Thursday, September 29, 2011

आदिशक्ती

आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राला सुरूवात होते या दिवसात आदिशक्तीची उपासना केली जाते तेजस्वरुपाची, शक्तीची उपासना केली जाते श्री महालक्ष्मी ही मुख्य देवता असून श्री महाकाली, श्री महासरस्वती ही तिचीच प्रासंगिक रुपं आहेत इतर नावांनीही या त्रिशक्ती प्रसिद्ध आहेत नवरात्रीत या देवीच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते या नवरात्रीनिमित्त हिंदुस्थानातील काही मंदिरांविषयी थोडंसं


* चंडिका मंदिर


कोकणात दापोली-दाभोळ रस्त्यावर (२३ कि.मी.) दाभोळच्या अलीकडे दगडाच्या काळ्या काताळांत चंडिका देवीचे भूमिगत मंदिर आहे. बाहेर फक्त दगडी कातळ आहे पण डोंगरात ताशीव काम करून मंदिराचे प्रांगण करण्यात आले आहे. हे पांडवकालीन देवी मंदिर आहे. एखाद्या गुहेत शिरावे तसे काळ्याकुट्ट अंधारातून आपण खाली येतो. आत पाण्यातून चालत आपण अंदाज घेत मूर्तीसमोर येतो.


* कच्छची आशापुरा 
 
भक्तांच्या आशाआकांक्षा पूर्ण करणारी, भक्तांचे अत्यंत आदराचे व श्रद्धेचे ठिकाण म्हणजे कच्छची ‘आशापुरा’. कच्छ (गुजरात) व सिंध (पाकिस्तान) मधील जवळिकी (धार्मिकदृष्ट्या) सांगणारे हे देवीचे श्रद्धास्थान. भूजपासून आखाताकडे जाणार्‍या राज्य मार्गावर ९५ कि.मी.वर वसलेले मातानुमद (मातेचा मठ) हे ठिकाण. येथील देवी फक्त कमरेपर्यंतच वर आलेली आहे. एक आख्यायिका त्यामागे आहे. (माहुरची रेणुका व अंबाजोगाई अंबाभवानीदेखील पूर्ण स्वरूपात वर आलेली नाही.) देवीचे मंदिर छोटेसेच, पण आकर्षकपूर्वक संगमरवराचे आहे. त्रिदेवीचे आशापुरा हे एकच स्वरूप आहे. कच्छची मालकीण (देवी) म्हणून भक्तांच्या हृदयात वास करून आहे. सिंधमधील प्रसिद्ध असलेल्या हिंगलाज देवीचे हे द्वितीय स्वरूप आहे. येथे वर्षातून तीनवेळा नवरात्रोत्सव संपन्न होतो. जैन धर्मीयांची ही कुलदेवता आहे.
 
मनालीची हिडिंबा
 
मनालीच्या दाट वृक्षराजीतील देवीचे पुरातन मंदिर मनालीचे मोठे भूषण आहे. भीमपुत्र घटोत्कचाची आई दैत्यपुत्री हिडिंबेने दुर्गेची तपश्‍चर्या केली व तिला देवत्व पावले. दगडी व लाकडी बांधणीचे पॅगोडा प्रकारचे छोटेसे मंदिर फारच आकर्षक आहे. मंदिराचे प्रवेशद्वार छोटे असल्याने आत वाकूनच प्रवेश करावा लागतो. मंदिरावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. आत देवीची छोटी मूर्ती आहे. सोबत अन्य देवताही आहेत. नवरात्रीत येथे मोठा उत्सव असतो.



देशनोकची करणीमाता 

बिकानेर-जोधपूर मार्गावर देशनोक नावाचे छोटेसे रेल्वेस्थानक आहे. तेथे जवळच करणीमातेचे मंदिर आहे. भक्तांचे ते मोठे श्रद्धास्थान आहे. छोटेसे किल्लास्वरूप मंदिरवास्तू आहे. १३८७ला जोधपूर जिल्ह्यातील फाळोडीजवळील सुरण गावातील बहुकन्यका असलेल्या घरात दुर्गेने जन्म घेतला. लहानपणापासून अनेक चमत्कार करून व भक्तांना सुपथावर लावून १५१ वर्षांनी तिने आपली अवतार समाप्ती केली. मंदिर परिसरात राखाडी रंगाचे उंदिर बिनधास्तपणे फिरत असतात. देवीपुढे ठेवलेल्या परातीमधील खीर ते पितात. तेथे त्यांना पूर्ण अभय आहे. आत कुत्रा वा मांजर येत नाही. हे उंदिर पूर्वाजन्मीचे पुजारी असल्याची भक्तांत भावना आहे. मंदिरातील पुजारी मृत्यूनंतर उंदिर बनून देवीच्या सहवासात राहतात असे समजते. बिकानेरपासून देशनोकसाठी भरपूर बससेवा उपलब्ध आहे.


* एकवीरा देवी व अंबामाता
 
हजारो वर्षांपासून विदर्भाचे महान शक्तिस्थान असलेली एकवीरा देवी आहे. ती अंबाबाईची मोठी बहीण समजली जाते. अंबाभवानीच्या दक्षिणेस अंबानाल्याच्या पलीकडे या देवीचे स्थान आहे. एकवीरा देवीची स्थापना महान तपस्वी सद्गुरू जनार्दन स्वामींनी केली. सप्तशती पाठाच्या प्रारंभीच एकवीरा देवीच्या अवताराची कहाणी दिसते. माहूरच्या रेणुकेचे हे स्वरूप आहे. असेच स्वरूप नगर व पुण्याजवळील कार्ल्याजवळच आहे. रेणुकेच्या पाच पुत्रांत परशुराम हा धाकटा पराक्रमी पुत्र. हा एकच वीर पुत्र जन्मल्याने रेणुकेला एकवीरा म्हणून भूतलावर ओळखू लागले. ही देवी कायस्थ, पाठारे प्रभू, कोळी आदींची कुलस्वामिनी आहे. ती उग्र स्वरूपाची असून रक्तदंती, नीलवर्णी, मोठे विशाल डोळे असलेली आहे. तिच्या हातात शस्त्रे आहेत. ही ब्रह्मरूपिणी अयोनिसंभवा होती. याच अमरावतीपासून ४२ कि.मी. अंतरावर वर्धा नदीकाठी ‘कौंडिण्यपूर’ आहे. रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करण्याचे योजिले होते पण रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णालाच मनोमन वरले होते. रुक्मिणी अंबामातेचे दर्शन घेण्यासाठी आली असताना पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे खिडकीच्या बाहेर तयार ठेवलेल्या रथात घालून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले. मंदिर पुरातन असून ती खिडकी आजही त्या घटनेची साक्षीदार आहे. मंदिर पूर्ण दगडी असून आत गारवा जाणवतो.


- रामकृष्ण अभ्यंकर
सौजन्य:- देव्हारा, सामना २६०९२०११.

Wednesday, September 28, 2011

उदे गं अंबे उदे

नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरांचं रूप काही वेगळंच खुलून दिसतं. पारंपरिक दागिने, रंगीबेरंगी वस्त्र आणि तेज:पुंज देवीची प्रतिमा असा हा थाट बघण्यासारखा असतो. देवीला तयार करण्याची ही तयारी नेमकी कशी केली जाते, त्यासाठी कोणते विशेष प्रयत्न करावे लागतात हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. मुंबईसह महाराष्ट्रातील नऊ देवीं च्या नवरात्र सजावटीचा हा आँखो देखा हाल...


