Tuesday, October 22, 2013

ए—सॅटर्न

शनीचे आतापर्यंत ६२ चंद्र सापडले आहेत. त्यांची नावे टायटन, एन्केलेडस, टेलेस्टो अशी आहेत. ही वैशिष्ट्यपूर्ण नावे त्यांना कोण देतो? एखादा नवीन चंद्र सापडला तर त्याला प्रथम एक तात्पुरते नाव दिले जाते. त्यात तो कोणत्या ग्रहाचा चंद्र आहे, सापडण्याचे वर्ष आणि त्या वर्षातील शोध क्रमांक उदा. शनीचा चंद्र असल्यास ए/२००५-ए१, ए/२००५-ए२ याप्रमाणे नावे दिली जातात. यातील पहिला ए—सॅटर्न म्हणून तर दुसरा ए सॅटेलाईट म्हणून वापरला गेला आहे. एकदा का त्या चंद्राची कक्षा निश्चित झाली की इंटरनॅशनल अस्ट्रोनोमिकल युनियन या संघटनेकडे त्याचे बारसे करण्याचे काम सोपवले जाते. साधारणपणे ही नावे ग्रीक किंवा रोमन पुराणातून घेतली जातात.
- योगेश नगरदेवळेकर
सौजन्य - फुलोरा सामना १९१०१३

No comments: