Sunday, February 09, 2014

खा ऽऽ जा - चवीने खाणार

   खाजा आणि हा असा? या खाजाचा आकारच असा की, डिक्टो बाकरवडी दिसायला अगदी मोठ्या आकाराची बाकरवडीच खायला अगदी मस्त कुरकुरीत खारीसारखा अलिबाग, मुरुड-जंजिरा गावच्या बाजारपेठेत मिळणारा हा गोड खाजा हनुमान स्वीट्स या छोट्याशा दुकानात दररोज सुमारे ३० किलो खाजा विकला जातो आणि तोही हातोहात 
१९७५ सालापासून हनुमान स्वीट्स या दुकानात हा खाजा बनवायला सुरूवात झाली आणि तेव्हापासून तो मुरुडवासीयांचा फेव्हरेट झाला मग घरात लग्न असो किंवा बारसं, बघता बघता खाजाची डिमांड वाढू लागली आता तर आजूबाजूच्या गावात किंवा मुंबई, पुणे, सातारा, सांगलीला जायचे झाल्यास मुरुडकर हमखास आपल्या गावचा खाजा नातेवाईकांसाठी घेऊन जातात त्यामुळे मुरुडचा खाजा आता महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे तसा हा खाजा मूळचा उत्तर प्रदेशातला तिथली एक प्रथा आहे मुलीला सासरी पाठवताना तिच्या सासरकडच्या मंडळींचे तोंड गोड व्हावे यासाठी तिच्यासोबत हा खाजा पाठवला जातो या दुकानाचे मालक धीरेंद्र सिंग यांच्या वडिलांनी तिथून या खाजाची टेक्निक मुरुडला आणली आणि उत्तर प्रदेशचा खाजा बघता-बघता मुरुडचा झाला तसे हे हॉटेल फार जुने, १९१२ सालातलेे! आज ही तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळतेय इतर अनेक पदार्थ इथे मिळतात पण खाजाची टेस्टच भारी 
तूप, मैद्याचा वापर करुन तयार केलेला आणि साखरेच्या पाकात घोळवलेला हा खाजा खाण्यासाठी मुरुड जंजिर्‍याला भेट देणारे पर्यटकही वाट वाकडी करून इथे येतात या हॉटेलात येणार्‍या खवय्याला अनेकदा गरमागरमच खाजा खायला मिळतो या गरम खाजाची टेस्टच भन्नाट हा खाजा तसा १५ दिवस टिकतोही आणि खिशाला परवडेबल असल्याने इथे येणार्‍या खवय्यांचीही काही कमी नाही 
दररोज सुमारे २५ ते ३० किलो खाजा बनवला जातो आणि या गरमागरम खाजाचा एक ट्रे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कढईत दुसरा खाजा तळला जात नाही एक खाजा पाच रुपये किमतीला मिळत असल्याने तो घेणेही आमच्या ग्राहकाला परवडते 
- धीरेंद्र सिंग
- सारिका मिठबांवकर

 THANKS - FULORA, SAMANA ०८०२१४


No comments: