सौंदर्याची व्याख्या करताना ‘नखशिखांत’ असा उल्लेख केला जातो. जो पायाच्या नखापासून सुंदर तो ‘नखशिखांत.’ पण नखांचा संबंध केवळ सौंदर्याशीच नव्हे तर आरोग्याशीही आहे. सुंदर नखे जसे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते त्याहून अधिक ते उत्तम आरोग्याचे निदर्शक मानले जाते. त्यामुळे कुणाला कुठला आजार झाला आहे किंवा लक्षणे आहेत याचा अंदाज त्या व्यक्तींची नखे पाहून लावता येतो.
* न्यूरोसिस- मानसिक आजार असणार्या रुग्णांच्या नखांवर असामान्य बारीक बारीक रक्तशिरा दिसून येते.
* सीझोफ्रेनिया असणार्या रुग्णांची नखे लहान मुलांसारखी असतात. त्यांची रक्तशिरा अपरिपक्व असतात.
* रक्तसंचार बिघडल्यास नखे पातळ होतात.
* खाली वाकलेली नखे त्वचारोग, मानसिक दुर्बलता, सिफिलीस, ऍनिमिया आजाराची सूचना देतात.
* नखांवरील पांढर्या खडबडीत रेषा हृदयरोगाचा धोका सांगतात.
* नखांवरील ठळक आडव्या रेषा दीर्घ तापाचे लक्षण आहे.
नखे खराब होण्याची इतर कारणे -
ठिसूळ नखे- अनुवंशिकतेने नखे ठिसूळ-कोरडी होऊ शकतात. रासायनिक पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळेही नखे खराब होतात.
बुरशीजन्य नखे- ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले की त्याठिकाणी बुरशी किंवा सूक्ष्म जीवजंतूंचा संसर्ग वाढू लागतो. नखांमध्ये असलेले पातळ थर या जीवजंतूंची वाढ होण्यास उत्तम जागा असते. नखांना फंगल इन्फेक्शन झाल्यास नखे फुगीर, काळी, निस्तेज दिसतात. अशी नखे दिसू लागल्यास ऍण्टीफंगल ट्रिटमेंट घ्यायला हवी.
काळजी घ्या-
* नखे ही आरोग्याची निदर्शक आहेत. त्यामुळे पर्यायाने नखांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी-
* नखांच्या पोषणासाठी कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन, फॉस्परस इत्यादींची गरज असते. संतुलित आहार, फळे, रस इत्यादींच्या माध्यमातून ही गरज भागवता येऊ शकते.
* नखे जास्त लांब वाढवू नका. वाढलेल्या नखांत मळ साठतो. त्यामुळे नखे आजारी पडतात.
* नखे स्वच्छ ठेवा. यासाठी गरम पाण्यात हात पाच-सहा वेळा साबणाने स्वच्छ धुवा. सौम्य ब्लशर असणार्या ब्रशने नखे साफ करा. शक्य असल्यास महिन्यातून एकदा तज्ज्ञांकडून मॅन्युक्युअर करून घ्या.
* क्युटिकल्सना मॉइश्चरायझर द्या. यासाठी मॉइश्चरायझर क्रीमचा वापर करा.
* हलक्या दर्जाचे नेलपेण्ट लावू नका. नेलपेण्ट काढण्यासाठी वारंवार रिमूव्हरचा वापर करू नका.
* शक्यतो नखांना नेलपेण्ट लावणे टाळा.
* नखांमध्ये बिघाड होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सौजन्य :- मानिनी, दै. सामना.
No comments:
Post a Comment