Sunday, March 27, 2011

घरटं - लांबलेला पाळणा

लग्नाचे लाडू खाऊन वर्ष होत आलं. आता पेढे कधी देताय...? प्रत्येक नवीन जोडप्याला आत्या, मावश्या, काक्या, माम्या अशा नातेवाईकांकडून प्रत्येक भेटीत हा प्रश्‍न विचारला जातो. पण, गेल्या काही वर्षांत हा प्रश्‍न विचारण्याची वेळ त्यांच्यावर बर्‍याचदा यायला लागलीय. कारण लग्नानंतर किमान काही वर्षं तरी मूल नको, असा हल्ली अनेक जोडप्यांचा निर्णय असतो.

काही वर्षांपूर्वीपर्यंत लग्नाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच पहिल्या बाळाचं बारसं झालेलं असायचं. जणू काही याचसाठी लग्न केलं होतं, असं ठरवून जराही वेळ न दवडता घरात पाळणा हालायचा. आता मात्र परिस्थिती तशी राहिलेली नाही. हल्ली अनेक जोडपी ठरवून पाच किंवा अधिक वर्षं मूल नको असा निर्णय घेतात.


खरं तर स्त्रियांच्या नोकरी करण्याचा याच्याशी फारसा संबंध नाही, असं बायकांशी बोलताना लक्षात येतं. याआधीही बायका नोकरी करतच होत्या. मात्र बहुसंख्य लग्नं अगदी पारंपरिक पद्धतीने, म्हणजेच मुलाला मुलगी पसंत आहे पद्धतीने होत होती. यात, लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ देणं वगैरे गोष्टींना थारा नव्हता. त्यामुळे नोकरी करणार्‍या बायकाही लग्नानंतर वर्षाच्या आत मॅटर्निटी लिव्हवर जात होत्या.

साधारणपणे गेल्या दशकभरात अरेंज्ड मॅरेजमध्येसुद्धा मुलामुलींनी लग्नाआधी भेटणं, फिरायला जाणं रूढ झालं. त्यामुळे एकमेकांना समजून घ्यायला, आपल्या दोघांमध्ये एक तिसरी व्यक्ती येण्याअगोदर आपण एकमेकांना पुरेसा वेळ द्यायला हवा, ही जाणीव निर्माण झाली. शिवाय, बायका फक्त नोकरीऐवजी करिअरचा विचार करू लागल्या. मध्यमवर्ग झपाट्याने बदलत उच्च मध्यमवर्गात सामील झाला.

या सगळ्याचे अनेक परिणाम दिसू लागले. त्यातीलच एक म्हणजे अनेक घरांमध्ये पहिला पाळणाच पाचेक वर्षांनंतर हलू लागला.

ओळखीतल्या एका जोडप्याने नीट वेळापत्रकच आखून ठेवलंय. लग्नानंतर पाच वर्षं कर्ज संपवून टाकायचं. मधल्या काळात स्वतःचं घर, एक गाडी आणि पाच वर्षांनंतर मूल! दोघंही नोकरी करणारे. शिवाय, कामात सतत पुढे जाण्याची आस बाळगणारे. त्यामुळे सध्या त्यांना एकमेकांसाठीच वेळ नाही. त्यात मूल जन्माला घालून त्याच्यावर कशाला अन्याय करायचा?

आसपासच्या तरुण जोडप्यांना पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्यांच्यातलं शेअरिंग वाढलंय. एकमेकांना वेळ देणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. नोकरी करणार्‍या जोडप्यांमध्ये तर वीकेण्ड म्हटलं की शॉपिंग, मुव्ही, डिनर हे समीकरणच रूढ झालंय. त्यामुळे घरात बाळ येण्याआधी ही सगळी मजा मनसोक्त करून घ्यायची, असाही एक विचार यामागे असतो.

कुटुंबनियोजनाची साधनं, वाढतं वय, दगदगीचं जीवनमान यामुळे दोघांच्याही शरीरावर परिणाम होऊन गुंता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळेच, अनेक जोडपी सुरुवातीलाच योग्य वैद्यकीय सल्ला घेतात. पाच वर्षांनी चान्स घ्यायचा, यासाठी आम्ही स्वतःला मेंटलीही तयार केलंय. पण सगळी काळजी घेऊनही मूल होण्यात अडचण आलीच तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत, असं एका मैत्रिणीने अगदी ठामपणे सांगितलं.

विचारांमध्ये स्पष्टता आणि ठामपणा असल्यामुळे हल्लीची ही तरुण जोडपी नातेवाईकांच्या प्रश्‍नांनाही बधत नाहीत. लग्नाला काही वर्षं उलटल्यानंतरही मूल नसेल तर अशा जोडप्यांकडे बर्‍याचदा संशयाच्या, दयेच्या नजरेने पाहिलं जायचं. स्त्रियांना तर टोमणेही ऐकावे लागायचे. पण आता, ‘आमचं प्लॅनिंग आहे,’ असं एखादी नववधूही कॅज्युअली सांगून जाते.

मात्र, कुटुंबनियोजनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आर्थिक आहे. गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गाची जीवनपद्धतीच बदलली. अडीच वर्षांच्या मुलाला शाळेत प्रवेश घेण्यासाठीही हल्ली तीस ते चाळीस हजार रुपये एकरकमी लागतात. शिवाय, प्रत्येक वाढदिवसाला मॅकडोनाल्ड किंवा तत्सम रेस्तरॉंमध्ये पार्ट्या, महागडी गिफ्ट्स, वीकेण्डला मॉल्सच्या फेर्‍या, मुलांची स्वतंत्र रूम, त्यात थीमप्रमाणे सजावट ही सगळी सुखं आपल्याही मुलांना मिळावी, ही प्रत्येक आईबापाची इच्छा असते. पण, इतक्या सुखांसाठी खूप पैसे लागतात. खूप पैसे कमावण्यासाठी खूप काम करावं लागतं... आणि खूप काम करावं लागतं म्हणून ज्याच्यासाठी हे सगळं करायचं, त्याचं आगमनच लांबतं.

Saturday, March 26, 2011

कॉर्पोरेट मंत्र - मी कोण?

चांगल्या-वाईटाच्या शर्यतीत आपण दररोज स्वत:ला कोर्टात गुन्हेगाराला उभे करतात तसे उभे करून असतो. आपण चांगले आहोत हेच ऐकण्याची इच्छा असते. सर्वांना आयुष्याच्या कोर्टात निकाल आपल्याच बाजूने लागावा असे वाटत जरी असले तरी तसे होईलच असे नाही. दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात यावर आपण आपली प्रतिमा बांधत असतो. राहून जाते ते स्वत:ला विचारणे की ‘मी कोण?’


एक चित्रकार होता. गुरूचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता. गुरू व स्वत:च्या कलेवर त्याला प्रचंड विश्‍वास होता. पण स्वत:वर त्याचा विश्‍वास फारसा नसावा. तीन दिवस परिश्रम करून त्याने एक सुंदर चित्र काढले. पण ‘आपले चित्र चांगले आहे का?’ हा प्रश्‍न त्याला कुणाला तरी विचारावासा वाटला. एका गजबजलेल्या रस्त्यावर त्याने त्याचे ते चित्र लावले. त्याखाली एक पाटी लावली, मी हे काढलेले चित्र तुम्हाला कसे वाटले? यात कुठेही चूक वाटली तर त्याजागी एक छोटीशी फुल्ली मारा.’ लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्याकरता संध्याकाळी तो पोहोचला. संपूर्ण चित्र फुल्ल्यांनी भरलेले पाहून त्याचे डोळे भरले. काही लोकांनी तर चुका काय तेही लिहिले होते. चित्रकाराचा जीव तुटला. तो धावत आपल्या गुरूकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हरलो. मी खूप वाईट चित्रकार आहे. मी चित्रकला सोडायला हवी. मी संपलो.’ हे ऐकून गुरूने म्हटले, ‘तू व्यर्थ नाहीस. तू फार चांगला चित्रकार आहेस. मी ते सिद्ध करू शकतो. असेच सारखे एक चित्र काढ आणि माझ्याकडे घेऊन ये. तसेच चित्र परत काढून चित्रकार दोन दिवसांनी गुरूकडे आला. गुरू त्या चित्रकाराला परत त्याच गजबजलेल्या रस्त्यावर घेऊन आला. ते चित्र परत रस्त्यावर ठेवले आणि खाली एक पाटी लिहिली, ‘मी हे चित्र काढले आहे. काही चुका आहेत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा.’ ही पाटी लावून ते दोघे निघाले. संध्याकाळी परत जाऊन त्यांनी पाहिले तर कुणीही त्या चित्राला हातदेखील लावला नव्हता. सहा-आठ दिवस ते चित्र तसेच राहिले. यावर गुरू म्हणाले, ‘फुल्ल्या मारणे सोपे असते, पण दुरुस्ती करणे कठीण असते.’ दुनियेच्या कोर्टात स्वत:ला उभे करू नका. सगळ्यांची मतं ऐका, पण इतरांच्या मतांनी तुटू नका. मी कोण आणि कसा हे पहिले स्वत:ला विचारा. टीका करणारे प्रत्येक पावलाला भेेटतील. त्या टीकांचे वार घेऊन जीव सोडू नका. चुका होतील, सर्वांच्याच होतात. त्या सुधारा. चुका म्हणजे आयुष्याचा अंत नाही. दुसर्‍यांनी कमी लेखले म्हणून आपण कमी होत नाही. तुम्ही कसे आणि कोण ते स्वत:च ठरवा. टीकांनी त्याचा हिशेब नका करू. तुम्हीच ठरवा, ‘मी कोण?’

