मागील लेखात आपण विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंतच्या प्रत्येकाला जाणवणार्या ताणतणावाच्या कारणांचा थोडक्यात आढावा घेतला. त्याचा तपशिलात विचार करताना असे आढळले की क्षुल्लक वाटणार्या छोट्या छोट्या गोष्टी पण गंभीर स्वरूप धारण करू शकतात. सततच्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे कायमस्वरूपी मानसिक किंवा शारीरिक समस्या उद्भवू शकतात. उदा. -
१) एखाद्या गोष्टीबाबत मनात कायमचा न्यूनगंड/भयगंड निर्माण होणे.
२) जीवन जगण्यामध्ये स्वारस्य नसणे/जगण्याचा कंटाळा येणे/ आत्महत्या करावीशी वाटणे.
३) ओ.सी.डी. (ऑबसेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर) यामध्ये सारखे हातपाय धुणे, घरात सारखा केर काढणे यांसारख्या विविध घटनांची पुनरावृत्ती करण्याची विकृती निर्माण होते.
४) कोणीतरी माझ्या मागावर आहे, मला मारून टाकू इच्छित आहे, माझ्यावर कुणीतरी करणी केली आहे, मला कुणाची दृष्ट लागली आहे अशा प्रकारचे गैरसमज कुरवाळत बसणे.
५) स्वभाव संशयी/ चिडचिडा बनतो.
६) धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन यांसारख्या व्यसनांच्या आहारी जाणे.
७) सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीवरदेखील तणावाचा परिणाम होतो.
तणावग्रस्त अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:ला ‘एकाकी’ समजते. अशावेळी मित्र-मैत्रीण, नातलग, सहकारी यांपैकी कोणीच उपलब्ध नसेल तर परमेश्वराच्या चरणी केलेली प्रार्थना आपले मनोधैर्य उंचावण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरते.
कारण माणूस हा पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. कोणत्याही औषधाशिवाय माणूस केवळ निसर्गाच्या सानिध्यात राहून तणावमुक्त होऊ शकतो.
तणावाशी दोन हात करायला अनेक शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत. प्रत्येकाने आपल्याला आवडेल, योग्य वाटेल अशा पर्यायाचा स्वीकार करावा. अपेक्षित सकारात्मक परिणाम नक्कीच मिळेल.
१) छंदोपचार - आपल्या आयुष्याचा मागोवा घेतल्यास असे जाणवते की प्रत्येकाला कसला तरी छंद असतोच. उदा. वाचन, लेखन, छायाचित्रण, चित्रकला, गायन, वादन, गिर्यारोहण, नृत्य, संगीत ऐकणे, समाजसेवा वगैरे. अडगळीत पडलेला छंद शोधून काढावा. तणावाकडे दुर्लक्ष करून त्याचे दुष्परिणाम टाळण्याचा एक साधा आणि सोपा मार्ग.
मनोविकार निर्माण होऊन वेडा होण्यापेक्षा छंदवेडा होणे केव्हाही चांगले.
२) निसर्गाशी मैत्री करा - ‘तणावग्रस्त’ वातावरणापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात गेले असता मन प्रफुल्लित होते. छानसा धबधबा, हिरवीगार झाडे, समुद्रकिनारा, पक्ष्यांचा किलबिलाट अशा गोष्टी ‘मूड’ बदलण्यास जादूच्या कांडीप्रमाणे काम करतात.

सौजन्य:- misteryogi1@yahoo.com चिरायू, सामना.
No comments:
Post a Comment