blog-post_4.html
No comments:
Post a Comment