सौजन्य:- थर्ड जनरेशन, सामना dr.swapnapatker@gmail.com

संगणकावर मराठी लेखन

आज आपण संगणकावर मराठीत टंकनासाठी उपलब्ध असणारी काही सॉफ्टवेअर्स बघणार आहोत. ही सॉफ्टवेअर्स मोफत अर्थात फ्री असल्याने तुम्ही ती फुकटात आपल्या संगणकावर डाऊनलोड करून घेऊ शकता.
आज आपण संगणकावर मराठीत टंकनासाठी उपलब्ध असणारी काही सॉफ्टवेअर्स बघणार आहोत. ही सॉफ्टवेअर्समुक्त अर्थात फ्री असल्याने तुम्ही ती फुकटात आपल्या संगणकावर डाऊनलोड करून घेऊ शकता.


ओंकार जोशी या मराठी तरुणाने तयार केलेल्या ‘ग म भ न’ या सॉफ्टवेअरचा उल्लेख सर्वात आधी यायलाच पाहिजे. मराठी संगणक वापरकर्ते, मराठी संस्थळे यांच्यासाठी ‘ग म भ न’ हे एक वरदान ठरले आहे. आज अनेक मराठी संस्थळे ‘ग म भ न’च्या आधारावर रसिकांच्या सेवेला हजर झाली आहेत ती त्यातील सहज सोप्या अशा मराठी टंकनाच्या सुविधेमुळे. ‘ग म भ न’ने मराठी टंकनाची भीती दूर करण्यास मोलाचा हातभार लावला आहे हे निश्‍चित.

‘ग म भ न’मध्ये मराठीसह इतर लिपी जसे की तामीळ, तेलगू, हिंदी, गुजराती, गुरुमुखी, बांगला इ.सुद्धा उपलब्ध आहेत. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही टंकलेले सर्व काही साठवून ठेवण्याचीदेखील सोय आहे. इंटरनेटवर ऑफलाइन असतानादेखील तुम्ही हे सॉफ्टवेअर वापरू शकता हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. फायरफॉक्स असो अथवा आय इ सारखा ब्राऊझर. ‘ग म भ न’ दोन्ही ठिकाणी अत्यंत उत्तमरीत्या कार्यरत होते. हे सॉफ्टवेअर आपण http://www.gamabhana.com/ येथून मिळवू शकतो.

या संस्थळावर आपल्याला ‘ग म भ न’विषयी संपूर्ण माहिती, त्याच्या वापरासंबंधी मार्गदर्शन मिळते. तसेच ‘ग म भ न’ वापरताना काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी फोरमदेखील इथे उपलब्ध आहे. वापरकर्त्याला सहसा भेडसावणार्‍या प्रमुख अडचणीविषयी इथे सविस्तर मार्गदर्शनदेखील करण्यात आले आहे.

‘ग म भ न’च्या जोडीलाच नाव घेतले जाते ते ‘बरहा’ या मुक्तस्रोत सॉफ्टवेअरचे. सॉफ्टवेअरला मराठीत संगणकप्रणाली म्हणतात. बरे मित्रांनो, ‘बरहा’ हा खरेतर मूळ कन्नड शब्द आहे. याचा अर्थ होतो ‘लिखाण.’ ‘बरहा’ मराठीबरोबरच देवनागरी, आसामी, कोकणी, सिंधी अशा आणि इतर बर्‍याच भाषांसाठी उपलब्ध आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, कुठल्याही ई मेलचे अकाऊंट, ऑर्कुट, फेसबुक यावर आपण बरहाच्या सहाय्याने थेट मराठीत लिहू शकतो. आहे का नाही छान फायद्याची अशी ही संगणकप्रणाली ? इकडून लिहून आणा, तिकडे पेस्ट करा या भानगडीच नकोत. हवे तिथे थेट मराठीत लिहायला सुरुवात करायची.

‘बरहा’मध्ये एक बरहापॅड हा एक प्रोग्रॅम असून त्यामध्ये आपण मराठी व इतर उपलब्ध असलेल्या सर्व भाषांत लेखन करू शकतो. एकदा लिहिलेले पुन्हा संपादितदेखील करू शकतो. http://www.baraha.com/ या संस्थळावरून आपणही संगणकप्रणाली आपल्या संगणकावर डाऊनलोड करून घेऊ शकता. बरहामध्ये टाईप कसे करावे, कुठल्या अक्षरासाठी कुठले की-बोर्डवरील बटण उपयोगाला येते याची मराठीत अत्यंत सुंदर माहिती आपल्याला तुषार जोशी यांच्या http://marathitlihaa.blogspot.com/ या ब्लॉगवर वाचायला मिळेल. इथे बरहा आपल्या संगणकावर कसे इन्स्टॉल करावे याची चित्रांच्या व व्हिडिओच्या सहाय्याने अत्यंत सोप्या मराठी भाषेत दिलेली माहिती अमूल्य आहे.

विकिपीडिया http://mr.wikipedia.org/ वर बरहामध्ये मराठीत टाइप कसे करावे, बरहाची व्यंजने, स्वर, नुक्ता असलेली अक्षरे, विरामचिन्हे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. जी सहज वाचून समजण्यायोग्य आहे. जोडाक्षरे, रफार कसे द्यावेत, कुठले चिन्ह वापरले असता कुठले अक्षर तयार होते, लघु गुरु चिन्हे याविषयी सविस्तर माहिती इथे प्राप्त करता येते.

चला तर मग आता आपला कळफलक अर्थात को-बोर्ड सरसावा आणि मराठी टंकनाचा ‘श्री गणेशा’ करा पाहू.

Thursday, March 24, 2011

नो टेन्शन - स्वसंमोहन चिकित्सा

संमोहन चिकित्सा - मनात खोलवर शिरून आतील नकारात्मक विचारांचा, भीतीचा कचरा साफ करून सकारात्मक विचारांच्या सुगंधाने मनाला स्वच्छ आणि ताजेतवाने करणारी अशी ही संमोहन चिकित्सा पद्धती.



या उपचार पद्धतीतील एक अंग ‘स्वसंमोहन’ शास्त्रोक्त पद्धतीने तज्ज्ञ संमोहन चिकित्सकाकडून स्वसंमोहनाचे एकदा परिपूर्ण प्रशिक्षण घेतले की, कुणीही व्यक्ती स्वत:भोवती एक संरक्षक कवच बनवून मानसिक ताण तणावापासून स्वत:चा बचाव स्वत:च करू शकते.

ताण-तणाव हा काही काल-परवा ज्वालामुखी किंवा धूमकेतूसारखा अचानक उद्भवलेला नाही. इतिहासामध्ये त्यासंबंधी आपल्याला अनेक उदाहरणे सापडतात. महाभारतामध्ये ऐन युद्धाच्या वेळी अर्जुनाला प्रचंड मानसिक ताण जाणवत होता. नीती-अनीती, सत्य-असत्य अशा विविध प्रकारच्या द्वंद्वामध्ये त्याचे मन अडकले होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला जो बोधपर उपदेश केला तोच मानसिक ताण-तणाव मुक्तीसाठी जगातला पहिला ग्रंथ ठरला ‘श्रीमद् भगवद्गीता.’

अतिशय समर्पक भाषेत असलेली भगवद्गीता कुणीही वाचावी. तणावमुक्तीचा मार्ग निश्‍चितच सापडतो, कारण त्यामध्ये श्रेष्ठ असा कर्माचा सिद्धांत श्रीकृष्णाने सांगितला आहे. तोच सिद्धांत आजदेखील लागू पडतो. त्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले ‘मनाचे श्‍लोक’देखील आजही कुणालाही मनाची देखभाल आणि मशागत करायला समर्थ आहेत.

त्वरित लागू पडणार्‍या उपायांविषयी ...

* तणावग्रस्त वाटू लागल्यावर एखाद्या निवांताच्या ठिकाणी जा.

* डोळे मिटून सावकाश पूर्ण छाती भरून जाईपर्यंत हळूहळू श्‍वास घ्या.

* छाती पूर्णपणे भरल्यानंतर हळूहळू श्‍वास सोडून छाती रिकामी करा.

* श्‍वास घेताना आणि सोडताना ‘मी रिलॅक्स होत आहे.’ ‘माझे मन शांत होत आहे’, ‘मनावरचा ताण नाहीसा होत आहे’ अशा सूचना स्वत:ला देत रहा.

* संपूर्ण लक्ष श्‍वास-प्रश्‍वास प्रक्रिया, मनाला देणार्‍या सूचना, शारीरिक स्थिती यावर ठेवा.

* संपूर्ण शरीर सैल ठेवा.

* शक्यतो हवेशीर आणि शांत जागेची निवड करा. (एखादे मंदिर, तुमचे देवघर, ऑफिसातली केबिन अशा प्रकारची ठिकाणे उत्तम) वरील प्रयोगानंतर शांत, सामान्य (नॉर्मल) वाटल्यास आपल्याला तणाव कशामुळे जाणवला याची एका डायरीत नोंद करा. ज्या ज्या वेळी तुम्हाला तणाव जाणवेल, त्या प्रत्येक वेळेची नोंद सविस्तर तपशिलासहित करायला विसरू नका. असे केल्याने तुम्हीच पोलीस बनून गुन्हेगाररूपी ताण-तणावाला अटक करू शकता आणि त्याच्यावर विजय मिळवू शकता, अर्थातच दीर्घकाळ सातत्याने त्यावर लक्ष ठेवूनच.तणाव एकाच परिस्थितीमुळे निर्माण होतो असे नाही.

