लग्नाचे लाडू खाऊन वर्ष होत आलं. आता पेढे कधी देताय...? प्रत्येक नवीन जोडप्याला आत्या, मावश्या, काक्या, माम्या अशा नातेवाईकांकडून प्रत्येक भेटीत हा प्रश्न विचारला जातो. पण, गेल्या काही वर्षांत हा प्रश्न विचारण्याची वेळ त्यांच्यावर बर्याचदा यायला लागलीय. कारण लग्नानंतर किमान काही वर्षं तरी मूल नको, असा हल्ली अनेक जोडप्यांचा निर्णय असतो.
काही वर्षांपूर्वीपर्यंत लग्नाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच पहिल्या बाळाचं बारसं झालेलं असायचं. जणू काही याचसाठी लग्न केलं होतं, असं ठरवून जराही वेळ न दवडता घरात पाळणा हालायचा. आता मात्र परिस्थिती तशी राहिलेली नाही. हल्ली अनेक जोडपी ठरवून पाच किंवा अधिक वर्षं मूल नको असा निर्णय घेतात.
खरं तर स्त्रियांच्या नोकरी करण्याचा याच्याशी फारसा संबंध नाही, असं बायकांशी बोलताना लक्षात येतं. याआधीही बायका नोकरी करतच होत्या. मात्र बहुसंख्य लग्नं अगदी पारंपरिक पद्धतीने, म्हणजेच मुलाला मुलगी पसंत आहे पद्धतीने होत होती. यात, लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ देणं वगैरे गोष्टींना थारा नव्हता. त्यामुळे नोकरी करणार्या बायकाही लग्नानंतर वर्षाच्या आत मॅटर्निटी लिव्हवर जात होत्या.
साधारणपणे गेल्या दशकभरात अरेंज्ड मॅरेजमध्येसुद्धा मुलामुलींनी लग्नाआधी भेटणं, फिरायला जाणं रूढ झालं. त्यामुळे एकमेकांना समजून घ्यायला, आपल्या दोघांमध्ये एक तिसरी व्यक्ती येण्याअगोदर आपण एकमेकांना पुरेसा वेळ द्यायला हवा, ही जाणीव निर्माण झाली. शिवाय, बायका फक्त नोकरीऐवजी करिअरचा विचार करू लागल्या. मध्यमवर्ग झपाट्याने बदलत उच्च मध्यमवर्गात सामील झाला.
या सगळ्याचे अनेक परिणाम दिसू लागले. त्यातीलच एक म्हणजे अनेक घरांमध्ये पहिला पाळणाच पाचेक वर्षांनंतर हलू लागला.
ओळखीतल्या एका जोडप्याने नीट वेळापत्रकच आखून ठेवलंय. लग्नानंतर पाच वर्षं कर्ज संपवून टाकायचं. मधल्या काळात स्वतःचं घर, एक गाडी आणि पाच वर्षांनंतर मूल! दोघंही नोकरी करणारे. शिवाय, कामात सतत पुढे जाण्याची आस बाळगणारे. त्यामुळे सध्या त्यांना एकमेकांसाठीच वेळ नाही. त्यात मूल जन्माला घालून त्याच्यावर कशाला अन्याय करायचा?
आसपासच्या तरुण जोडप्यांना पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्यांच्यातलं शेअरिंग वाढलंय. एकमेकांना वेळ देणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. नोकरी करणार्या जोडप्यांमध्ये तर वीकेण्ड म्हटलं की शॉपिंग, मुव्ही, डिनर हे समीकरणच रूढ झालंय. त्यामुळे घरात बाळ येण्याआधी ही सगळी मजा मनसोक्त करून घ्यायची, असाही एक विचार यामागे असतो.
कुटुंबनियोजनाची साधनं, वाढतं वय, दगदगीचं जीवनमान यामुळे दोघांच्याही शरीरावर परिणाम होऊन गुंता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळेच, अनेक जोडपी सुरुवातीलाच योग्य वैद्यकीय सल्ला घेतात. पाच वर्षांनी चान्स घ्यायचा, यासाठी आम्ही स्वतःला मेंटलीही तयार केलंय. पण सगळी काळजी घेऊनही मूल होण्यात अडचण आलीच तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत, असं एका मैत्रिणीने अगदी ठामपणे सांगितलं.
विचारांमध्ये स्पष्टता आणि ठामपणा असल्यामुळे हल्लीची ही तरुण जोडपी नातेवाईकांच्या प्रश्नांनाही बधत नाहीत. लग्नाला काही वर्षं उलटल्यानंतरही मूल नसेल तर अशा जोडप्यांकडे बर्याचदा संशयाच्या, दयेच्या नजरेने पाहिलं जायचं. स्त्रियांना तर टोमणेही ऐकावे लागायचे. पण आता, ‘आमचं प्लॅनिंग आहे,’ असं एखादी नववधूही कॅज्युअली सांगून जाते.
मात्र, कुटुंबनियोजनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आर्थिक आहे. गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गाची जीवनपद्धतीच बदलली. अडीच वर्षांच्या मुलाला शाळेत प्रवेश घेण्यासाठीही हल्ली तीस ते चाळीस हजार रुपये एकरकमी लागतात. शिवाय, प्रत्येक वाढदिवसाला मॅकडोनाल्ड किंवा तत्सम रेस्तरॉंमध्ये पार्ट्या, महागडी गिफ्ट्स, वीकेण्डला मॉल्सच्या फेर्या, मुलांची स्वतंत्र रूम, त्यात थीमप्रमाणे सजावट ही सगळी सुखं आपल्याही मुलांना मिळावी, ही प्रत्येक आईबापाची इच्छा असते. पण, इतक्या सुखांसाठी खूप पैसे लागतात. खूप पैसे कमावण्यासाठी खूप काम करावं लागतं... आणि खूप काम करावं लागतं म्हणून ज्याच्यासाठी हे सगळं करायचं, त्याचं आगमनच लांबतं.

No comments:
Post a Comment