Sunday, September 22, 2013

दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान

- ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.
- ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.
- ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘ऍस्कॉरबीक ऍसिड’ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते.
- आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.
- दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ तर... ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते ०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.
- मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम दुधाची आवश्यकता असते.
- ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो.
- मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे.
- माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस असते.
- डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो.
- मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.
- इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.
- मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते.
- ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास ‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.
- मानवाच्या रोजच्या आहारात कॉर्बोहायड्रेटस हे घटक जास्त प्रमाणात असते.
- मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.
- कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात.
- तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे अपायकारक द्रव्य असते.
- रक्तातील पांढर्‍या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास ब्लड कॅन्सर होतो.  


सौजन्य:- फुलोरा, सामना २१०९१३

Monday, September 16, 2013

श्री महागणपती रांजणगाव


अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे(?) महागणपती’ असेही म्हटले जाते.
हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.

Sunday, September 15, 2013

श्री विघ्नेश्र्वर ओझर


 अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.
मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.

Saturday, September 14, 2013

श्री गिरिजात्मक लेण्याद्री


अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

Friday, September 13, 2013

श्री चिंतामणी थेऊर


अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.
थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)

Thursday, September 12, 2013

श्री वरदविनायक महड


महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.
या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ.स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.
रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.

Wednesday, September 11, 2013

श्री बल्लाळेश्वर पाली


पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.
हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.
पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.

Tuesday, September 10, 2013

श्री सिद्धिविनायक सिद्धटेक



सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून ९९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून १४२ कि. मी. अंतरावर आहे.

Monday, September 09, 2013

श्री मोरेश्र्वर मोरगांव



अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
जवळच कऱ्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.

Sunday, September 01, 2013

जी जनरल के नॉलेज

- महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.
- महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे. 
- वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.
- नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
- सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.
- महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.
- कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.
- कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे.
- भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.
- सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. 
हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे.
- फिल्म ऍड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे येथे आहे.
- महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड ऍम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली.
- माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे. 
- थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो.
- रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.
- भारतातील परकीय गुंतवणुकीस महाराष्ट्राचा हिस्सा २४ टक्के आहे. (मार्च २००९)
- महाराष्ट्रावर २००२-०३ मध्ये ८२ हजार ५४९ कोटी रुपयांचे कर्ज, २००६-०७ मध्ये १ लाख ३४ हजार ४९३ कोटींवर गेले तर २००७-०८ मध्ये १ लाख ४४ हजार ३२५ कोटींच्या आसपास कर्ज होते. 

सौजन्य :- फुलोरा, सामना ३१०८१३

व्हॉयेजर

इतर ग्रहांपेक्षा शनी हा त्याला असलेल्या कडयांमुळे ओळखला जातो. एखाद तुकडे तुकडे झालेला ग्रह किंवा धूमकेतू याच्या अवशेषातून ही कडी बनली आहेत. या कडयांचे निरीक्षण व्हॉयेजर १ व व्हॉयेजर २ या यानांनी केले त्यातून अदभुत अशा निरनिराळ्या गोष्टी समोर आल्या. या कडयांना बाहेरून आत अशी ,ँ,ण्, अशी नावे देण्यात आली आहे. दोन कडयांच्या मध्ये जी फट आहे त्यांना सुद्धा नावे आहेत. आश्चर्य म्हणजे, याएन्के आणि केप्लर गॅपमध्ये शनिचे दोन लहान चंद्र भ्रमण करतात आणि ही गॅप मोकळी ठेवतात. यातील कड्यांमधील रुंदी ४५०० किमी आहे. ही गॅप साध्या दुर्बिणीतूनही दिसते. ए कडयाची रुंदी १४,६०० किमी आहे तर बी कडयाची रुंदी २५,५०० किमी आहे.

सौजन्य :- योगेश नगरदेवळेकर, फुलोरा, सामना ३१०८१३