कोल्हापूरची अंबाबाई
 


कोल्हापूर येथील अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. बालाजीची पत्नी म्हणून अंबाबाईचा उल्लेख असल्याने खास पंचमी दिवशी तिरुपतीहून देवीला शालू येतो. नवरात्रोत्सवाच्या आधी मंदिराच्या खजिन्यातून देवीचे दागिने बाहेर काढले जातात. देवीच्या सेवेत यादव, आदिलशाही, छत्रपती शिवराय यांच्या काळातील हिरे, माणके, रूपे, सोने, चांदी आदी जडजवाहीर असल्याची माहिती इतिहास अभ्यासक उदयसिंह यादव यांनी दिली. उपयुक्त वाटतील अशा पद्धतीने रेणुकामाता, अन्नपूर्णामाता, विठ्ठल-रुक्मिणी, महिषासुरमर्दिनी, जोतिबा रूपातील पूजा बांधली जाते. दररोज रात्री शेजारतीपूर्वी देवीची पूजा उतरवली जाते.


- महादेव मिसाळ

महालक्ष्मी



मुंबईतल्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीचे नऊ दिवस भक्तांची अलोट गर्दी उसळते. या दिवसात देवीचं अलौकिक रूप पाहण्यासारखं असतं. नवरात्रीत देवीला खास सिल्कच्या काठापदराच्या साड्या नेसवल्या जातात. या साड्या मंदिराच्या ट्रस्टींतर्फे दिलेल्या असतात. नऊ दिवस देवीला नऊ साड्या नेसविण्याची पद्धत आहे. त्यासाठी कुठलाही रंग ठरलेला नसतो. महालक्ष्मी मंदिरात तीन देवींच्या मूर्ती आहेत. या तिन्ही देवींच्या साड्यांचे रंगही वेगवेगळे असतात. नवरात्रीतले नऊ दिवस या तीनही देवींचा मुखवटा सोन्याचा असतो. तसंच नवरात्रीत देवीला सर्व अलंकार चढविले जातात.


विरारची जीवदानी
 
  जीवदानी गडाच्या 400 मीटर उंचीवर जीवदानी मातेचे भव्य मंदिर आहे. मंदिरात देवीची अडीच फूट उंचीची मूर्ती आहे. दररोज पहाटे 4 वाजता देवीचा साजशृंगार होतो. प्रतिपदेला तिचा शृंगार असतो त्यावेळी पिवळी साडीचोळी देवीला नेसवतात, तर अष्टमीला हिरवी साडीचोळी नेसवली जाते. विजयादशमीला सीमोल्लंघन करणारी माता ही लाल साडीत असते. ते तिचे चंडिकेचे रूप असते. भक्तांनी देवीला अर्पण केलेला साड्या नवरात्राच्या या तीन तिथींव्यतिरिक्त इतर दिवशी देवीला नेसविण्यात येतात. देवीच्या गळ्यात लक्ष्मीहार, नाकात नथ, कानात कुडी, झुमके, पायात पैंजण, हातात बांगड्या, दंडावर बाजूबंद असे महाराष्ट्रीयन पद्धतीचे सोन्याचे दागिने शृंगाराला साज म्हणून चढवितात.



आडिवर्‍याची महाकाली



आडिवर्‍याची महाकाली ही भक्तांच्या नवसाला पावणारी. त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या दर्शनाला भक्तांची गर्दी होते. देवीला वर्षभर लोक ज्या ज्या साडीचोळीची ओटी भरतात त्या सर्व साड्यांपैकी सर्वात चांगली अशी एक साडी देवीला नेसवली जाते. ही साडी शक्यतो हिरव्या रंगाचीच असते. ही साडी नऊ दिवस तशीच ठेवली जाते. परंपरागत वापरात असलेले दागिनेच नवरात्रीत देवीला घातले जातात.


 
 
सप्तशृंगीचा साजशृंगार

 
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी मातेचा नवरात्रोत्सवात साजशृंगार करून देवीला नटविले जाते. सोमवारी पांढर्‍या रंगाचा शालू नेसवला जातो. देवीच्या कपाळावर ओम आकाराचे कुंकू लावले जाते. मंगळवारी हिरव्या रंगाचा शालू असतो. कपाळावर कुंकू लावलं जातं. बुधवारी गुलाबी रंगाचं महावस्त्र आणि बदाम आकाराचं कुंकू काढलं जातं. गुरुवारी पिवळ्या रंगाचा शालू आणि स्वस्तिक आकाराचं कुंकू असतं. शुक्रवारी जांभळ्या रंगाचा शालू नेसवून कपाळावर पाकळी किंवा पिंपळपान कुंकवानं काढलं जातं. शनिवारी सर्व रंग असलेला शालू नेसवून देवीच्या कपाळावर शंखाचा आकार असलेले कुंकू काढलं जातं. रविवारी तांबड्या रंगाचं महावस्त्र नेसवून सूर्याच्या आकाराचे कुंकू देवीच्या कपाळावर लावलं जातं. देवीला अनेक प्रकारचे दागिने आहेत. टोप, पुतळीहार, नथ, मणिमंगळसूत्र, ठुसी, कमरपट्टा, कर्णफुले, हातात बांगड्या, रुद्राक्षमाळा, लक्ष्मीहार इत्यादी अलंकारांनी देवीला सजविलं जातं तसेच देवीच्या मुखात तांबूल विडा ठेवला जातो.


- लक्ष्मीकांत पाठक



तांबडी जोगेश्‍वरी

पुण्याची ग्रामदैवत तांबडी जोगेश्‍वरी देवीची ख्याती जगभर पोहोचली आहे. नवरात्रीमध्ये तर देवीच्या मंदिरामध्ये भाविकांचा अक्षरश: पूर लोटतो. तांबडी जोगेश्‍वरी देवीचे वैशिष्ट्य म्हणजे नऊ दिवस देवीची विविध वाहनांवरील साकारण्यात येणारी रूपे. अर्थात दरवर्षी ही रूपे बदललीही जातात. प्रत्येक दिवशी वेगळी साडी आणि सजावटही नवी असते. जशी साडी आणि तिचे रूप त्याला साजेसे दागिने देवीला घालते जातात. महालक्ष्मीचे रूप असले की कोल्हापुरी साज, तोडे असे पांरपरिक पद्धतीच्या सोन्याच्या दागिन्यांनी देवीला सजविण्यात येते. बहुतांश सोने आणि मोत्याच्या प्रकारातील दागिने असतात. देवीला सजविण्याचे काम मंदिराचे पुजारीच करतात अशी माहिती तांबडी जोगेश्‍वरी मंदिराचे ज्ञानेश बेंद्रे यंानी दिली.


- मेधा पालकर

रेणुकादेवी

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या रेणुकामातेच्या मंदिरातही नवरात्रीत भक्तांच्या रांगाच रांगा लागतात. पिवळा व हिरवा हे रंग शुभ मानले जात असल्यामुळे या देवीला नवरात्रीत या दोन रंगांपैकीच एका रंगाची साडी नेसवली जाते. रेणुकामातेला पहिल्या दिवशी नेसवलेली साडीच नऊ दिवस ठेवतात. ललिता पंचमीच्या महापूजेसाठी देवीला सर्व विशेष अलंकार चढविले जातात. त्यात देवीला बिंदीपासून कानातले, बोरमाळ असे विविध दागिने घातले जातात. दररोज देवीला मोगर्‍याचे गजरेही माळले जातात.

- विजय जोशी

मुंब्रादेवी


मुंब्य्रााच्या डोंगरावर वसलेली मुंब्रादेवी म्हणजे ठाणे जिल्ह्यातील लोकांचं आराध्यदैवत. नवरात्रीचे नऊ दिवस या मंदिरात मोठा उत्सव असतो व त्या उत्सवासाठी देवीला अतिशय सुंदररीत्या सजवलेले असते. भक्तांनी देवीला अर्पण केलेल्या साड्यांपैकी नऊ हिरव्या साड्या देवीला नऊ दिवस नेसविल्या जातात. या देवीच्या गळ्यात अनेक अलंकार असतात; पण त्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतं ते मोठी सोन्याच्या व काळ्या मण्यांची माळ. या माळेला मोठं पानांचं पेण्डंटही आहे. मंगळसूत्रासारखी दिसणारी ही माळ देवीचं सौंदर्य अधिक खुलवते.


एकवीरा देवी

कार्ल्याच्या डोंगरात स्थानापन्न झालेली एकवीरा आई ही अनेक भक्तांचं श्रद्धास्थान. यंदा एकवीरा आईला नऊ ट्रस्टींनी दिलेल्या नऊ साड्या नेसविण्यात येणार आहेत. या साड्यांचे रंग ठरलेले नसतात. पुजारी ठरवतील ती साडी देवीला नेसवली जाते. आजपर्यंत नवरात्रीत एकवीरा देवीला भक्तांनी दिलेल्या साड्याच नेसविल्या जायच्या. तसंच अष्टमीच्या दिवशी गाभारा पूर्ण फुलांनी सजविला जातो. नवरात्रोत्सवात देवीचे सर्व दागिने चढविले जातात.

- मच्छिंद्र खराडे

सौजन्य:- फुलोरा, सामना २४०९२०११.

Thursday, September 22, 2011

लालेलाल डाळींब

डाळींबामुळे पचनशक्ती वाढते, तोंडाला चव येते हे ह्रदयरोगावर उपयुक्त आहे डाळींबात असे अनेक औषधी गुणधर्म आहेत


- गोड डाळिंबे तृषाशामक, उष्णताहारक, पित्तहारक असतात पित्तविकारामध्ये फार उपयोग होतो त्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णताही नाहीशी होते ताज्या डाळिंबाच्या रसात खडीसाखर घालून प्यायल्याने पित्तप्रकोप शांत होतो

- उलट्या होत असल्यास डाळिंबाचा रस प्या किंवा अन्न शिजवताना त्यात डाळिंब घाला

- वारंवार येणार्‍या तापामध्ये फिकेपणा आला असेल तर ताज्या डाळिंबाचा रस प्यायला द्या

- अनेक दिवसांचा कोरडा खोकला व दम लागत असल्यास डाळिंबाचा रस आणि मधाचे चाटण दिवसभरातून द्यावे

- डाळिंबाच्या सालीचे चूर्ण मधात मिसळून चाटल्यास घशातला कफदोष कमी होईल

- तोंडाला चव नसल्यास आंबट-गोड डाळिंबाचे दाणे थोड्याशा सैंधव मिठासह खाण्याचा उपयोग होतो

- ताप, पोटात कळ येणे, जुलाब होणे, अपचनाच्या तक्रारी, वरचेवर पोट दुखणे, अशा तक्रारींसाठी डाळींबाचा रस किंवा डाळिंब शिजवलेली पेज, सूप उपयोगी पडते

- डाळिंबाच्या फळाची साल जुलाब थांबवते

- डाळिंबाचा रस घेतल्याने नाकामधून रक्त पडण्याचे बंद होते

- मूळव्याधीच्या त्रासामध्ये रसाचा फायदा होतो

- गोड डाळिंब गरोदर स्त्रियांसाठी उत्तम समजले जाते अशक्तपणा दूर होतो शरीरस्वास्थ्य सुधारते ह्रदयासाठी आणि शरीरासाठी ते बलकारक ठरते

- डाळिंबाचा रस खडीसाखरेतून घेतल्यास छातीत दुखणे थांबते

- आजारी माणसाला डाळिंब शक्तीकारक आहे

सौजन्य:- चिरायू, सामना २२०९२०११.

गर्भवतींसाठी टॉर्च पॅनल टेस्ट

गर्भवती महिलेला असलेले आजार हे बहुतांशी वेळा तिच्या बाळाकडे संक्रमित होत असतात. हे आजार बाळापर्यंत पोहोचले आहेत का? हे ओळखण्यासाठी ‘टॉर्च पॅनेल टेस्ट’ ही एक नवीनच चाचणी आली आहे. लाईफ केअर मेडिकल सेंटरमध्ये ही चाचणी नव्यानेच सुरू करण्यात आली आहे. या चाचणीची किंमत २९०० रुपये असून यामुळे बाळाला होणारे रोगांचे संक्रमण शोधण्यास सोपे जाणार आहे. या चाचणीत टॉक्सोप्लाजमोसिज, रुबेला, सायटोमेगालोव्हायरस या तपासण्यांचा समावेश आहे. गर्भावस्थेत असताना एखाद्या आजाराचा संसर्ग झाल्यास ते बाळाच्या व आईच्या आरोग्यास घातक असते. त्यामुळे गर्भपात होऊ शकतो. बाळ मृतावस्थेत जन्म घेऊ शकतो किंवा बाळात जन्मजात दोष असू शकतो. त्यामुळे ही तपासणी आवश्यक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ह तपासणी गर्भावस्थेच्या आधी किंवा गर्भधारणा झाल्याचे कळताच केली जाते.


सौजन्य :- चिरायू, सामना २२०९२०११.

अनियंत्रित रक्तस्त्राव - आय.टी.पी.चा धोका

अचानकपणे नाकातून, हिरड्यांतून किंवा त्वचेच्या कुठल्याही भागातून अनियंत्रित रक्तस्त्राव होण्याच्या समस्या ही बर्‍याचदा आय.टी.पी. या आजाराची लक्षणे असू शकतात. आयटीपी म्हणजेच इम्युन थ्रम्बोसायटोपेनिक पुर्परा हा आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये विशेषत: आढळतो.


आय.टी.पी. म्हणजे नक्की काय?

आय.टी.पी.मध्ये शरीरात तयार झालेल्या ऍण्टिबॉडीज् प्लेटलेट्सवर हल्ला चढवतात. समजा आपल्या शरीरावर कोणत्याही रोगजंतूंचा हल्ला झाला तर स्वादुपिंड, बोनमॅरो, लिम्फनोड्स यामुळे ऍण्टी बॉडीज्ची निर्मिती केली जाते. त्यांच्या मदतीने हा सूक्ष्म जंतूंचा नाश केला जातो. पण आयटीपीमध्ये या ऍण्टिबॉडीज् बाहेरील हानिकारक घटकांऐवजी शरीराच्या पेशींवरच हल्ला करतात.

आयटीपी जेव्हा होतोे तेव्हा शरीरातील प्रतिकार शक्ती रक्तातील प्लेटलेट्सचाच नाश करते, ज्यांची आवश्यकता रक्त गोठण्याकरता असते. त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

प्लेटलेट्सची संख्या कमी असणे हे फारच घातक आहे. प्लेटलेटची संख्या ही ३० हजार/युएल पर्यंत कमी झाल्यास अचानकपणे शरीरातून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

आयटीपी म्हणजे शरीराची आपल्याच प्लेटलेट्सचा नाश करण्याची वृत्ती. वैद्यकीय भाषेत त्याला ऑटो इम्युन रिस्पॉन्स असे म्हणतात.

ऍण्टी प्लेटलेट्स ऍण्टिबॉडीज्चा प्लेटलेट्सच्या निर्मितीवरसुद्धा परिणाम होतो. बोनमॅरोमधील पेशींवर याचा ताण येतो. त्यामुळे आयटीपी असणार्‍या व्यक्तींमध्ये दुहेेरी गोष्टी होतात, म्हणजे त्याच्या प्लेटलेट्सचा नाश होतो आणि नाश होणार्‍या प्लेटलेट्सची जागा घेऊ पाहणार्‍या सामान्य प्लेटलेट्सची निर्मितीसुद्धा कमी होते. या प्लेटलेट्सची प्रचंड घट होते आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावल्यामुळे अचानक रक्तस्त्राव होतो.

