पुन्हा एकदा निसर्गाने आपले रौद्र रूप परदेशात दाखवले. पुन्हा एकदा सिद्ध झाले कि निसर्गानेच आपल्याला बनवले आहे व तोच आपल्याला मिटवू शकतो. त्याने पुन्हा एकदा दाखवले कि माणसाने निसर्गावरील अतिक्रमण थांबवले नाही तर तो काय करू शकतो आणि त्याची परिणीती किती भंयकर असू शकते.
अर्थात भारत पण सुनामीच्या विळख्यातून गेला आहे. अजून वेळ गेलेली नाही, अजूनही सरकारी टप्प्यावर निसर्ग वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले पाहिजेत. त्या सर्व लोकांचा, संस्थांचा मला अभिमान वाटतो जे निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात आपण पण खारीचा वाटा उचलला पाहिजे.
असो, पण निसर्ग माणसावर अतिक्रमण करतो तेव्हा किती भयाण परिस्थिती होते हे आपण सर्वांनी पहिले व अनुभवलेच आहे. आज-काल काही लोक वेगळे राज्य मागत आहेत, तसेच आतंकवादी, नक्षलवादी तसेच इतर लोक जे मानवतेच्या विरुध्द वागत आहेत, त्यांनी कृपया हे लक्षात ठेवावे जेव्हा निसर्गाला हे असह्य होईल, तेव्हा तो आक्रमण करेल आणि तेव्हा राज्य, देश ह्या सर्व सीमा तोडून टाकेल.
तर मी व माझ्या सारख्या संवेदनशील लोकांकडून एवढेच म्हणेन कि, आम्ही सर्व त्या लोकांसोबत आहोत ज्यांनी आताच सुनामी व भूकंप अनुभवला आहे. देव त्यांना या संकटातून वर येण्याची हिम्मत देवो.
No comments:
Post a Comment