Saturday, March 21, 2020

चांगल्या सवयी. Good Habits.

मानवी स्वभावच असा आहे कि, त्याला एखादी चांगली गोष्ट सांगितली तरी, त्याचा अहं त्याला ती गोष्ट सहज स्वीकारण्यापासून परावृत्त करत असतो. पण, जेव्हा एखादी इमर्जन्सी, किंवा एखादी घटना घडते तेव्हा त्या चांगल्या गोष्टी मानव स्वीकारायला सुरुवात करतो. आणि, हेच चांगल्या सवयींबाबत देखील घडते.

आता, कोरोना संकट पासून वाचण्यापासून ह्याच चांगल्या गोष्टींचे महत्व अधोरेखित होत आहे.

१. हात साबणाने स्वछ धुवा.
२. शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल किंवा टीसु पेपर धरा.

आता, चेहऱ्याला वारंवार हात न लावणे हे तरी चष्मा असणार्याना प्रॅक्टिकली शक्य नाही. तरी, पण एक ग्राहक व वापरकर्ता (यूजर) म्हणून काही गोष्टी आम्ही स्वतःहून वर्षानुवर्षे करत आहोत. एक नागरिक म्हणून, आम्ही त्या तुमच्या बरोबर शेयर करत आहोत. ह्यात, कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करणे हा उद्देश नाही. तसेच, सुचवलेली औषधें हि तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

१. रोज सकाळी आंघोळीच्या एक बालदी कोमट पाण्यात फक्त दोन थेंब निलगिरी तेल टाका. ह्याचा वास खूप तीव्र आहे. जो न्हाणी घरात दरवळतो. त्यामुळे, न्हाणी घरात कोरोना ला आळा बसू शकतो. ह्या पाण्याने अंघोळ केल्यावर आपल्या शरीराला निलगिरी चा वास येत नाही. तसेच, शरीरावर असणाऱ्या जंतूंचा नायनाट होण्यास पण मदत होते. घरात गोमूत्र शिंपडावे.

२. घरातील जमीन पुसताना एका बादलीत एक चमचा डेटॉल टाकावे. त्यामुळे, जमिनीवर असणारे जीवजंतूं कमी होण्यास मदत होते.

३. घरात पाच वर्षांवरील लहान मुले असतील तर, पतंजली कफ सिरप ची बाटली कायम घरात ठेवावी. तसेच, सर्वानी रोज आवळा सिरप व कोरफडीचा एक चमचा रस रोज प्यावा. त्याने शरीराची प्रतिकार शक्ती कायम राहण्यास मदत होते.

४. कधी हलका ताप वाटला तर घरात नेहमी सिप्ला कंपनीची "निसिप प्लस" Nicip Plus हि गोळी ठेवावी. मात्र, एक एक गोळी सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी घेऊनही ताप उतरत नसेल तर थेट डॉक्टर कडे जावे.

५. ज्यांच्यामध्ये पूर्व आजार किंवा पूर्वी डेंगू झाला असेल किंवा ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी दर रविवारी एक चमचा पपई च्या पानाचा रस प्यावा. घरातील सर्व मंडळी पण घेऊ शकतात. हा रस शरीरातील लाल पेशी वाढविण्यास मदत करतो.

६. संध्याकाळी घरात दिवेलागणीच्या वेळी, प्रत्येक खोली मध्ये कापूर, धूप लावावे. जेणेकरून, घरातील वातावरण शांत व प्रसन्न राहते. तसेच, सांज कीटकांना घरात घुसण्या पासून मज्जाव होतो.

७. रात्री झोपताना उघडे असणाऱ्या शरीरास ओडोमॉस क्रीम लावून झोपावे. कृपया, चेहऱ्यास लावू नये.

८. रात्री झोपताना घराच्या सर्व कोपऱ्यात, मोठ्या वस्तू कपाट वगैरे च्या मागे, पलंगाखाली बेगॉन स्प्रे करावे. आणि चिंतामुक्त झोपी जावे.


वरील प्रमाणे, दैनंदिनी अनुसरण केल्यावर देखील जर एखाद्या असाध्य रोगाची लक्षणे किंवा, सर्दी ताप खोकला झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा. आपण वापरत असलेल्या उत्पादनांची, औषधांची  अंतिम तारीख सतत बघावी.

