शरीरातल्या टिश्यूंच्या वाढीसाठी आणि पुनर्निर्मितीसाठी जीवनसत्त्व ‘क’ची आवश्यकता असते. आपले शरीर क जीवनसत्त्वाची निर्मिती करीत नाही. म्हणून ते बाहेरून अन्न किंवा फळ-भाज्यांच्या रूपात मिळवावे लागते. आहारात जर क जीवनसत्त्व नसेल तर केस, त्वचा रूक्ष होणे, अंग सुजणे, हातपाय दुखणे अशा तक्रारी सुरू होतात. याशिवाय कॅन्सरला प्रतिबंध करणारे ऍण्टिऑक्सिडन्ट जीवनसत्त्व ‘क’मध्ये असल्यामुळे आहारात त्याची आवश्यक मात्रा जरूर असावी.कुठून मिळवाल? : संत्रे, लिंबू, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे, कांदा, लसूण, रताळे, कोबी, पपई, आंबा, फ्लॉवर, टोमॅटो, अननस.
उपयोग : प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध, दात-हिरड्यांचे आरोग्य सुधारते, त्वचा-केसांचे पोषण करते, लोह पचवण्यास मदत करते.
कमतरतेमुळे होणारे आजार : रूक्ष केस, निस्तेज त्वचा, हिरड्यांना सूज येणे, रक्त येणे, नाकातून रक्त येणे, अंग सुजणे.
सौजन्य :- मानिनी, दै. सामना.
No comments:
Post a Comment