* ऑफिसमधील राजकारण, वाढत्या जबाबदार्‍या, कामाचे वाढीव तास

* स्वत:चे किंवा कुटुंबातील सदस्याचे दीर्घ आजारपण

* मुलांचे करीयर किंवा विवाह यासंबंधी समस्या

* घरातील किंवा ऑफिसातील मतभेद यापैकी ‘मेरा वाला कौनसा?’ यांची नोंद करा.
सौजन्य:- मानिनी, सामना
misteryogi1@yahoo.com

जीवनसत्त्वाची बाराखडी : ई

जीवनसत्त्व ‘ई’ हे एक ऍण्टी ऑक्सिडण्ट आहे. शरीरात तयार होणार्‍या हानीकारक पेशींची संख्या रोखते.


कुठून मिळवाल :

लोणी, अंडी, पूर्ण धान्ये, दूध, मका, बदाम, गहू, सोयाबीन, सूर्यफूल, भोपळा.

उपयोग :

रक्तप्रवाह सुरळीत ठेवते. पेशींना प्राणवायू पुरवण्यास मदत करते. रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते. कमतरतेमुळे होणारे

आजार :

त्वचा निस्तेज होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे. याशिवाय वंध्यत्व ही गंभीर समस्याही उद्भवू शकते. या जीवनसत्त्वाअभावी प्रजनन क्षमता कमी होऊ शकते.

सौजन्य:- मानिनी, सामना.

Tuesday, March 22, 2011

श्री. छत्रपती शिवाजी महाराज कि जय.


19th February is the date of Shivjayanti as declared by the Government. As per the Hindu culture, we should celebrate Shivjayanti as per Hindu lunar calendar i.e. on 22 March २०१०.

अधिक माहिती करिता इथे क्लिक करा.

सौजन्य:-

१. http://www.hindujagruti.org/hinduism/national-icons/shivaji-maharaj/


२. http://www.scribd.com/doc/2627443/-

Saturday, March 19, 2011

पी पाणी

उन्हाच्या झळा जाणवू लागल्यामुळे सरबताच्या गाड्यांवरची गर्दी चांगलीच वाढू लागली आहे. पण या सरबतापेक्षाही दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे अधिक आवश्यक आणि योग्य आहे. सरबतांमुळे नाहक वजन वाढते. त्यापेक्षा पाणी प्यायल्यामुळे शरीराची स्वच्छता होते. पाणी बेचव वाटत असले तरी उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच भरपूर पाणी पिण्याची सवय लावून घेतली पाहिजे.


पाणी पिण्याची सवय कशी लावायची

आठ बाय आठचा नियम लक्षात ठेवा :

दररोज आठ औंस मापाचे आठ पेले पाणी प्या. पण प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असलेले पाण्याचे प्रमाण तिच्या दैनिक कामकाजावर आणि वजनावर अवलंबून असते. यासाठी सोपी पद्धत अशी की तुमच्या वजनाला ३० ने भागा. जे उत्तर येईल तितके (उदा. तुमचे वजन ७० असेल तर तुम्ही दररोज २.३ लीटर) पाणी प्यायलेच पाहिजे.

पाण्याची बाटली सतत सोबत ठेवा :

तुम्ही जिथे जाल तिथे स्वत: सोबत पाण्याची बाटली घेऊन जा. पाणी साठवण्यासाठी एकतर काचेची बाटली किंवा चांगल्या प्रतीच्या प्लॅस्टिकची बाटली वापरा. यूज ऍण्ड थ्रो बाटल्या पुन:पुन्हा वापरल्यामुळे पाणी विषाक्त होण्याची भीती असते.

गजर लावा :

अनेकांना पाणी पिण्याची आठवणच होत नाही. तहान लागत नाही तोपर्यंत ही मंडळी पाणीच पीत नाहीत. अशांनी दर तासाला चक्क गजर लावावा. गजर वाजला की एक पेला पाणी प्यायचे अशी सवय लावा.

पाण्याची चव बदला :

अनेकांना पाण्याची चव आवडत नाही. अशा वेळी प्युरिफायर केलेले पाणी प्या किंवा किंचित गार पाणी प्या. अशा पाण्याची चव चांगली लागते किंवा पाण्यात लिंबू पिळा किंवा फळांच्या फोडी पाण्यात घालून ते पाणी प्या. वाळा, पुदिन्याची पाने यांचाही तुम्ही पाण्याची चव बदलण्यासाठी वापर करू शकता.

जलप्रचूर आहार घ्या :

पाणी पिण्यासोबतच अशी फळे जरूर खा ज्यात पाणी भरपूर प्रमाणात आहे. टरबूज, कलिंगड, काकडी अशी फळे या मोसमात खूप येतात. त्यांचा आपल्या खाण्यात समावेश करा.

अतिरेक नको :

जास्त पाणी प्यायल्याने सतत मूत्रविसर्जनास जावे लागते. त्यामुळे दिवसभरात खूप पाणी प्या. पण झोपण्यापूर्वी काही तास पाणी पिणे थांबवावे.

उच्च रक्तदाब किंवा पाय सुजणे आणि काही हृदय विकार असलेल्या लोकांनी जास्त पाणी पिऊ नये. किडनीच्या त्रासाचा इतिहास असेल, किंवा तुम्ही ट्रान्सप्लान्ट केले असेल तर पाण्याच्या सेवनाबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सौजन्य:- चिरायू, सामना.

जीवनसत्त्वाची बाराखडी - ड

नवजात शिशुला सकाळी आठ वाजेपर्यंत सूर्यप्रकाशात ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण यावेळी सूर्याच्या कोवळ्या किरणांमधील ‘ड’ जीवनसत्त्व त्या बालकाला मुबलक प्रमाणात मिळते. जे त्याच्या हाडांच्या बळकटीसाठी खूप गरजेचे असते. केवळ बालकांनाच नव्हे तर सर्वांनाच निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्हिटॅमिन ‘ड’ ची गरज भासते. व्हिटॅमिन ‘ड’ चे दोन प्रकार आहेत. ‘ड २’ (अर्गोकेलसीफेरोल) व ‘ड ३’ (कोलेफेलसीफेरोल)


* कुठून मिळवाल?

जीवनसत्त्व ‘ड’ मिळवण्याचे प्रमुख स्रोत सूर्यकिरणे आहेत. त्वचा जेव्हा उन्हाच्या संपर्कात येते तेव्हा जीवनसत्त्व ‘ड’च्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. याशिवाय दुग्धजन्य पदार्थ, अंड्यातील पिवळ्या बलकमधूनही ‘ड’ जीवनसत्त्व मिळते.

* उपयोग

हाडांच्या वाढीसाठी आणि बळकटीसाठी सर्वाधिक उपयुक्त कॅल्शियम पचवण्यात मदत करते. चेतासंस्थेचे काम सुरळीत करते.

* कमतरतेमुळे होणारे आजार

लहान मुलांना मुडदूस होण्याची सर्वाधिक शक्यता असते. तसेच हाडे ठिसूळ होण्याचा धोका.
सौजन्य:- चिरायू, सामना,

नो टेन्शन - ताणाचे परिणाम

मागील लेखात आपण विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंतच्या प्रत्येकाला जाणवणार्‍या ताणतणावाच्या कारणांचा थोडक्यात आढावा घेतला. त्याचा तपशिलात विचार करताना असे आढळले की क्षुल्लक वाटणार्‍या छोट्या छोट्या गोष्टी पण गंभीर स्वरूप धारण करू शकतात. सततच्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे कायमस्वरूपी मानसिक किंवा शारीरिक समस्या उद्भवू शकतात. उदा. -


१) एखाद्या गोष्टीबाबत मनात कायमचा न्यूनगंड/भयगंड निर्माण होणे.

२) जीवन जगण्यामध्ये स्वारस्य नसणे/जगण्याचा कंटाळा येणे/ आत्महत्या करावीशी वाटणे.

३) ओ.सी.डी. (ऑबसेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर) यामध्ये सारखे हातपाय धुणे, घरात सारखा केर काढणे यांसारख्या विविध घटनांची पुनरावृत्ती करण्याची विकृती निर्माण होते.

४) कोणीतरी माझ्या मागावर आहे, मला मारून टाकू इच्छित आहे, माझ्यावर कुणीतरी करणी केली आहे, मला कुणाची दृष्ट लागली आहे अशा प्रकारचे गैरसमज कुरवाळत बसणे.

५) स्वभाव संशयी/ चिडचिडा बनतो.

६) धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन यांसारख्या व्यसनांच्या आहारी जाणे.

७) सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीवरदेखील तणावाचा परिणाम होतो.

तणावग्रस्त अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:ला ‘एकाकी’ समजते. अशावेळी मित्र-मैत्रीण, नातलग, सहकारी यांपैकी कोणीच उपलब्ध नसेल तर परमेश्‍वराच्या चरणी केलेली प्रार्थना आपले मनोधैर्य उंचावण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरते.

कारण माणूस हा पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. कोणत्याही औषधाशिवाय माणूस केवळ निसर्गाच्या सानिध्यात राहून तणावमुक्त होऊ शकतो.

तणावाशी दोन हात करायला अनेक शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत. प्रत्येकाने आपल्याला आवडेल, योग्य वाटेल अशा पर्यायाचा स्वीकार करावा. अपेक्षित सकारात्मक परिणाम नक्कीच मिळेल.

१) छंदोपचार - आपल्या आयुष्याचा मागोवा घेतल्यास असे जाणवते की प्रत्येकाला कसला तरी छंद असतोच. उदा. वाचन, लेखन, छायाचित्रण, चित्रकला, गायन, वादन, गिर्यारोहण, नृत्य, संगीत ऐकणे, समाजसेवा वगैरे. अडगळीत पडलेला छंद शोधून काढावा. तणावाकडे दुर्लक्ष करून त्याचे दुष्परिणाम टाळण्याचा एक साधा आणि सोपा मार्ग.

