आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राला सुरूवात होते या दिवसात आदिशक्तीची उपासना केली जाते तेजस्वरुपाची, शक्तीची उपासना केली जाते श्री महालक्ष्मी ही मुख्य देवता असून श्री महाकाली, श्री महासरस्वती ही तिचीच प्रासंगिक रुपं आहेत इतर नावांनीही या त्रिशक्ती प्रसिद्ध आहेत नवरात्रीत या देवीच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते या नवरात्रीनिमित्त हिंदुस्थानातील काही मंदिरांविषयी थोडंसं
* चंडिका मंदिर
कोकणात दापोली-दाभोळ रस्त्यावर (२३ कि.मी.) दाभोळच्या अलीकडे दगडाच्या काळ्या काताळांत चंडिका देवीचे भूमिगत मंदिर आहे. बाहेर फक्त दगडी कातळ आहे पण डोंगरात ताशीव काम करून मंदिराचे प्रांगण करण्यात आले आहे. हे पांडवकालीन देवी मंदिर आहे. एखाद्या गुहेत शिरावे तसे काळ्याकुट्ट अंधारातून आपण खाली येतो. आत पाण्यातून चालत आपण अंदाज घेत मूर्तीसमोर येतो.
* कच्छची आशापुरा
भक्तांच्या आशाआकांक्षा पूर्ण करणारी, भक्तांचे अत्यंत आदराचे व श्रद्धेचे ठिकाण म्हणजे कच्छची ‘आशापुरा’. कच्छ (गुजरात) व सिंध (पाकिस्तान) मधील जवळिकी (धार्मिकदृष्ट्या) सांगणारे हे देवीचे श्रद्धास्थान. भूजपासून आखाताकडे जाणार्या राज्य मार्गावर ९५ कि.मी.वर वसलेले मातानुमद (मातेचा मठ) हे ठिकाण. येथील देवी फक्त कमरेपर्यंतच वर आलेली आहे. एक आख्यायिका त्यामागे आहे. (माहुरची रेणुका व अंबाजोगाई अंबाभवानीदेखील पूर्ण स्वरूपात वर आलेली नाही.) देवीचे मंदिर छोटेसेच, पण आकर्षकपूर्वक संगमरवराचे आहे. त्रिदेवीचे आशापुरा हे एकच स्वरूप आहे. कच्छची मालकीण (देवी) म्हणून भक्तांच्या हृदयात वास करून आहे. सिंधमधील प्रसिद्ध असलेल्या हिंगलाज देवीचे हे द्वितीय स्वरूप आहे. येथे वर्षातून तीनवेळा नवरात्रोत्सव संपन्न होतो. जैन धर्मीयांची ही कुलदेवता आहे.
मनालीची हिडिंबा
मनालीच्या दाट वृक्षराजीतील देवीचे पुरातन मंदिर मनालीचे मोठे भूषण आहे. भीमपुत्र घटोत्कचाची आई दैत्यपुत्री हिडिंबेने दुर्गेची तपश्चर्या केली व तिला देवत्व पावले. दगडी व लाकडी बांधणीचे पॅगोडा प्रकारचे छोटेसे मंदिर फारच आकर्षक आहे. मंदिराचे प्रवेशद्वार छोटे असल्याने आत वाकूनच प्रवेश करावा लागतो. मंदिरावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. आत देवीची छोटी मूर्ती आहे. सोबत अन्य देवताही आहेत. नवरात्रीत येथे मोठा उत्सव असतो.
देशनोकची करणीमाता
बिकानेर-जोधपूर मार्गावर देशनोक नावाचे छोटेसे रेल्वेस्थानक आहे. तेथे जवळच करणीमातेचे मंदिर आहे. भक्तांचे ते मोठे श्रद्धास्थान आहे. छोटेसे किल्लास्वरूप मंदिरवास्तू आहे. १३८७ला जोधपूर जिल्ह्यातील फाळोडीजवळील सुरण गावातील बहुकन्यका असलेल्या घरात दुर्गेने जन्म घेतला. लहानपणापासून अनेक चमत्कार करून व भक्तांना सुपथावर लावून १५१ वर्षांनी तिने आपली अवतार समाप्ती केली. मंदिर परिसरात राखाडी रंगाचे उंदिर बिनधास्तपणे फिरत असतात. देवीपुढे ठेवलेल्या परातीमधील खीर ते पितात. तेथे त्यांना पूर्ण अभय आहे. आत कुत्रा वा मांजर येत नाही. हे उंदिर पूर्वाजन्मीचे पुजारी असल्याची भक्तांत भावना आहे. मंदिरातील पुजारी मृत्यूनंतर उंदिर बनून देवीच्या सहवासात राहतात असे समजते. बिकानेरपासून देशनोकसाठी भरपूर बससेवा उपलब्ध आहे.
* एकवीरा देवी व अंबामाता
हजारो वर्षांपासून विदर्भाचे महान शक्तिस्थान असलेली एकवीरा देवी आहे. ती अंबाबाईची मोठी बहीण समजली जाते. अंबाभवानीच्या दक्षिणेस अंबानाल्याच्या पलीकडे या देवीचे स्थान आहे. एकवीरा देवीची स्थापना महान तपस्वी सद्गुरू जनार्दन स्वामींनी केली. सप्तशती पाठाच्या प्रारंभीच एकवीरा देवीच्या अवताराची कहाणी दिसते. माहूरच्या रेणुकेचे हे स्वरूप आहे. असेच स्वरूप नगर व पुण्याजवळील कार्ल्याजवळच आहे. रेणुकेच्या पाच पुत्रांत परशुराम हा धाकटा पराक्रमी पुत्र. हा एकच वीर पुत्र जन्मल्याने रेणुकेला एकवीरा म्हणून भूतलावर ओळखू लागले. ही देवी कायस्थ, पाठारे प्रभू, कोळी आदींची कुलस्वामिनी आहे. ती उग्र स्वरूपाची असून रक्तदंती, नीलवर्णी, मोठे विशाल डोळे असलेली आहे. तिच्या हातात शस्त्रे आहेत. ही ब्रह्मरूपिणी अयोनिसंभवा होती. याच अमरावतीपासून ४२ कि.मी. अंतरावर वर्धा नदीकाठी ‘कौंडिण्यपूर’ आहे. रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करण्याचे योजिले होते पण रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णालाच मनोमन वरले होते. रुक्मिणी अंबामातेचे दर्शन घेण्यासाठी आली असताना पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे खिडकीच्या बाहेर तयार ठेवलेल्या रथात घालून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले. मंदिर पुरातन असून ती खिडकी आजही त्या घटनेची साक्षीदार आहे. मंदिर पूर्ण दगडी असून आत गारवा जाणवतो.
- रामकृष्ण अभ्यंकर
सौजन्य:- देव्हारा, सामना २६०९२०११.

No comments:
Post a Comment