Monday, September 12, 2011

पितृपंधरवडा/पितृपक्ष



भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद कृष्ण १५ या पंधरा दिवसांच्या कालावधीला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा म्हणतात.


या कालात पृथ्वीवरील (मृत्यूलोकातील) माणसांकडे त्यांचे पितर निवासासाठी येतात. हे देवलोकातून, मृत्यूलोकातून, नरकातून, प्रेतयोनीतील असू शकतात.

श्राध्दविधी - आपल्या ऐपतीप्रमाणे व इच्छेप्रमाणे


१) नुसते दूधकेळे, दक्षिणा

२) हिरण्य - पितरपूजन, गुरुजींना शिधा व दक्षिणा

३) संपूर्ण यथासांग विधी

-----------------------------

संपूर्ण यथासांग विधी -


लागणारे साहित्य व उपचार -

गोमूत्र शिंपडून वास्तू पवित्र करावी.

आपल्या घरातील देवांची पूजा करावी.

आपल्या पितरांच्या फोटोंना स्वच्छ करुन हार घालणे, चंदन लावणे, तुळस वाहणे, दिवा लावणे, उदबत्ती लावणे.


आपली सेवा घेण्यासाठी त्यांची विनंती करावी.


आपल्या पितरांची यादी - नाते, नावे, गोत्र यासहित तयार ठेवावे.


सकाळी नाश्त्याला उपवासाचे हलके जिन्नस करावेत.
---------------------------

आसन (दर्भ व कांबळे),

चंदनाचे गंध,

फूल (पांढरी फुले),

दीप (तुपाचा दिवा),

धूप,

उदक (पाणी),

काळे तीळ (स्नेह),

जानवे

सुपार्‍या

सातू

हळद

कुंकू

बुक्का

भस्म

लोकरगुंडा

ताम्हने

पळीपंचपात्र

कलश

सुटे पैसे

केळीची पाने

द्रोण

विड्याची पाने



चतुर्विध अन्न (शक्यतो घरी अन्न शिजवावे)

(भक्ष्य -चावण्याचे, पेय-द्रव, चोष्य- चोखण्याचे, लेह्य- चाटण्याचे (भात-वरण, गाईचे तूप, पायसम्‌, उडीद वडे, आमसुलाची चटणी, लिंबू, भाज्या, आमटी-कढी, दही इ.),मध

अत्तर

वस्त्र (ऐच्छिक),

त्रयोदशगुणी विडा,

दक्षिणा इ.

- काकबली

- गाईला घास

- आपल्या घरात काम करणार्‍यांना व नातेवाईकांना भोजन

- सर्वात शेवटी स्वतः भोजन करावे.

- रात्री हलका आहार घ्यावा.

श्रध्दापूर्वक व शक्तीनुसार व समंत्रक उत्तम वैदिक विप्रांना (एक देवांसाठी, एक पितरांसाठी -अर्यमा, एक श्राध्द प्रयोग चालविण्यासाठी) दिले असता आपल्या पितरांना ते ज्या योनीतील असतील (देव-गंधर्व-यक्ष-मनुष्य-पशू-प्रेत इ.) त्यायोग्य भोग त्यांना मिळतात. ते तृप्त झाल्याने त्यांचे आशीर्वाद श्राध्द करण्यार्‍या यजमानाला मिळतात.

पितरांविषयी श्राध्दपक्ष यात दिलेले आहे.

श्राध्द केल्याने एक वेगळेच समाधान मिळते.
ते न केल्याने आपले पितर असंतुष्ट होऊन भुकेले-तहानेले शाप देऊन निघून जातात. त्यांना प्रेतत्व येते. त्यांना मोक्ष मिळण्यात अडचण येते.

॥श्रीराम समर्थ॥

सौजन्य:- http://anusandhan.org/node/80

1 comment:

THANTHANPAL said...

भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद कृष्ण १५ या पंधरा दिवसांच्या कालावधीला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा म्हणतात.
पितृपंधरवडा/ पितृपक्ष या कालात पृथ्वीवरील (मृत्यूलोकातील) माणसांकडे त्यांचे पितर निवासासाठी येतात. हे देवलोकातून, मृत्यूलोकातून, नरकातून, प्रेतयोनीतील असू शकतात. अश्या खोट्या भ्रामक चुकीच्या मूर्खपणाच्या अंधश्रद्धा समाजात पसरवून सामान्य , बहुजन जनतेला लुबाडण्याचा राजरोस चालणारा हा उच्चवर्णीय वर्गाचा कुटील डाव मोडून काढण्याची आज गरज आहे. एकदा मेल्यावर सगळे संपते. त्या नंतर मानवी आत्म्याचे काय होते हे जगातील जिवंत असणाऱ्या कोणत्याही मानवाला माहीत नाही. आणि याचाच गैरफायदा घेत सामान्य, अडाणी जनतेला लुबाडण्याचा धंदा गेली हजारो वर्ष चालू आहे. श्राद्धात सांगितलेले वस्त्र (ऐच्छिक), त्रयोदशगुणी विडा, दक्षिणा इ. प्रकार करून आपल्या आई वडीलांच्या आत्म्यास शांती मिळवण्या पेक्षा , ते जिवंत असताना त्यांना चार घास सुखाने, प्रेमाने खाऊ दीले, त्यांचा आत्मसन्मान जपला, त्यांना मानाने वागवले तर ते प्रेत योनीत भूत योनीत कश्याला जातील.
ज्या मुलांना तळहाताच्या फोडा प्रमाणे प्रेमाने जपले, दुधा पेक्षा साय महत्वाची म्हणत नातवंडाना त्यांनी सांभाळलेले असते, असे ते आई वडील, नातुचे आजी आजोबा मेल्यावर आपल्या मुलाला सुनेला नातवंडाना छळायला कश्याला या जगात येतील . हा साधा विचार सुद्धा आपण करत नाही ही आपल्या समाजाची शोकांतिका.
आई वडीलांच्या नावाने जेवण देण्याची जर एव्हढीच हौस असेल तर कोण्या अनाथ घरातील विद्यार्थ्यांना जेवण द्या, त्यांच्या शिक्षणा करता मदत करा, रात्री अंधारात रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्या गरीबाच्या अंगावर चादर घाला हीच खरी सेवा. उगीच ज्यांच्या कडे आहे त्यांना वस्तू देऊन तुमच्या पितरांना नक्कीच शांती लाभणार नाही. अनाथांचे नाथ व्हा हीच खरी ईश्वर सेवा...........