दीर्घकाल आयटीपीचा त्रास असलेल्या रुग्णाच्या आयुष्यावर परिणाम होतो. आयटीपी असणार्‍या रुग्णांना अचानकपणे रक्तस्त्राव होण्याची सतत धास्ती असते. साधे खरचटले तरी अनियंत्रित रक्तस्त्राव होतो. तसेच नाकातून, हिरड्यांतूनही रक्त येण्याची शक्यता असते. मात्र मेंदूमध्ये किंवा पचनमार्गात रक्तस्त्राव झाल्यास मात्र मृत्यू ओढावू शकतो.

थकवा आणि औदासिन्य यासुद्धा गोष्टी आजाराबरोबर दिसून येऊ शकतात.

लहान मुलं आणि वयस्कांमध्ये दिसून येऊ शकतो. काही रुग्णांमध्ये हा आजार लपलेल्या स्थितीत असतो व त्याची लक्षणे दिसून येत नाहीत.

काहीजणांमध्ये खूपच रक्तस्त्राव आणि पुरळासारखी जांभळ्या रंगाची रॅश त्वचेवर दिसून येते.

या आजाराची लक्षणे ही प्लेटलेट्सच्या संख्येवर अवलंबून आहे. त्यामुळे अनियंत्रित रक्तस्त्राव होत असेल तर तो आयटीपी नाही ना, याची जरुर खात्री करून घ्या.

- डॉ. गणपती भट
जसलोक हॉस्पिटल
सौजन्य:- चिरायू, सामना २२०९२०११.

Tuesday, September 20, 2011

मनोरंजन ऑनलाइन

मोबाईल, आयपॉड, टॅबलेटमुळे मनोरंजनाच्या साधनांची व्याख्या पूर्णपणे बदलून गेली आहे व आता तर इंटरनेटमुळे मनोरंजन हे संगणकापर्यंत पोहोचले आहे. इंटरनेटचा वापर करून तुम्ही तुमचा करमणुकीचा आवडता पर्याय थेट तुमच्या संगणकावर वापरू शकता व त्यासाठी तुम्हाला फक्त गरज आहे ती संगणक व इंटरनेटची.


ऑनलाइन मनोरंजनाचे पर्याय - १) ऑनलाइन एफएम रेडिओ २) ऑनलाइन टीव्ही ३) ऑनलाइन म्यझिक


ऑनलाइन म्युझिक


संगीत म्हणजे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. ऑफिसमध्ये किंवा घरी अगदी थेट प्रवासातदेखील जर तुमच्याबरोबर तुमचा संगणक आणि इंटरनेट असेल तर तुम्ही कुठेही तुमचे आवडीचे गाणे ऐकू शकता. सध्या इंटरनेटवरील अनेक लोकप्रिय ऑनलाइन म्युझिक संकेतस्थळांवरून तुमचा आवडीचा कलाकार किंवा चित्रपट किंवा संगीत दिग्दर्शक अशा कोणत्याही पर्यायाचा वापर करून तुमचे आवडीचे गाणे ऐकू शकता. इंटरनेटवर अनेक मराठी चित्रपटांचीदेखील गाणी आपण ऑनलाइन ऐकू शकता.


प्रमुख ऑनलाइन म्युझिक देणारी संकेतस्थळे : 1) http://www.in.com/  2) http://www.ragga.com/  3) http://www.radiorhythm.com/  4) http://www.songbuzz.rediff.com/  5) www.google.co.in/music


ऑनलाइन टीव्ही


बिल गेटस्चे संगणकावर ‘लाईव्ह टीव्ही’चे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे व सध्या इंटरनेटवर अनेक संकेतस्थळांवर आपण ऑनलाइन टीव्हीचा मनमुराद आनंद घेऊ शकतो व त्यासाठी तुम्हाला कोणत्याही हार्डवेअर डिव्हाईसची गरज पडत नाही. फक्त संगणक व इंटरनेट एवढ्याच गोष्टींचा वापर करून तुम्ही तुम्हाला हवा तो चॅनेल व हवा तो कार्यक्रम थेट इंटरनेटवर बघू शकता. ऑनलाइन टीव्ही सेवा देणारी बहुतांशी संकेतस्थळे मात्र हिंदुस्थानबाहेरची आहेत.


प्रमुख संकेतस्थळे :
1) http://www.wwitv.com/  2) http://www.livetvchannelsfree.com/

3) http://www.tvchannelsfree.com/  4) http://www.yapptv.com/

ऑनलाइन एफएम रेडिओ



आपण आपल्या घरातील रेडिओ किंवा मोबाईल फोनमधील एफएमप्रमाणेच संगणकावर इंटरनेटचा वापर करून कोणत्याही एफएम रेडिओ चॅनलवरील हवे ते गाणे किंवा हवा तो कार्यक्रम ऐकू शकतो. ऑनलाइन एफएम वरील गाणे ऐकण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या संगणकाला इंटरनेटव्यतिरिक्त स्पीकर किंवा हेडफोन्सची गरज लागते. इंटरनेटवरील एफएम रेडिओवर थेट एफएम रेडिओपेक्षा जास्त स्पष्टता अनुभण्यास मिळते. त्याचबरोबर आपण कोणताही रेडिओ चॅनल पाहिजे तेव्हा लावू शकतो. सध्या इंटरनेटवर अनेक देशी व विदेशी संकेतस्थळांवर ऑनलाइन एफएम रेडिओची सोय देण्यात आली आहे.


प्रमुख ऑनलाइन एफएम सेवा देणारी संकेतस्थळे :

1) http://www.planetradiocity.com/  2) http://www.hindiradios.com/
3) http://www.onlinefmradio.in/  4) http://www.radostationindia.com/
5) http://www.123radiostation.com/

ऑनलाइन मनोरंजन वापरताना-

- इंटरनेटवरून थेट लाइव्ह स्ट्रीम हूक स्वरूपात येतो. त्यामुळे तुमचा इंटरनेटचा वेग चांगला असला पाहिजे नाहीतर डेटा बफर होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला थोडा डिले जाणवू शकतो.


- शक्यतो तुमच्या संगणकाचे कॉन्फिगरेशन चांगले असणे गरजेचे आहे.

- इंटरनेटचे बिल जास्त येण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला इंटरनेवरील मनोरंजनाचा पर्याय अजमवायचा असेल तर जास्त डाऊनलोड किंवा अनलिमिटेड इंटरनेट पर्याय घ्या.



सौजन्य:- इंद्रधनू, सामना २००९२०११.

