Thursday, November 07, 2019

प्रधान मंत्री जन आरोग्य योजना PMJAY

प्रधान मंत्री जन आरोग्य योजना - 👨🏻‍⚕
अंतर्गत ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांना इ कार्ड देण्यात येत आहे. ज्यात रु. ५/- लाख पर्यंतचा आजारांचा खर्च सरकार करणार आहे. तर ते कोणते आजार ह्या योजनेखाली येतात त्याची हि यादी. जर कुणी हे मेडिकल शब्द मराठीत भाषांतरित करून सांगितले तर बरं होईल. 📎

PMJAY - 👩🏻‍⚕
Under this Scheme, the Senior Citizens in Rural Area are getting E-Card. The Hospitalisation Expenses upto Rs. 5/- Lakh for listed Diseases will be covered under this Scheme. The List of Diseases are given hereunder. If anyone can translate this List in Marathi, it will be useful for many people. 📎






प्रधान मंत्री जन आरोग्य योजना -
ह्या योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलची यादी पुढील प्रमाणे. तुमच्या  राज्यातील व जिल्ह्यातील हॉस्पिटल शोधण्यासाठी खालील लिंक वर टिचकी मारा. (पालघर जिल्ह्यातील हॉस्पिटल सध्या ठाणे जिल्ह्यातच दाखवत आहेत.     👨‍⚕


PMJAY -
The hospitals that are available in the Sindhudurg District are listed below. To search your hospital in your state and district, plese click on this link. The Hospitals in the Palghar Distrct are still listed under Thane District. 👩‍⚕ 

https://hospitals.pmjay.gov.in/Search/empnlWorkFlow.htm?actionFlag=ViewRegisteredHosptlsNew





