Sunday, February 23, 2014

आगळे वेगळे

- शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू जिभेचे असतात.
- हाताच्या ठशाप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीच्या जिभेची ठेवणही वेगवेगळी असते.
- मानवाच्या मांडीचे हाड सिमेंटपेक्षाही मजबूत असते.
- दर दोन आठवड्याला आपले पोट स्नायूंचा नवा थर निर्माण करत असते.

सौजन्य :- फुलोरा, सामना २३०२१४

Experience the Power of e-Insurance Account with NDML's National Insurance-policy Repository


Dear SANDIP SADANAND PARADKAR,

You have been enjoying the benefits of Demat account and would have experienced the ease and convenience that Demat form of holding Securities have brought to dealings in Securities Market. Now it’s time to hold Insurance Policies in electronic form and experience the same ease and convenience.

It gives us immense pleasure to inform you that our subsidiary NSDL Database Management Limited (NDML) has been authorized by Insurance Regulatory and Development Authority (IRDA) to act as an Insurance Repository. You can now hold your insurance policies in electronic form with NSDL group, the way you hold your securities in Demat Account. We have named this initiative as "National Insurance-policy Repository" (NIR).
NIR facilitates a proposer to hold insurance policies in electronic form in a single e-Insurance Account (eIA) and offers easy online access to these insurance policies. For this, you will have to open an eIA and the insurance policies will be credited by the Insurance Company into this eIA. You can seek credit of existing as well as new insurance policies in eIA.
And it costs you nothing to open eIA and hold insurance policies in electronic form.


NIR Facilitates:
                                                                                                                                                        !                                                                                                 
·         Holding of all insurance policies in a single e-Insurance Account (eIA),
·         Doing away the hassles associated with holding the insurance policies in physical form,
·         One time Know Your Customer (KYC)  for opening the e-Insurance account,
·         A single point of contact for the account holder to update demographic details with insurance companies,
·         Conversion of the existing paper policies into electronic policies at the request of the policy holder.
Benefits:

·         No charges for eIA opening and eIA maintenance to the eIA holder,
·         Eliminates multiple KYC,
·         All insurance policies  under one umbrella,
·         Single view for all policies,
·         Portfolio tracking,
·         Ease in Premium payments,
·         Account Statement from NIR.
eIA can be opened by filling the eIA application form (attached) and submitting it to your nearest Approved Person - your DP/Broker may also be an Approved Person who will facilitate opening of eIA.
The details of the Approved Persons and the list of insurance companies, whose policies as on date can be converted into electronic form are available at https://nir.ndml.in. We are in the process of appointing more approved persons and many insurance companies are likely to join the Insurance Repository system in due course.


To experience the power of e-Insurance Account fill in the attached eIA application form and submit it to the nearest Approved Person. Please visit https://nir.ndml.in for further information.


For any assistance please feel free to get in touch with us at helpdesk.nir@nsdl.co.in / 022 49142631.

Regards,
NSDL.

