आपण जेव्हा कधी गुंतवणुकीची
चर्चा करत असतो, तेव्हा एक गोष्ट आपल्या सहज लक्षात आली असेल कि बर्याचश्या लोकांची गुंतवणूक हि एक किंवा दोन अश्या
विशिष्ट क्षेत्रातच असते. तर आज आपण आपल्या बचत खात्याव्यातिरिक्त व प्रोपर्टी या क्षेत्राव्यतिरिक्त
असलेल्या रु १,००० ची गुंतवणूक इतर गुंतवणुकीच्या
क्षेत्रात कशी करावी याबद्दल जाणून घेऊया.
१. शेयर्स
- इथे शेयर्स म्हणजे मुंबई स्टोक एक्स्चेंज व नशनल स्टोक एक्स्चेंज (BSE व NSE) इथे
व्यवहार होत असलेले विविध कंपन्यांचे शेयर्स. इथे तस बघितलं तर शेयर्स व्यावसायिक हे
छोट्या अवधीसाठी गुंतवणूक करीत असतात. पण गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून जर आपल्याला गुंतवणूक
करायची असेल तर आपण मोठ्या अवधीसाठी गुंतवणूक करणे आवश्यक असते. आता कोणत्या शेयर्स
मध्ये गुंतवणूक करायची याचे बेसिक ज्ञान तरी आपणास असले पाहिजे. कारण शेयर्स मधील गुंतवणूक
हि जोखीम ची गुंतवणूक मानली जाते. यासाठी आपण आपल्या शेयर ब्रोकर चा सल्ला घेण्याबरोबरच
आपण ज्या कंपनीच्या शेयर्स मध्ये गुंतवणूक करणार आहोत किंवा केली आहे त्या बद्दल येत
असलेली वर्तमान पत्रातील माहिती व बिजनेस न्यूज चनेल वरील माहिती वर पण लक्ष ठेवले
पाहिजे. जर आपली गुंतवणूक योग्य कंपनीच्या शेयर्स मध्ये असेल तर त्यातून मिळणारा परतावा
हा देखील इतर गुंतवणुकीच्या क्षेत्रापेक्षा उत्तम असतो. आजही अशी उदाहरण पाहायला मिळतात
कि ज्यांनी मोठ्या अवधीसाठी चांगल्या शेयर्स मध्ये गुंतवणूक केली होती त्यांना मिळालेला
परतावा हा देखील कितीतरी पटीने मोठा आहे . उदा. ज्या गुंतवणूक दारांनी आयशर मोटर ह्या
कंपनीचे शेयर्स २७ वर्षांपूर्वी रु १२/- ला घेतले होते त्याचा भाव रु ३९००/- वर आहे,,,
तर वोखहार्ट ह्या कंपनीचा शेयर एका वर्ष पूर्वी रु २१००/- वर होता तो आज वाईट बातम्यांमुळे
रु ४५०/- वर आहे .
तर अस आहे "शेयर्स"
हे गुंतवणुकीच क्षेत्र. त्यामुळे ह्या क्षेत्रात ३०% गुंतवणूकच करावी.
तर आता आपण पाहूया सुरक्षित
गुंतवणुकीची क्षेत्रे.
२. रिकरिंग डिपोजिट-(आर. डी.
) :- रीकरिंग म्हणजे परत परत केली जाणारी गुंतवणूक. हि गुंतवणूक दर दिवसाची
किंवा दर महिन्याची सुद्धा असू शकते. अर्थात बँकेतील आर. डी.व्याज दर हा फिक्सड डिपोजिट
प्रमाणेच असतो. बँकेतील आर. डी. हा कमीत कमी
सहा महिन्यासाठीठेवावा लागतो. हे क्षेत्र पण आपल्या बचत खात्याप्रमाणेच काम
करत. आपण ह्या क्षेत्रात आपल्या इतर खर्चानबरोबरच सतत बचत करू शकतो. त्यामुळे ह्या
क्षेत्रात १०% गुंतवणूक ठेवण्यास काहीच हरकत नाही. आपल्यापैकी बरेच जन आर डी हा एख्याद्या
पतसंस्थेत किंवा सहकारी सोसायटी किंवा इतर कोणत्याही आर्थिक संस्थेत ठेवतात, तेव्हा हे बघण पण आवश्यक आहे कि
ती संस्था आरबीआय (RBI) किंवा सेबी (SEBI) किंवा तत्सम रेगुलेटरी ऑथोरिटी बरोबर रजीस्टार
आहे. पोस्ट ऑफिस पण आर डी ची सुविधा देत.