सौजन्य - आयुष्मान भारत योजना

Tuesday, September 10, 2019

बजाज फिनसर्व चे पॉकेट इन्शुरन्स

बजाज फिनसर्व ने ग्राहकांच्या दैनंदिन उपयोगात येणाऱ्या सेवा, उत्पादने ह्यांचे  इन्शुरन्स दिले आहे. बघा, पूर्ण यादी.
१. चावी रिप्लेसमेंट इन्शुरन्स
२. वॉल्लेट काळजी
३. हॉस्पिटल कॅश कव्हर
४. डोळ्यांची काळजी 
५. रोड ट्रिप कव्हर
६. पर्स कव्हर
७. साहस कव्हर
८. ए टी एम चोरी
९. बॅकपॅकिंग ट्रॅव्हल कव्हर
१०. बॅगेज इन्शुरन्स
११. सी सी टी वि कॅमेरा कव्हर
१२. सायकल इन्शुरन्स
१३. दिल्ली मेट्रो इन्शुरन्स
१४. डेंगू कव्हर
१५. डिज़ाइनर कपडे इन्शुरन्स
१६. डोमेस्टिक हॉलिडे कव्हर
१७. डी एस एल आर कॅमेरा इन्शुरन्स
१८. इलेक्ट्रॉनिक स्टेशनरी इन्शुरन्स
१९. फायर क्रॅकर इन्शुरन्स
२०. फिटनेस वेअरअबल इन्शुरन्स
२१. फ्रॅडूलेन्ट  चार्जेस कव्हर
२२. ग्रुप जीवन सुरक्षा
२३. जिम इंज्युरी इन्शुरन्स
२४. हॅण्डहेल्ड इ रिडींग डेव्हिसेस इन्शुरन्स
२५. हेल्मेट इन्शुरन्स
२६. होम इन्व्हर्टर इन्शुरन्स
२७. होम प्रोटेक्शन कव्हर
२८. हनिमून हॉलिडे कव्हर
२९. आयडेंटिफाय थेफ्ट कव्हर
३०. इन्फेकशन कव्हर
३१. किडनी स्टोन इन्शुरन्स
३२. लॅपटॉप चार्जेर इन्शुरन्स
३३. लेह लडाख रोड ट्रिप कव्हर
३४. लक्जरी सॅनिटरी फिटटींग्स इन्शुरन्स
३५. मेनिंगोकॉकचाल मेनिंगटीस कव्हर
३६. मोबाईल चार्जेर इन्शुरन्स
३७. मोबाईल चार्जेर इन्शुरन्स
३८. मॉर्निंग वॉल्क अपघात इन्शुरन्स
३९. मुंबई मेट्रो इन्शुरन्स
४०. मुंबई पुणे गोवा रोड ट्रिप कव्हर
४१. मुंबई पुणे रोड ट्रिप कव्हर
४२. मुजिकल इन्स्ट्रुमेंट इन्शुरन्स
४३. पेन इन्शुरन्स
४४. पिलग्रिमेज   कव्हर
४५. प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन कव्हर
४६. प्राईस प्रोटेक्शन कव्हर
४७. पुणे गोवा रोड ट्रिप कव्हर
४८. पर्चेस प्रोटेक्शन कव्हर
४९. शूज इन्शुरन्स
५०. स्मॉल गॅजेट इन्शुरन्स
५१. सोलो ट्रॅव्हलर कव्हर
५२. स्पोर्ट फिटनेस इंज्युरी कव्हर
५३. स्टॅम्पएड  इन्शुरन्स
५४. ट्रेक कव्हर
५५. तुबेरकलोसिस  कव्हर
५६. वैष्णो देवी टेम्पल पिलग्रिमेज कव्हर
५७. वॉच इन्शुरन्स
५८. वॉटर प्युरीफिर इन्शुरन्स
५९. वॉटरबॉर्न डिसीज कव्हर
६०. वेडडींग ड्रेस इन्शुरन्स
६१. वीकएंड गेटवे रोड ट्रिप कव्हर
६२. विंटर ट्रेक कव्हर
६३. वायरलेस हेडफोन्स इन्शुरन्स
 अधिक माहितीसाठी, टर्म्स व कंडिशन साठी खालील लिंक वर क्लीक करा. ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध.
Bajaj Finserv has brought Pocket Insurance for the products and services that are being daily used by the Customers. For more info, click.
Pocket Insurance पॉकेट इन्शुरन्स

Thursday, August 08, 2019

जगप्रसिद्ध अगरबत्ती एका क्लिक वर !!

बाजारात तर भरपूर कंपन्यांच्या अगरबत्ती मिळतात। पण, वर्तमानपत्रात पण ज्या अगरबत्ती बद्दल लेख येतो व आरोमा थेरपी ने समृद्ध असलेली, ती एकमेव अगरबत्ती आहे, "राम भरोसे".
ह्या सणासुदीला आपले घर परिसर सुगंधाने प्रफुल्लित करण्यासाठी, आणि, तुमच्या सोयीनुसार व आवडणारा सुगंध थेट ऑनलाइन ऑर्डर देण्यासाठी, पेयमेंट करून घरपोच मिळण्यासाठी इथे टिचकी मारा
जगप्रसिद्ध "रामभरोसे" अगरबत्ती   ची किंमत ⤵
नवीन ग्राहकांनी अनुभव घेण्यासाठी
प्रति १०० ग्राम ₹ ८०/-
नाथ,
इथे क्लीक करा।
Nath 100 Grams

नियमित ग्राहकांनी दर दोन महिन्यांनी ऑर्डर करण्यासाठी।
प्रति २५० ग्राम १७५/-
नाथ,
इथे क्लीक करा।
Nath 250 Grams

नियमित ग्राहकांनी दर चार  महिन्यांनी ऑर्डर करण्यासाठी /
कॉम्बो १०० ग्राम चे ५ सुगंध ₹ ४००/- मध्ये ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा।
Combo 5 of 100 Grams