मनोविकार निर्माण होऊन वेडा होण्यापेक्षा छंदवेडा होणे केव्हाही चांगले.

२) निसर्गाशी मैत्री करा - ‘तणावग्रस्त’ वातावरणापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात गेले असता मन प्रफुल्लित होते. छानसा धबधबा, हिरवीगार झाडे, समुद्रकिनारा, पक्ष्यांचा किलबिलाट अशा गोष्टी ‘मूड’ बदलण्यास जादूच्या कांडीप्रमाणे काम करतात.

सौजन्य:- misteryogi1@yahoo.com चिरायू, सामना.

Tuesday, March 15, 2011

कॉर्पोरेट मंत्र - पिंपळ व्हा!

 माझे आयुष्य पण या लेखातील पिंपळाप्रमाणेच होते. पण सध्या खंड पडला आहे. तरी पण मी पुन्हा एकदा प्रयत्न करेन पिंपळ बनण्याचा.

सध्या सर्वांनाच वेळ कमी पडतो. सकाळ होते. कामांना सुरुवात होते. गर्दी, दगदग, धावपळ, शोधाशोध, प्रवास, आदेश, कर्तव्य, प्रगती, ओढाताण, चढ-उतार सगळं काही दिनचर्येप्रमाणे घडत-उलगडत राहते. तेवढ्यात रात्र होते. दिवस संपतो. तो संपला पण आपल्यालाच संपल्यासारखे वाटते. दुसरा दिवस येणार हे माहीत असते, पण तो असाच जाणार हेही माहीत असते. ही जाणीव घेऊन येते चीडचीड, ऑफिसचे काम संपत नाही, घरातली कर्तव्य संपत नाहीत. आपल्याकडे काय नाही याचा हिशेब सुरू होतो. काय आहे यावर लक्ष द्यायची आपली सवय नसतेच म्हणून अर्धवट हिशेब लावून डोक्याला हात लावतो, पापण्या भिजवतो. बॉस, नवरा, बायको, नातेवाईक, सहकारी कसे आपल्याला समजत नाहीत याचा जाप करतो. उरला सुरलेला वेळही राग, रुसवे, द्वेष आणि वैताग करण्यात घालवतो. जे नाही त्यासाठी सगळेच रडतात पण जे आहे त्यात सुखी राहणारे कमी असतात. पिंपळाचा आदर्श ठेवा. त्याला कुठेही टाकले तरी तो रूजून येतो आणि मिळेल त्या हवा-पाण्याचा आधार घेत फोफावतो. याचा अर्थ पिंपळ फक्त ‘ऍडजेस्टमेंट’ करतो असे नाही. त्याला कळते फक्त फोफावणे, तेच त्याचे ध्येय असते. जे हवा पाणी असेल त्याच्याशी दोस्ती करून मोठे व्हायचे, फोफवायचे एवढेच त्याच्या मनात असते. बघता बघता पिंपळ सारा आकाश व्यापून टाकतो. मोठा होतो. भरपूर सावली देतो. कधी काळी त्याला उपटून टाकायचा विचार करणार्‍यांनाही तितकीच सावली देतो. पिंपळाचे आयुष्य फोफावणे आणि सावली देणे हेच आहे. तसे पाहिले तर मनुष्याचे आयुष्यही तसेच हवे. मोठे होऊन इतरांना मोठे करणार्‍या पिंपळासारखे जगा. येणार्‍या प्रत्येक परिस्थितीशी मैत्री करा. त्यातूनच मोठे व्हाल यावर विश्‍वास ठेवा. सर्वांना आपल्या समजूतदारपणाची व मायेची सावली द्या. पिंपळ होऊन पाहा. कधी एखाद्या नर्तकीप्रमाणे सळसळ करीत डोलणारा, कधी शंकराच्या तांडव नृत्याप्रमाणे आसमंत घुमवून टाकणारा, आवाज करीत आपल्या बाहूंनी सर्व जगाला कवेत घेणारा तो कधी स्वत:शीच मस्तीत शीळ घालत बसल्या जागी हसत हसत बोलणारा. कधी एखाद्या सर्वसंग परित्याग केलेल्या योग्याप्रमाणे निश्‍चल होऊन स्वत:ची सर्व जाणीव हरपून बसलेला. पिंपळाची पानं पुस्तकात ठेवली जातात. पिंपळाचा आदर्श ठेवलात तर तुमची आठवण ही जपली जाईल. मोठे व्हा, मोठे करा, पिंपळ व्हा.

सौजन्य:- dr.swapnapatker@gmail.com थर्ड जनरेशन, सामना. 

Sunday, March 13, 2011

आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे.

 केवळ 'आकर्षण' म्हणजे प्रेम नव्हे ! हे वाक्य उपरोधिक जरी वाटत असले तरी त्यामध्ये तथ्य आहे. एखादा मुलगा असो कि मुलगी. आपले शालेय शिक्षण संपवून कॉलेजमध्ये जाऊ लागल्यावर आपण एखाद्या वेगळ्याच जगात आलो आहोत असे त्यांना वाटते आणि ते स्वाभाविकच आहे. कारण त्यांना शालेय जीवनातून थोडी फार मोकळीक लाभलेली असते. शालेय जीवनात एखाद्या मुलाबरोबर बोलायला लाजणारी मुलं कोलेज जीवनात तासान तास गप्पा मारत राहतात. मग एखाद्या बरोबर मित्रो होते आणि त्यांना एकमेकांबद्दल काहीतरी वाटू लागते. आपल्यात एखादे सुंदर 'प्रेमफुल' उगवलं कि काय असा भास त्या युवकास अथवा युवतीस होतो. पुढे 'friendship day' च्या नावाखाली एकमेकांच्या हातात चिंध्या बंधने, 'valentine day' ला गुलाब देणे. ते एकमेकांनी स्वीकारणे म्हणजे प्रेमाला मान्यता देणे इत्यादी प्रकार सुरु होतात. पण वरवर वाटणारे हे 'प्रेम' प्रेम नसून किशोरवयीन अवस्थेतील एक 'आकर्षण' असते. हे त्यांना कधी उमगत नाही.
 Heart Image 402080
'प्रेम' व 'आकर्षण' यातील फरक न समजल्याने अनेक जन फसतात. प्रेमात सर्व काही सामावलं आहे असं म्हणतात. 'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम जरी   असलं तरी ते प्रेम करणं सोपं आहे. पण शेवट पर्यंत टिकवणे अवघड. 'मी तुझ्यावर प्रेम करतो' किंवा 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' अशी गुळगुळीत वाक्ये बोलून प्रेम कधी व्यक्त होत नाही. प्रेम हे केवळ नजरेतून व्यक्त होते. त्या क्षणभर नजरेला कुठल्याही परितोषकाची सर येणार नाही.

प्रेम आणि आकर्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे 'प्रेम' म्हणजे किंवा 'आकर्षण' किंवा 'आकर्षणयुक्त' प्रेमाचे वेडे मायाजाल झपाट्याने वाढत चाललंय. एखाद्या मुलीबरोबर चार शब्द बोलल्यावर आपण तिच्या प्रेमात पडलोय असं त्याला वाटते. मग त्याच प्रेम यशस्वी होत नाही. कारण त्याला खरे  प्रेम कळालेलं नसतं. त्याने केवळ आकर्षणआलाच प्रेम मानलेल असतं.

प्रेम या शब्दातील मर्म फार थोड्याच लोकांना कळालेलं आहे आणि ते ज्याला कलाल तो खरा भाग्यवान. एकमेकांना रोज पहाण किंवा एकमेकांसाठी वाटेल तसा पैसा उधळण म्हणजे प्रेम नाही ती केवळ कारागिरी ठरते. प्रेम म्हणजे एकमेकांनी एकमेकांविषयी आपल्या मनात कोरलेली मूर्ती असते.  प्रेम हे प्रेयसी भोवती लोटांगण घालून मिळवायचं नसतं. तर एकमेकांना समजावून घेऊन ते स्नेह धाग्यांनी गुंफून हृदयात जपायचं असतं. प्रेम हे केवळ प्रेम असतं. त्यात एकमेकांचे विचार जुळावे लागतात. जीवनातील कोणत्याही संकटात एकमेकांना ढालीसारखी साथ देण्याची तयारी असावी लागते. एकमेकांत प्रचंड समजूतदार पणा आणि सामंजस्य असावे लागते.  एकमेकांच्या मनातील भावना ओळखण्याची कुवत असावी लागते आणि हि कुवत ज्याच्यात आहे तो खरा 'प्रेमवीर'. नाही तर नुसत्या आकर्षणाला प्रेम मानून उपयोग काय? एकमेकांच्या भावना समजून घेणारा जोडीदार मिळाल्यास ते एकमेकांच्या साथीने स्वताचा परिणामतः समाजाचा उत्कर्ष करू शकतील.

सौजन्य  :- गिरीश बा. पाटील, कस्तुरी, पुढारी १७ जुने २००५.

Saturday, March 12, 2011

जीवनसत्त्वाची बाराखडी - क

शरीरातल्या टिश्यूंच्या वाढीसाठी आणि पुनर्निर्मितीसाठी जीवनसत्त्व ‘क’ची आवश्यकता असते. आपले शरीर क जीवनसत्त्वाची निर्मिती करीत नाही. म्हणून ते बाहेरून अन्न किंवा फळ-भाज्यांच्या रूपात मिळवावे लागते. आहारात जर क जीवनसत्त्व नसेल तर केस, त्वचा रूक्ष होणे, अंग सुजणे, हातपाय दुखणे अशा तक्रारी सुरू होतात. याशिवाय कॅन्सरला प्रतिबंध करणारे ऍण्टिऑक्सिडन्ट जीवनसत्त्व ‘क’मध्ये असल्यामुळे आहारात त्याची आवश्यक मात्रा जरूर असावी.