सौजन्य :- ई-मेल वर प्रसारित

Sunday, February 16, 2014

मिळती जुळती जपानी

बर्‍याच जणांना असा प्रश्‍न पडतो की, परदेशी भाषा का शिकायची? जागतिकीकरणाची गरज, चांगली नोकरी मिळते ही काही उत्तरे. परंतु स्वानुभवातून मी एवढेच सांगू शकेन की, स्वत:च्या देशाची, मातृभाषेची किंमत कळण्यासाठी, देशप्रेम जागृत होण्यासाठी, परदेशी कंपन्यांनी हिंदुस्थानात गंुंतवणूक करून अधिकाधिक हिंदुस्थानींना नोकरीच्या संधी मिळण्यासाठी परदेशी भाषा शिकणे हे एक माध्यम आहे.
जपानी शिकण्याची सुरुवात मुळाक्षरांपासून झाली. आपली बाराखडी असते तशी जपानीमध्ये पाचखडी आहे. आ, ई, ऊ, ए, ओ पाचच स्वर. ख, घ, छ, ट, ठ, ड, ढ, ण, थ, ध, ल, ळ, क्ष, ज ही अक्षरे नाहीत. इंग्रजीमध्ये दोन असतात तशा इथे तीन लिप्या. हिरागाना, काताकाना व कांजी (चित्रलिपी). बालवाडीत बसल्यासारखं वाटत होतं. रोज दहा मुळाक्षरे शिकायची. घरी जाऊन शंभरदा लिहून त्याचा सराव करायचा. हळूहळू मजा येऊ लागली.
जपानी भाषेचे व्याकरण मराठी भाषेशी (हिंदुस्थानी भाषा व्याकरणाशी) मिळतेजुळते आहे. त्यामुळे नवीन शब्द, नवीन व्याकरण शिकूनही वाक्य तयार करणे सोपे आहे. जपानी देशप्रेमाच्या कथांमुळे मला कायमच त्यांच्याबद्दल आदर होता. भाषा शिकायला लागल्यानंतर ‘आई’ या जपानी शब्दाचा अर्थ ‘प्रेम’ आहे, हे ऐकल्यावर जपानीवरील प्रेम अधिक वाढले.
भाषा शिकणे म्हणजे केवळ व्याकरण शिकणे, शब्दसंग्रह वाढवणे एवढे सीमित राहात नाही. ग्रीन टी, मिसो सूप, सुशी, जपानी सण, किमोनी इत्यादी छोट्या छोट्या गोष्टी वर्गात शिकविल्या जात होत्या. चॉपस्टिकने खायचे कसे याचेही प्रात्यक्षिक वर्गात करून घेतले गेले. त्यात एक मुख्य गोष्ट शिकविली जात होती, ती म्हणजे प्रत्येक वेळी जपानी परंपरा, सणांची हिंदुस्थानी परपरांशी तुलना करून पाहणे.
कित्येकदा परदेशी लोकांकडून हिंदुस्थानातील अस्वच्छता, रस्त्यावरील खड्डे यावर टीका व्हायची. त्या प्रत्येक वेळी काळजाला पीळ बसायचा. स्वत:च्या मुलाला इतरांनी नावे ठेवल्यावर आईला जसा राग येतो तसं वाटायचं. मी माझ्या देशातील वाईट गोष्टींना नावे ठेवेनही. परंतु कुणा परदेशी माणसाने नावे ठेवलेली सहन होत नव्हती. त्यामुळेच इथून पुढे समाजात वावरताना स्वत:च्या वागणुकीची मी काळजी घेईन. ही भावना निर्माण झाली. परदेशी संस्कृतीतील जे जे चांगले ते ते मी स्वत:मध्ये रुजवावे व हिंदुस्थानातील जे जे चांगले त्या प्रत्येक गोष्टीचा अभिमानाने प्रसार करावा, ही जाणीव मला या परदेशी भाषेच्या शिक्षणाने दिली.
जपानी सरकारच घेते परीक्षाजपान फाऊंडेशन ही जपानी सरकारी संस्था वर्षांतून दोन वेळा ( जुलै व डिसेंबरमधील पहिल्या रविवारी) परीक्षा घेते. हिंदुस्थानात बंगलोर, दिल्ली, कोलकाता व महाराष्ट्रात मुंबई व पुणे येथे ही परीक्षा घेतली जाते. प्रश्‍नपत्रिका जपानहून येते व उत्तरपत्रिका जपानला तपासायला जातात. त्यानंतर मिळणारे सर्टिफिकेटही सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ग्राह्य धरले जाते. या भाषेचे वर्ग पुणे, मुंबई येथे अनेक ठिकाणी चालतात. 
माझीच मला ओळख झालीपरदेशी गोष्ट म्हणजे चांगलीच अशी काही लोकांची धारणा. जपानी शिकत असताना मला माझ्याच संस्कृतीची नव्याने ओळख होत होती. आपल्या संस्कृतीतील महत्त्वाच्या गोष्टी समोर येत होत्या. जपानमध्ये गेले तेव्हा स्वच्छ रस्ते पाहून परत आल्यावर इथून पुढे एकदाही मी रस्त्यावर कागद, कचरा चुकूनही फेकणार नाही, कोणी थुंकत असेल तर त्याला निडरपणे सांगेन, अशी प्रतिज्ञा केली.
- शुभांगी कानिटकर

सौजन्य :- फुलोरा,  सामना, १४०२१४

देवघर

वास्तुशास्त्रामध्ये देवघराला फार महत्त्व आहे नवं घर घेतलं की देवघराची जागा कुठे असावी हा प्रश्‍न अनेकांना पडतो त्यांच्यासाठी 
- सकाळच्या कोवळ्या किरणांचा प्रभाव ईशान्य व पूर्व दिशेला असतो त्यामुळे शुभ जैविक ऊर्जेचा परिणाम या दिशांवर जास्त होतो त्यामुळे या दिशांना देव्हार्‍याची व्यवस्था केलेली बरी देवघर घराच्या पश्‍चिमेच्या भिंतीला असेल व तो पूर्वाभिमुख असल्यास घरातील बर्‍याच वास्तुदोषांचे निर्मूलन होऊ शकेल 
- देव्हारा साग, शिसे, चंदनाच्या लाकडाचा किंवा पांढर्‍या संगमरवरचाही चालेल
- देव्हार्‍यात कमीतकमी देवतांची मांडणी करावी र्ै देवघरात श्री शंकर स्फटीकाच्या स्वरुपात ठेवावे
- देव्हार्‍यामध्ये मूर्तींची पंचायतन नुसार मांडणी करावी 
- देव्हारा जमिनीपासून साधारण २ ते ४ इंच उंच ठेवा 
- देवघरात घंटा अवश्य ठेवा 

SABHAR :- FULORA, SAMANA १४०२१४

मराठी समाजसेवा सातासमुद्रापार

गावातल्या गावात समाजसेवा करायची म्हटली तरी डोक्याला आठ्या, मग परदेशात... ‘मराठी’ युवकांसाठी हे क्षेत्र नवीन असले तरी काही मराठी युवकांनी अशी समाजसेवा आफ्रिकन देशांमध्ये करून मराठी झेंडा सातासमुद्रापार लावला आहे. त्यांनी मळलेली ही पायवाट समाजसेवा करू पाहणार्‍या मराठी युवकांना मार्गदर्शक ठरणारीच आहे...!आजही सिएरा लिओन या देशात ‘इंटरनॅशनल अक्शन ऍड’ या संस्थेबरोबर जोडली गेलेली पुण्याची सुवर्णा हुलावळे हिने याआधी इथोपिया, झांबिया या देशांत व्हॉलेण्टरिंग केलं होतं. इथोपियात चाइल्ड सेक्स वर्करचं पुनर्वसन करताना या व्यवसायात त्यांची येण्यामागची कारणं शोधणं, त्यांना पर्यायी उपजीविकेचं साधन तसेच सुरक्षितता पुरवणं अशा अनेक पर्यायांचा अवलंब करून सुवर्णाने तिथल्या लहानग्यांचं पुनर्वसन केलं... ज्या देशात वीज नाही... त्यामुळे पर्यायाने तासन्तास इंटरनेट नाही... फोन नाही आणि मनोरंजनाची साधनं नाहीत... अशा देशात सुरुवातीला एकटं राहणं अवघड गेलं. पण कमीत कमी सुविधांमध्ये आपण कसं राहायचं हे मी यातून शिकले, असं सुवर्णा म्हणते. इथोपियातली प्रेमळ माणसं आणि त्यांचा पराकोटीचा पाहुणचारही सुवर्णाला अनुभवता आला. सुवर्णा म्हणते, या देशांच्या तुलनेत आपला देश कितीतरी सधन आहे. हिंदुस्थानात सामाजिक कार्य करताना विशेष अडचणी नसतात. पण पूर्णपणे अनोळखी देशात पायाभूत सुविधांचा अभाव असताना काम यशस्वी करणं म्हणजे स्वत:मधल्या क्षमतांचा कस लागतो.