नियमित ग्राहकांनी दर सहा महिन्यांनी ऑर्डर करण्यासाठी /
कॉम्बो २५० ग्राम चे ५ सुगंध ₹ ८७५/- ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा।
Combo 5 of 250 Grams

तुम्ही स्वतः ऑनलाईन ऑर्डर व पेमेंट करू शकता। वरील लिंक मध्ये पूर्ण माहिती भरा।

किंवा आम्हाला गूगल पे किंवा बँक द्वारे पेयमेंट करा। आम्ही तुमची ऑर्डर थेट कंपनीकडून घरपोच करू।

ऑर्डर व पेयमेंट केल्यावर कृपया पिंग करावे । अधिक माहितीसाठी संपर्क व वॉट्सअप्प ७३८७२४९५२५.

Thursday, July 18, 2019

मुंबई लोकल ट्रेन प्रवासी विमा

Mumbai Local Train Passenger Insurance.

वाह ! मुंबई लोकल ट्रेन 🚄ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पण आरोग्य इन्शुरन्स उपलब्ध आहे. बजाज फिनसर्व ह्या कंपनीने हि सुविधा दिलेली आहे. ३६५ दिवसांसाठी चे रु. १,००,०००/- चे कव्हर फक्त रु. ३९९/- मध्ये. पोलिसी ची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :-
🔹१. जर ट्रेन अपघातात मृत्यू झाला तर रु. १,००,०००/- तुमच्या नॉमिनी ला मदत म्हणून मिळतील.
🔹२. जर ट्रेन अपघातात अपंगत्व आले, ज्यामुळे तुमचे उत्पन्न बुडत असेल तर रु. २०००/- प्रति आठवडा मिळतील.
🔹३. व्यक्ती ज्या १८ वर्षाखालील व ७० वर्षाच्या वरचे असतील त्यांना हि पोलिसी लागू नाही.
🔹४. मुंबई लोकल ट्रेन व्यतिरिक्त झालेल्या अपघातासाठी हि पोलिसी लागू नाही.
पोलिसी क्लेम करण्यासाठी खालील पैकी कोणत्याही एका पद्धतीने कॉन्टॅक्ट करू शकता. 

Wow ! Now Mumbai Local Train 🚄Travellers can avail the Health Insurance as Commuters in just Rs. 399/- for 365 days with the Cover of Rs. 1/- Lakh. The Bajaj Finserv has offered this insurance. The features are as follows :-

Although the local trains are considered the lifeline of commuters in Mumbai, there is always a higher risk of accidents, or any other unforeseen events. If you’re looking to protect yourself against such risks, get coverage with Mumbai Local Train Cover from Bajaj Finserv.

🔹1. In the event of your demise due to an accident on a Mumbai local train, your nominees get up to Rs. 1 lakh to help provide for them.
🔹2. In the event of disability due to injuries sustained on a Mumbai local train, you are covered against loss of income, for Rs. 2000 per week.
🔹3. Individuals below 18 years and above 70 years of age are not eligible.
🔹4. Any expenses incurred due to accidents other than while traveling on Mumbai local trains will not be covered.
You can lodge a claim under your Mumbai Local Train Insurance policy by contacting us through one of the following ways:

• E-mail – customercare@bajajallianz.co.in📩
• Toll free number - 1800-209-1021📱

For Online application, click here. 📝
https://www.bajajfinserv.in/pre-approved-mumbai-local-train-cover-application-form
====================
The above info is complied by
https://www.bajajfinserv.in/ 💻
ई-मेल - customercare@bajajallianz.co.in 📩
टोल फ्री क्र. - १८००-२०९-१०२१ 📱
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करावे. 📝
https://www.bajajfinserv.in/pre-approved-mumbai-local-train-cover-application-form 

====================
वरील माहिती हि एका प्रवाशाने सर्व प्रवाशांसाठी संकलित केली आहे. अधिक माहिती साठी कंपनी ची वेबसाईट आहे.
https://www.bajajfinserv.in/ 💻