कुठून मिळवाल? : संत्रे, लिंबू, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे, कांदा, लसूण, रताळे, कोबी, पपई, आंबा, फ्लॉवर, टोमॅटो, अननस.

उपयोग : प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध, दात-हिरड्यांचे आरोग्य सुधारते, त्वचा-केसांचे पोषण करते, लोह पचवण्यास मदत करते.

कमतरतेमुळे होणारे आजार : रूक्ष केस, निस्तेज त्वचा, हिरड्यांना सूज येणे, रक्त येणे, नाकातून रक्त येणे, अंग सुजणे.

सौजन्य  :- मानिनी, दै. सामना.

आरोग्याचे निदर्शक

सौंदर्याची व्याख्या करताना ‘नखशिखांत’ असा उल्लेख केला जातो. जो पायाच्या नखापासून सुंदर तो ‘नखशिखांत.’ पण नखांचा संबंध केवळ सौंदर्याशीच नव्हे तर आरोग्याशीही आहे. सुंदर नखे जसे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते त्याहून अधिक ते उत्तम आरोग्याचे निदर्शक मानले जाते. त्यामुळे कुणाला कुठला आजार झाला आहे किंवा लक्षणे आहेत याचा अंदाज त्या व्यक्तींची नखे पाहून लावता येतो.


* न्यूरोसिस- मानसिक आजार असणार्‍या रुग्णांच्या नखांवर असामान्य बारीक बारीक रक्तशिरा दिसून येते.

* सीझोफ्रेनिया असणार्‍या रुग्णांची नखे लहान मुलांसारखी असतात. त्यांची रक्तशिरा अपरिपक्व असतात.

* रक्तसंचार बिघडल्यास नखे पातळ होतात.

* खाली वाकलेली नखे त्वचारोग, मानसिक दुर्बलता, सिफिलीस, ऍनिमिया आजाराची सूचना देतात.

* नखांवरील पांढर्‍या खडबडीत रेषा हृदयरोगाचा धोका सांगतात.

* नखांवरील ठळक आडव्या रेषा दीर्घ तापाचे लक्षण आहे.



नखे खराब होण्याची इतर कारणे -

ठिसूळ नखे- अनुवंशिकतेने नखे ठिसूळ-कोरडी होऊ शकतात. रासायनिक पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळेही नखे खराब होतात.

बुरशीजन्य नखे- ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले की त्याठिकाणी बुरशी किंवा सूक्ष्म जीवजंतूंचा संसर्ग वाढू लागतो. नखांमध्ये असलेले पातळ थर या जीवजंतूंची वाढ होण्यास उत्तम जागा असते. नखांना फंगल इन्फेक्शन झाल्यास नखे फुगीर, काळी, निस्तेज दिसतात. अशी नखे दिसू लागल्यास ऍण्टीफंगल ट्रिटमेंट घ्यायला हवी.

काळजी घ्या-

* नखे ही आरोग्याची निदर्शक आहेत. त्यामुळे पर्यायाने नखांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी-

* नखांच्या पोषणासाठी कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन, फॉस्परस इत्यादींची गरज असते. संतुलित आहार, फळे, रस इत्यादींच्या माध्यमातून ही गरज भागवता येऊ शकते.

* नखे जास्त लांब वाढवू नका. वाढलेल्या नखांत मळ साठतो. त्यामुळे नखे आजारी पडतात.

* नखे स्वच्छ ठेवा. यासाठी गरम पाण्यात हात पाच-सहा वेळा साबणाने स्वच्छ धुवा. सौम्य ब्लशर असणार्‍या ब्रशने नखे साफ करा. शक्य असल्यास महिन्यातून एकदा तज्ज्ञांकडून मॅन्युक्युअर करून घ्या.

* क्युटिकल्सना मॉइश्‍चरायझर द्या. यासाठी मॉइश्‍चरायझर क्रीमचा वापर करा.

* हलक्या दर्जाचे नेलपेण्ट लावू नका. नेलपेण्ट काढण्यासाठी वारंवार रिमूव्हरचा वापर करू नका.

* शक्यतो नखांना नेलपेण्ट लावणे टाळा.

* नखांमध्ये बिघाड होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सौजन्य :- मानिनी, दै. सामना.

नो टेन्शन - का ताणता?

आज मानसिक ताणतणाव आबालवृद्ध, स्त्री-पुरुष प्रत्येकालाच भेडसावत आहे. स्थळ-काळ, जात-धर्म यापैकी कशाचेच बंधन त्याबाबत नसते. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला जाणवणार्‍या तणावाचे कारण आणि स्वरूप वेगवेगळे असते.


विद्यार्थ्यांना जाणवणार्‍या ताणाची कारणे

* आई-वडिलांच्या अवाजवी अपेक्षा

* शिक्षण आणि नोकरी-व्यवसायातील जीवघेणी स्पर्धा

स्त्रियांना जाणवणार्‍या ताणामागील कारणे

* पती आणि बॉसकडून निर्माण होणार्‍या अवाजवी अपेक्षा

* घर आणि ऑफिस यांच्या व्यवस्थापनामध्ये होणारी दमछाक

* नोकरी-व्यवसायातील जीवघेणी स्पर्धा

* रजोनिवृत्तीच्या वेळी होणारे मानसिक आणि शारीरिक बदल

पुरुषांना जाणवणार्‍या ताणाची कारणे

* उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ न बसणारे गणित

* शिक्षण, नोकरी-व्यवसायामधील जीवघेणी स्पर्धा


वृद्धांना भेडसावणार्‍या ताणाची कारणे

* शिक्षण/व्यवसायानिमित्त परदेशी राहणारी मुले

* एकाकीपणामुळे वाटणारी असुरक्षितता

* वृद्धापकाळातील आजार

या कारणांव्यतिरिक्त आपल्या सार्‍यांचीच बदललेली मानसिकता तणाव निर्मितीचे प्रमुख कारण ठरते.

दुसर्‍याला नि:स्वार्थीपणे मदत करणे, इतरांच्या सुख-दु:खात सहभागी होणे या गोष्टी दुर्मिळ होत असून केवळ स्वत:चाच विचार करण्याची आत्मकेंद्री वृत्ती बळावताना दिसत आहे.

सहनशीलता, त्याग हे शब्द आपल्या शब्दकोशातून आपण हद्दपार केले आहेत. ‘इगो’ जपण्याची विकृती आपल्यात रुजली आहे.


मानसिक ताण किंवा स्ट्रेसची लक्षणे

मानसिक ताणाचे प्रतिबिंब शरीरावर उमटते आणि शरीरात विविध प्रकारचे नकारात्मक बदल उद्भवतात.

१) तळहाताला/संपूर्ण शरीराला वाजवीपेक्षा जास्त घाम येणे.

२) घशाला कोरड पडणे

३) हृदयाची धडधड वाढणे

४) रक्तदाब वाढणे

५) गरगरणे/ चक्कर येणे

६) डोकेदुखी/ पाठदुखी

७) भूक न लागणे/ अति प्रमाणात भूक लागणे

८) अनिद्रा/ अतिनिद्रा

९) रोजच्या साध्या-सोप्या कामात चुका होणे

१०) बेचैनी/ अतिशय भीती, चिंता

यासारखी एक वा अनेक कारणे मानसिक तणावाखाली वावरणार्‍या व्यक्तीमध्ये दिसतात.

काय कराल?

* मनाची तयारी करा.

* मानसिक तणावाचा चक्रव्यूह भेदण्यासाठी सर्वप्रथम स्वत:च्या मनाला सक्षम बनवा.

* ‘मी तणावमुक्त होईनच’ अशी सकारात्मक स्वयंसूचना म्हणजेच ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’चा पहिला धडा.

* तुमची स्वत:ची संरक्षक यंत्रणा तुमच्या सोबत असेल, तर जगातली कोणतीही व्यक्ती/ घटना तुम्हाला तणावग्रस्त बनवूच शकत नाही.


मन मोकळे करा

मानसिक तणावाच्या जाळ्यात आपण गुरफटले जातोय आणि सुटकेचा मार्ग सापडत नसेल तर गोंधळून जाऊ नका. जीवलग मित्र-मैत्रीण, नातेवाईक, सहकारी यापैकी जो तुम्हाला सर्वात अधिक जवळचा वाटत असेल त्याच्याकडे आपले मन मोकळे करा. कदाचित तो तुम्हाला तणावमुक्तीचा मार्ग दाखवू शकेल. पण तसे झाले नाही तरी तुमच्या मनाला ‘रिलॅक्स’ वाटलेच.
एकटे राहू नका

तणावग्रस्त मानसिक अवस्थेत एकटे राहिल्यास डोक्यात अधिकाधिक नकारात्मक विचार येतात. म्हणून सतत मित्र, सहकारी, नातेवाईक यांच्या सहवासात रहा.

सौजन्य  :- मिस्टर योगी, चिरायू, दै. सामना.

Friday, March 11, 2011

निसर्गाचे रौद्र रूप

 पुन्हा एकदा निसर्गाने आपले रौद्र रूप परदेशात दाखवले. पुन्हा एकदा सिद्ध झाले कि निसर्गानेच आपल्याला बनवले आहे व तोच आपल्याला मिटवू शकतो. त्याने पुन्हा एकदा दाखवले कि माणसाने निसर्गावरील अतिक्रमण थांबवले नाही तर तो काय करू शकतो आणि त्याची परिणीती किती भंयकर असू शकते.

