नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरांचं रूप काही वेगळंच खुलून दिसतं. पारंपरिक दागिने, रंगीबेरंगी वस्त्र आणि तेज:पुंज देवीची प्रतिमा असा हा थाट बघण्यासारखा असतो. देवीला तयार करण्याची ही तयारी नेमकी कशी केली जाते, त्यासाठी कोणते विशेष प्रयत्न करावे लागतात हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. मुंबईसह महाराष्ट्रातील नऊ देवीं च्या नवरात्र सजावटीचा हा आँखो देखा हाल...
कोल्हापूरची अंबाबाई
कोल्हापूर येथील अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. बालाजीची पत्नी म्हणून अंबाबाईचा उल्लेख असल्याने खास पंचमी दिवशी तिरुपतीहून देवीला शालू येतो. नवरात्रोत्सवाच्या आधी मंदिराच्या खजिन्यातून देवीचे दागिने बाहेर काढले जातात. देवीच्या सेवेत यादव, आदिलशाही, छत्रपती शिवराय यांच्या काळातील हिरे, माणके, रूपे, सोने, चांदी आदी जडजवाहीर असल्याची माहिती इतिहास अभ्यासक उदयसिंह यादव यांनी दिली. उपयुक्त वाटतील अशा पद्धतीने रेणुकामाता, अन्नपूर्णामाता, विठ्ठल-रुक्मिणी, महिषासुरमर्दिनी, जोतिबा रूपातील पूजा बांधली जाते. दररोज रात्री शेजारतीपूर्वी देवीची पूजा उतरवली जाते.
- महादेव मिसाळ
महालक्ष्मी
मुंबईतल्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीचे नऊ दिवस भक्तांची अलोट गर्दी उसळते. या दिवसात देवीचं अलौकिक रूप पाहण्यासारखं असतं. नवरात्रीत देवीला खास सिल्कच्या काठापदराच्या साड्या नेसवल्या जातात. या साड्या मंदिराच्या ट्रस्टींतर्फे दिलेल्या असतात. नऊ दिवस देवीला नऊ साड्या नेसविण्याची पद्धत आहे. त्यासाठी कुठलाही रंग ठरलेला नसतो. महालक्ष्मी मंदिरात तीन देवींच्या मूर्ती आहेत. या तिन्ही देवींच्या साड्यांचे रंगही वेगवेगळे असतात. नवरात्रीतले नऊ दिवस या तीनही देवींचा मुखवटा सोन्याचा असतो. तसंच नवरात्रीत देवीला सर्व अलंकार चढविले जातात.
विरारची जीवदानी
जीवदानी गडाच्या 400 मीटर उंचीवर जीवदानी मातेचे भव्य मंदिर आहे. मंदिरात देवीची अडीच फूट उंचीची मूर्ती आहे. दररोज पहाटे 4 वाजता देवीचा साजशृंगार होतो. प्रतिपदेला तिचा शृंगार असतो त्यावेळी पिवळी साडीचोळी देवीला नेसवतात, तर अष्टमीला हिरवी साडीचोळी नेसवली जाते. विजयादशमीला सीमोल्लंघन करणारी माता ही लाल साडीत असते. ते तिचे चंडिकेचे रूप असते. भक्तांनी देवीला अर्पण केलेला साड्या नवरात्राच्या या तीन तिथींव्यतिरिक्त इतर दिवशी देवीला नेसविण्यात येतात. देवीच्या गळ्यात लक्ष्मीहार, नाकात नथ, कानात कुडी, झुमके, पायात पैंजण, हातात बांगड्या, दंडावर बाजूबंद असे महाराष्ट्रीयन पद्धतीचे सोन्याचे दागिने शृंगाराला साज म्हणून चढवितात.
आडिवर्याची महाकाली
आडिवर्याची महाकाली ही भक्तांच्या नवसाला पावणारी. त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या दर्शनाला भक्तांची गर्दी होते. देवीला वर्षभर लोक ज्या ज्या साडीचोळीची ओटी भरतात त्या सर्व साड्यांपैकी सर्वात चांगली अशी एक साडी देवीला नेसवली जाते. ही साडी शक्यतो हिरव्या रंगाचीच असते. ही साडी नऊ दिवस तशीच ठेवली जाते. परंपरागत वापरात असलेले दागिनेच नवरात्रीत देवीला घातले जातात.