Monday, July 15, 2019

एफ डी (फिक्स्ड डिपॉजिट) चैन अपडेट


आम्ही दिलेली एफ डी गुंतवणूक चैन एवढी प्रसिद्ध झाली कि, त्यामुळे खास करून ज्यांनी गृह कर्ज घेतले आहे, त्यांनी एफ डी चैन मोठ्या प्रमाणावर उपयोगात आणली. त्यांनी गृहकर्जाच्या इन्शुरन्स घेण्याऐवजी तीच रक्कम एफ डी मध्ये गुंतवायला सुरुवात केली.  व आता एफ डी मॅचुर झाल्यावर मिळणारी रक्कम गृहकर्ज फेडण्यास उपयोगात आणू लागले. ज्यामुळे, एकीकडे लोकांना एफ डी वर व्याज पण मिळाले, आणि त्या समोर गृहकर्जाच्या व्याजाचा भार पण कमी झाला. तर, दुसरीकडे आता गृहकर्ज कमी झाल्यामुळे गृहकर्जाची इ एम आय व मुदत देखील कमी होण्यास मदत होत आहे.

गुंतवणूक करण्यासाठीच्या लेखात आम्ही तुम्हाला एच डी एफ सी लिमिटेड व महिंद्रा फिनान्स ह्या दोन संस्थांबद्दल ज्या तेव्हा सर्वात जास्त व्याज दर देत होत्या, त्या बद्दल सांगितले होते. आता, एक अपडेट असा आहे कि, एच डी एफ सी लिमिटेड मध्ये ऑनलाईन काढलेल्या फिक्स्ड डिपॉजिट ची रक्कम मॅच्युरिटी तारखे दिवशी ऑटोमॅटिक क्रेडिट येत नाही, जशी आय डी बी आय मध्ये येते. त्यासाठी, तुम्हाला एच डी एफ सी मध्ये जाऊन एफ डी पावती व इतर पुरावे जमा करावे लागतात, मग त्याच दिवशी एफ डी रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होते.

ह्या उलट, महिंद्रा फिनान्स च्या ऑनलाईन एफ डी ची रक्कम मॅच्युरिटी तारखे दिवशी आपोआप आपल्या बँक खात्यात जमा होते. आणि, महिंद्रा फिनान्स चा सध्याचा व्याज दर हा सर्वात जास्त आहे.

आणि, महिंद्रा फिनान्स मध्ये रु. ५०००/- पासून पण गुंतवणुकीचे ओपशन आहेत. पण, रु. १००००/- ची गुंतवणूक ठेवणे बरे पडते. तीच, बजाज फिनान्स मध्ये किमान गुंतवणूक रक्कम रु. २५०००/- आहे. 

कदाचित, पूर्ण भारतात सर्व आर्थिक संस्थांमध्ये  ह्या एफ डी चैन मध्ये गुंतवणूक एवढी वाढली असेल कि, सरकारला होम लोन इन्शुरन्स ला उत्तेजना देण्यासाठी, आयकर कलमांखाली वजावट ह्या बजेट मध्ये द्यावी लागली असेल.

तेव्हा, सर्वाना उपयुक्त व सुरक्षित गुंतवणुकीचे माध्यम असलेली हि एफ डी चैन अनुसरायला काहीच हरकत नाही.
====================
वरील लेख हा स्व-अनुभवावर आधारित आहे. कृपया, कोणतेही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण विचार करावा. 

Monday, June 03, 2019

महानगर गॅस पाईप कनेक्शन

महानगरचा पाईप लाईन गॅस कनेक्शन (पी एन जी) अगदी बिल्डिंग जवळ आले आहे. म्हणूनच, म्हटलं थोडं बघूया काय प्रोसिजर आहे ते. ग्राहक तीन प्रकारच्या कॅटेगोरीत ऑनलाईन अर्ज भरू शकतात.⛽

१. ज्या बिल्डिंग मध्ये पाईप गॅस अगोदर पासून आहे.