Friday, February 28, 2020

प्रतीक्षा सूची प्रकार Type of Waiting List

सामान्य प्रवाशांना रेल्वे ची प्रतीक्षा सूची एकच वाटते। पण, त्यात वेगवेगळे प्रकार आहेत। (GNWL, RLWL वगैरे). आम्ही रोज एका संज्ञेबद्दल माहिती देऊ।📝
Common passengers of Rail feels that there is only one type of Wait list. But it has different types. (RLWL, TQWL) We will update on one concept everyday.  📝

प्रतीक्षा सूची प्रकार :-
Type of Waiting List :-

१. जनरल वेटिंग लिस्ट म्हणजे काय ?
जे प्रवासी ट्रेन ज्या मूळ स्थानकातून सुटणार आहे, किंवा त्याजवळील स्टेशन वरून चढण्याचे बुकिंग करतात, त्यांना जनरल वेटिंग लिस्ट तिकीट दिले जाते. हि प्रतीक्षा सूची सर्व सामान्यतः असते. आणि, ह्या प्रतीक्षा सूची मध्ये तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते.

1. What is GNWL?
General Waiting List (GNWL) waitlisted tickets are issued when the passenger begins his/her journey at the originating station of a route or stations close to the originating station. This is most common type of waiting list and has got the highest chances of confirmation.                    © APB

२. रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट म्हणजे काय ?
रिमोट लोकेशन प्रतीक्षा सूची म्हणजे मार्गावरील  मधल्या स्टेशन साठी दिले जाणारे तिकिटं। (सुरुवातीच्या व शेवटच्या स्थानक   व्यतिरिक्त), कारण ही त्या मार्गावरील खूप महत्त्वाची शहरे असतात। ह्या तिकिटना वेगळी प्राथमिकता दिली जाते। आणि, ह्याची कॉन्फिर्मेशन हे त्या मधल्या थांब्याला होणाऱ्या रद्दीकरणावर अवलंबून असते। रिमोट लोकेशन वरील स्थानके स्वतःचे चार्ट ट्रेन सुटणाच्या दोन तीन तास अगोदर बनवतात। अश्या प्रकारच्या प्रतीक्षा सुचितील तिकिटं नक्की होण्याची शक्यता खूप कमी असते।

2. What is RLWL?
Remote Location Waiting List (RLWL) means ticket is issued for intermediate stations (between the originating and terminating stations) because usually these are the most important towns or cities on that particular route. This type of tickets will be given a separate priority and confirmations will depend on the cancellations of a destination confirmed ticket. Remote location stations prepare there own chart 2-3 hours before the actual departure of train. For this type of ticket there are less chances of confirmation.
===========
उदा. मंगला एक्सप्रेस दिल्ली ते एर्नाकुलम धावते। पण, कल्याण ते कणकवली तिकिटांचा चार्ट हा कल्याण ला बनतो। 🚂
Eg. Mangla Express runs from Delhi to Ernakulam. But, the Chart of Kalyan - Kankavli is being prepared by the Kalyan station. 🚂

 ३. पुलिंग कोटा प्रतीक्षा सूची म्हणजे काय ?
ही सूची वेगवेगळ्या छोट्या स्थानकांकडून शेयर केली जाते। पूल कोटा हा सुरुवातीच्या स्थानकांकडून सुरू होतो व पूर्ण मार्गावर एकचं पूल कोटा असतो।
पूल कोटा हा सुरुवाती पासून मधल्या स्थानका पर्यंत किंवा मधल्या स्थानकापासून शेवटच्या स्थानका पर्यंत किंवा दोन मधल्या  स्थानकांसाठी असतो।

3. What is PQWL?
A Pooled Quota Waiting List (PQWL) is shared by several small stations. Pooled Quotas normally operate only from the originating station of a route, and there is only one Pooled Quota for the entire run. The Pooled Quota is generally allotted for passengers travelling from the originating station to a station short of the terminating station, or from an intermediate station to the terminating station, or between two intermediate stations.

४. रिमोट लोकेशन सामान्य प्रतीक्षा सूची म्हणजे काय ?

ही प्रतीक्षा सूची तिकिटं बुक केल्यावर त्या ग्राहकांना दिली जाते, जिथे प्रतीक्षा सूची प्रकार हा रिमोट लोकेशन प्रतीक्षा सूची असतो। ह्याचा अर्थ तिकिटं बुक केल्यावर रिमोट लोकेशन प्रतीक्षा सूची चे नाव आपोआप रिमोट लोकेशन सामान्य प्रतीक्षा सूची होते।

4. What is RLGN?
Remote Location General Waiting List (RLGN) is issued when a user books a ticket where WL quota is RLWL. This means after ticket booking RLWL gets named as RLGN.