Sunday, September 18, 2011

कॉर्पोरेट मंत्र - येडा बनून पेढा खा

दुसर्‍यांची थट्टा करायला सर्वांना आवडते पण स्वत:ची मस्करी केली कुणी की अजिबात सहन होत नाही. आपल्याशी जराशी कधी मस्ती केली कुणी तर आपल्यातला गब्बर सिंग जागा होतो. आयुष्यात अनेक गोष्टी हसण्यावर नेल्या तर जगणे सोपे होते व त्याचा फायदाही होतो. चिडण्या किंवा रक्त आटवण्यापेक्षा थट्टेची मजा घ्या. थट्टेचाही उपयोग होऊ शकतो हे समजा. एक गोष्ट सांगते. उज्जैन बाहेरील एका गावात एक गणिती होता. लोक त्याला आकड्यांचा बादशहा म्हणत. अर्थविषयक सर्व निर्णय घेताना राजा आवर्जून त्याचा सल्ला घेत. उत्तरेतील तक्षीलेपासून ते दक्षिणेतील कांचीपर्यंत त्याची चर्चा होत. गावातील सरपंच मात्र त्याच्यावर जळत. तो सरपंच सतत त्याला चिडवत, ‘‘तू असशील मोठा आकड्यांचा राजा पण तुझा पोरगा अगदी मठ्ठ आहे. त्याला चांदी आणि सोन्यात जास्त महाग काय हेही समजत नाही. पोरावर लक्ष द्या जरा’’. गणिततज्ज्ञाचा अपमान झाला. त्याने त्याच्या पोराला बोलावले व विचारले, ‘‘चांदी महाग की सोने?’’ पोरगा म्हणाला, ‘‘सोने.’’ बाप खूश झाला, पण आश्‍चर्याने म्हणाला, ‘‘अरे तुला माहीत आहे मग सरपंच असे का बोलतात. ते मला रोज चिडवतात की मी तुला काहीच शिकविले नाही, दुर्लक्ष केले. तुला अक्कल नाही आणि सोने-चांदी काय मोठे याचीही तुला जाण नाही. मला याचे फार वाईट वाटते. त्यावर पोरगा म्हणाला, ‘‘मी रोज शाळेत जाताना वाटेत सरपंच मला बोलावून घेतात. काही वयस्कर जमलेल्या गावकर्‍यांसमोर एका हातात चांदीचे व दुसर्‍या हातात सोन्याचे नाणे धरून मला सांगतात महाग असेल ते घेऊन जा. मी चांदीचे नाणे घेतो, सरपंच व गावकरी खूप हसतात माझ्यावर. माझी थट्टा करतात. तुमचा सूड घेतल्यासारखे त्यांना वाटत असावे म्हणूनच ते तुम्हाला मी मठ्ठ आहे असे सांगतात. गणिततज्ज्ञाने तोच प्रश्‍न विचारला जो तुम्हालाही पडला असेल, ‘‘तुला माहीत आहे सोने महाग मग तू चांदीचे नाणे का घेतोस, का फजिती करून घेतोस रोज. पोरगा बापाचा हात धरून आतल्या खोलीत घेऊन गेला. चांदीची नाणी भरलेला एक डबा बापाला दाखवला आणि बापाला म्हणाला, ‘‘ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे घेऊन त्यांची मजा, थट्टा संपेल. मला नाणी मिळणेही बंद होईल. घेऊ द्या त्यांना मजा आणि मला नाणी.’’ कधी कधी थट्टेचे पात्र होण्यात काहीच हरकत नाही. याचा अर्थ आपण बावळट किंवा मूर्ख असा नाही. आपल्याला काही साध्य करण्याकरिता दुसर्‍यांना थोडा आनंदाचा वाटा देणे एवढेच. सगळ्यांचा आनंद घ्या थट्टेचाही. येडा बनून पेढा खावा कधी कधी. अधिक गोड लागतो.


dr.swapnapatker@gmail.com
सौजन्य:- फुलोरा, सामना १७०९२०११.

Wednesday, September 14, 2011

सुरक्षित ऑनलाइन व्यवहारासाठी...२FA - डिजिटल आयडेंटिटी

आजच्या ई-युगातील इंटरनेटवरून केली जाणारी कोणतीही खरेदी-विक्री सुरक्षित करण्याचे नवे तंत्रज्ञान म्हणजे ‘२FA’ (टू फॅक्टर ऑथेंटिकेशन) हे ई-युगातील व्यवहार सुरक्षित करण्यासाठी प्रभावी अस्त्र आहे. ‘‘तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करून कोणतेही ऑनलाइन व्यवहार करणार असाल तर तुमच्याकडे ‘२FA’ आहे याची खात्री करून घ्या व त्यानंतरच इंटरनेटवरून कोणताही ऑनलाइन व्यवहार करा.


‘२FA’ ची वैशिष्ट्ये



एक्स्ट्रा आयडेंटी

‘२FA’ म्हणजेच तुमच्या स्वत:च्या ओळखी व्यतिरिक्त इतरांना माहिती नसलेली आयडेंटी म्हणजेच एक्स्ट्रा आयडेंटी. साधरणत: जेव्हा तुम्ही इंटरनेटवरून कोणताही व्यवहार करीत असता तेव्हा तुम्हाला फक्त तुमचा क्रेडिट कार्ड क्रमांक cvv व क्रेडिट कार्डची एक्स्पायरी डेट एवढीच माहिती द्यावी लागते. ही माहिती तुमच्या क्रेडिट कार्डवरदेखील असते. त्यामुळे जर तुमचे क्रेडिट कार्ड हरवले किंवा चोरले गेले तर कोणीही सहजपणे त्याचा वापर करून एखादा ऑनलाइन व्यवहार करू शकतो. परंतु ‘२FA’ मधील एक्स्ट्रा आयडेंटी या वैशिष्ट्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना तुम्हाला क्रेडिट कार्डवरील माहितीव्यतिरिक्त काही ठरावीक माहिती जी फक्त तुम्हालाच माहीत आहे तीदेखील सादर करावी लागते. उदा. तुमची जन्मतारीख किंवा इतर काही जे इतरांना माहीत नसेल असे यामुळे जरी क्रेडिट कार्ड हरवले तरी ‘२FA’ मुळे याचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होते.


सिक्युअर आयडी


‘२FA’ मधील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सिक्युर आयडी. सिक्युर आयडी हे तुमच्याकडील आयडेंटी कार्डसारखेच डिजिटल आयडेंटी कार्ड असते. सिक्युर आयडी तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करू शकता किंवा सिक्युर आयडीसाठी वेगळे छोटेसे गॅझेटदेखील बाजारात उपलब्ध आहे. सिक्युर आयडी जर तुम्ही तुमच्या ऑनलाइन खात्यासोबत जोडले तर प्रत्येक ठरावीक वेळेनंतर त्यावर एक युनिक आयडी क्रमांक तयार होतो. हा युनिक क्रमांक फक्त तुमच्यासाठीच असतो. तुम्ही तोपर्यंत हा युनिक क्रमांक ऑनलाइन व्यवहारात वापरत नाही तोपर्यंत असा कोणताही व्यवहार पूर्ण होत नाही. सिक्युर आयडी कोणत्याही बनावट ई-व्यवहारापासून रक्षण करतो. सध्या बाजारामध्ये व्हेरीसाईन आरएसए या प्रख्यात कंपन्यांचे सिक्युर आयडी उपलब्ध आहेत व आपण त्या संदर्भात अधिक माहिती खालील संकेत स्थळावरून मिळवू शकता.


https://idprotect.verisign.com/ , www.rsa.com/securid

OTP (वन टाईम पासवर्ड)


जेव्हा तुम्ही नेट बँकिंग किंवा ई-व्यवहार करण्यासाठी ठरावीक बँकेच्या संकेत स्थळावरून वन टाईम पासवर्ड (OTP) जनरेट करून घ्या. ओटीपी जनरेट करण्यासाठी आपल्या क्रेडिट कार्डची सर्व माहिती असणे आवश्यक आहे. OTP जनरेट झाल्यावर तो तुमच्या बँकेमध्ये रजिस्टर्ड क्रमांक किंवा ई-मेल ऍड्रेसवर पाठवला जातो. OTP हादेखील आजकालच्या ‘२FA’ मधील लोकप्रिय प्रकार आहे. OTP हादेखील सिक्युर आयडीप्रमाणेच फक्त तुम्हालाच माहीत असतो.