2. ज्या बिल्डिंग मध्ये पाईप गॅस नाही आहेत ते. (ह्या बाबतीत सोसायटी एन ओ सी पण आवश्यक आहे).

३. ज्या बिल्डिंग च्या जवळून पाईप गॅस काँनेक्शन गेले आहेत ते.

अर्जा सोबत रु. ६६३५/- भरणे आवश्यक आहे. त्यातील रु. ५७५०/- रिफंडबल आहेत. हा ब्रेक अप दाखवणारा चार्ट सोबत जोडला आहे.

अर्ज सादर केल्यावर महानगर गॅस चे ऑफिसर्स व्हिजिट करतात व काँनेकशन देणे फिजिबल आहे का ते स्टडी करतात. जर काँनेक्शन देणे शक्य नसेल तर रु. ६६३५/- ऑनलाईन मार्फत पूर्णतः रिफंड केले जातात.






आता थोडा महानगर गॅस च्या डोमेस्टिक बिलिंग चा अंदाज घेऊ या. महानगर गॅस हा एस सी एम (SCM) ह्या परिमाणात मोजला जातो. ह्यांचे बिलिंग सायकल दोन महिन्याचे (६१ दिवसांचे) आहे.
आपल्या कडे जो लाल डब्बा सिलेंडर येतो त्याला एल पी जी म्हणतात. तो जवळ जवळ १५ किलो चा असतो. म्हणजे, दोन महिन्याला आपल्याला ३० किलोग्राम  सिलेंडर लागतो, ५ व्यक्तींच्या कुटुंबासाठी.
म्हणजे, १ एस सी एम = ०.७६ किलोग्रॅम.
म्हणजे, दोन महिन्यात ३० किलोग्राम = २२ एस सी एम.
महानगर गॅस ची बिलिइंग पद्धत हि इनकम टॅक्स सारखी प्रतिस्लॅब प्रमाणे आहे.
१. पहिल्या ३६.६० एस सी एम करिता रेट रु. २१.९६/- आहे.
२. पुढील ५४.९० एस सी एम करिता रेट रु. २६.०१/-  आहे.
३. त्या पुढील एस सी एम करिता रेट रु. ३३.३६/- आहे.
म्हणजे, ह्या स्लॅब नुसार आपले २२ एस सी एम चे बिल म्हणजे ६१ दिवसांचे बिल २२ * रु. २१.९६ = रु. ४८३/- + जीएसटी येणार. 🧾
समजा, जर कुणी ९९ एस सी एम गॅस वापरला तर त्याचे बिल रु. २४७५/- + जीएसटी येणार. कसे, ते दर्शविणारा तक्ता सोबत जोडला आहे.















आता, ह्यात एक बाब नोंद घेण्यासारखी आहे, ती म्हणजे, इलेक्ट्रिक मीटर प्रमाणे गॅस मीटर असणार. त्यामुळे, मीटर किती जोरात धावेल ते आपल्याला समजणार नाही. अर्थात, बिलिंग दृष्ट्या सुटसुटीत वाटत असले तरी बदलापूर ग्राहकांना कसा अनुभव येतो ते पाहावे लागेल. आणि, मग च निर्णय घेणे उचित ठरेल. 🤔

धन्यवाद. एका ग्राहकाने केलेले निरीक्षण. 🧐


महानगर गॅस बद्दल इंग्लिश मधील संपूर्ण माहिती साठी https://www.mahanagargas.com/ ह्या वेबसाईट ला भेट द्या.


Wednesday, May 22, 2019

ओनरशिप (स्वतः चा) फ्लॅट - एक शाप.