अर्थात भारत पण सुनामीच्या विळख्यातून गेला आहे. अजून वेळ गेलेली नाही, अजूनही सरकारी टप्प्यावर निसर्ग वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले पाहिजेत. त्या सर्व लोकांचा, संस्थांचा मला अभिमान वाटतो जे निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात आपण पण खारीचा वाटा उचलला पाहिजे.

असो, पण निसर्ग माणसावर अतिक्रमण करतो तेव्हा किती भयाण परिस्थिती होते हे आपण सर्वांनी पहिले व अनुभवलेच आहे. आज-काल काही लोक वेगळे राज्य मागत आहेत, तसेच आतंकवादी, नक्षलवादी तसेच इतर लोक जे मानवतेच्या विरुध्द वागत आहेत, त्यांनी कृपया हे लक्षात ठेवावे जेव्हा निसर्गाला हे असह्य होईल, तेव्हा तो आक्रमण करेल आणि तेव्हा राज्य, देश ह्या सर्व सीमा तोडून टाकेल. 

तर मी  व माझ्या सारख्या संवेदनशील लोकांकडून एवढेच म्हणेन कि, आम्ही सर्व त्या लोकांसोबत आहोत ज्यांनी आताच सुनामी व भूकंप अनुभवला आहे. देव त्यांना या संकटातून वर येण्याची हिम्मत देवो.

Thursday, March 10, 2011

सावित्रीबाई फुले स्मृतिदिन

Savitribai Jotirao Phule Wife of Social Reformer Mahatma Phule
Savitribai Jotiba PhuleSavitribai PhuleFirst Indian Lady Teacher


 
Events Year


Birth of SavitriBai.(Naigaon,Tha. Khandala Dist. Satara) Father's name- Khandoji Nevse, Mother's name- Laxmi. 3rd Jan.1831

Marriage with Jotirao Phule. 1840

Education started. 1841

Passed third and fourth year examination from Normal school. 1846-47

Started school with Sagunabai in Maharwada. 1847

Country's first school for girls was started at Bhide's wada in Pune and Savitribai was nominated as the first head mistress of the school. 1 Jan.1848

School for adults was started at UsmanSheikh's wada in Pune. Left home with Jotirao for educating Shudra and ati Shudra's . 1849

First public Til-Gul programme was arranged by Mahila Seva Mandal. 14 Jan.1852

Phule family was honoured by British government for their works in the field of education and Savtribai was declared as the best teacher. 16 Nov.1852

Infanticide prohibition home was started. 28 Jan.1853

Prize giving ceremony was arranged under the chairmanship of Major Candy. 12 Feb.1853

"Kavya Phule"-the first collection of poems was published. 1854

A night school for agriculturist and labourers was started. 1855

'Lecture's of Jyotiba' was published. 25 Dec.1856

Orphanage was started. 1863

Opened the well to untouchables. 1868

Adopted son of Kashibai, a Brahmin Widow's Child. 1874

Done important work in famine and started 52 free food hostels in Maharashatra. 1876 to 1877

Adopted son, Dr.Yashwant was married to the daughter of Sasane. 4 Feb.1889

Death of her husband Jotirao Phule . 28 Nov. 1890

Chairperson of Satya Shodhak Samaj Conference at Saswad. 1893

Again famine in Maharashtra. Forced government to start relief work. 1896

Plague epidemic in Pune.Had done social work during this hour. 1897

Died while serving the Plague paitents during plague epidemic. 10 March 1897

Centenary year in Maharashtra and National honour. 10 March 1997 to 98

Government of India honoured her by publishing a postage stamp. 10 March 1998

सौजन्य :- अधिक माहितीसाठी http://www.mahatmaphule.com/savitribaiphule.html

पालकांची शाळा - घास काऊ चिऊचे...

हा घास चिऊचा...हा घास काऊचा...असं करत जेवणाचे चारदोन घास मुलांच्या पोटात ढकलताना समस्त आईंच्या नाकी नऊ येतात. एकतर स्वत:च्या जेवण्याच्या आधी मुलांना भरवायचे असल्यामुळे आईच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळेला असतो आणि मुलांना मात्र जेवणापेक्षा खेळण्यात रस असतो. आपल्या बाळाने काहीतरी खावं असं तिला सतत वाटत असतं. पण काय भरवायचं असा प्रश्‍न पडत असतो. काही मुलं सतत काहीतरी खातच असतात. अशा दोन्ही प्रकारच्या मुलांसाठी सकस आहाराची सवय कशी लावायची असे प्रश्‍न आईला नेहमी पडत असतात.

सकाळी शाळेत जाताना अनेक मुलं नाश्ता करायचे टाळतात त्याचा परिणाम त्यांच्या एकाग्रतेवर होतो हा आहार म्हणजे मेमरी ऍक्टिव्हेटर आहे त्यामुळे सकाळचा नाश्ता मस्ट आहे तसेच मुलांना तुम्ही नाश्त्याला काय देता हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे बर्‍याचशा महिला आपल्या मुलाला प्रत्येक पदार्थात साखर घालून देतात दुधात साखर, कॉन्फ्लेक्समध्ये साखर, भातात साखर, चपाती रोलमध्ये साखर असा आहार देऊन आई आपल्या मुलाच्या भावी आयुष्यात मधुमेहाचा पाया रचतेय हे तिच्या लक्षातही येत नसेल रेडी टू कुक पॅकच्या जमान्यातील आजकालची मुलं बाहेरचे खाणे, पॅकेट फूड अधिक प्रमाणात खातात घरचे अन्न खाणे टाळतात वेफर्स, समोसा, आइस्क्रीम, चॉकलेट, पॅकेट ड्रिंक, पिझ्झा, पॉपकॉर्न अशा चटपटीत पदार्थांमध्ये साखर आणि मिठाचे प्रमाण असते हल्लीची मुलं हे पदार्थ दररोज खात असतात यामुळे अनेक आजारांना ते लहानपणीच आमंत्रण देत असतात


मुलं काही काही पदार्थ अजिबात खात नाहीत उदा कारले, पालेभाज्या.. अशावेळी त्या पदार्थाचे नाव न सांगता तो पदार्थ त्यांच्या समोर ठेवा त्या पदार्थाला जरा फॅन्सी नाव देऊन तो पदार्थ मुलांना खायला द्या मुलं तो आवडीने खातील कारलं हे कारल्यासारखं मुलांच्या समोर आणू नका त्यात थोडा बदल करा पनीर भरलेले कारले किंवा बटाट्याच्या भाजीमध्ये कारल्याचा प्रयोग करून पहा बहुतेक लहान मुलांना व्हॅनीलाचा वास आवडतो अशावेळी व्हॅनिला इसेन्सचे काही थेंब त्यांच्या आहारात घाला त्या वासाने मुलं आवडीने तो पदार्थ खातील पदार्थ जास्त आकर्षक दिसावा यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करा मुलाच्या जेवणाची प्लेट सजवून ती त्याच्या समोर आणा हो, पण तो पदार्थ करताना त्यात जास्त साखर घालू नका

मुलांच्या वाढीसाठी आहाराबरोबरच पाणीही तितकेच महत्त्वाचे असते पाणी पिण्याकडे अनेक मुलं दुर्लक्ष करतात सहा वर्षांपर्यंतची मुलं क्वचितच संपूर्ण ग्लास पाणी पितात ग्लासातलं एक घोट पाणी पिऊन ते परत पाणी प्यायला येतात अशावेळी मोठ्यांना त्यांचा राग येतो खासकरून आई किंवा शाळेतल्या बाई ‘एकदाच काय ते संपूर्ण ग्लास पाणी पी आणि जा’ असा मुलाला दम भरतात त्याचा परिणाम उलट होतो मुलं पाणी पिणेच सोडून देतात कुठे बाहेर जायचे झाल्यास मुलांना लघवीला होऊ नये याची खबरदारी म्हणून अनेक पालक मुलांना पाणी प्यायलाच देत नाहीत अशा अनेक कारणांमुळे काही मुलं पाणी प्यायचंच सोडून देतात तहान लागल्यावर मुलांना पाणीच प्यायला द्या फळांचा रस, कोला म्हणजे पाणी नव्हे हे लक्षात ठेवा

* आहारात साखरेचे आणि मिठाचे प्रमाण बेताचेच ठेवा

* दररोज संतुलित आहार द्या कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्सचा समावेश आहारात असावा

* फॅट्स, प्रोटीन्सचा समावेश आहारात असावा

* मुलांना सतत पाणी प्यायला द्या पाणी देण्याचा कंटाळा करू नका

* कॉफी आणि कोलापासून त्यांना दूरच ठेवा या पेयांमुळे मुलं आळसावलेली होतात

* त्यांच्या दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने करा

* रात्री झोपण्याआधी दूध देणं चांगलं, पण दुधात साखर घालून देऊ नका कारण साखरेने एनर्जी वाढतेेे आणि झोपण्याच्या वेळेस मुलं ऍक्टिव्ह होतात

* जेवणाची वेळ ठरवा त्यांना वेळेवर जेवण द्या जेवणाच्या वेळी स्नॅक खायला देऊ नका

* पॅकेज फूड देणे टाळा घरातला आहार द्या

* तुम्ही बनवलेला पदार्थ दिसायला चांगला आणि चवदार असावा त्यामुळे मुलं तो आवडीने खातील मुलांना सतत पाणी प्यायला द्या पाणी देण्याचा कंटाळा करू नका

सौजन्य - स्वाती पोपट-वत्स (पोदार जम्बो किड्सच्या संचालिका), दै. सामना - ९ मार्च २०११.

Monday, March 07, 2011

हेल्थ फूडस् खरंच हेल्दी असतात का ?

हल्ली बाजारात सगळीकडे ‘हेल्थ फूडस्’ची धूम आहे. जिथे बघावं तिथे ‘कोलेस्टेरोल फ्री’ , ‘फायबर रिच’, ‘शुगर फ्री’, ‘लो कॅल.’ इ. लेबलं लावून कितीतरी खाण्याचे पदार्थ किंवा संबंधित पदार्थ दुकानाच्या किंवा मॉलच्या प्रत्येक शेल्फमधून आपल्याला खुणावत असतात. यातील बहुतांश पदार्थ एका चमचमीत किंवा एरवी ’ल्हपत्ूप्ब्’ समजल्या जाणार्‍या पदार्थाचा ‘देवकृपेने’ जणू आपल्याचसाठी बनवलेला आरोग्यपूर्ण अवतार असतो. उदा. फ्रायम्स, चीज बॉल, चीझी वेफर, बिस्कीट इ. पण जर हे सगळे ‘हेल्थ फूडस्’ खरंच एवढे हेल्दी असते, तर मग जागतिक आरोग्य संघटनेने सगळ्यांच्याच आहारात अमुक अमुक टक्के या फूडस्चा समावेश असलाच पाहिजे असेच फर्मान नसते का काढले? ठीक आहे. अगदी एवढ्या टोकाला पण नको जाऊया. अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये अशा लाखो ‘हेल्थ फूड’ कंपन्यांनी गेल्या २० वर्षात खूप प्रगती केली आहे (शेअर मार्केटमधे), पण तरी त्या देशातल्या लठ्ठ लोकांची संख्या कमी झालेली नसून वाढलीच आहे. आणि आता हेच आपल्याही देशात घडतंय. कारण मानसशास्त्रासंबंधीच आहे. अमेरिकेतच झालेल्या एका अध्ययनाप्रमाणे, ‘हेल्दी’ लेबल असलेले पदार्थ इतर पदार्थांच्या प्रमाणात जास्त खाल्ले जातात आणि म्हणून त्या हेल्थ फूडमधून मिळणार्‍या कॅलरीजचं प्रमाण बरंच वाढून लोकं उलट अधिक लठ्ठ होतात.


एक साधं उदाहरण घेऊया. एका डाएट जागरूक व्यक्तीसमोर फ्रेंच फ्राईस किंवा बटाट्याची भजी आणि बेक्ड हेल्थ ठेवलं तर ते हेल्थ स्नॅक्स घेतील. ठीक आहे. आता जर फक्त पहिले दोन विकल्प असते तर त्यांनी काय केलं असतं? जर खरंच हेल्थ कॉन्शियस असतील तर बहुदा पाच फ्रेंच फ्राईस किंवा २-३ भजी खाल्ली असतील. पण याच व्यक्तीने त्या हेल्थ स्नॅक्सचा अर्धा पुडा फस्त केला असता. असे का? कारण त्याला कुणीतरी कुठलं तरी हेल्थ लेबल लावलेलं होतं. याचा अर्थ हा नाही की ते तुम्हाला फसवतायेत. पण आपणच त्या हेल्थी नूडल्सच्या पाकिटावर ’makes two servings’ हे छापलेलं न वाचता ते माणसी एक पाकीट असं खातो आणि अशा वेळी तो ‘हेल्थी’ लेबल असलेला पदार्थ आपल्या आरोग्याला हानिकारक ठरतो.

- सौजन्य:- अमिता गद्रे-केळकर Diet कॉन्सुल्तांत (दै. सामना ५ मार्च २०११.)

Sunday, March 06, 2011

श्री. रामकृष्ण परमहंस जयंती


SRI RAMAKRISHNA


[1836-1886]



Sri Ramakrishna, who was born in 1836 and passed away in 1886, represents the very core of the spiritual realizations of the seers and sages of India. His whole life was literally an uninterrupted contemplation of God. He reached a depth of God-consciousness that transcends all time and place and has a universal appeal. Seekers of God of all religions feel irresistibly drawn to his life and teachings. Sri Ramakrishna, as a silent force, influences the spiritual thought currents of our time. He is a figure of recent history and his life and teachings have not yet been obscured by loving legends and doubtful myths. Through his God-intoxicated life Sri Ramakrishna proved that the revelation of God takes place at all times and that God-realization is not the monopoly of any particular age, country, or people. In him, deepest spirituality and broadest catholicity stood side by side. The God-man of nineteenth-century India did not found any cult, nor did he show a new path to salvation. His message was his God-consciousness. When God-consciousness falls short, traditions become dogmatic and oppressive and religious teachings lose their transforming power. At a time when the very foundation of religion, faith in God, was crumbling under the relentless blows of materialism and skepticism, Sri Ramakrishna, through his burning spiritual realizations, demonstrated beyond doubt the reality of God and the validity of the time-honored teachings of all the prophets and saviors of the past, and thus restored the falling edifice of religion on a secure foundation. Drawn by the magnetism of Sri Ramakrishna's divine personality, people flocked to him from far and near -- men and women, young and old, philosophers and theologians, philanthropists and humanists, atheists and agnostics, Hindus and Brahmos, Christians and Muslims, seekers of truth of all races, creeds and castes. His small room in the Dakshineswar temple garden on the outskirts of the city of Calcutta became a veritable parliament of religions. Everyone who came to him felt uplifted by his profound God-consciousness, boundless love, and universal outlook. Each seeker saw in him the highest manifestation of his own ideal. By coming near him the impure became pure, the pure became purer, and the sinner was transformed into a saint. The greatest contribution of Sri Ramakrishna to the modern world is his message of the harmony of religions. To Sri Ramakrishna all religions are the revelation of God in His diverse aspects to satisfy the manifold demands of human minds. Like different photographs of a building taken from different angles, different religions give us the pictures of one truth from different standpoints. They are not contradictory but complementary. Sri Ramakrishna faithfully practiced the spiritual disciplines of different religions and came to the realization that all of them lead to the same goal. Thus he declared, "As many faiths, so many paths." The paths vary, but the goal remains the same. Harmony of religions is not uniformity; it is unity in diversity. It is not a fusion of religions, but a fellowship of religions based on their common goal -- communion with God. This harmony is to be realized by deepening our individual God-consciousness. In the present-day world, threatened by nuclear war and torn by religious intolerance, Sri Ramakrishna's message of harmony gives us hope and shows the way. May his life and teachings ever inspire us.
UNIVERSAL TEACHINGS OF SRI RAMAKRISHNA


SEE GOD IN ALL

I have now come to a stage of realization in which I see that God is walking in every human form and manifesting Himself alike through the sage and the sinner, the virtuous and the vicious. Therefore when I meet different people I say to myself, "God in the form of the saint, God in the form of the sinner, God in the form of the righteous, God in the form of the unrighteous."

GOD IS WITHIN YOU

Do you know what I see? I see Him as all. Men and other creatures appear to me only as hollow forms, moving their heads and hands and feet, but within is the Lord Himself.

PERSEVERE IN YOUR SEARCH FOR GOD

There are pearls in the deep sea, but one must hazard all to find them. If diving once does not bring you pearls, you need not therefore conclude that the sea is without them. Dive again and again. You are sure to be rewarded in the end. So is it with the finding of the Lord in this world. If your first attempt proves fruitless, do not lose heart. Persevere in your efforts. You are sure to realize Him at last.

TRUST COMPLETELY IN GOD

What are you to do when you are placed in the world? Give up everything to Him, resign yourself to Him, and there will be no more trouble for you. Then you will come to know that everything is done by His will.

LOVE OF GOD IS ESSENTIAL

Unalloyed love of God is the essential thing. All else is unreal.
सौजन्य :- http://www.ramakrishna.org/

Saturday, March 05, 2011

कॉर्पोरेट मंत्र - आधार

आपण कुठेही उभे राहिलो की टेकतो. गरज नसतानाही नकळत आधाराची ओढ मनाला असतेच. आपण श्‍वास घेताना विचार करत नाही. आपण श्‍वास घेत आहोत ही क्रिया आपल्या विचारांवर अवलंबून नसते. तसेच स्वत:ला न सांगता आपण आधार शोधत असतो. घरात, कार्यालयात, गर्दीत, एकटेपणात, सगळ्यात. बाजूला बसून अश्रू पुसणे हाच फक्त ‘आधार’ आहे हे समजणार्‍यांनी जरा आपल्याच मनाशी संवाद साधावा. आधाराची व्याख्या काय? आधार म्हणजे दगड होणे. देवळातली देवाची मूर्ती होता आले तर तुम्ही आधाराचा खरा अर्थ समजाल. प्रत्येक देवळात येणारा भक्त आपल्या सुख-दु:खाचा हिशोब मांडत असतो. कधी हात जोडून रडतो तर कधी हसतमुखाने सुखाचे क्षण वाटतो. कधी जड मनाने माफीही मागतो, तर कधी रागरागाने आपले हक्क मागतो. आधार त्या भक्ताची गरज व अट्टहास दोन्ही असते. खरं तर आधार द्यायचा की नाही हा पर्याय त्या देवाकडे नसतोच कारण आधार देण्याची गोष्ट नाही, ती घेण्याची गोष्ट आहे. ज्याला गरज भासते तो ‘आधार’ घेतोच. कुटुंबात, मित्रांमध्ये, ऑफिसमध्ये अनेकदा लोक तेच तेच विषय आणि तीच तीच रडगाणी घेऊन येतात. ते काय सांगणार ते आपण आधीच हजार वेळा ऐकलेले असते. त्यांचा त्रास फार असला तरी त्या त्रासाचे मोल आपल्या मनात उतरत जाते. पण तसा विचार का करावा? जर तुम्ही त्या देवळातला दगड वाटत असाल तर ते तुमच्याकडून आधार घेणारच. अगदी तुमच्या समंतीशिवाय अशावेळी न वैतागता व न त्रागा करता थोड्या वेळासाठी देवळातला दगड व्हा. ऐकून घ्या. तुम्ही काही बोलला नाहीत तरी चालेल. देवळातील दगडाची मूर्तीही काहीच बोलत नाही. ती फक्त असते. तुम्हीही असा. कुणी आपला आधार घेत असेल तर घेऊ द्या. काही क्षणांसाठी दगडी का होईना पण देव होण्याची संधी सोडू नका. फक्त मोठेच छोट्यांना आधार देतात असे नाही. जगात कुणीही कुणाचाही आधार होऊ शकते. मिर्जा गालीबने त्यांच्या एका शायरीत म्हटले आहे.


