Monday, June 03, 2019

महानगर गॅस पाईप कनेक्शन

महानगरचा पाईप लाईन गॅस कनेक्शन (पी एन जी) अगदी बिल्डिंग जवळ आले आहे. म्हणूनच, म्हटलं थोडं बघूया काय प्रोसिजर आहे ते. ग्राहक तीन प्रकारच्या कॅटेगोरीत ऑनलाईन अर्ज भरू शकतात.⛽

१. ज्या बिल्डिंग मध्ये पाईप गॅस अगोदर पासून आहे.

2. ज्या बिल्डिंग मध्ये पाईप गॅस नाही आहेत ते. (ह्या बाबतीत सोसायटी एन ओ सी पण आवश्यक आहे).

३. ज्या बिल्डिंग च्या जवळून पाईप गॅस काँनेक्शन गेले आहेत ते.

अर्जा सोबत रु. ६६३५/- भरणे आवश्यक आहे. त्यातील रु. ५७५०/- रिफंडबल आहेत. हा ब्रेक अप दाखवणारा चार्ट सोबत जोडला आहे.

अर्ज सादर केल्यावर महानगर गॅस चे ऑफिसर्स व्हिजिट करतात व काँनेकशन देणे फिजिबल आहे का ते स्टडी करतात. जर काँनेक्शन देणे शक्य नसेल तर रु. ६६३५/- ऑनलाईन मार्फत पूर्णतः रिफंड केले जातात.






आता थोडा महानगर गॅस च्या डोमेस्टिक बिलिंग चा अंदाज घेऊ या. महानगर गॅस हा एस सी एम (SCM) ह्या परिमाणात मोजला जातो. ह्यांचे बिलिंग सायकल दोन महिन्याचे (६१ दिवसांचे) आहे.
आपल्या कडे जो लाल डब्बा सिलेंडर येतो त्याला एल पी जी म्हणतात. तो जवळ जवळ १५ किलो चा असतो. म्हणजे, दोन महिन्याला आपल्याला ३० किलोग्राम  सिलेंडर लागतो, ५ व्यक्तींच्या कुटुंबासाठी.
म्हणजे, १ एस सी एम = ०.७६ किलोग्रॅम.
म्हणजे, दोन महिन्यात ३० किलोग्राम = २२ एस सी एम.
महानगर गॅस ची बिलिइंग पद्धत हि इनकम टॅक्स सारखी प्रतिस्लॅब प्रमाणे आहे.
१. पहिल्या ३६.६० एस सी एम करिता रेट रु. २१.९६/- आहे.
२. पुढील ५४.९० एस सी एम करिता रेट रु. २६.०१/-  आहे.
३. त्या पुढील एस सी एम करिता रेट रु. ३३.३६/- आहे.
म्हणजे, ह्या स्लॅब नुसार आपले २२ एस सी एम चे बिल म्हणजे ६१ दिवसांचे बिल २२ * रु. २१.९६ = रु. ४८३/- + जीएसटी येणार. 🧾
समजा, जर कुणी ९९ एस सी एम गॅस वापरला तर त्याचे बिल रु. २४७५/- + जीएसटी येणार. कसे, ते दर्शविणारा तक्ता सोबत जोडला आहे.















आता, ह्यात एक बाब नोंद घेण्यासारखी आहे, ती म्हणजे, इलेक्ट्रिक मीटर प्रमाणे गॅस मीटर असणार. त्यामुळे, मीटर किती जोरात धावेल ते आपल्याला समजणार नाही. अर्थात, बिलिंग दृष्ट्या सुटसुटीत वाटत असले तरी बदलापूर ग्राहकांना कसा अनुभव येतो ते पाहावे लागेल. आणि, मग च निर्णय घेणे उचित ठरेल. 🤔

धन्यवाद. एका ग्राहकाने केलेले निरीक्षण. 🧐


महानगर गॅस बद्दल इंग्लिश मधील संपूर्ण माहिती साठी https://www.mahanagargas.com/ ह्या वेबसाईट ला भेट द्या.