आताच काही दिवसांपूर्वी सोसायटी आवारात बसण्यासाठी बाकडी लावण्यात आलीत. सोसायटी ची परवानगी न घेता थेट अशी बाकडी लावणे म्हणजे अतिक्रमण नाही का ? असाच गैर व्यवहार कायदेशीर मार्गाने जलवंती अपार्टमेंट, नवीन शिंदे आली इथे करण्यात आला आहे. रजिस्ट्रेशन क्र. TNA/AMB/HSG/(TC)/24025/2012-13. सोसायटी ला दोन वर्षे चेअरमन नसल्यामुळे इमारती मधील घाटकोपरला राहण्याऱ्या नगर सेवकाला सहा महिन्यासाठी चेअर मन बनविण्यात आले होते. सदर माजी चेअरमन नि  बरोबर जेव्हा अंबरनाथ निवडणूक कार्यालय कडून सोसायटी ची निवडणूक घेतली जाते, त्या दरम्यान गेली १३ वर्षे बंद असलेले सोसायटी चे गॅरेज  बिल्डर च्या संगनमताने परस्पर विकले. सोसायटी २०१२ सालापासून रजिस्टर आहे. त्या नंतर हि गॅरेज चा व्यवहार  बिल्डर करू शकले नव्हते. कारण, माजी सेक्रेटरी एक हाती बिल्डर विरुद्ध लढत होते. बिल्डर जेव्हडे गिर्हाईक पाठवायचा तेवढ्या गिर्हाईक ना हाकलून लावायचे. पण सोसायटी मधील सर्व सदस्यांनी हि बाब गांभीर्याने घेतली नाही. गॅरेज विकत घेणारा बिजनेसमॅन आहे. म्हणजे, ह्या त्रिकुटाने (नगरसेवक, बिल्डर, बिजनेसमॅन) बरोबर वेळ साधत गॅरेज ला फ्लॅट दाखवून परस्पर रेजिस्ट्रेशन केले. सोसायटी ची एन ओ सी न घेता. 
त्या बिजनेसमॅन ने तर आता सोसायटी मेंबर वर (आजी चेअरमन, आजी खजिनदार, दोन मेंबर) दादागिरी करत वीज मीटर पण फिक्स केला आणि गॅरेज वापरायला पण सुरुवात केली. 
सोसायटी ने सदर मेंबर ला अजून शेयर सर्टिफिकेट दिलेलं नाही.  म्हणजे, आज हि पैश्याने सामर्थ्यवान व राजकीय शक्ती असणाऱ्यांची गुलामगिरी सामान्य मेंबर्स ना करावी लागत आहे. आता काही प्रश्न निर्माण होतात ते असे -

१. महारेरा नुसार फक्त नोंदणी कृत प्रोजेक्ट चा व्यवहार होऊ शकतो, मग अनोंदणीकृत गॅरेज चा व्यवहार रजिस्टर करण्याची बिल्डर ची हिम्मत कशी झाली ?

२. रेजिस्ट्रार काय फक्त स्टॅम्प ड्युटी पेयमेन्ट वर रेजिस्ट्रेशन करून देतात ? असे व्यवहार रजिस्टर करताना महारेरा सर्टिफिकेट ची मागणी का करत नाहीत. ?

३. एकदा रजिस्टर झालेले डोकमेण्ट रेजिस्ट्रार परत कॅन्सल करू शकत नाहीत, अशी म्हणे कायद्यात तरतूद आहे ? मग, रेजिस्ट्रार रेजिस्ट्रेशन करण्यापूर्वी सोसायटी एन ओ सी का मागत नाहीत ?

४. महावितरण (वीज विभाग) फक्त अग्रीमेंट वर वीज जोडणी कशी देऊ शकतात ? ते सोसायटी एन ओ सी ची मागणी का करत नाहीत ?

५. मुनिसिपालिटी टॅक्स विभाग फक्त अग्रीमेंट वर टॅक्स नाव कसे बदलू शकतात ? ते सोसायटी एन ओ सी ची मागणी का करत नाहीत ?