३. एफ डी बँक्स कुमुलेटीव
:- एफ डी म्हणजे फिक्सड डेपोजीट किंवा मुदत ठेव. नावावरुनच तुमच्या
लक्षात येईल कि ठेव किंवा गुंतवणूक हि एका विशिष्ट कालावधी साठी करावी लागते. कुमुलेटीव
म्हणजे व्याज पण मुद्दलीत जमा होऊन त्यावर व्याज मिळून जमा झालेली रक्कम.
उदा. समजा तुम्ही रु.
१००००/- जर ९% दराने ५ वर्षांसाठी ठेवले तर तुम्हाला मचुरीटी (एफ डी बंद होणाऱ्या)
दिवशी रु १५,५६७/- मिळतील.
त्यामुळे ह्या गुंतवणूक
क्षेत्रात १०% गुंतवणूक करण्यास काहीच हरकत नाही.
४.
एफ डी बँक्स नॉन-कुमुलेटीव :- एफ डी म्हणजे फिक्सड
डेपोजीट किंवा मुदत ठेव. नावावरुनच तुमच्या लक्षात येईल कि ठेव किंवा गुंतवणूक हि एका
विशिष्ट कालावधी साठी करावी लागते. नॉन- कुमुलेटीव म्हणजे एफ डी बंद होणार्या दिवशी
सुद्धा आपली मुद्दल तशीच परत मिळते, मात्र त्यावरील व्याज हे आपल्या बचत खात्यात दर
महिना / त्रैमासिक / सहा महिन्यांनी जमा होते.
उदा. समजा तुम्ही रु.
१००००/- जर ८ % दराने ५ वर्षांसाठी ठेवले तर तुम्हाला मचुरीटी (एफ डी बंद होणाऱ्या)
दिवशी रु १०,०००/- च मिळतील. मात्र जर तुम्ही दरमहा हे ऑप्शन घेतले असेल तर रु ६६/- दरमहा तुमच्या बचत खात्यात व्याज रूपाने ५ वर्षांपर्यंत
जमा होत राहतील.
त्यामुळे हे क्षेत्र देखील
१०% गुंतवणूक करण्यास योग्य आहे.
५. एल. आय. सी., मेडिक्लेम
पोलिसिज वगैरे :- आपल्यापैकी सर्वच जणांचा
कल हा आपले पुढील आयुष्य सुरक्षित करण्याचा असतो म्हणजेच जीवन इंसुरड करण्यावर असतो
व त्यामुळेच आपण लाईफ इंसुरंस व तत्सम पोलिसिज मध्ये गुंतवणूक करत असतो . त्यामुळेच ह्या क्षेत्रात पण आपल्या एकूण गुंतवणूक
क्षमतेतील १०% गुंतवणूक ठेवण्यास काहीच हरकत नाही.
६. कंपनीचे बोन्ड्स डेबेण्चार
कुमुलेटीव :- लिमिटेड कंपनीज त्यांना लागणारे भांडवल हे लोकांकडून तीन प्रकारे
घेऊ शकतात - १. इक्विटी शेयर्स २. प्रेफेरंस शेयर्स ३. बोन्ड्स किंवा डेबेन्चार . ४.
फिक्सड डिपोजिट
बोन्ड्स किंवा डेबेन्चार
कुमुलेटीव किंवा जर फिक्सड डिपोजिट मध्ये व्याज हा ज्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची
आहे त्या दरम्यान मुद्दलीत जमा होऊन त्यावर पुन्हा व्याज जमा होते व एकूण रक्कम मचुरिटी
दिवशी मिळते.
७. कंपनीचे बोन्ड्स डेबेण्चार
नॉन कुमुलेटीव - ह्या गुंतवणूक क्षेत्रात
व्याज हे मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक पद्धतीने घेण्याची सुविधा असते.
८. एन. एस. सी., पी. पी. एफ.,
के. वि. पी. वगैरे - एन. एस. सी म्हणजे नशनल
सेविंग सर्टीफिकेट व के. वि. पी. म्हणजे किसान
विकास पत्र. हे दोन्ही गुंतवणुकीचे विकल्प पोस्ट ऑफिस (टपाल कार्यालय) द्वारे दिले
जातात. ह्या प्रकारात पण गुंतवणूक हि एका विशिष्ट कालावधी साठी करावी लागते. पी. पी.
एफ. म्हणजे पब्लिक प्रोविडेंट फंड . पी. पी. एफ. ची सुविधा हि पूर्वी फक्त एस बी आय
मधूनच दिली जात होती ती आता इतर बँकांमधून सुद्धा दिली जाते. ह्यातील गुंतवणूक हि पंधरा
वर्षांकरिता असते पण पाच वर्षानंतर जमा रकमेवर काही प्रमाणात कर्ज घेण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ह्या गुंतवणूक
क्षेत्रात पण १० % गुंतवणूक ठेवणे पण योग्य आहे . ह्या क्षेत्रात व्याज हे मुद्दलीतच जमा होण्याचा विकल्प आहे .
९. म्युच्युअल फंड
- हा एक गुंतवणूकीचा पर्याय आहे ज्याचा वापर
करून भारतीय गुंतवणूकदार कर बचत, संपत्ती निर्माण करणे, नियमित उत्पन्न मिळवणे, इ.
उदिष्टे साध्य करू शकतो संपत्ती निर्माण करणेसाठी समभाग निगडीत योजना, ज्यात शेअर बाजाराची
जोखिम अंतर्भुत असते व कर्जरोखे निगडीत योजना ज्यात व्याज दराचे बदलाची व पतदर्जाची
जोखिम अंतर्भुत असते. समभाग निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या जास्त जोखिम असते
व कर्जरोख्याशी निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी जोखिम असते. ह्या क्षेत्रात
४% पर्यंत गुंतवणूक ठेवू शकता.
१०. सोने फिजिकल किंवा ईटिएफ
- भारतीयांमध्ये सोन्याबद्दल विशेष आकर्षण आहे. प्रत्येक सणासुदीला भारतीयांकडून सोन्याची
जोरदार खरेदी केली जाते. सोने अलंकार म्हणून ठेवण्यात काहीच हरकत नाही पण जेव्हा आपण
तेच सोने बाजारात विक्री साठी नेतो तेव्हा आपल्याला बाजार भावापेक्षा कमी किंमत मिळते हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. सोने जर आपण
फिजिकल स्वरुपात ठेवले तर ते चोरी होण्याची शक्यता असते . तेच आपण ईटीएफ स्वरुपात डीमट
ख्यातात सुरक्षित ठेवू शकतो. त्यामुळे ह्या क्षेत्रात ५% गुंतवणूक ठीक आहे .
११. चांदी - भारतीयांना चांदी घेण्यामध्ये पण विशेष रस आहे.
पण चांदी मध्ये पण अलंकार म्हणून गुंतवणूक ठीक आहे. गेल्या एका वर्षात जरी चांदीच्या
किंमती मध्ये रु सुमारे ३०००० ते ६५००० असा चढ-उतार झाला असला तरी ह्यात ३% गुंतवणूक करणे ठीक आहे.
वरील चर्चिलेल्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये प्रत्येक जन आपल्या गरजेनुसार चढ
उतार करू शकतो.
Copy rights Reserved –Marathi
Shyear Bajar
No comments:
Post a Comment