केवळ 'आकर्षण' म्हणजे प्रेम नव्हे ! हे वाक्य उपरोधिक जरी वाटत असले तरी त्यामध्ये तथ्य आहे. एखादा मुलगा असो कि मुलगी. आपले शालेय शिक्षण संपवून कॉलेजमध्ये जाऊ लागल्यावर आपण एखाद्या वेगळ्याच जगात आलो आहोत असे त्यांना वाटते आणि ते स्वाभाविकच आहे. कारण त्यांना शालेय जीवनातून थोडी फार मोकळीक लाभलेली असते. शालेय जीवनात एखाद्या मुलाबरोबर बोलायला लाजणारी मुलं कोलेज जीवनात तासान तास गप्पा मारत राहतात. मग एखाद्या बरोबर मित्रो होते आणि त्यांना एकमेकांबद्दल काहीतरी वाटू लागते. आपल्यात एखादे सुंदर 'प्रेमफुल' उगवलं कि काय असा भास त्या युवकास अथवा युवतीस होतो. पुढे 'friendship day' च्या नावाखाली एकमेकांच्या हातात चिंध्या बंधने, 'valentine day' ला गुलाब देणे. ते एकमेकांनी स्वीकारणे म्हणजे प्रेमाला मान्यता देणे इत्यादी प्रकार सुरु होतात. पण वरवर वाटणारे हे 'प्रेम' प्रेम नसून किशोरवयीन अवस्थेतील एक 'आकर्षण' असते. हे त्यांना कधी उमगत नाही.
'प्रेम' व 'आकर्षण' यातील फरक न समजल्याने अनेक जन फसतात. प्रेमात सर्व काही सामावलं आहे असं म्हणतात. 'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम जरी असलं तरी ते प्रेम करणं सोपं आहे. पण शेवट पर्यंत टिकवणे अवघड. 'मी तुझ्यावर प्रेम करतो' किंवा 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' अशी गुळगुळीत वाक्ये बोलून प्रेम कधी व्यक्त होत नाही. प्रेम हे केवळ नजरेतून व्यक्त होते. त्या क्षणभर नजरेला कुठल्याही परितोषकाची सर येणार नाही.
प्रेम आणि आकर्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे 'प्रेम' म्हणजे किंवा 'आकर्षण' किंवा 'आकर्षणयुक्त' प्रेमाचे वेडे मायाजाल झपाट्याने वाढत चाललंय. एखाद्या मुलीबरोबर चार शब्द बोलल्यावर आपण तिच्या प्रेमात पडलोय असं त्याला वाटते. मग त्याच प्रेम यशस्वी होत नाही. कारण त्याला खरे प्रेम कळालेलं नसतं. त्याने केवळ आकर्षणआलाच प्रेम मानलेल असतं.
प्रेम या शब्दातील मर्म फार थोड्याच लोकांना कळालेलं आहे आणि ते ज्याला कलाल तो खरा भाग्यवान. एकमेकांना रोज पहाण किंवा एकमेकांसाठी वाटेल तसा पैसा उधळण म्हणजे प्रेम नाही ती केवळ कारागिरी ठरते. प्रेम म्हणजे एकमेकांनी एकमेकांविषयी आपल्या मनात कोरलेली मूर्ती असते. प्रेम हे प्रेयसी भोवती लोटांगण घालून मिळवायचं नसतं. तर एकमेकांना समजावून घेऊन ते स्नेह धाग्यांनी गुंफून हृदयात जपायचं असतं. प्रेम हे केवळ प्रेम असतं. त्यात एकमेकांचे विचार जुळावे लागतात. जीवनातील कोणत्याही संकटात एकमेकांना ढालीसारखी साथ देण्याची तयारी असावी लागते. एकमेकांत प्रचंड समजूतदार पणा आणि सामंजस्य असावे लागते. एकमेकांच्या मनातील भावना ओळखण्याची कुवत असावी लागते आणि हि कुवत ज्याच्यात आहे तो खरा 'प्रेमवीर'. नाही तर नुसत्या आकर्षणाला प्रेम मानून उपयोग काय? एकमेकांच्या भावना समजून घेणारा जोडीदार मिळाल्यास ते एकमेकांच्या साथीने स्वताचा परिणामतः समाजाचा उत्कर्ष करू शकतील.
सौजन्य :- गिरीश बा. पाटील, कस्तुरी, पुढारी १७ जुने २००५.
No comments:
Post a Comment