Wednesday, March 07, 2012

माऊसची क्रांती

कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी मधली माऊस ही टेक्नॉलॉजी अभूतपूर्व ठरली. कीबोर्ड इतके माऊस हे अत्यावश्यक नसले तरी विण्डोजच्या जगात अतिशय उपयुक्त असे हे इनपूट उपकरण आहे. माऊसच्या टेक्नॉलॉजीत काळानुरूप प्रगती झाली आणि वायरलेस, ट्रॅकबॉल या माऊसची क्रांती झाली. म्हणूनच या भागात माऊसची क्रांती जाणून घेणार आहोत.


- माऊस ही दर्शक प्रणाली आहे. माऊसला साधारण तीन बटण असतात. हल्ली वापरात असलेल्या माऊसला दोन बटण आणि एक स्क्रोलींग असते.

- माऊस कॉम्प्युटरच्या मागच्या भागाला जोडले जाते. माऊस सीरिअल, यूएसबी तसेच वायरलेस पोर्टमध्येही उपलब्ध आहे.

- माऊसचा वापर कीबोर्डच्या जोडीला करता येतो. केवळ माऊसने काम होते असे नाही.

- डिझाइन, ग्राफिक्स किंवा चित्र काढण्यासाठी माऊसचा वापर केला जातो.

माऊसचे प्रकार

- मेकॅनिकल माऊस : या माऊसच्या खालच्या बाजूला एक छोट्या आकाराचा बॉल असतो. तो माऊससोबत फिरतो. याची वायर सीपीयु ला जोडलेली असते.

- ऑप्टिकल माऊस : या माऊसलाही एक छोट्या आकाराचा बॉल असतो. माऊसच्या बाहेर पडणारा प्रकाश माऊसच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.

- कॉर्डलेस माऊस : हा माऊस बॅटरीवर चालतो. सीपीयूसोबत हा माऊस वायरलेस पद्धतीने काम करतो.

माऊस नीट चालत नसेल तर

- माऊसच्या मागील बाजूस असलेला फ्लॅप काढून आतील रबरी बॉल स्वच्छ करून घ्या.

- रोलर फिरत नसेल तर माऊस बदलावा.

- माऊसचा पोर्ट चेक करावा. तो सीपीयूमध्ये नीट कनेक्ट झाला की नाही हे पाहावे.

- पीसी रिस्टार्ट करावा जेणेकरून काही तात्पुरता प्रॉब्लेम झाला असेल तर माऊस नीट चालेल.

सौजन्य:- फुलोरा, सामना ०३०३२०१२.

मुझे रंग दे

रंग खेळण्याचा दिवस म्हणजे कलरफुल सेलिब्रेशन. रंगांच्या अद्भुत जगाची बातच न्यारी. प्रत्येक रंगाचं स्वत:चं असं वैशिष्ट्य आहे आणि दुसर्‍या रंगात मिसळल्यानंतरही ते वैशिष्ट्य अबाधित राहतं. प्रत्येकाचं आयुष्य कलरफुल असतं, पण त्याकडे बघण्याची सौंदर्यदृष्टी हवी. धूलिवंदनाच्या निमित्ताने आपण रंगांत रंगून जातो. फुलोरा टीम तुमच्यासोबत ऍडव्हान्समध्ये रंग खेळणार आहे, अर्थात एका वेगळ्या स्टाइलने. आज आपण प्रत्येक रंगाशी दोस्ती करून त्याचं अंतरंग आणि जागतिक महत्त्व जाणून घेणार आहोत. काही निवडक रंगांना आम्ही कलरफुल पॅनलवर बसवलंय... बघा, तुमचा फेव्हरेट रंग त्यात सापडतोय का...