सप्तशृंगीचा साजशृंगार
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी मातेचा नवरात्रोत्सवात साजशृंगार करून देवीला नटविले जाते. सोमवारी पांढर्या रंगाचा शालू नेसवला जातो. देवीच्या कपाळावर ओम आकाराचे कुंकू लावले जाते. मंगळवारी हिरव्या रंगाचा शालू असतो. कपाळावर कुंकू लावलं जातं. बुधवारी गुलाबी रंगाचं महावस्त्र आणि बदाम आकाराचं कुंकू काढलं जातं. गुरुवारी पिवळ्या रंगाचा शालू आणि स्वस्तिक आकाराचं कुंकू असतं. शुक्रवारी जांभळ्या रंगाचा शालू नेसवून कपाळावर पाकळी किंवा पिंपळपान कुंकवानं काढलं जातं. शनिवारी सर्व रंग असलेला शालू नेसवून देवीच्या कपाळावर शंखाचा आकार असलेले कुंकू काढलं जातं. रविवारी तांबड्या रंगाचं महावस्त्र नेसवून सूर्याच्या आकाराचे कुंकू देवीच्या कपाळावर लावलं जातं. देवीला अनेक प्रकारचे दागिने आहेत. टोप, पुतळीहार, नथ, मणिमंगळसूत्र, ठुसी, कमरपट्टा, कर्णफुले, हातात बांगड्या, रुद्राक्षमाळा, लक्ष्मीहार इत्यादी अलंकारांनी देवीला सजविलं जातं तसेच देवीच्या मुखात तांबूल विडा ठेवला जातो.
- लक्ष्मीकांत पाठक
तांबडी जोगेश्वरी
पुण्याची ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी देवीची ख्याती जगभर पोहोचली आहे. नवरात्रीमध्ये तर देवीच्या मंदिरामध्ये भाविकांचा अक्षरश: पूर लोटतो. तांबडी जोगेश्वरी देवीचे वैशिष्ट्य म्हणजे नऊ दिवस देवीची विविध वाहनांवरील साकारण्यात येणारी रूपे. अर्थात दरवर्षी ही रूपे बदललीही जातात. प्रत्येक दिवशी वेगळी साडी आणि सजावटही नवी असते. जशी साडी आणि तिचे रूप त्याला साजेसे दागिने देवीला घालते जातात. महालक्ष्मीचे रूप असले की कोल्हापुरी साज, तोडे असे पांरपरिक पद्धतीच्या सोन्याच्या दागिन्यांनी देवीला सजविण्यात येते. बहुतांश सोने आणि मोत्याच्या प्रकारातील दागिने असतात. देवीला सजविण्याचे काम मंदिराचे पुजारीच करतात अशी माहिती तांबडी जोगेश्वरी मंदिराचे ज्ञानेश बेंद्रे यंानी दिली.
- मेधा पालकर
रेणुकादेवी
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या रेणुकामातेच्या मंदिरातही नवरात्रीत भक्तांच्या रांगाच रांगा लागतात. पिवळा व हिरवा हे रंग शुभ मानले जात असल्यामुळे या देवीला नवरात्रीत या दोन रंगांपैकीच एका रंगाची साडी नेसवली जाते. रेणुकामातेला पहिल्या दिवशी नेसवलेली साडीच नऊ दिवस ठेवतात. ललिता पंचमीच्या महापूजेसाठी देवीला सर्व विशेष अलंकार चढविले जातात. त्यात देवीला बिंदीपासून कानातले, बोरमाळ असे विविध दागिने घातले जातात. दररोज देवीला मोगर्याचे गजरेही माळले जातात.
- विजय जोशी
मुंब्रादेवी
मुंब्य्रााच्या डोंगरावर वसलेली मुंब्रादेवी म्हणजे ठाणे जिल्ह्यातील लोकांचं आराध्यदैवत. नवरात्रीचे नऊ दिवस या मंदिरात मोठा उत्सव असतो व त्या उत्सवासाठी देवीला अतिशय सुंदररीत्या सजवलेले असते. भक्तांनी देवीला अर्पण केलेल्या साड्यांपैकी नऊ हिरव्या साड्या देवीला नऊ दिवस नेसविल्या जातात. या देवीच्या गळ्यात अनेक अलंकार असतात; पण त्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतं ते मोठी सोन्याच्या व काळ्या मण्यांची माळ. या माळेला मोठं पानांचं पेण्डंटही आहे. मंगळसूत्रासारखी दिसणारी ही माळ देवीचं सौंदर्य अधिक खुलवते.
एकवीरा देवी
कार्ल्याच्या डोंगरात स्थानापन्न झालेली एकवीरा आई ही अनेक भक्तांचं श्रद्धास्थान. यंदा एकवीरा आईला नऊ ट्रस्टींनी दिलेल्या नऊ साड्या नेसविण्यात येणार आहेत. या साड्यांचे रंग ठरलेले नसतात. पुजारी ठरवतील ती साडी देवीला नेसवली जाते. आजपर्यंत नवरात्रीत एकवीरा देवीला भक्तांनी दिलेल्या साड्याच नेसविल्या जायच्या. तसंच अष्टमीच्या दिवशी गाभारा पूर्ण फुलांनी सजविला जातो. नवरात्रोत्सवात देवीचे सर्व दागिने चढविले जातात.
- मच्छिंद्र खराडे
सौजन्य:- फुलोरा, सामना २४०९२०११.

No comments:
Post a Comment