६. आता सर्व डेटा (माहिती) ऑनलाईन मध्ये उपलब्ध आहे. मग रेजिस्ट्रार, महावितरण, मुनिसिपालिटी पाच मिनिटे खर्च करून सदर सोसायटी रजिस्टर आहे कि नाही हे चेक करू शकत नाहीत का ?

७. माननीय सुप्रीम कोर्ट च्या एका निर्णयानुसार गॅरेज हे सध्या राहत असलेल्या मेंबर ना कॉमन फॅसिलिटी म्हणून वापरण्यासाठी असते. नुसते गॅरेज बिल्डर सेपरेट युनिट किंवा फ्लॅट दाखवून विकू शकत नाही. 2010 Judgement Nahalchand Laloochand Pvt. Ltd. v Panchali Co-operative Housing Society Ltd. (AIR 2010 SC 3607).
मग प्रश्न असा उभा राहतो कि काय महारेरा हे सुप्रीम कोर्ट पेक्षा मोठे आहे ? 

८. आणि हौसिंग फेडेरेशन चा तर स्वतंत्र कारभार आहे.

मेम्बर्सनी महावितरण कर्मचाऱ्यांना मीटर जोडण्यास मज्जाव केला तर त्यानेही दादागिरीत सांगितले, "आम्ही मीटर जोडणारच. नंतर तुम्ही तो फोडूही शकतात."  म्हणजे, जेणे करून सोसायटी मेंबर फौल्ट मध्ये येतील. हे असं सर्व वातावरण निर्माण झाले आहे. अर्धे मेंबर तर मुंबईत राहतात, त्यांनी फ्लॅट भाड्यावर देऊन ठेवले आहेत. त्यांना सोसायटी बद्दल काही देणेघेणे नाही. आणि इथे वास्तव्यास असणाऱ्या सरळ मार्गी मेंबर्स ना चीड येतेय, पण काही करू शकत नाहीत. एकूणच काय, आम्ही एक एक दिवस ह्या भीतीत घालवत आहोत, कि आमचा फ्लॅट परस्पर विकला जाऊ नये, नाहीतर आमच्यावर पण बेघर व्हायची वेळ येईल.  

सध्याचे खजिनदार ज्यांनी सर्वांतर्फे पुढाकार घेऊन विरोध केला होता, त्यांना मारण्यासाठी इमारतीच्या आजूबाजूस माणसे उभे ठेवण्याची तयारी त्या गॅरेज खरीददाराने केली होती, असे हल्लीच खजिनदारांच्या पत्नीकडून कळले. त्यामुळे, त्या खजिनदारानी पण इमारतीत येण्याचे जवळ जवळ बंद केले आहे. आता, ते परिवाराला घेऊन त्यांच्या सासऱ्यांच्या घरी राहत आहेत.

अर्थात, माझ्या मते खजिनदारांचे मत पण बरोबर आहे. त्यांचे म्हणणे आहे, "सेक्रेटरी बाहेर राहणार निवडला आहे. तो येत नाही, लक्ष देत नाही, मग मी कशाला सर्वांसाठी लढू". कारण, त्या गॅरेज वाल्याने जबरदस्ती ने वीज मीटर लावल्यावर, आजी खजिनदार, आजी चेयरमन, आणि काही सदस्यांनी एका लोकल नगरसेवकाचा सल्ला घेतला. त्यांनी, बदलापूर मुनिसिपालिटी, पोलीस स्टेशन व वीज मंडळाला ठराविक मथळा असलेले पत्रं सोसायटी तर्फे सबमिट करा असे सांगितले होते. त्या पद्धतीने मी पत्राचे फॉरमॅट बनवून आजी खजिनदाराना दिले.  आज १५/८/२०१९ आहे, त्या अनुषंगाने जी मागची सभा झाली, त्यात इथे राहणारे सोसायटी सदस्य त्या पत्रांवर सही करून वरील संस्थांना ती पत्रं वरील सबमिट करतील, असे अपेक्षित होते.
पण, त्या मीटिंग मध्ये माजी खजिनदाराने त्याच्या पत्नीला बोलवून माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली, "ह्याने, (म्हणजे मी) गॅरेज विकण्यात माझा (म्हणजे त्या खजिनदराचा) पण सहभाग आहे." आणि, मी असे बोललो हे प्रूफ करण्यासाठी त्या माजी खजिनदारांची पत्नी उपस्थित सदस्यांवर प्रेशर टाकत होती, मी वरील वाक्य बोललो म्हणून. त्या सर्व उपस्थित सदस्यांनी सांगितले, "संदिप तसा बोललेलं नाही." तर त्यांची पत्नी सदस्यांशी भांडायला लागली व मग आमची बाचाबाची सुरु झाली, तेव्हा माजी खजिनदाराच्या तोंडून त्यांच्या मनातील गोष्ट बाहेर पडली व त्यांनी मला धमकी दिली, "तू इथे राहतोस कसा, तेच बघतो." आणि, त्यांच्या पत्नीने खाली उतरताना आमच्या दारात धमकी दिली "घरात घुसून मारिन." मागे पण, एका वेगळ्या विषयावरून सदर महिलेने आम्हाला अशीच धमकी दिली आहे. आम्ही, आता पर्यंत ह्या धमक्यांना उत्तर दिलेले नाही.
तरी पण मी कळवळीने सांगत होतो,  ह्या लेटर्स वर विचार करा व सबमिट करूयात. तेव्हा माजी खजिनदाराने उद्धटपणे दुसऱ्यांदा मला सांगितले, "तू  मेंबर नाही, तुला काय करायचे आहे, मेंबर बघतील."
त्यामुळे, मग मला आजी सेक्रेटरी वर पण शंका आलीय, माझ्यावर आरोप होत असताना माझी बाजू मांडण्यासाठी मला बोलावले नव्हते, मोठं मोठे आवाज यायला लागले तेव्हा मी स्वतः वर मीटिंग मध्ये गेलो, तेव्हा वरील प्रकार घडला. आणि, मग त्या सेक्रेटरी ने मीटिंग कॅन्सल केली, त्यामुळे आम्हाला मिळालेली धमकी आम्ही सर्व मेंबर समोर मांडू शकलो नाही. तसेच, जी पत्रं सोसायटी तर्फे संस्थांना सबमिट करायची होती, तो विषय पण बाजूला राहिला.
आता तर तो गॅरेज खरेदीदार बिनधास्त झाला आहे, अधिकृत मेंबर बनवलेला नसताना पण त्याने डायरेक्ट गॅरेज भाड्यावर दिले आहे व दिवस रात्र वापरायला सुरुवात केली आहे.
माझे वडील (माजी सेक्रेटरी) पण त्यामुळे आता घाबरले आहेत. आणि, आम्ही सांगितलं, पोलिसात तक्रार करूयात, तर काहीच बोलले नाहीत. त्यामुळे, मी पण गप्प बसलो आहे, कारण, बिल्डर, घाटकोपरच नगरसेवक, तो बिजनेसमॅन हे आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या पॉवरफुल समजले जातात. आणि, ह्यांना मेंबर्स मधून कुणाकुणाचा छुपा सँपोर्ट आहे ते हि माहित नाही. त्यामुळे, आता आम्हाला आमचा स्वाभिमान बाजूला ठेवून घाबरून शांत पणे तणावाखाली राहावे लागत आहे.

 (वरील लेख हा घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे, त्यामुळे जर शक्य झाले तर आम्ही ह्या इमारतीत फ्लॅट घेतल्यापासूनच्या घटना पण जर मन झाले तर मांडू. आता मी खूप उद्विग्न आहे, कारण, कायदेशीर खोटे व लबाड वागणाऱ्या लोकांविरुद्ध लढ्याची हिम्मत आता पूर्वी प्रमाणे लोकांमध्ये राहिलेली नाही.)