‘‘एक पत्थर होना चाहिये सर पटकने के लिये’’ तसेच, कुणाचा तरी दगड व्हा. देव नका होऊ, आधार व्हा.

Friday, March 04, 2011

जीवनसत्वाची बाराखडी - ब

‘ब’ जीवनसत्त्वाचे १,२,३,५,६,१२ हे सहा प्रकार आहेत. या प्रत्येक प्रकाराचे उपयोग, त्यांची कार्यपद्धती व त्याच्या अभावाने उद्भवणारे आजार वेगवेगळे आहेत.


* ब-१

उपयोग : पचनव्यवस्था सुधारते, चेतनसंस्थेचे काम सुरळीत करते.

कशातून मिळेल : हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, अननस, कवच असलेली फळे.

कमतरतेमुळे होणारे आजार : बेरीबेरी.

लक्षणे : अशक्तपणा, अंगभर सूज येणे.

* ब-२

उपयोग : मनावरील ताण कमी करणे, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते.

कशातून मिळेल : यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध.

कमतरतेमुळे होणारे आजार : अरायबोफ्लेव्हिनोमीस.

लक्षणे : अंगभर जखमा.

* ब-३

कशातून मिळेल : हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट, दूध.

उपयोग : कोलेस्ट्रॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते.

* ब-५

कशातून मिळेल : धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक.

उपयोग : शरीरातील शक्ती वाढवते.

* ब-६

कशातून मिळेल : सोयाबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलांच्या बिया.

उपयोग : प्रथिनांचे पचन करते, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते.

* ब-१२

कशातून मिळेल : यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ.

उपयोग : पेशींची निर्मिती करते, रक्तपेशी तयार करण्यात मदत करते.

कमतरतेमुळे होणारे आजार : पर्निसियस ऍनिमिया.

लक्षणे : हिमोग्लोबिनचे कमी प्रमाण, जीभ, चेहरा, ओठ पांढरे होणे.

सौजन्य :- दै. सामना

Wednesday, March 02, 2011

शक्ती! भक्ती!! युक्ती!!!

तानाजीराव मालुसरे, समर्थ रामदास, स्वातंत्र्यवीर सावरकर हे शक्ती, भक्ती आणि युक्तीचे खंदे पुरस्कर्ते. या तीन पुरुषोत्तमांना मराठी राजभाषा दिनी स्मरणांजली!

महाराष्ट्र पराक्रमी योध्यांचे, महान संतांचे आणि श्रेष्ठ स्वातंत्र्यवीरांचे महान राष्ट्र! ३५० वर्षांपूर्वी शक्ती, भक्ती आणि युक्ती या त्रिसूत्रींचा योग्यरीत्या वापर करून महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली रायगड किल्ल्यावर हिंदुस्थानातील हिंदूंचे स्वतंत्र राज्य निर्माण केले. २६ फेब्रुवारीला नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी, रामदास नवमी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुण्यदिन असा शक्ती, भक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी योग जुळून आला होता! त्या तीन पुरुषोत्तमांना ही छोटीशी आदरांजली!


तानाजी मालुसरे मूठभर मिश्यांचा आणि परातीएवढ्या छातीचा महाराजांचा खेळगडी. महाडजवळील उमरठ हे तानाजीरावांचं गाव. उमरठचा मारुती आणि ग्रामदैवते मालुसर्‍यांना प्रसन्न होती. म्हणून तानाजीराव महाराजांचे खास मर्जीतील उमराव होते. तानाजीराव आरंभापासून स्वराज्याच्या कार्यात महाराजांसोबत होते. अफझलखान मोहीम, संगमेश्‍वरातील सूर्यराव सुर्व्यांची नाकाबंदी अशा महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या तानाजीरावांनी लीलया पेलल्या होत्या. कोकणातील रस्तेबांधणीच्या कामातही त्यांचा सहभाग होता. असे हे तानाजीराव आपल्या मुलाचं लगीन सोडून सिंहगडाचं लगीन लावण्याकरिता मोहिमेवर निघाले. (इतिहासतज्ज्ञांच्या मते कोंढाण्याचे नाव सिंहगड हे तानाजीरावांना वीरगती मिळण्यापूर्वीपासूनचे आहे) तर हा सिंहगड सर करून स्वराज्यात सामील करण्याकरिता तानाजीराव, सूर्याजीराव, शेलारमामा, पाचशे मावळ्यांनिशी नवमीच्या काळ्याकभिन्न रात्री डोणागिरीच्या कड्याला भिडले. दोन तरबेज मावळे प्रथम कडा येंगून वर गेले. वर पोहोचताक्षणी त्यांनी खाली दोर सोडले. तानाजीराव, सूर्याजी, शेलारमामा व इतर मावळे वर चढू लागले. स्वा. सावरकर तानाजीरावांच्या पोवाड्यात लिहितात, ‘तानाजी चढू लागले, स्वातंत्र्य चढू लागले!’ वर पोहोचताच क्षणी हर हर महादेवच्या आरोळ्या ठोकत मावळे, तानाजीराव उदयभान व मुघलांवर तुटून पडले. एकच रणकंदन माजले. शिवशाहीर म्हणतात, ‘तुटून पडली वीज विजेवर, वादळ-वणवा पिसाटला।’ आणि घात झाला उदयभानचा वार वर्मी लागून तानाजीराव धारातीर्थी पडले. संयम सुटलेल्या, घाबरलेल्या मावळ्यांना एकत्र करून विस्कटलेला डाव सूर्याजी आणि शेलारमामांनी जिंकला! सिंहगडावर भगवा फडकला. तानाजीरावांनी आणि मावळच्या पोरांनी आपल्या शक्तीच्या सामर्थ्यावर दिल्लीवाल्यांवर जरब बसवली आणि दिल्लीवाल्यांना बजावले, ‘मराठ्यांची पोरे आम्ही भिणार नाही मरणाला’ स्वत: महाराज तानाजीरावांना श्रद्धांजली अर्पण करण्यास जातीने उमरठ्यास आले. चितेवर शांतपणे पहुडलेले तानाजीराव महाराजांना म्हणत होते, ‘येतो महाराज, राग-लोभ नसावा, आपल्या भगव्या झेंड्याचा शिलेदार तानाजी मालुसरे! (दि. ४ फेब्रु. १६७०) तानाजी मालुसर्‍यांच्या शक्तीला त्यांचा पुण्यदिनी मानाचा मुजरा!

भक्तीपंथातील श्री समर्थ रामदास केवळ एक व्यक्ती नव्हती, ती एक सामाजिक आणि राजकीय चळवळ होती. भक्तिमार्ग आचरताना शुद्ध उपासना, विमळज्ञान, वैराग्य, ब्राह्मरक्षण व गुरुपरंपरा ही पाच आध्यात्मिक लक्षणे समर्थांनी सांगितली. भिक्षेच्या माध्यमातून १० ते २० वयोगटातील अनेक मुलांना समर्थांनी दीक्षा देऊन राष्ट्रीय पातळीवर एक संघटना उभारली. अकराशे मठ व चौदाशे महंतांचे जाळे हिंदुस्थानभर विणले व भक्तिमार्गाने हिंदुत्वाच्या वाढीचा ध्यास घेतला. भक्तीबरोबर रामदासांचा थोडाफार राजकारणाशीही संबंध आला. शिवाजी महाराजांना आदराने संबोधून समर्थ लिहितात, ‘देव ब्राह्मण आचारविचार। कित्येक जनासी आधार। सदा घडे परोपकार। देणे ईश्‍वराचे॥

क्षात्रधर्माविषयी लिहितात, ‘देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा। अशा आकंठ रामभक्तीत बुडालेल्या समर्थांस रामदासनवमीनिमित्त साष्टांग दंडवत।

विश्‍वात फक्त आहेत,

विख्यात बहाद्दर दोन,

जे आईकरता गेले,

सागरास पालांडून हनुमंतानंतर आहे या ‘विनायकाचा’ मान.

आपल्या युक्तीने ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन निसटून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या स्वा. वि. दा. सावरकरांना त्यांच्या पुण्यदिनी (२६ फेब्रुवारी १९६६) शतश: प्रणाम.

स्वाभिमान ठेवा, सैनिक व्हा, विज्ञाननिष्ठेने राहा, हिंदुस्थान अखंड करून जगात एक मोठे राष्ट्र म्हणून त्यास सन्मान प्राप्त करून द्या, हा त्यांचा संदेश कृतीत आणणे हीच त्यांना खरी आदरांजली.

सौजन्य - संदीप विचारे, (दै. सामना मधील लेख)