आज मानसिक ताणतणाव आबालवृद्ध, स्त्री-पुरुष प्रत्येकालाच भेडसावत आहे. स्थळ-काळ, जात-धर्म यापैकी कशाचेच बंधन त्याबाबत नसते. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला जाणवणार्या तणावाचे कारण आणि स्वरूप वेगवेगळे असते.
विद्यार्थ्यांना जाणवणार्या ताणाची कारणे
* आई-वडिलांच्या अवाजवी अपेक्षा
* शिक्षण आणि नोकरी-व्यवसायातील जीवघेणी स्पर्धा
स्त्रियांना जाणवणार्या ताणामागील कारणे
* पती आणि बॉसकडून निर्माण होणार्या अवाजवी अपेक्षा
* घर आणि ऑफिस यांच्या व्यवस्थापनामध्ये होणारी दमछाक
* नोकरी-व्यवसायातील जीवघेणी स्पर्धा
* रजोनिवृत्तीच्या वेळी होणारे मानसिक आणि शारीरिक बदल
पुरुषांना जाणवणार्या ताणाची कारणे
* उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ न बसणारे गणित
* शिक्षण, नोकरी-व्यवसायामधील जीवघेणी स्पर्धा
वृद्धांना भेडसावणार्या ताणाची कारणे
* शिक्षण/व्यवसायानिमित्त परदेशी राहणारी मुले
* एकाकीपणामुळे वाटणारी असुरक्षितता
* वृद्धापकाळातील आजार
या कारणांव्यतिरिक्त आपल्या सार्यांचीच बदललेली मानसिकता तणाव निर्मितीचे प्रमुख कारण ठरते.
दुसर्याला नि:स्वार्थीपणे मदत करणे, इतरांच्या सुख-दु:खात सहभागी होणे या गोष्टी दुर्मिळ होत असून केवळ स्वत:चाच विचार करण्याची आत्मकेंद्री वृत्ती बळावताना दिसत आहे.
सहनशीलता, त्याग हे शब्द आपल्या शब्दकोशातून आपण हद्दपार केले आहेत. ‘इगो’ जपण्याची विकृती आपल्यात रुजली आहे.
मानसिक ताण किंवा स्ट्रेसची लक्षणे
मानसिक ताणाचे प्रतिबिंब शरीरावर उमटते आणि शरीरात विविध प्रकारचे नकारात्मक बदल उद्भवतात.
१) तळहाताला/संपूर्ण शरीराला वाजवीपेक्षा जास्त घाम येणे.
२) घशाला कोरड पडणे
३) हृदयाची धडधड वाढणे
४) रक्तदाब वाढणे
५) गरगरणे/ चक्कर येणे
६) डोकेदुखी/ पाठदुखी
७) भूक न लागणे/ अति प्रमाणात भूक लागणे
८) अनिद्रा/ अतिनिद्रा
९) रोजच्या साध्या-सोप्या कामात चुका होणे
१०) बेचैनी/ अतिशय भीती, चिंता
यासारखी एक वा अनेक कारणे मानसिक तणावाखाली वावरणार्या व्यक्तीमध्ये दिसतात.
काय कराल?
* मनाची तयारी करा.
* मानसिक तणावाचा चक्रव्यूह भेदण्यासाठी सर्वप्रथम स्वत:च्या मनाला सक्षम बनवा.
* ‘मी तणावमुक्त होईनच’ अशी सकारात्मक स्वयंसूचना म्हणजेच ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’चा पहिला धडा.
* तुमची स्वत:ची संरक्षक यंत्रणा तुमच्या सोबत असेल, तर जगातली कोणतीही व्यक्ती/ घटना तुम्हाला तणावग्रस्त बनवूच शकत नाही.
मन मोकळे करा
मानसिक तणावाच्या जाळ्यात आपण गुरफटले जातोय आणि सुटकेचा मार्ग सापडत नसेल तर गोंधळून जाऊ नका. जीवलग मित्र-मैत्रीण, नातेवाईक, सहकारी यापैकी जो तुम्हाला सर्वात अधिक जवळचा वाटत असेल त्याच्याकडे आपले मन मोकळे करा. कदाचित तो तुम्हाला तणावमुक्तीचा मार्ग दाखवू शकेल. पण तसे झाले नाही तरी तुमच्या मनाला ‘रिलॅक्स’ वाटलेच.
एकटे राहू नका
तणावग्रस्त मानसिक अवस्थेत एकटे राहिल्यास डोक्यात अधिकाधिक नकारात्मक विचार येतात. म्हणून सतत मित्र, सहकारी, नातेवाईक यांच्या सहवासात रहा.

सौजन्य :- मिस्टर योगी, चिरायू, दै. सामना.
No comments:
Post a Comment