लाल


- रोमन साम्राज्यात लाल ध्वज हा युद्धाचं प्रतीक मानला जात होता - ठळक उठून दिसत असल्याने सिग्नलपासून ब्रेक लाइटपर्यंत सर्वत्र त्याचा वापर केला जातो

- आक्रमकतेचं प्रतीक म्हणून इजिप्शिअन्स पूर्वी स्वत:ला लाल रंगात रंगवून घ्यायचे - रशियामध्ये लाल रंग हे सौंदर्याचं चिन्ह आहे तर साऊथ आफ्रिकेत ते दु:खदर्शक आहे - हिंदुस्थानी सैनिकाचं प्रतीक दर्शवताना लाल रंग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो - नवीन गाडीला लाल बो बांधणं हे शुभ समजलं जातं - चीनमध्ये लाल रंग शुभ असून सुट्ट्या आणि विवाहदर्शक चिन्हे लाल रंगात असतात - ग्रीसमध्ये इस्टरसाठी शुभसंकेत म्हणून अंड्यांना लाल रंग दिला जातो - अनेक देशांच्या झेंड्यांमध्ये लाल रंग आढळतो

हिरवा

- प्राचीन इजिप्शिअन्स घर आणि मंदिरांना हिरव्या रंगाने रंगवत असत - ग्रीसमध्ये हिरव्या रंगाचा अर्थ विजय तर स्कॉटलण्डमध्ये आदराचं प्रतीक असा होतो - आयर्लंडचा हा राष्ट्रीय रंग आहे

- हिरवा रंग तारुण्यदर्शक आहे तसंच तो निसर्गाचा रंग असल्याने आरोग्यदायी आहे

गुलाबी

- सर्वाधिक स्त्रियांचा आवडता म्हणून प्रसिद्ध आहे

- जपानमध्ये मात्र हा रंग पुरुषांशी निगडित आहे

- प्रेम आणि आनंदाचं प्रतीक मानला जातो

- आत्मविश्वास वाढवणारा रंग अशीही ओळख आहे

निळा

- निळा रंग सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो - इराणमध्ये हा रंग दु:खाचं प्रतीक आहे - निळ्या रंगात रिलॅक्स करणारे गुणधर्म आहेत त्यामुळे एखाद्या रूमला निळा रंग देतात - प्रेमाचं प्रतीक मानत असल्याने पाश्चात्त्य देशांतील वधू निळ्या रंगाचं वस्त्र परिधान करते किंवा जवळ बाळगते - ट्रू ब्लू म्हणजे विश्वासू आणि फिलिंग ब्लू म्हणजे उदासीनता - पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाची रिबन बहुतेकदा निळी असते

पिवळा

- शेतकरी किंवा व्यापारी यांचं प्रतीक सांगताना हिंदुस्थानात पिवळा रंग महत्त्वाचा मानला जातो - वसंत ऋतू दर्शवतानाही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची पद्धत हिंदुस्थानात काही ठिकाणी आहे - पिवळ्या रंगाला काही ठिकाणी जेलसीचा रंग मानतात - काही औषधोपचारांमध्ये पिवळ्या रंगाला शांततेचं प्रतीक समजलं जातं - मध्ययुगीन काळात नाटकातील मृत्युदर्शक पात्र पिवळ्या वस्त्रात रंगमंचावर येत असे

पर्पल

- क्लिओपात्राचा आवडता रंग अशी याची ओळख आहे - पर्पल हार्ट म्हणजे युद्धात जखमी किंवा मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकन सैनिकासाठी केलेलं मिलिटरी डेकोरेशन
- थायलण्डमध्ये विधवा स्त्री दु:खदर्शक म्हणून पर्पल रंगाचा वापर करते - हा रंग शाही समजला जातो - कलर थिअरीनुसार मुलांच्या रूममध्ये पर्पल रंग वापरल्यास त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते

सफेद

- सफेत रंग हा जागतिक शांततेचं प्रतीक आहे
- चीन आणि जपानमध्ये दु:खदर्शक म्हणून वापरला जातो
- सफेत रंगाचे कपडे घातले की छान स्वप्नं पडतात, असा ग्रीसमध्ये समज आहे
- सफेत वस्त्र हे विवाहप्रसंगी शुभ असल्याचं काही ठिकाणी मानलं जातं

काळा

- दु:खदर्शक म्हणून अनेक देशांत वापरला जातो रहस्यमय कामांशी संबंधित हा रंग आहे - ब्लॅक ह्युमर म्हणजे असभ्य विनोद, ब्लॅकमेल म्हणजे अडवणूक करून काम साध्य करून घेणं, ब्लॅकलिस्ट म्हणजे बंदी घालणं, तर बिझनेस इन द ब्लॅक म्हणजे पैसे कमावणं - कराटे एक्स्पर्टला ब्लॅक बेल्ट मिळतो

सौजन्य:- फुलोरा, सामना ०३०३२०१२