Monday, July 15, 2019

एफ डी (फिक्स्ड डिपॉजिट) चैन अपडेट


आम्ही दिलेली एफ डी गुंतवणूक चैन एवढी प्रसिद्ध झाली कि, त्यामुळे खास करून ज्यांनी गृह कर्ज घेतले आहे, त्यांनी एफ डी चैन मोठ्या प्रमाणावर उपयोगात आणली. त्यांनी गृहकर्जाच्या इन्शुरन्स घेण्याऐवजी तीच रक्कम एफ डी मध्ये गुंतवायला सुरुवात केली.  व आता एफ डी मॅचुर झाल्यावर मिळणारी रक्कम गृहकर्ज फेडण्यास उपयोगात आणू लागले. ज्यामुळे, एकीकडे लोकांना एफ डी वर व्याज पण मिळाले, आणि त्या समोर गृहकर्जाच्या व्याजाचा भार पण कमी झाला. तर, दुसरीकडे आता गृहकर्ज कमी झाल्यामुळे गृहकर्जाची इ एम आय व मुदत देखील कमी होण्यास मदत होत आहे.

गुंतवणूक करण्यासाठीच्या लेखात आम्ही तुम्हाला एच डी एफ सी लिमिटेड व महिंद्रा फिनान्स ह्या दोन संस्थांबद्दल ज्या तेव्हा सर्वात जास्त व्याज दर देत होत्या, त्या बद्दल सांगितले होते. आता, एक अपडेट असा आहे कि, एच डी एफ सी लिमिटेड मध्ये ऑनलाईन काढलेल्या फिक्स्ड डिपॉजिट ची रक्कम मॅच्युरिटी तारखे दिवशी ऑटोमॅटिक क्रेडिट येत नाही, जशी आय डी बी आय मध्ये येते. त्यासाठी, तुम्हाला एच डी एफ सी मध्ये जाऊन एफ डी पावती व इतर पुरावे जमा करावे लागतात, मग त्याच दिवशी एफ डी रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होते.

ह्या उलट, महिंद्रा फिनान्स च्या ऑनलाईन एफ डी ची रक्कम मॅच्युरिटी तारखे दिवशी आपोआप आपल्या बँक खात्यात जमा होते. आणि, महिंद्रा फिनान्स चा सध्याचा व्याज दर हा सर्वात जास्त आहे.

आणि, महिंद्रा फिनान्स मध्ये रु. ५०००/- पासून पण गुंतवणुकीचे ओपशन आहेत. पण, रु. १००००/- ची गुंतवणूक ठेवणे बरे पडते. तीच, बजाज फिनान्स मध्ये किमान गुंतवणूक रक्कम रु. २५०००/- आहे. 

कदाचित, पूर्ण भारतात सर्व आर्थिक संस्थांमध्ये  ह्या एफ डी चैन मध्ये गुंतवणूक एवढी वाढली असेल कि, सरकारला होम लोन इन्शुरन्स ला उत्तेजना देण्यासाठी, आयकर कलमांखाली वजावट ह्या बजेट मध्ये द्यावी लागली असेल.

तेव्हा, सर्वाना उपयुक्त व सुरक्षित गुंतवणुकीचे माध्यम असलेली हि एफ डी चैन अनुसरायला काहीच हरकत नाही.
====================
वरील लेख हा स्व-अनुभवावर आधारित आहे. कृपया, कोणतेही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण विचार करावा. 

No comments: