बर्याच जणांना असा प्रश्न पडतो की, परदेशी भाषा का शिकायची? जागतिकीकरणाची गरज, चांगली नोकरी मिळते ही काही उत्तरे. परंतु स्वानुभवातून मी एवढेच सांगू शकेन की, स्वत:च्या देशाची, मातृभाषेची किंमत कळण्यासाठी, देशप्रेम जागृत होण्यासाठी, परदेशी कंपन्यांनी हिंदुस्थानात गंुंतवणूक करून अधिकाधिक हिंदुस्थानींना नोकरीच्या संधी मिळण्यासाठी परदेशी भाषा शिकणे हे एक माध्यम आहे.
जपानी शिकण्याची सुरुवात मुळाक्षरांपासून झाली. आपली बाराखडी असते तशी जपानीमध्ये पाचखडी आहे. आ, ई, ऊ, ए, ओ पाचच स्वर. ख, घ, छ, ट, ठ, ड, ढ, ण, थ, ध, ल, ळ, क्ष, ज ही अक्षरे नाहीत. इंग्रजीमध्ये दोन असतात तशा इथे तीन लिप्या. हिरागाना, काताकाना व कांजी (चित्रलिपी). बालवाडीत बसल्यासारखं वाटत होतं. रोज दहा मुळाक्षरे शिकायची. घरी जाऊन शंभरदा लिहून त्याचा सराव करायचा. हळूहळू मजा येऊ लागली.
जपानी भाषेचे व्याकरण मराठी भाषेशी (हिंदुस्थानी भाषा व्याकरणाशी) मिळतेजुळते आहे. त्यामुळे नवीन शब्द, नवीन व्याकरण शिकूनही वाक्य तयार करणे सोपे आहे. जपानी देशप्रेमाच्या कथांमुळे मला कायमच त्यांच्याबद्दल आदर होता. भाषा शिकायला लागल्यानंतर ‘आई’ या जपानी शब्दाचा अर्थ ‘प्रेम’ आहे, हे ऐकल्यावर जपानीवरील प्रेम अधिक वाढले.
भाषा शिकणे म्हणजे केवळ व्याकरण शिकणे, शब्दसंग्रह वाढवणे एवढे सीमित राहात नाही. ग्रीन टी, मिसो सूप, सुशी, जपानी सण, किमोनी इत्यादी छोट्या छोट्या गोष्टी वर्गात शिकविल्या जात होत्या. चॉपस्टिकने खायचे कसे याचेही प्रात्यक्षिक वर्गात करून घेतले गेले. त्यात एक मुख्य गोष्ट शिकविली जात होती, ती म्हणजे प्रत्येक वेळी जपानी परंपरा, सणांची हिंदुस्थानी परपरांशी तुलना करून पाहणे.
कित्येकदा परदेशी लोकांकडून हिंदुस्थानातील अस्वच्छता, रस्त्यावरील खड्डे यावर टीका व्हायची. त्या प्रत्येक वेळी काळजाला पीळ बसायचा. स्वत:च्या मुलाला इतरांनी नावे ठेवल्यावर आईला जसा राग येतो तसं वाटायचं. मी माझ्या देशातील वाईट गोष्टींना नावे ठेवेनही. परंतु कुणा परदेशी माणसाने नावे ठेवलेली सहन होत नव्हती. त्यामुळेच इथून पुढे समाजात वावरताना स्वत:च्या वागणुकीची मी काळजी घेईन. ही भावना निर्माण झाली. परदेशी संस्कृतीतील जे जे चांगले ते ते मी स्वत:मध्ये रुजवावे व हिंदुस्थानातील जे जे चांगले त्या प्रत्येक गोष्टीचा अभिमानाने प्रसार करावा, ही जाणीव मला या परदेशी भाषेच्या शिक्षणाने दिली.
जपानी सरकारच घेते परीक्षाजपान फाऊंडेशन ही जपानी सरकारी संस्था वर्षांतून दोन वेळा ( जुलै व डिसेंबरमधील पहिल्या रविवारी) परीक्षा घेते. हिंदुस्थानात बंगलोर, दिल्ली, कोलकाता व महाराष्ट्रात मुंबई व पुणे येथे ही परीक्षा घेतली जाते. प्रश्नपत्रिका जपानहून येते व उत्तरपत्रिका जपानला तपासायला जातात. त्यानंतर मिळणारे सर्टिफिकेटही सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ग्राह्य धरले जाते. या भाषेचे वर्ग पुणे, मुंबई येथे अनेक ठिकाणी चालतात.
माझीच मला ओळख झालीपरदेशी गोष्ट म्हणजे चांगलीच अशी काही लोकांची धारणा. जपानी शिकत असताना मला माझ्याच संस्कृतीची नव्याने ओळख होत होती. आपल्या संस्कृतीतील महत्त्वाच्या गोष्टी समोर येत होत्या. जपानमध्ये गेले तेव्हा स्वच्छ रस्ते पाहून परत आल्यावर इथून पुढे एकदाही मी रस्त्यावर कागद, कचरा चुकूनही फेकणार नाही, कोणी थुंकत असेल तर त्याला निडरपणे सांगेन, अशी प्रतिज्ञा केली.
- शुभांगी कानिटकर
सौजन्य :- फुलोरा, सामना, १४०२१४

No comments:
Post a Comment