परदेशी जाण्याचा हेतू केवळ स्वत:ची प्रगती असतो. परंतु गरिबी, कुपोषण याबरोबरच अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या देशांमध्ये जाऊन व्हॉलेण्टरिंग करणं हे तसं मराठी माणसाला अद्याप माहीत नसलेलं क्षेत्र. सिद्धार्थ संख्ये, सुवर्णा हुलावळे, शरद पंत, सचिन पटवर्धन अशा काही मराठी युवकांनी ही मोहीम यशस्वी केली आहे. व्हॉलेण्टरिंग वोव्हरसीज (V.S.O.) या संस्थेमार्फत या तरुणांनी अफ्रिकन देशामधल्या खेड्यांमध्ये जाऊन व्हॉलेण्टरिंग केलं. अभिमान वाटावा अशीच यांची कामगिरी.
सिद्धार्थ V.S.O. च्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी नायजेरियातून व्हॉलेण्टरिंग करून परतला. सामाजिक कार्याची आवड असणार्‍या सिद्धार्थने नायजेरियातील कधी अति थंड तर कधी अति उष्ण अशा लाफिया, मडाकिया, पण्यम अशा वेगवेगळ्या प्रदेशांत काम केलं. तिथल्या लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी राबवलेल्या प्रकल्पांचा रिसर्च रिपोर्ट तयार करणं आणि त्याचं विश्‍लेषण करण्याचं काम सिद्धार्थनं केलं. तीन महिन्यांच्या कालावधीत त्याने कामाच्या निमित्ताने तिथल्या स्थानिकांशी संवाद साधला. या काळात सिद्धार्थला तिथली संस्कृती, परंपरा आणि त्याचबरोबर त्यांच्या समस्या जवळून बघता आल्या. सुरुवातीला थोडासा धास्तावलेला सिद्धार्थ नायजेरियातून परतला तो अनेक मित्र बनवून. सिद्धार्थ म्हणतो, ‘‘मला नायजेरियातल्या व्हॉलेण्टरिंगने खूप काही शिकवले आणि आपण किती सधन देशाचे नागरिक आहोत याची जाणीवही करून दिली.
पश्‍चिम आफ्रिकेतल्या सिएरा लिओन देशात २०१०मध्ये व्हॉलेण्टरिंग केलेल्या अमरावतीच्या शरदनेही तिथल्या मटरू जॉग या छोट्याशा खेड्यात मच्छीमार आणि शेतकर्‍यांच्या व्यवसायाचं नियोजन करून त्यांना प्रशिक्षितही केलं. आसपासच्या १२ खेड्यांतील लोकांना त्याने मासे टिकवण्याच्या नव्या पद्धती तसेच मासेमारीसाठी आवश्यक असणार्‍या मोठ्या बोटी वापरण्याचं महत्त्व अभ्यासपूर्वक पटवून दिलं. आपल्या याच कामातून वेळ काढत तिथल्याच एका आफ्रिकन युथ या संस्थेतल्या मुलांना त्याने अनेक विषयांवर मार्गदर्शनही केलं. याबदल्यात ही मुलं शरदला तिथले लोकप्रिय खाद्यपदार्थ, आचके प्रेमाने करून आणायची आणि खिलवायची. तिथल्या स्थानिक मुलांना शरदने मार्शल आर्ट शिकवलं आणि बदल्यात फुटबॉलही शिकून घेतलं. व्हॉलेण्टरिंगच्या एका वर्षाच्या काळात शरदने तिथल्या लोकांच्या मनात स्थान तर निर्माण केलंच पण त्याचबरोबर तिथल्या गावप्रमुखाने त्याला इलोगिमा (stand still) ही पदवी दिली. सुरुवातीला शरद हा तिथल्या लोकांसाठी पुमै पुमै (गोरा माणूस) होता; पण नंतर हाच शरद त्यांचा जिवलग मित्र झाला. 
सध्या ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’मध्ये कार्यरत असलेले सचिन पटवर्धन यांनी २०११मध्ये आफ्रिकेतल्या घाना देशात जाऊन व्हॉलेण्टरिंग केलं होतं. एका वर्षासाठी घानात गेलेल्या सचिन यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन ही संधी स्वीकारली. तिथल्या स्थानिक जिल्हा पंचायतीमध्ये व्यवसायिक उपक्रमांचे अभ्यासपूर्वक नियोजन आणि निश्‍चितीचं काम केलं. सचिन यांनी तिथंही प्रेमाची नाती तयार केली. सचिन म्हणतात की, महाराष्ट्राला थोर समाजसेवकांचा वारसा लाभलेला आहे. पण अशा प्रकारच्या जागतिक स्तरावरील समाजसेवेपासून मराठी माणूस अजूनही दूर आहे. देश, भाषा, संस्कृती यांच्या सीमा ओलांडून कुठल्याही व्यवसायिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता या तरुणांनी केलेली ग्लोबल समाजसेवा अनेकांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे.
व्हीएसओअनेक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्था परदेशात व्हॉलेण्टरिंग संधी देतात. vso ही त्यापैकीच एक संस्था. या संस्थेचे जगभरातील ४० देशांमध्ये काम चालते.
माफक स्टायपेण्डव्हॉलेण्टरिंगसाठी पदव्युत्तर व किमान ३ वर्षांचा अनुभव. इंग्रजी आणि किमान संगणकाचे ज्ञान या पात्रता आवश्यक आहे. या बदल्यात विमान भाडं, राहाण्या-खाण्याची सोय आणि माफक स्टायपेंड संस्थेकडून व्हॉलेण्टीयर्सला दिला जातो.
- स्वप्नाली अभंग


