जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले. सोबत भाजप लोकसभा उपनेते गोपीनाथ मुंडे, रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, महापौर सुनील प्रभू, आमदार रवींद्र वायकर, पालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर, उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख अधीक्षिका सीमा मलिक आदी मान्यवर.
मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) - कॉंग्रेस आघाडीने महाराष्ट्राला बकाल करून असुविधेच्या ‘ट्रॉमा’मध्ये ढकलले आहे. शिवसेना, भाजप आणि रिपाइं महायुतीची सत्ता आल्यावर मुंबईसह महाराष्ट्राला या असुविधेच्या ‘ट्रॉमा’तून बाहेर काढू, असा जबरदस्त विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.
जोगेश्वरी येथील पालिकेच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर मनपा रुग्णालया’चे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सुनील प्रभू होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची जबरदस्त पिसे काढली.
उद्धव ठाकरे म्हणाले, सत्ताधार्यांनी महाराष्ट्राला असुविधेच्या गर्तेत ढकलले आहे. आपली सत्ता आल्यावर महाराष्ट्रात सर्व सुविधा देऊ. आपल्या राज्याला स्वच्छ आणि सुंदर करू.
बाळासाहेबांच्या स्वप्नातली मुंबईमुंबईकरांना जास्तीत जास्त सुविधा मिळतील. त्यांना मुंबईबाहेर जावे लागणार नाही आणि कुणालाही हेवा वाटेल अशी मुंबई निर्माण करू. अगदी बाळासाहेबांच्या स्वप्नातली मुंबई निर्माण करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
...तर ‘आदर्श नंबर-२’ उभी राहिली असतीशिवसेनाप्रमुखांचे मुंबईवर विशेष प्रेम होते. शिवसेनेकडे पालिकेची सत्ता नसती तर या रुग्णालयाच्या जागेवर ‘आदर्श नंबर-टू’ उभी राहिली असती, असा टोला लगावतानाच शिवसेनाप्रमुखांनी जनतेचे नेहमीच ऋण मानले. त्यामुळेच हे रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी निर्माण होऊ शकले, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आता भोगतोययावेळी मुंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. युतीची सत्ता होती तेव्हा पुन्हा युतीचीच सत्ता येईल म्हणून आम्हीच सहा महिने सत्ता कमी केली. हा निर्णय घेतला तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले, संपूर्ण सत्ता भोगा. आम्ही ऐकले नाही. आता भोगतोय अशी कबुलीही मुंडे यांनी दिली.
हा अपघात नाहीआम्ही एकत्र आलो. हा अपघात नाही. अनेकांना वाटते आमच्यात अपघात व्हावा. पण अपघात होणार नाही. कारण आम्ही एकत्र बसून गाडी चालवतो, असे रामदास आठवले यांनी सांगताच एकच खसखस पिकली.
मुंबईकरांना काटा टोचला तर वेदना बाळासाहेबांना होत मुंबईचे शांघाय करू नका. मुंबईला मुंबईच राहू द्या. मुंबई पुढे जाईल असे सांगणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईवर विशेष प्रेम होते. युतीची सत्ता असताना वर्तमानपत्रांची कात्रणे पाठवून ते आम्हाला कामाला लावायचे. मुंबईकरांना काटा टोचला तर वेदना बाळासाहेबांना व्हायच्या. मुंबईकरांवर एवढे प्रेम करणारा नेता मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही, अशा शब्दांत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी जागवल्या त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
भांडुपला रुग्णालय द्या!पश्चिम उपनगरात अद्ययावत रुग्णालय दिले. आता पूर्व उपनगरात भांडुप येथे यापेक्षाही सरस रुग्णालय द्या, तसे वचनच द्या, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांना दिल्या.
ट्रॉमा आणि शिवसेनाप्रमुखभाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी ट्रॉमा आणि शिवसेनाप्रमुखांचा संबंध कसा आहे हे सांगितले. त्यासाठी त्यांनी ‘ट्रॉमा’ची व्याख्या केली. ट्रॉमा म्हणजे भावनात्मक जखम (ऍन इमोशनल होल्ड). शिवसेनाप्रमुखांच्या निधनाने सुद्धा भावनात्मक जखम निर्माण झाली आहे. त्यांच्या नावाने निर्माण झालेल्या या रुग्णालयाच्या माध्यमातून या जखमेवर ओलावा देण्याचे काम होईल.
याप्रसंगी शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, उपमहापौर मोहन मिठबावकर, पालिका सभागृहनेते यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब, विनोद घोसाळकर, गटनेते दिलीप पटेल, बेस्ट समिती अध्यक्ष संजय (नाना) आंबोले, नगरसेविका गीता गवळी, श्रद्धा जाधव, शुभा राऊळ, किशोरी पेडणेकर, उज्ज्वला मोडक, प्रमोद सावंत, राम बारोट, कृष्णा पारकर, साब रेड्डी बोरा, रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे आदी मान्यवरांसह शिवसेना-भाजपचे सर्व नगरसेवक, समिती अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले.
- एटीएम फुटणार नाही, तुटणार नाहीभाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी एटीएम (आठवले, ठाकरे, मुंडे) तुटणार नाही, फुटणार नाही. एकत्रच राहणार. कोणी काहीही केले तरी आम्ही तिघे एकत्रच राहू, अशी जोरदार घोषणा देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
सरकारवर विश्वासच नाहीमुंबईत साथीच्या आजाराने थैमान घातले म्हणून मी स्वत: रुग्णालयांना भेट दिली. पालिकेची रुग्णालये रुग्णांनी भरून गेली होती. तेव्हा पालिकेवर टीका झाली होती. पण नंतर सरकारी रुग्णालयाची पाहणी केली असता शासनाची रुग्णालये सामसूम होती. रुग्ण नव्हते. यावरून जनतेचा पालिकेवर विश्वास आहे, सरकारवर अजिबात विश्वास नसल्याचेच स्पष्ट होते अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी लगावली.
मुलुंड-कांजूरला ट्रॉमा केअरहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामुळे जोगेश्वरी परिसरातील १५ लाख लोकांना उपचार घेता येणार आहे. त्यांची ससेहोलपट थंाबणार आहे असे सांगतानाच मुलुंड-कांजूर येथे ट्रॉमा केअर रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा महापौर सुनील प्रभू यांनी केली, तर जोगेश्वरी विधानसभेतील सहा विभागांतील लोकोपयोगी प्रकल्पांना शिवसेनाप्रमुखांचे नाव देणार असल्याचे आमदार रवींद्र वायकर यांनी स्पष्ट केले. येथील मंडईला आणि आदिवासी मुलांच्या वेरावली शाळेलासुद्धा शिवसेनाप्रमुखांचे नाव देणार असल्याचे वायकर म्हणाले.

सौजन्य - सामना २२१०१३
No comments:
Post a Comment