आज आपण संगणकावर मराठीत टंकनासाठी उपलब्ध असणारी काही सॉफ्टवेअर्स बघणार आहोत. ही सॉफ्टवेअर्स मोफत अर्थात फ्री असल्याने तुम्ही ती फुकटात आपल्या संगणकावर डाऊनलोड करून घेऊ शकता.
आज आपण संगणकावर मराठीत टंकनासाठी उपलब्ध असणारी काही सॉफ्टवेअर्स बघणार आहोत. ही सॉफ्टवेअर्समुक्त अर्थात फ्री असल्याने तुम्ही ती फुकटात आपल्या संगणकावर डाऊनलोड करून घेऊ शकता.
ओंकार जोशी या मराठी तरुणाने तयार केलेल्या ‘ग म भ न’ या सॉफ्टवेअरचा उल्लेख सर्वात आधी यायलाच पाहिजे. मराठी संगणक वापरकर्ते, मराठी संस्थळे यांच्यासाठी ‘ग म भ न’ हे एक वरदान ठरले आहे. आज अनेक मराठी संस्थळे ‘ग म भ न’च्या आधारावर रसिकांच्या सेवेला हजर झाली आहेत ती त्यातील सहज सोप्या अशा मराठी टंकनाच्या सुविधेमुळे. ‘ग म भ न’ने मराठी टंकनाची भीती दूर करण्यास मोलाचा हातभार लावला आहे हे निश्चित.
‘ग म भ न’मध्ये मराठीसह इतर लिपी जसे की तामीळ, तेलगू, हिंदी, गुजराती, गुरुमुखी, बांगला इ.सुद्धा उपलब्ध आहेत. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही टंकलेले सर्व काही साठवून ठेवण्याचीदेखील सोय आहे. इंटरनेटवर ऑफलाइन असतानादेखील तुम्ही हे सॉफ्टवेअर वापरू शकता हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. फायरफॉक्स असो अथवा आय इ सारखा ब्राऊझर. ‘ग म भ न’ दोन्ही ठिकाणी अत्यंत उत्तमरीत्या कार्यरत होते. हे सॉफ्टवेअर आपण http://www.gamabhana.com/ येथून मिळवू शकतो.
या संस्थळावर आपल्याला ‘ग म भ न’विषयी संपूर्ण माहिती, त्याच्या वापरासंबंधी मार्गदर्शन मिळते. तसेच ‘ग म भ न’ वापरताना काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी फोरमदेखील इथे उपलब्ध आहे. वापरकर्त्याला सहसा भेडसावणार्या प्रमुख अडचणीविषयी इथे सविस्तर मार्गदर्शनदेखील करण्यात आले आहे.
‘ग म भ न’च्या जोडीलाच नाव घेतले जाते ते ‘बरहा’ या मुक्तस्रोत सॉफ्टवेअरचे. सॉफ्टवेअरला मराठीत संगणकप्रणाली म्हणतात. बरे मित्रांनो, ‘बरहा’ हा खरेतर मूळ कन्नड शब्द आहे. याचा अर्थ होतो ‘लिखाण.’ ‘बरहा’ मराठीबरोबरच देवनागरी, आसामी, कोकणी, सिंधी अशा आणि इतर बर्याच भाषांसाठी उपलब्ध आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, कुठल्याही ई मेलचे अकाऊंट, ऑर्कुट, फेसबुक यावर आपण बरहाच्या सहाय्याने थेट मराठीत लिहू शकतो. आहे का नाही छान फायद्याची अशी ही संगणकप्रणाली ? इकडून लिहून आणा, तिकडे पेस्ट करा या भानगडीच नकोत. हवे तिथे थेट मराठीत लिहायला सुरुवात करायची.
‘बरहा’मध्ये एक बरहापॅड हा एक प्रोग्रॅम असून त्यामध्ये आपण मराठी व इतर उपलब्ध असलेल्या सर्व भाषांत लेखन करू शकतो. एकदा लिहिलेले पुन्हा संपादितदेखील करू शकतो. http://www.baraha.com/ या संस्थळावरून आपणही संगणकप्रणाली आपल्या संगणकावर डाऊनलोड करून घेऊ शकता. बरहामध्ये टाईप कसे करावे, कुठल्या अक्षरासाठी कुठले की-बोर्डवरील बटण उपयोगाला येते याची मराठीत अत्यंत सुंदर माहिती आपल्याला तुषार जोशी यांच्या http://marathitlihaa.blogspot.com/ या ब्लॉगवर वाचायला मिळेल. इथे बरहा आपल्या संगणकावर कसे इन्स्टॉल करावे याची चित्रांच्या व व्हिडिओच्या सहाय्याने अत्यंत सोप्या मराठी भाषेत दिलेली माहिती अमूल्य आहे.
विकिपीडिया http://mr.wikipedia.org/ वर बरहामध्ये मराठीत टाइप कसे करावे, बरहाची व्यंजने, स्वर, नुक्ता असलेली अक्षरे, विरामचिन्हे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. जी सहज वाचून समजण्यायोग्य आहे. जोडाक्षरे, रफार कसे द्यावेत, कुठले चिन्ह वापरले असता कुठले अक्षर तयार होते, लघु गुरु चिन्हे याविषयी सविस्तर माहिती इथे प्राप्त करता येते.
चला तर मग आता आपला कळफलक अर्थात को-बोर्ड सरसावा आणि मराठी टंकनाचा ‘श्री गणेशा’ करा पाहू.

No comments:
Post a Comment