'२FA’ साठी काय कराल?


- RBI च्या नवीन निर्देशानुसार कोणत्याही ई व्यवहारासाठी ‘२FA’ च्या वरीलपैकी कोणत्याही सेवेपैकी एक सेवा असणे गरजेचे आहे.


- ‘२FA’ च्या अनेक पर्यायांपैकी तुम्हाला वापरण्यास सोपा व करता येण्याजोगा कोणताही पर्याय निवडा.

- वेगवेगळ्या बँकादेखील वेगवेगळे पर्याय आपणास देतात तेदेखील आपल्या गरजेप्रमाणे तपासून बघा.

- संबंधित बँकेकडे निवडलेल्या पर्यायांची नोंद करा.

- जर तुमच्याकडे अनेक बँकांची क्रेडिट कार्ड असतील तर शक्यतो एकच पासवर्ड किंवा संख्या पर्यायाची निवड करू नका.

सिक्रेट आयडेंटी


सिक्रेट आयडेंटी हादेखील ‘२FA’ मधील अजून एक लोकप्रिय प्रकार आहे. यासाठी जेव्हा तुम्ही तुमचे नेटबँकिंग खाते चालू करता तेव्हा नेटबँकिंगच्या प्रोफाईलमध्ये काही खास गोष्टीची माहिती जमा करावी लागते. उदा. तुमच्या फॅमिली डॉक्टरचे नाव, किंवा तुमचा आवडता खेळ, अथवा तुमचे जन्मठिकाण इ. एकदा का तुम्ही ही माहिती साठवून ठेवली की त्यावर जेव्हा जेव्हा तुम्ही नेटबँकिंगचा वापर कराल तेव्हा तेव्हा यापैकी कोणत्याही दोन गोष्टीची माहिती आपल्याला विचारली जाईल व जेव्हा ही माहिती खरी असेल तेव्हाच तो नेटबँकिंग व्यवहार पूर्ण होईल.


SMS टोकन

एश्ए टोकन हादेखील ‘२FA’ मधील एक लोकप्रिय प्रकार आहे. जेव्हा तुम्ही नेटबँकिंगचा वापर कराल तेव्हा पेमेंट कन्फर्मेशनआधी तुमच्या मोबाईलवर एक एश्ए टोकन पाठवले जाईल. हा टोकन क्रमांक जोपर्यंत तुम्ही तुमच्या इंटरनेटवरील संकेतस्थळावर टाकत नाही तोपर्यंत सदर व्यवहार पूर्ण होणार नाही. त्यामुळे जर तुम्ही ही सेवा घेतली असेल तर ऑनलाइन व्यवहार करताना तुमचा मोबाईल चालू ठेवणे गरजेचे आहे.




सौजन्य:- इंद्रधनू, सामना १३०९२०११.

Monday, September 12, 2011

पितृपंधरवडा/पितृपक्ष



भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद कृष्ण १५ या पंधरा दिवसांच्या कालावधीला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा म्हणतात.


या कालात पृथ्वीवरील (मृत्यूलोकातील) माणसांकडे त्यांचे पितर निवासासाठी येतात. हे देवलोकातून, मृत्यूलोकातून, नरकातून, प्रेतयोनीतील असू शकतात.

श्राध्दविधी - आपल्या ऐपतीप्रमाणे व इच्छेप्रमाणे


१) नुसते दूधकेळे, दक्षिणा

२) हिरण्य - पितरपूजन, गुरुजींना शिधा व दक्षिणा

३) संपूर्ण यथासांग विधी

-----------------------------

संपूर्ण यथासांग विधी -


लागणारे साहित्य व उपचार -

गोमूत्र शिंपडून वास्तू पवित्र करावी.

आपल्या घरातील देवांची पूजा करावी.

आपल्या पितरांच्या फोटोंना स्वच्छ करुन हार घालणे, चंदन लावणे, तुळस वाहणे, दिवा लावणे, उदबत्ती लावणे.


आपली सेवा घेण्यासाठी त्यांची विनंती करावी.


आपल्या पितरांची यादी - नाते, नावे, गोत्र यासहित तयार ठेवावे.


सकाळी नाश्त्याला उपवासाचे हलके जिन्नस करावेत.
---------------------------

आसन (दर्भ व कांबळे),

चंदनाचे गंध,

फूल (पांढरी फुले),

दीप (तुपाचा दिवा),

धूप,

उदक (पाणी),

काळे तीळ (स्नेह),

जानवे

सुपार्‍या

सातू

हळद

कुंकू

बुक्का

भस्म

लोकरगुंडा

ताम्हने

पळीपंचपात्र

कलश

सुटे पैसे

केळीची पाने

द्रोण

विड्याची पाने



चतुर्विध अन्न (शक्यतो घरी अन्न शिजवावे)

(भक्ष्य -चावण्याचे, पेय-द्रव, चोष्य- चोखण्याचे, लेह्य- चाटण्याचे (भात-वरण, गाईचे तूप, पायसम्‌, उडीद वडे, आमसुलाची चटणी, लिंबू, भाज्या, आमटी-कढी, दही इ.),मध

अत्तर

वस्त्र (ऐच्छिक),

त्रयोदशगुणी विडा,

दक्षिणा इ.

- काकबली

- गाईला घास

- आपल्या घरात काम करणार्‍यांना व नातेवाईकांना भोजन

- सर्वात शेवटी स्वतः भोजन करावे.

- रात्री हलका आहार घ्यावा.

श्रध्दापूर्वक व शक्तीनुसार व समंत्रक उत्तम वैदिक विप्रांना (एक देवांसाठी, एक पितरांसाठी -अर्यमा, एक श्राध्द प्रयोग चालविण्यासाठी) दिले असता आपल्या पितरांना ते ज्या योनीतील असतील (देव-गंधर्व-यक्ष-मनुष्य-पशू-प्रेत इ.) त्यायोग्य भोग त्यांना मिळतात. ते तृप्त झाल्याने त्यांचे आशीर्वाद श्राध्द करण्यार्‍या यजमानाला मिळतात.

पितरांविषयी श्राध्दपक्ष यात दिलेले आहे.

श्राध्द केल्याने एक वेगळेच समाधान मिळते.
ते न केल्याने आपले पितर असंतुष्ट होऊन भुकेले-तहानेले शाप देऊन निघून जातात. त्यांना प्रेतत्व येते. त्यांना मोक्ष मिळण्यात अडचण येते.

॥श्रीराम समर्थ॥

सौजन्य:- http://anusandhan.org/node/80

पितृपक्ष

भाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. या तिथीला सर्व पितरांना श्राद्ध घालतात. श्रद्धेने करावयाचे ते श्राद्ध. असा हा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला कुळाचार आहे. भाद्रपद कृष्णपक्ष हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपले निकटवर्तीय ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध घातले जाते. आपले मृत पूर्वज म्हणजेच पितर होय. या तिथीला काही धार्मिक विधींची परंपरा आहे. हा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष वा श्राद्धपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या तर्पणाचा पक्ष. तर्पण करावयाचे म्हणजे श्रद्धेने, मनोभावाने तृप्त करावयाचे.


समाजामध्ये सदविचार, सत्कर्मे वाढावी आपल्याला इतरांविषयी कळकळ वाटावी, कृतज्ञता वाटावी व त्यामुळे आपल्या हातून सत्कृत्ये घडावी यासाठी आपल्या पूर्वजांनी काही कुळाचार नेमून दिले आहेत. त्यापैकी पितरांना पिंडदान करणे हे एक. यादिवशी समाजातील दीनदुबळ्यांना अन्नदान करावे व पुण्यकर्म करावे. त्यांची क्षुधाशांती करून मने तृप्त व संतुष्ट करावीत. या दिवशी अनेक मंदिरातून, संस्थातून, घराघरातून अन्नदानाचे कार्यक्रम पार पडत असतात. भुकेल्याला जेवू घालणे हीच खरी ईश्वरसेवा आहे ही उद्दात भावना त्यामागे आहे.