SABHAR :- FULORA, SAMANA १५०२१४  

Sunday, February 09, 2014

गंमत रे

  अभ्यास तर सगळेच करतात, पण तो करताना त्यातही काही मज्जा असते, काही गंमत असते हे बर्‍याच कमी जणांना ठाऊक असते जे फक्त शिकतात त्यांच्यासाठी हे खास 
- इंग्रजीमध्ये १ ते ९९ पर्यंतच्या स्पेलिंग लिहिताना कुठेही a, b, c, d चा वापर होत नाही पहिल्यांदा d हा hundred मध्ये दिसतो
- १ ते ९९९ पर्यंतच्या स्पेलिंगमध्ये a, b, c चा वापर कुठेही होत नाही पहिल्यांदा चा वापर thousand मध्ये होतो
- १ ते ९९९९ पर्यंतच्या स्पेलिंगमध्ये कुठेच b, c चा वापर झालेला नाही 
billion ची स्पेलिंग लिहिताना त्यात b डोकावतो
c चा वापर इंग्लिश काऊंटिंगमध्ये तुम्हाला कुठेही आढळणार नाही 

साभार  - फुलोरा, सामना ०८०२१४ 

खा ऽऽ जा - चवीने खाणार

   खाजा आणि हा असा? या खाजाचा आकारच असा की, डिक्टो बाकरवडी दिसायला अगदी मोठ्या आकाराची बाकरवडीच खायला अगदी मस्त कुरकुरीत खारीसारखा अलिबाग, मुरुड-जंजिरा गावच्या बाजारपेठेत मिळणारा हा गोड खाजा हनुमान स्वीट्स या छोट्याशा दुकानात दररोज सुमारे ३० किलो खाजा विकला जातो आणि तोही हातोहात 
१९७५ सालापासून हनुमान स्वीट्स या दुकानात हा खाजा बनवायला सुरूवात झाली आणि तेव्हापासून तो मुरुडवासीयांचा फेव्हरेट झाला मग घरात लग्न असो किंवा बारसं, बघता बघता खाजाची डिमांड वाढू लागली आता तर आजूबाजूच्या गावात किंवा मुंबई, पुणे, सातारा, सांगलीला जायचे झाल्यास मुरुडकर हमखास आपल्या गावचा खाजा नातेवाईकांसाठी घेऊन जातात त्यामुळे मुरुडचा खाजा आता महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे तसा हा खाजा मूळचा उत्तर प्रदेशातला तिथली एक प्रथा आहे मुलीला सासरी पाठवताना तिच्या सासरकडच्या मंडळींचे तोंड गोड व्हावे यासाठी तिच्यासोबत हा खाजा पाठवला जातो या दुकानाचे मालक धीरेंद्र सिंग यांच्या वडिलांनी तिथून या खाजाची टेक्निक मुरुडला आणली आणि उत्तर प्रदेशचा खाजा बघता-बघता मुरुडचा झाला तसे हे हॉटेल फार जुने, १९१२ सालातलेे! आज ही तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळतेय इतर अनेक पदार्थ इथे मिळतात पण खाजाची टेस्टच भारी 
तूप, मैद्याचा वापर करुन तयार केलेला आणि साखरेच्या पाकात घोळवलेला हा खाजा खाण्यासाठी मुरुड जंजिर्‍याला भेट देणारे पर्यटकही वाट वाकडी करून इथे येतात या हॉटेलात येणार्‍या खवय्याला अनेकदा गरमागरमच खाजा खायला मिळतो या गरम खाजाची टेस्टच भन्नाट हा खाजा तसा १५ दिवस टिकतोही आणि खिशाला परवडेबल असल्याने इथे येणार्‍या खवय्यांचीही काही कमी नाही 
दररोज सुमारे २५ ते ३० किलो खाजा बनवला जातो आणि या गरमागरम खाजाचा एक ट्रे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कढईत दुसरा खाजा तळला जात नाही एक खाजा पाच रुपये किमतीला मिळत असल्याने तो घेणेही आमच्या ग्राहकाला परवडते 
- धीरेंद्र सिंग
- सारिका मिठबांवकर

 THANKS - FULORA, SAMANA ०८०२१४