पूर्वजांचे स्मरण केल्याने त्यांची सत्कर्मे आठविल्याने त्यातून आपल्याला स्फूर्ती, प्रेरणा मिळते. मन उत्साही होते.


अशा रितीने अन्नदानाचे महत्व सांगणारा हा पितृपक्ष आपण कृतज्ञतापूर्वक पाळला पाहिजे.

सौजन्य:- http://zampya.wordpress.com/

Sunday, September 11, 2011

Anant Chaturthi - अनंत चतुर्थी

ganeshaAnant Chaturthi (or Anant Chaturdashi) is the last day of the “Ganesh festival” celebrated in Maharashtra, Gujarat, Karnataka and Andhra Pradesh. It is the tenth day after Ganesh Chaturthi which falls on the 14th day of the bright Bhadrapada (the sixth month of Hindu calendar). The day follows the immersion of the idols of the beloved Lord but to be welcomed the next year with equal fervor. Some people observe a vow in honour of Lord Vishnu, which if kept for 14 years is supposed to bring wealth.


Story of 'Anant'

Hindu Mythology tells that, there was a Brahmin named Sumant. From his wife Diksha he had a daughter named Sushila. After the death of Diksha, Sumant married Karkash who was not caring to Sushila. She gave a lot of trouble to her. Sushila married to Kaundinya and decided to leave the house to avoid the nuisance of her step mother. On the way, Kaundinya went to a river to take bath and Sushila joined a women group who were worshipping “Anant”. Sushila was very curious to know the reason of worshipping. The women explained her, the purpose of this vow to obtain divinity and wealth, and are kept for 14 years.

Sushila decided to take the “Anant Vow” and slowly they became very rich. One day Kaundinya, noticed a string (Anant string) on Sushila's left hand. This string is usually tied on the left hand by women to observe the vow. When Kaundinya heard the story of the Anant vow, he was displeased and said that they had become rich, not for Anant but for his knowledge and efforts. He then took the Anant String from Sushila’s hand and threw it into the fire.

Soon after this incident, they were reduced to extreme poverty. Kaundinya realized the effect of the Anant and hence decided to undergo rigorous penance until the appearance of the God himself. He went into the forest. There, he saw tree full of mangoes but was covered with worms. He asked the tree if he had seen Anant but he got a negative reply. Then he asked lakes, cow, donkey, elephant but nobody could respond him positively. At last he prepared a rope to hang himself. But suddenly Anant appeared in the form of an old Brahmin and advised Kaundinya that if he made the 14 years vow, he would get back all his wealth and happiness. Lord Anant also explained the incidents occurred during the course of his way to meet him.

Festival ends…

On the day of Anant Chaturdashi, the idols of Lord Ganesha installed at home and various “Mandapas” (display place) are taken to a pond, lake, river or a sea in great procession with slogan: “ganpati bappa morya, agle baras to jaldi aa” ("father Ganpati, come again next year"). On this day, people travel to the water front with the idols, big and small, dancing and singing in large procession. The 10 day long festival comes to an end after the immersion ceremony is over.

सौजन्य:- http://www.festivalsofindia.in/AnantChaturthi/ 

Friday, September 09, 2011

आजारांना आधार फळांचा


आयुर्वेदात फलाहाराला महत्त्व आहे. कारण फळे निरनिराळ्या रोगांवर गुणकारी आहेत. त्याचाच हा मागोवा...


ऍसिडीटी : द्राक्ष, नारळ, शेंगदाणा, मध, गूळ, दही.


अस्थी झीज : सफरचंद, केळी, आंबा, काकडी, लसूण.

अस्थमा : लसूण.

कर्करोग : गाजर, आले, लिंबू, गदड लिंबू (इडलिंबू).

कॉलरा : कारले, नारळपाणी, काकडी, कांदा.

सर्दी खोकला : लसूण, आले, लिंबू, गडद लिंबू (इडलिंबू).

बद्धकोष्ठ : बदाम, कोबी, गाजर, काकडी, लिंबू, केळी, बीट, मका, अंजीर, किशमिश, सोयाबीन, पालक, गव्हाचे पदार्थ.

मधुमेह : बगाली चणा, कारले, मेथी, द्राक्ष, आवळा, शेंगदाणा, जांभूळ, राजमा, इडलिंबू, आंब्याची पाने, सोयाबीन.

जुलाब : केळी, गाजर, लसूण, शेंगदाणा, आवळा, जांभूळ, डाळिंब आणि आंब्याची कोय.

हृदयरोग : कोबी, गाजर, मध, सफरचंद, लसूण, कांदा, संत्र, द्राक्ष, आवळा, किशमिश, इडलिंबू.

रक्तदाब : सफरचंद, केळी, लसूण, इडलिंबू, लिंबू, कांदा, जव, किशमिश, सोयाबीन, सुरजमुखीच्या बिया.

शुगर : कारले, मेथी.

रोगप्रतिकारक शक्ती : टरबूज.

सुज : चेरी, लसूण, हळद, मसाला.

नपुंसकता : बदाम, उडीद डाळ.

कृमी : गाजर, पपई, टोमॅटो, डाळिंब.

कावीळ : उसाचे कांडे, मुळा.

किडनी स्टोन : सफरचंद, टोमॅटो.

अल्सर : लिंबू.

मूळव्याध : बीट, कारले, जांभूळ, कांदा, मुळा, लिंबू, चणे.

पिंपल्स : काकडी, लिंबू (चेहर्‍यावर लावण्यासाठी).

दंतदुखी : लिंबू, शेंगदाणे, सफरचंद, कांदा, डाळिंब, पालक.

डांग्या खोकला : लसूण, कांदा.

सौजन्य :- चिरायू, सामना.

‘शुभमंगला’ आधी सावधान...

समाजात हुंडाबळी, घटस्फोट, नवर्‍याकडून होणारी छळवणूक, फसवणूक असे प्रकार वारंवार समोर येतात. देवा, ब्राह्मणांच्या साक्षीने घेतलेल्या आणाभाका लग्नानंतर खोट्या का ठरतात? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. करिअर, पत्नी आणि एखाद्या कुटुंबात सून म्हणून जाताना पेलाव्या लागणार्‍या अनेक जबाबदार्‍या पार पाडायच्या म्हणजे तारेवरची कसरतच. मात्र यावरही मात करता येऊ शकते. ती म्हणजे लग्नाआधीच्या काऊन्सिलिंगने म्हणजेच समुपदेशनाने. लग्न तुटण्याच्या वळणावर आल्यानंतर समुपदेशन करण्यापेक्षा विवाहपूर्व समुपदेशन केव्हाही चांगलेच.


मुलगा आणि मुलगी हे दोघेही अशा काऊन्सिलींगच्या माध्यमातून आपल्या भावी आयुष्याविषयीच्या कल्पना, शंका, एकमेकांचे स्वभाव याविषयी जाणून घेऊ शकतात. ज्या कुटुंबात जायचे आहे अथवा ज्या मुलीशी विवाह करायचा आहे ती आपल्या घरात कशी रुळेल, घरातल्या मंडळींशी जुळवून घेऊ शकेल का? अशा असंख्य प्रश्‍नांची उकल काऊन्सिलिंगच्या माध्यमातून होऊ शकते.

भावी जोडीदार आणि सासरच्या मंडळीबाबत मुलीच्या मनात काही कल्पनाचित्र असते. एखाद्या चित्रपटातील गोड प्रसंग डोळ्यासमोर आणून ती जोडीदाराचे स्वप्न रंगवत असते. प्रत्यक्षात वास्तव दुसरेच असते. म्हणून आयुष्यातल्या खाचखळग्यांविषयी मुलींनी अधिक जागरुक असले पाहिजे. सगळे काही सुरळीत होईल असे न मानता येणारे प्रत्येक संकट कसे टाळायचे किंवा त्याला धीराने कसं तोंड द्यायचं हे ठरवून आपले नाते बळकट कसे होईल असा प्रयत्न मुलींनी केला पाहिजे. सासू-सासर्‍याव्यतिरिक्त घरातील दीर, भावजय किंवा नणंदेचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव व आवडी निवडीविषयी भावी जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोललं पाहिजे.

मुलींची दुहेरी भूमिका

चूल आणि मूल ही संकल्पना इतिहासजमा झाली असून महिला आता पुरुषांपेक्षाही कितीतरी पुढे निघून गेल्या आहेत. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच अनेक मुली स्वत:च्या पायावर उभ्या राहतात. लग्नानंतर नोकरी आणि पत्नी अशी दुहेरी भूमिका तिला वठवावी लागते. तेव्हा नोकरी, पती आणि कुटुंब यामधील संतुलन साधणे अत्यंत आवश्यक असते.

लग्नानंतरचे प्लॅनिंग

वंशाचा दिवा, खानदानचा वारस हवा असे म्हणत लग्न झाले की वर्षभरात मूल अंगणात खेळलं पाहिजे अशी इच्छा मुला-मुलींचे आई-वडील बाळगून असतात. मात्र आजच्या काळात विवाहानंतर मूल किती वर्षांनी हवे याचे देखील नियोजन करायला हवे. नोकरी करणार्‍या मुलींनी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला पाहिजे.

बिनधास्त बोला ...

विवाह हा मुलगा आणि मुलगी या दोघांच्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण. त्यामुळे याविषयी निर्णय घेताना मनात उठणारे प्रश्‍न दाबून ठेवून, घाई गडबडीत किंवा लोक काय म्हणतील याचा विचार न करता मनातील प्रत्येक प्रश्‍नावर काऊन्सिलरशी बिनधास्त बोला. अगदी सेक्सविषयीचे प्रश्‍न असले तरी न लाजता चर्चा करून मनातली घालमेल दूर करून मगच लग्नाचा निर्णय घेतला पाहिजे.

- सीमा कुलकर्णी
सौजन्य:- मानिनी, सामना.

‘चीज’ म्हणा लेटेस्ट डिजिटल कॅमेराज्

मोबाईलच्या क्रांतीमुळे कॅमेरा ही आता क्षुल्लक गोष्ट असली तरी अनेक सोनेरी क्षण टिपून घेण्यासाठी कॅमेरा हवा असतो. फोटोग्राफीतील तंत्रज्ञानात झालेल्या आमूलाग्र बदलांमुळे आता लहान मुलेदेखील सहजपणे फोटो काढू शकतात. डिजिटल कॅमेर्‍याच्या नवीन तंत्रज्ञानामुळे फोटोग्राफीचा छंद कोणीही जोपासू शकतो. या लेखात आम्ही तुम्हाला सध्या बाजारात असलेल्या लेटेस्ट कॅमेर्‍यांची माहिती देत आहोत. त्यांच्यातील वैशिष्ट्यांवर आधारित रेटिंग्जही दिले आहेत. त्यावरून तुम्हाला तुमचा कॅमेरा सिलेक्ट करता येईल.



सो गेट रेडी फॉर फोटो शूट ऍण्ड ‘से चीज!’

डिजिटल कॅमेर्‍यामध्ये जुन्या कॅमेर्‍याच्या तुलनेत असंख्य नवीन वैशिष्ट्ये आहेत. त्यातील काही प्रमुख वैशिष्ट्यांवर डिजिटल कॅमेरा घेताना लक्ष ठेवावे लागते.


- रिझुल्युशन : रिझुल्युशन म्हणजेच फोटोची स्पष्टता. जेवढे जास्त पिक्सेल तेवढेच जास्त रिझुल्युशन कॅमेर्‍याच्या मेगा पिक्सेल रिझुल्युशनवरून ठरते. त्यामुळे 1 मेगा पिक्सेलच्या कॅमेर्‍यापेक्षा 5 मेगा पिक्सेलच्या कॅमेर्‍यामध्ये तुम्हाला जास्त स्पष्टता व मोठी फोटोसाईज मिळू शकते.

- ऑप्टिकल झूम : फोटोची स्पष्टता वाढविण्यासाठी ऑप्टिकल झूम हा महत्त्वपूर्ण घटक आहे. ऑप्टिकल झूम अर्थात झूम लेन्सेस ज्याचा वापर करून फोटो काढला जातो. जेवढी जास्त ऑप्टिकल झूम तेवढीच जास्त फोटोची वैविधता आपणास मिळू शकते.

- फ्लॅश : आजकालच्या बहुतांशी डिजिटल कॅमेर्‍यांमध्ये फ्लॅश इन बिल्टच असतो, पण डिजिटल कॅमेरा घेताना ‘‘रेड आय रिडक्शन’’ हे वैशिष्ट्य असणारा डिजिटल कॅमेरा घ्यावा व गरज असल्यास एक्सटर्नल फ्लॅशचा पर्यायदेखील अजमावण्यास काहीही हरकत नाही.

- बर्स्ट मोड : म्हणजेच एकाच क्षेत्रात अनेक फोटो घ्यायचे अनोखे वैशिष्ट्य. याचा फायदा जर एखाद्या मोशनमध्ये असणार्‍या गोष्टीचा फोटो घ्यायचा असेल तर होतो. त्यामुळे तुम्ही एकाच वेळेस घेतलेल्या अनेक फोटोंपैकी चांगला आलेला फोटो निवडू शकता.

- एलसीडी स्क्रीन : आजकालच्या बहुतांशी डिजिटल कॅमेर्‍यांमध्ये मोठा एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. हवा तो फोटो आपण थेट या एलसीडी स्क्रीनमध्ये बघू शकतो. त्यामुळे पारंपरिक व्ह्यूफाईंडरचा वापर करण्याची गरज पडत नाही.

- यूएसबी कनेक्टिव्हिटी व जास्त क्षमतेचे मेमरी कार्ड असणे ही कोणत्याही डिजिटल कॅमेर्‍याची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात फोटो स्टोअर करू शकता व ते शेअरदेखील करू शकता.

Techno.savvy@live.com


सौजन्य:- इंद्रधनू, सामना.

नासपती

पावसाळ्या दरम्यान येणार्‍या नासपतीच्या गोड फळांचा उपयोग खाण्यासाठी तर आंबट फळांचा उपयोग औषधनिर्मितीसाठी केला जातो हे फळ बहुगुणी आहे


- नासपती मधुर, रुचकर, वातशामक असते. मुरांबा खाल्याने शौचाला साफ होते


- गोड नासपती खाल्याने मस्तक, फुप्फुसे व ह्रदयाची दुर्बलता दूर होते

- आजारी व्यक्तीला नासपती देण्यात येते पित्तप्रकोप दूर होतो तसेच रक्तामधील अतिरिक्त उष्णता दूर होते

- आंबट नासपती खाल्याने भूक लागते रक्तातिसार, संग्रहणी, जीर्णातिसार, मुरडा, उलटी आदी विकारांमध्ये फायदा होतो तसेच जठर व यकृताला बल प्राप्त होते.

सौजन्य:- आरोग्य, सामना.